मला काही सांगाचंय...- २५-२ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय...- २५-२

२५. सोनेरी क्षण remaining

सायंकाळचे 7 वाजत आले , बाहेर सगळे लोक आपल्या दैनंदिन जीवनात आनंद, द्वेष , सुख दुःख , साथ , एकांत जे काय वाट्याला आहे ते मान्य करणाऱ्या तर काही त्याच गोष्टींचा विरोध करून असं का ? असा प्रश्न निर्मिकाला विचारणाऱ्या सर्वांचा आज च्या पुरता निरोप घेऊन सूर्य पश्चिमेला जाऊन पोहोचला ....


इतक्यात आकाशचे वडील आणि काही शेजारी भेटीला आले ... पुन्हा एकदा कुमार कसा आहे ? हा प्रश्न नव्याने त्यांना ऐकावा लागला आणि तेच ते एक उत्तर देताना मन जड होत होतं ... सर्व दिलासा देऊन परतून जायला लागले ...


मोबाईल मध्ये वेळ पाहत " आपल्याला ही निघायला हवं , आपण सर्वांना रात्री इथं थांबणं जमणार नाही .." ऋतुराज


" हो , बरोबर आहे ... " आर्यन


" आज आपण सर्व कुमारच्याच घरी जाऊ ..." अनिरुध्द


सर्वांनी होकार दिला तर कुमारचे वडील, सुजितचे वडील आणि आकाशचे वडील हे तिघेही तिथेच थांबले ... बाकीचे सर्व घरी परत जायला निघाले ... काही वेळातच ते सर्व त्याच्या घरी पोहोचले ... ती माउली घरी आल्या आल्या आवराआवर करायला लागली तोपर्यंत सर्वजण फ्रेश झाले ... चहा घेतला अन बाहेरच अंगणात बैठक मांडली ... गप्पा गोष्टी सुरु असता मध्येच कुमार सोबत असतांना घालवलेले क्षण प्रत्येकजण पुन्हा आज नव्याने जगत , एकमेकांना सांगू लागले ....


तिला गहिवरून आलं आणि ती डोळ्यातलं पाणी पुसून , आत गेली ... तसे सर्व शांत झाले ... आईच मन नकळत दुखवलं गेल्याची त्यांना जाणीव झाली ... प्रशांत पाठोपाठ आत जाऊन तिला धीर देत - " आई , तू रडू नकोस नाहीतर मला पण रडायला येईल ..." त्याच्या एका वाक्याने ती सावरली ...


" नाही , बाळ आता नाही रडणार , बरं सांग काय बनवू जेवायला ..? "


इतक्यात आर्यन आणि अनिरुध्द घरात आले ...


" तुम्ही काहीपण बनवलं तर आवडेल ... साधंच जेवण ... " अनिरुध्द


" काकू मी तुम्हाला मदत करतो ... " म्हणत आर्यन तिच्याआधीच स्वयंपाकघरकडे गेला ...


तिला मदत करायला लागला ... त्याला स्वयंपाकच नाही तर इतर कामातही मदत करायची आवड ...


अनिरुध्द बाजूच्या खोलीत जाऊन मोबाईल चार्जर कुठे मिळते का शोधू लागला ... आत गेल्यावर समोरच्या भिंतीवर बोर्डला लावलेला चार्जर त्याला दिसला , मोबाईल चार्जिंगला लावून त्याने भिंतीच्या कप्प्यात ठेवला ... त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि कितीतरी वेळ इथेच कुमारशी आपण गप्पा मारत होतो त्याला आठवलं ... जसजसा तो खोलीत वावरायला लागला तसतसा आठवणींचा थवा त्याचा मनात गर्दी करायला लागला आणि गतकाळात जे काय झाले ते नजरेसमोर काही पुसट , धूसर त्याला जाणवलं , नकळत ते क्षण आठवत तो कुमारची आवडती पुस्तक हाताने स्पर्श करून जणू कुमार आसपास असल्याचं अनुभवू लागला ... बरेचसे नावाजलेले पुस्तक वाचून उभे ठेवलेले, व्यवस्थित रचलेले .... त्या सर्वांत सहज ओळखू येईल असे एक लहान पुस्तक पुस्तकांवर आडवे ठेवलेलं त्याला दिसलं ... शेवटी मानवी स्वभाव जरा काही भिन्न दिसलं कि मन तिकडे धाव घेतं म्हणूनच मनाला आहारी जाऊन त्याने ते पुस्तक हाती घेतलं ...


पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मोठ्या अक्षरात नाव छापलेले ...


" दुनिया तुला विसरेल ... "


माननीय वा. वा. पाटणकर यांच्या शायरीचे वपु काळे यांनी केलेले रसग्रहण ...


त्याने सहज हाती घेऊन पुस्तक उघडलं ... काही पानांच्या मध्ये जास्तच अंतर असून तिथे काहीतरी असल्याचं त्याला दिसून आलं ... पुन्हा स्वभावाला औषध नाही हेच खरं अन त्याने पुस्तक वाचायचं सोडून आधी पटापट पान बाजूला सारून त्या पानांच्या मध्ये काय ठेवलं आहे असं स्वतःलाच विचारलं ... तो असा बिलकुल वागला नसता पण कुमारच्या डायरीबद्दल जेव्हा त्याने सुजितकडून ऐकलं होतं त्यामुळे इथं काहीतरी शंका आल्याने त्याने पान न वाचता बाजूला सारले ....


आणि बघतो तर काय ? एक कागद मधातून घडी मारलेला त्याला दिसला , क्षणाचा विलंब न करता त्याने तो कागद उचलला आणि समोर धरून वाचू लागला ...


आज मी माझं सारं आठवणींचं ओझं माझ्या डायरीत बंदिस्त करून ठेवलं ... मन काहीसं हलकं जाणवत आहे ... जीवनात जे काय घडून गेलं ते पुन्हा लिहितांना अगदी तेव्हा जितकं अनुभवलं नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मला जाणवलं ... आनंद , विरह, सुख , दुःख सारं सारं अगदी पुन्हा नव्याने घडत आहे असं वाटून गेलं... सारे क्षण पुन्हा जगायला मिळाले जणू काही ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी भूतकाळशी रजा घेऊन परतून आले ... " सोनेरी क्षण " आता तर कधीच विसरू शकणार नाही असे वाटते ...!


अन दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला मी किती स्वार्थी आहे ? मी केवळ माझाच विचार केला माझ्या जिवलग दोस्तांच काय ? त्यांनी हे अनुभवायला नको ... त्यांच्या जीवनात हि काही क्षण जे सोनेरी म्हणजे कधीच परतून येणार नाही असे , येऊन गेले पण आता ते सारे भूतकाळात विलीन झाले ... पण माझ्या डायरीसारखेच मी त्यांच्या जीवनांत आलेले ते क्षण लिहून ठेवले तर त्यांना पुन्हा एकदा तरी तसं जगता येईल , अथवा काहीसं अनुभवता येईल ...


मग मी निश्चय केला आजपासूनच कामाला सुरुवात करायची आणि ते सोनेरी क्षण पानांवर उतरवायचे ... इतक्यात जेव्हा त्यांच्याशी भेट होईल तेव्हा लिहिलेलं एक आठवणींची शिदोरी म्हणून माझ्याकडून माझ्या दोस्तांना एक भेट असेल ...

खाली त्या दिवसाची तारीख आणि त्याच नाव लिहिलेलं होतं ...


हे असं वाचून आणखी एक आश्चर्याचा धक्काच त्याला बसला ... अचानक डोकं जड झालं असं वाटलं , रेल्वे रुळावरून एका मागे एक अश्या अनेक रेल्वे सुसाट वेगाने धावत आहे तसे कित्येक प्रश्न मनात ये जा करू लागले ... अगदी सुन्न झाल्यासारखं त्याला जाणवलं जसा तळहात बर्फावर तसाच तासन तास ठेवावा ... काही वेळाने हात बाजूला केला असता काही क्षण जाणीव होत नाही तसेच अनिरुध्द अनुभवत होता ...


किंचित आवाज ऐकू आला , तो भानावर आला ... तसा पहिला विचार त्याच्या मनात आला अन हळूहळू विचारांनी त्याच्याभोवती एक अदृश्य पोकळी निर्माण केली ... ' कुमार तू स्वतः एक गुपित पुस्तक आहे कितीतरी रहस्य त्यात दडवून असतील ... तुझी डायरी जी अजून मला माहित नव्हती , केवळ सुजितने ती वाचली आहे तर आता हे एक आणखी नवीन ... पण तू आमच्याबद्दल काही लिहिलं आहे तर ते आहे तरी कुठं ...? सुजितला याबद्दल माहित असेल का ..? कि आणखी कुणाला ...? कि मीच आहे तो पहिला ... ? नशीबवान ? मला सर्वप्रथम माहीत झालं म्हणून ... कि कमनशिबी ? फक्त तू काहीतरी लिहिलं इतकंच मला कळलं ...


तर काय लिहिलं आणि कुणा कुणा बद्दल ? ठेवलं कुठं ? केव्हा वाचायला मिळेल ?

या विचारांनी , प्रश्नांनी त्याला त्रस्त केले..


एकांतात मन आणि ते मनातले बेलगाम विचार जंगली घोड्याप्रमाणे सुसाट वेगाने येतात आणि जातात ... अधीर करून सोडतात ... अधीर झालेलं मन जास्त चौकस असतं ... प्रत्येक गोष्टीची पारख करायचं ठरवतं , जे माहिती नाही ते माहित करून घेण्यासाठी योग्य वेळेची वाट न पाहता बसता शोध सुरु करतं ...


या नश्वर देहाची तुलना बाजूला ठेवली तर शेवटी आपण सगळे लोक सारखेच ... विचारांत काहीसा फरक पडतो तोही केवळ ती विशिष्ट व्यक्ती ज्या वातावरणात , ज्या कुणाच्या सहवासात वावरते त्यावर अवलंबून असते ...


ते पुस्तक जिथल्या तिथं त्याने परत ठेवलं आणि काही संशयित नजरेस पडतं का म्हणून तो पाहू लागला .... कप्प्यात ठेवलेले सर्व पुस्तक एक एक बाजूला करून त्याने पाहिले . जवळच भिंतीच्या खुंटीला लटकलेली एक बॅग दिसली त्याने लगेच खाली काढून ती उघडली पण त्याला निराशाच मिळाली , मग बिछान्याखाली वाकून पाहिलं तर एक जुनी पत्र्याची पेटी दिसली , त्याने ती बाहेर ओढून ताणून काढली पण त्यात काही जुने कागदपत्रे , जुनी पुस्तके , काही कपडे , काही लग्नपत्रिका सापडल्या पण जे तो शोधत होता तसं काहीच मिळत नव्हतं ... न राहवून त्याने नाही नाही म्हणत भिंतीला टेकून ठेवलेले कपाट उघडले वर वर नजर फिरवली तर त्यात कपड्यांखेरीज काही दिसेल हि आशा संपली ... आता तो घामाने पुरता ओलाचिंब झाला , जरा थकला - इतकं शोधून अखेर अपयशच मिळालं म्हणून पंखा सुरु करुन तो बिछान्यावर बसला ... ' दोस्ता कुठं ठेवलं आहे लिहून ते गुपितं सोनेरी क्षण ? तू स्वतः काही एक प्रश्नापेक्षा कमी आहे का ? ' स्वतःशीच बडबडला ...


कपाटावरून एक चेंडू खाली पडला , पंख्याच्या आवाजाने कपाटावर बहुदा निजलेला उंदीर घाबरून पळाला त्याच्या धावपळीमुळे तो चेंडू खाली पडला होता . त्याने तो चेंडू उचलला आणि परत वर ठेवतांना एका बॉक्सवर त्याची नजर खिळली .. वरून तो बॉक्स त्यात कधी बूट आणले असल्याचं त्याला समजलं .. पायांचे तळवे किंचित वर उचलून त्याने बॉक्स खाली काढला ...


" देवा , यांत तरी काही मिळू दे ... " म्हणत त्याने बॉक्स उघडला ...


तर एक कोर कट पांढरं पान त्याला दिसलं ... हळूच पानाला मोळ पडू न देता त्याने पण बाजूला केलं .... ते पण बाजूला सारताच मोठा खजिना सापडावा इतका आनंद त्याला झाला ... त्याच्या नजरे समोरच सोनेरी रंगाच्या वेष्टनावर वर जरा डाव्या बाजूला To , त्याखाली अनिरुध्द आणि खाली उजव्या बाजूला from, कुमार असं लिहिलेलं त्याने वाचलं अन आनंदाने त्याच्या डोळ्यांत आसवं चमकली ...