बारा जोतिर्लिंग भाग १४ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बारा जोतिर्लिंग भाग १४

बारा जोतिर्लिंग भाग १४

केदारनाथ याच्या अनेक पौराणिक कथा आहेत त्यातील पंचकेदार ची कथा अशी सांगितली जाते..
महाभारत युद्धात विजयी झाल्यावर पांडवाना भ्रातृहत्या च्या पापातून मुक्ति पाहीजे होती .
यासाठी त्यांना भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवायचा होता पण शंकर तर त्यांच्यावर रुसलेले होते .
भगवान शंकरांच्या दर्शनासाठी पांडव काशीला गेले पण तिथे शंकर त्यांना भेटले नाहीत .
ते सर्व त्यांना शोधत शोधत हिमालयात येऊन पोचले .
भगवान शंकरांना पांडवांना दर्शन द्यायचेच नव्हते म्हणुन ते अदृश्य होऊन ते केदारला जाऊन राहिले.
दुसरीकडे पांडवपण जिद्दीचे पक्के होते ते त्यांच्या मागोमाग केदारला गेले
भगवान शंकरांनी तोपर्यंत बैलाचे रूप धारण केले आणि ते अन्य पशुत जाऊन मिसळले .
पांडवांना शंका होतीच ..
त्यामुळे भीमाने आपले विशाल रूप धारण करून दोन पहाडांवर आपले पाय पसरले .
इतर सर्व गाई बैल तो निसटून गेले परंतु शंकरांच्या रूपातला बैल भीमाच्या पायाखालुन जायला तयार होईना भीमाने शक्ती लावुन त्या बैलावर झडप घातली पण बैल भूमीत अदृश्य होऊ लागला .
तेव्हा भीमाने त्या बैलाच्या पाठीचा त्रिकोणी भाग पकडला .
त्यावेळेस भगवान शंकर पांडवांची भक्ति, दृढ संकल्प पाहून प्रसन्न झाले .
त्यांनी तत्काळ दर्शन देऊन पांडवांना मुक्त केले .
या जागेवर आजही द्रौपदीसहीत पाच पांडवांची पूजा होते .
इथे शिवाची पूजा म्हशीच्या वशिंडाच्या रुपात तेव्हापासुन केली जाते .

त्या वेळेपासुनच भगवान शंकर बैलाच्या आकृति-पिंडाच्या स्वरूपात श्री केदारनाथ में पुजले जातात .
असे म्हणतात की जेव्हा भगवान शंकर बैलाच्या रूपात अदृश्य झाले आणि भीमाशी त्यांची झटापट होत असताना बैलरुपातील शंकरांच्या धडाच्या वरचा भाग काठमाण्डू इथे प्रकट झाला .
आता तेथे पशुपतिनाथचे प्रसिद्ध मंदिर आहे .
शंकरांचे बाहू तुंगनाथ मध्ये प्रकट झाले
मुख रुद्रनाथ मध्ये प्रकट झाले
नाभि मद्महेश्वर मध्ये आणि
जटा कल्पेश्वर मध्ये प्रकट झाल्या
यासाठी या चार स्थानासहित श्री केदारनाथ याला पंचकेदार म्हणले जाते .
इथे शिवशंकरांचे भव्य मंदिर बनलेले आहे .

