Mala Kahi Sangachany - 39 - 4 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय..... - ३९ - ४

३९. सोबती - जुने कि नवे - 4

तिच्याशी बोलत थांबण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती ... तरी मी म्हणालो , " किर्तीप्रिया , हे तुझं काय चाललं ? "

" कुठे काय ? काही तर नाही ... "

" अस मध्येच रस्त्यात सायकलच्या आड येणं , समजा माझा तोल गेला असता तर किंवा तुला लागलं असतं तर .."

" कुमार , ते होय , काही झालं नाही ना ... आधी तु सांग इतके दिवस कुठे होता ? दिसलाच नाही ... "

तिचं अस निष्काळजीने वागणं मला जरा आवडलं नव्हतं म्हणून " मला ना आधीच घरी यायला खूप उशीर झाला आहे आणि भूक पण लागली आहे , आपण नंतर बोलू ... "

" नाही , तु आता सांग , जास्त उशीर झाला नाही अजून ... जवळपास दोन महिन्यापासून तुझा पत्ता नाही .. "

" नंतर निवांत बोलू , आता मला जाऊ दे .. " मी तिला टाळण्याचा प्रयत्न करत होतो , तिला न भेटल्याचं कारण सांगावं लागलं असतं , तिच्यावरचा राग हे कारण सांगणं म्हणजे मग बोलता बोलता १४ फेब्रुवारी चा विषय निघाला असता याची मला भिती वाटत होती ...

तिने हॅण्डल आणखी घट्ट धरून " नंतर वगैरे काही नाही , तु सांगणार आहे की नाही .... बोल पटकन "

तिचा असा हट्टीपणा माझ्यासाठी अगदी नवीन आणि अनपेक्षित होता , तिचं वागणं जरा आश्चर्याचं वाटलं होतं ... " मी तुला नंतर सावकाश सांगतो , सध्या मला खूप भूक लागली आहे ... प्लिज .. "

" इतकीच भूक लागली आहे तर चल , आज माझ्याघरी जेवण कर ... " म्हणत तिने हॅण्डल सोडून माझा हात पकडला होता ...

तिच्या अश्या वागण्याने मला आश्चर्य आणि आनंद असा मिश्र भावनांचा अनुभव आला होता , " थांब , थांब जरा , त्यापेक्षा आपण आधी बोललो तर उत्तम होईल ... " मलाच माघार घ्यावी लागली होती .

दोन्ही हातांची घडी घालून , एखाद्या फौजदारासारखी ती समोर उभी होती ," बोल इतक्यात कुठे होता ? "

" ते काय झालं , यावर्षीचे विषय फार कठीण होते म्हणून पेपरसाठी खूप साऱ्या नोट्स काढाव्या लागल्या आणि अभ्यासाला जास्त वेळ दिला म्हणून ... "

" अस्स होय , इतका अभ्यास केला की घरातून बाहेर निघालाच नाही ! " डोळे मोठे करून ती बोलली तेव्हा मी हसण्यावाचून राहिलो नाही ...

" हसतोस काय ? "

" काही नाही , बस् सहज .. "

" खरंच तु खूप अभ्यास केला तर यावर्षी पण पहिला येशील नाही ??? "

तिच्या या प्रश्नाने मी सावरलो ," म माहित नाही ... बरं निघतो मी ... " इतकं बोलून मी सायकल घेऊन घरी आलो होतो .

पण तिने विचारलेला प्रश्न कितीतरी दिवस मनात तसाच राहिला होता तर त्यादिवशीच्या तिच्या वागण्याने मला पहिल्यांदा प्रश्न पडला की तिच्याबद्दल माझ्या मनात जी भावना आहे , तीच भावना तिच्या मनात देखील असेल का ? राहून राहून मन स्वतःच " हो " असं उत्तर देत होत ... तो अनुभव काही वेगळाच होता , याआधी तिच्या बाजूने मी केव्हाच विचार केला नव्हता पण त्यादिवशी तिने जसा हट्ट धरला होता , सोबतच माझा रस्ता आणि हात धरून तिचं मला थांबवणं खूप आनंददायी वाटलं होतं , पुन्हा पुन्हा तेच ते आठवून मी एकांतात सुख अनुभवत होतो ... तिच्यावरच प्रेम आता एका वेगळ्याच उंचीला पोहोचलं होतं , दिवसभरात कितीवेळ पापण्या बंद करून तिच्या आठवणीत रमतांना निघून जात होता आणि कित्येकदा तिचं नाव हातावर , पानावर लिहिलं माहीत नाही , तिचं नाव लिहिण हाही एक छंद बनला होता ... तर कबीरला एकूण एक गोष्ट सांगणं यांत एक वेगळा आनंद मिळत होता , त्याच्या सहवासात असलो कि मला तिच्या बद्दल बोलण्याचा मोह आवरता येत नव्हता , असंच कबीरजवळ एकदा बसलो होतो आणि मला तो किस्सा आठवला ,

" कबीर ... तुला एक गोष्ट तर सांगायची राहूनच गेली , दोन चार दिवस झाले बहुतेक , टायपिंग क्लास ला मी एकटाच गेलो होतो , टायपिंग मशीनवर पेज व्यवस्थित लावून मी कीबोर्डचा सराव करत होतो आणि बाजूला ठेवलेल्या पेजवरील शब्द टाइप करत होतो , अचानक तिची आठवण आली आणि तिचं नाव पेजवर मी कधी टाईप केलं समजलं नाही तर मी जेव्हा तीच नाव टाईप केल्याचं समजलो तेव्हा आणखी एकदा तिचं नाव टाईप करावंसं वाटलं म्हणून पुन्हा तिचं नाव टाईप केलं होतं , टाइपिंग मशीनने कोऱ्या कागदावर तीच नाव खूप छान दिसत होतं मग काय संपूर्ण पानभर तिचंच नाव टाईप केलं , पण पूर्ण टाईप करून झालं होतं मग मी ते पण मशीनमधून बाहेर काढलं आणि एक नजर पाहिलं , संपूर्ण पानावर एकच नाव ....kirtipriya , kirtipriya फक्त kirtipriya ... अन अचानक मनात विचार आला , एका क्षणाचाही विलंब न करता मी दुसऱ्या बाजूने टाईप केलं होतं , " kirtipriya I Love You ..." तेव्हा मन खुष झालं होत आणि एकदा आणखी , एकदा आणखी अस करत पानांची दुसरी बाजू संपली होती , असे मी का केलं कळलं नाही पण मन समाधानी होत , एक प्रवाहात मी वाहत होतो , तिच्या आठवणीत ते पानही जुळलं ... "

" पण मनातलं तिला सांगावं म्हटलं तर कसं सांगावं ? काहीएक कळत नाही , कबीर ... कधी ती वेळ येईल ? जे मी पानावर लिहिलं , तुझ्या फांदीवर लिहिलं , मनात कोरलं ते सारं काही तिला शब्द ओठांतून बाहेर आणून व्यक्त करता येईल ... कुणास ठाऊक ? बस् एकदा मला तिला मनातलं बोलून सांगायचं आहे ... एक भिती वाटते की मी माझ्या भावना व्यक्त केल्यावर तिचा गैरसमज झाला तर मैत्रीचं नातं मी गमावून बसेल काय ? म्हणून योग्य वेळेची वाट पहायला हवी .... "

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED