Mala Kahi Sangachany - 24-2 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय...- २४-२

२४. अनपेक्षित remaining

10 - 15 मिनिटांनी त्यांना रस्ता काहीवेळ मोकळा दिसला आणि ते पलीकडे पोहोचले ... हॉटेल मध्ये जाऊन बसले ...


" दादा , जरा पाणी मिळेल का ? " अनिरुध्द


इतक्यात एक 12 - 13 वर्ष्याचा मुलगा लगेच पाण्याचे भरलेले ग्लास घेऊन हजर झाला आणि त्याने पटापट ते ग्लास टेबलवर ठेवले ... खांद्यावरच्या कापडाने टेबलवर किंचित सांडलेले पाणी पुसले ... डोळ्यावर आलेले केसांचे वळण हाताने मागे सारून " बोला , दादा लय ऑर्डर आहे ... "


जरावेळ त्याच्याकडे पाहून -


" दोस्ता , दोन फुल चहा .. " आर्यन


" आणखी काही ... "


( जरावेळ एकमेकांकडे पाहून ) शेवटी सुजीतच म्हणाला -

" अजून ... दोस्ता , दोन बिस्कीटचे पाकीट आणशील.. "


"अनिरुध्द , अजून काही घ्यायचं का ? " ऋतुराज


" नाही बस , बाकी काही नको .. " अनिरुध्द


तो मुलगा दिलेली ऑर्डर आणायला निघून गेला , त्यांनी पाणी घेतले ... जवळपास चारही ग्लास खाली झाले होते ... बराच दिवसांनी असे एकत्र बसून चहा घेण्याचा योग आला होता तर याक्षणी कुमार सोबत नाही याची खंत प्रत्येकाला होतीच ... राहून राहून त्याची कमी आणखी तीव्रतेने जाणवू लागली म्हणून एक दुसरी नजर एकमेकांना पाहून ते आजूबाजूला बघत होते ...


तो मुलगा चहा , बिस्कीटचे पाकीट घेऊन आला .. दोन रिकामे काचेचे ग्लास त्या ग्लासमध्ये दोन भरलेले ग्लास त्याने टेबलवर ठेवले , बाजूला दोन पाकीट ठेवून तो दुसरा ऑर्डर घ्यायला गेला ...


" आर्यन , याचे दोन कट कर बरं .. " अनिरुध्द ( एकात एक ठेवलेले ते दोन ग्लास त्याच्या समोर सरकवत बोलला )


सुजितने दोन कट चहा फोन ग्लासमध्ये टाकला आणि एक ऋतुराजला देत " हं ऋतुराज चहा घे ... "


त्यांनी चहा , बिस्कीट संपवले .


" मला वाटतं , घरून आणलेले जेवण बहुतेक खराब झाले असेल ... " सुजित


" हो , या कडक उन्हामुळे टिफिनबंद जेवण खराब व्हायची शक्यता आहे ... " ऋतुराज


" येथे आलो आहोत तर काही नाश्ता सोबत घेऊन जाऊ ..." आर्यन


" दादा , पाच सहा लोकांकरिता गरमागरम नाश्ता पार्सल द्या ... " अनिरुध्द


मग नाश्ता घेऊन ते दवाखान्यात परतले . कितीतरी वेळ असाच त्यांच्या विनवण्या करण्यात निघून गेला ... कुमारला एकदा जाग आली की सोबतच जेवण करू ... असं त्यांचं म्हणणं होतं ... शेवटी सर्वांनी मिळून त्यांना स्वतःच एक दोन घास कसेतरी भरविले ... मग सुजितचे वडील , प्रशांत आणि आकाश यांनी सुध्दा थोडं थोडं जेवण केलं ... सर्व आधी ज्या ठिकाणी बसलेले होते तिथे पुन्हा जाऊन बसले ....


" कुमार जागा झाला " इतकं ऐकण्यासाठी ते सर्व आतुरले ...


पण म्हणतात ना वेळ आल्याशिवाय ती घटना , प्रसंग , परिस्थिती , वातावरण घडत नाही अथवा बदलत नाही ... कालचक्र त्याच्या नियमानुसारच फिरतं आणि योग्य वेळ आली की जे व्हायचं ते घडून येतं .... आपण काय अपेक्षा केली याचा कालचक्राशी काहीही संबंध नसतो तर आपलं अपेक्षित किंवा अनपेक्षित असं काहीसं जीवन नावाच्या पुस्तकावर प्रत्येक क्षण आला तसा निघून जात नवनवीन अनुभव मनावर छापले जातात , काही आयुष्यभरासाठी तर काही फक्त आणि फक्त त्या एका क्षणापुरते ...


त्याचे आई वडील , सुजितचे वडील , त्याचा भाऊ आणि मित्र सारे यावेळी आपापल्या मनात काहीतरी अपेक्षित असं धरून होते , एक मात्र सर्वांच्या मनात सारखं होतं ते म्हणजे काही वेळातच कुमारला जाग येईल आणि तो लवकरच बरा होईल ... अगदी पूर्ववत ...


इतक्यात त्यांच्या समोरून एक नर्स हाताला लावलेल्या घड्याळाकडे पाहत कुमारच्या रूमकडे जायला लागली .. डाव्या हातावरच्या त्या घड्याळात वेळ तिने वेळ पाहिला , झटक्याने तो हात मागे घेत तिने रूमचा दरवाजा उघडला ... कुमार जवळ उभी राहून तिने परत एकदा किती वाजले ते पाहिले ... एक नजर कुमारला आणि दुसरी घड्याळात फिरणाऱ्या काट्यांना ती पाहत असता-


कुमार बंद पापण्याच्या आत डोळ्यांची हालचाल करत असल्याचं तिला दिसून आले ... काही क्षणात हातपाय मंद गतीने हलवित त्याला जाग येत असल्याचे लक्षण तिला जाणवले ... तरी तो पूर्णपणे जागा व्हायची ती वाट बघत होती ... ती रूमच्या आत येताच त्याने हालचाल करायला सुरुवात केली , खरं तर ऑपरेशन झाल्यावर रुग्णाला शुध्दीवर यायला कितीवेळ लागतो याचा चांगलाच अनुभव तिला आलेला होता म्हणून ती अचूक वेळेवर रूममध्ये आली ...


त्याने हात जरा हलवून त्याची मान किंचित वळवली ... मग हळूहळू पापण्यांची उघडझाप करत त्याने डोळे उघडले ... त्याने इकडे तिकडे नजर फिरवून मग त्या नर्सकडे त्याची नजर रोखली ... अगदी केविलवाण्या नजरेने तो तिला पाहत राहिला ... तिने त्याचा हात हातात घेऊन एक नजर घड्याळ पाहत त्याची रक्तवाहिका तपासली ...


" कसं वाटतंय ? "


त्याने तिला प्रतिसाद द्यायचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडून एकही शब्द बाहेर आला नाही ...


" त्रास होत असेल .. "


मग त्याने मानेनेच होकारार्थी खूण केली ..


" तू सध्या आराम कर मी आलेच .. "


पुन्हा त्याने हळूच मान हलवली ...


नर्स बाहेर येताच ती माउली तिला विचारायला लागली... " कुमार जागा झाला की नाही ? कसा आहे तो आता ? ठीक आहे ना ?"


" आत्ताच त्याला जाग आली , तुम्ही इथेच थांबा ... मी डॉक्टरांना बोलावून आणते ... " इतके बोलून ती निघून गेली ..


कुमार शुध्दीवर आला कळताच त्यांना कितीतरी पटीने जास्त आनंद झाला ...


डॉ. वैद्य लगेच त्याची तपासणी करायला आत गेले ... पाठोपाठ नर्स सोबतच रुममध्ये आली ...


" हॅलो कुमार , कसा आहेस ? "


त्याला बोलायला त्रास होत असल्याने हात जरा उचलून त्याने प्रतिसाद दिला ....


" ठीक आहे , त्रास करून घेऊ नको ... "


त्यावर पापणी जरा मिटून त्याने होकार दिला ...


डोक्याचे बारकाईने निरीक्षण करून डॉक्टर - " कुमार , डोकं जपून .. जास्त हालचाल करायची नाही ... "


त्याने हाताने इशारा केला ...


" आणखी कुठे दुखतं का ? "


त्यावर त्याने काहीही प्रतिक्रिया दिली नाही ..


" ठीक आहे , येतो मी नंतर भेटूया ... काळजी करू नकोस सर्व ठीक होईल ..."


परत येतांनी दार लावून दोघे बाहेर आले ...


यावेळी त्याचे आई वडील काही विचारण्यापूर्वीच डॉ . वैद्य स्वतःहून म्हणाले ...


" कुमार शुध्दीवर आला आहे आणि बरा आहे ... डोक्याला ताण पडत असल्याने त्याला आत्ता बोलता येत नाही , हळूहळू त्रास कमी व्हायला लागला की तो आधीसारखा आपल्याशी गप्पा गोष्टी सांगेल ..."


काहीसं निराश होऊन ते डॉक्टरला पाहत होते ... ती माऊली डोळ्यात पुन्हा एकदा जमा झालेले अश्रू पापणीतून खाली उतरताच पदराने पुसले पण दुसऱ्याक्षणी


" डॉक्टर मी त्याला भेटू शकते ? "


सर्वांनाच त्याला भेटायचं होतं पण मनातलं तसंच मनात ठेवून ते बाजूला उभे राहिले ...


" हो जा तुम्ही , या त्याला भेटून आणि त्याला त्रास होईल म्हणून त्याच्याशी गप्पा मारत बसू नका आणि शक्यतो त्याच्यासमोर कृपया रडू नका ... "


डॉक्टर परत आपल्या केबिनकडे जात असताना प्रशांत , सुजित ,आर्यन , अनिरुध्द ,ऋतुराज ,आकाश सर्वांनी घोळका घालून आम्हाला पण कुमारला पाहायचं आहे म्हणत जागीच थांबवलं ...


जरावेळ विचार करून -


" एक काम करा , तुम्ही सर्व काही ठराविक वेळेनंतर त्याला भेटायला जा, एकाचवेळी सगळे आत जाऊ नका आणि मी जे सांगितलं ते लक्षात असू द्या , त्याच्याशी जास्त बोलू नका .. ठीक आहे ... "


डॉक्टर तिथून जात्तांना नर्सला तसं सांगून गेले ... नर्स तिथेच बाजूला खुर्चीवर बसून आधी त्याचा आई वडिलांना आणि सुजीतच्या वडिलांना आत जा म्हणाली , लवकर परत या असं हि बोलली ...


तिला होकार देऊन ते तिघे त्याला पाहायला आत गेले ... ... ...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED