मला काही सांगाचंय...- २०-२ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय...- २०-२

२०. दिलासा remaining

" तेच तर सांगते , मी बाहेर आले तेव्हा बघते तर काय सायकल ला चावीच नव्हती , थोडं घाबरल्यासारखं वाटलं तू असतास तर जरा मदत झाली असती पण ...

मग मला वाटलं कुणी तरी चावी काढून घेतली असेल , मला काही सुचत नव्हतं ... मी सहज म्हणून वॉचमन काकांना विचारलं की माझ्या सायकल ची चावी तुम्हाला दिसली का ?

तर सुदैव माझं कुणी तरी एक मुलाने चावी त्यांच्याकडे दिली होती ... "


" अरे वा ! हे एक ठीक झालं ... "


" हो , नाहीतर आज चांगलीच पंचाईत झाली असती ... तो मुलगा नाही मिळाला त्याचे आभार मानले असते .. "


" असेल कुणीतरी ... "


अस बोलतच आम्ही गावात पोहोचलो आणि आपापल्या घरी आलो ... मी सायकल घरी उभी केली आणि लगेच धावतच कबीर जवळ गेलो ...


" कबीर ... कबीर ... मला काही सांगायचं .. आज एक गंमत झाली .. "


त्याने हिरवीगार पान हलवून जणू मला विचारलं ' काय झालं दोस्ता...? '


" अरे आज ना , मी आणि ती सोबत घरी आलो .. तसं आम्ही आज सोबत कॉलेजला जायचं ठरवलं होतं पण माझी सायकल वेळेवर पंक्चर झाली होती म्हणून जाऊ नाही शकलो ...

आणि .. मी त्याला परत येतांनी आमचं जे काय बोलणं झालं ते सारं सांगितलं अन त्याच्या आडोश्याला बसलो ... "


त्याच्या सहवासात खूप छान वाटायचं ...

" खरी गंमत तर अजून बाकी आहे "


त्याच अस झालं की मी लवकरच सायकल दुरुस्त करून कॉलेजला गेलो होतो ... ती सायकल लावून आत गेली होती तर मी तिने कुठे सायकल लावली हे पाहत होतो आणि तिच्या सायकल जवळ जाऊन बघतो तर काय ? तिने नुसती सायकल उभी केली होती , सायकल ला चावी तशीच होती ... मला नेमकं काय करावं सुचत नव्हतं , आत जाऊन तिला शोधून चावी देणं मला जमलं नसतं म्हणून जरावेळ विचार करून मी ती चावी वॉचमन काकांना दिली ... अन त्यांना सायकल जवळ नेऊन त्या सायकल हि चावी आहे असं सांगितलं .... दिवसभर तिथं थांबणं मला शक्य नव्हतं मग मी घरी परतलो , पण तिला सुटी झाल्यावर चावी मिळेल कि नाही याची काळजी मला होती ... शेवटी वाट पाहत बराच वेळ झाला असे मला वाटलं ... ती आली की नाही हे पाहायलाच मी बाहेर पडलो होतो पण ती यायची होती म्हणून मी पुन्हा परत तिथं गेलो .... अशी झाली आज गंमत ....


ती पुढं वाचणार इतक्यात तिचा मोबाईल वाजला . तिने मोबाईल हाती घेतला तर सुजित चा फोन आल्याचं तिला समजलं ...


" हॅलो ... सुजित "


" हॅलो .."


" बोल ना सुजित काय म्हणतोस ? कुमार कसा आहे ? "


" कुमार शुद्धीवर आला ... जवळपास अर्धा तास झाला ... "


" तब्येत कशी आहे आता त्याची .."


" अजून कुणालाही त्याला भेटू दिल नाही . डॉक्टर त्याला चेक करत आहेत .... "


" बरा आहे ना तो ? आता वेळ खूप झाला नाहीतर मी आले असते त्याला भेटायला ... तर मी उद्याच येईल ..."


" डॉक्टर ICU मधून बाहेर आल्यावर कळेल कि त्याची तब्येत कशी आहे .. ठीक आहे तू ये उद्या .."


" हो . तिथं आल्यावर तुला फोन लावणार "


" हो चालेल , बरं तुला मी एक बुक तुझ्या बॅगमध्ये चुकून आल्याचं विचारलं होत , तूला मिळालं का ? "


" हो मिळालं ना ..."


त्यावर तिला विचारावं कि तू वाचलं का कुमारने लिहिलेलं .... अस त्याला वाटलं पण त्याने तिला विचारलं नाही ... त्याला तसं जमलं नाही " ठीक आहे येतेवेळी सोबत आणशील ते बुक

" फक्त इतकंच तो बोलला .


सुजितला सांगावं का ? कि मी कुमारची डायरी वाचत आहे ते अस तिला तिच्या मनात एक क्षणासाठी येऊन गेलं ... पण ती सुध्दा फोनवर तसं काही एक बोलली नाही ... " ठीक आहे मी आणते सोबत ते बुक येतेवेळी .... बरं मी फोन ठेवते "


त्यावर " हो ठीक आहे गुड बाय " म्हणत दोघांनी फोन ठेवला ...


डायरीत एक बोट ठेवून ती तशीच तिच्या हातात धरलेली .... दुसऱ्या हाती मोबाईल .... समोर काय आहे आणखी अस स्वतःला विचारत ती पुढं वाचणार तोच तिचा मनात एक प्रश्न आला ... हि डायरी सुजितने तर वाचली नसेल ना ? अजून कुणाला माहित आहे हे डायरीचं गुपित .......