आणखी एका कथेनुसार

हिमालयातील केदार नामक शृंगावर नर आणि नारायण नामक ऋषी तपस्या करीत असत.
हे महातपस्वी भगवान विष्णूचे अवतार समजले जात.
त्यांच्या ह्या तपस्येवर प्रसन्न होऊन शंकर प्रकट झाले, आणि त्यांच्या प्रार्थनेनुसार ज्योतिर्लिंगच्या रूपात सदैव येथे वास करीन असा त्यांना वर प्रदान केला .
हे स्थळ केदारनाथ पर्वतराज हिमालयाच्या केदार नावाचा शिखरावर स्थापित आहे .
त्या दोघा ऋषींच्या विनंतीनुसार शिवशंकर येथे वसले आहेत .
केदारनाथचा महिमा फार मोठा आहे .
उत्तराखण्ड मध्ये बद्रीनाथ आणि केदारनाथ ही दोन मुख्य तीर्थक्षेत्रे आहेत .
या दोहोंच्या दर्शनाचे मोठे माहात्म्य आहे .
जे भक्त केदारनाथचे दर्शन केल्याशिवाय बद्रीनाथ यात्रा करतात ,त्यांची यात्रा निष्फळ होते
केदारनाथ सहित नर-नारायण-मूर्ति च्या दर्शनाचे फळ म्हणुन समस्त पापांचा नाश होऊन जीवनापासुन मुक्ति प्राप्त होते .
आणखी एका कथेनुसार
स्कन्द पुराणात लीहीले आहे की एके वेळेस केदार परिसराविषयी जेव्हा पार्वतीदेवीनी शिवशंकरांना विचारले तेव्हा भगवान शिव त्यांना म्हणाले की केदार परिसर त्यांना अत्यंत प्रिय आहे .
ते आपल्या गणसेवकांसहीत सदासर्वदा केदार परिसरात वस्ती करतात .
इथे ते तेव्हापासुन रहात आहेत जेव्हा त्यांनी या सृष्टिची रचना करण्यासाठी ब्रह्मदेवाचे रूप धारण केले होते .

स्कन्द पुराणामध्ये स्थानाचा महिमा असाही वर्णन केला जातो
एक शिकारी होता ज्याला हरणाचे मांस खाणे अत्यंत प्रिय होते .
एकदा तो शिकारीच्या शोधात हा केदार परिसरात आला .
तो पुर्ण दिवस भटकत होता पण त्याला अजिबात कोणतीच शिकार मिळाली नाही .
संध्याकाळच्या वेळेस नारद मुनी या परिसरात आले तेव्हा दुरून त्यांना हरीण समजुन त्यांच्यावर बाण सोडण्यासाठी सज्ज झाला .

त्याने बाण सोडेपर्यंत सूर्य पुर्णतया अस्ताला गेला .
अंधार झाल्यावर त्याला असे दिसले की एक साप बेडकाला गिळत आहे आणि तो बेडूक मृत झाल्यावर त्तो शिवशंकर रुपात परिवर्तित झाला आहे .
अशा प्रकारे शिकाऱ्याने आणखी एक दृश्य पाहीले ते म्हणजे एका हरणाला सिंह मारायला लागला आहे,आणि ते मृत हरीण शिवाच्या गणांसोबत शिवलोकी जाऊ लागला आहे .
असे हे चकित करणारे अद्भुत दृश्य पाहुन शिकारी मात्र हैराण झाला होता .
याच वेळी नारद मुनि ब्राह्मण वेशात शिकाऱ्यासमोर साक्षात उपस्थित झाले .

त्या वेळेस शिकार्याने नारद मुनीना या अद्भुत दृश्या विषयी विचारले .
नारद मुनींनी त्याला समजावले की हे अत्यंत पवित्र क्षेत्र आहे .
या स्थानावर मृत झाले असता पशुपक्ष्यांना सुद्धा मुक्ति मिळत असते .
तेव्हा शिकाऱ्याला आपल्या पापकर्मांचे स्मरण झाले की कशा प्रकारे त्याने अनेक पशुपक्ष्यांची हत्या यापुर्वी केलेली आहे .
शिकाऱ्याने नारद मुनींना आपल्या मुक्तिचा उपाय विचारला .
नारद मुनिंकडून शिवशंकरा विषयी ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर शिकारी केदार परिसरात राहुन तो शिवाच्या उपासनेमध्ये लीन झाला .
मृत्यु नंतर त्याला शिव लोकामध्ये स्थान प्राप्त झाले .

क्रमशः