बारा जोतिर्लिंग भाग १७ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बारा जोतिर्लिंग भाग १७

बारा जोतिर्लिंग भाग १७

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे घृष्णेश्वर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.
दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्याजवळ हे मंदिर आहे.
शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या मंदिराचा उल्लेख आहे.

येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला.
सध्या आस्तित्वात असलेले हे मंदिर इ.स. १७३०मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर अहिल्याबाईंनी आपल्या सासु गौतमीबाई उर्फ बायजाबाई यांच्या स्मरणार्थ या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख शिलालेखात सापडतो.
या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. या मंदिराला २७ सप्टेंबर १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

हे मंदिर लाल दगडात बांधलेले असून त्यावर आकर्षक कोरीव काम करण्यात आले आहे.
या मंदिराचा सभामंडप २४ खांबांवर आधारलेला असून महादेवाचे लिंग पूर्वाभिमुख आहे.
या मंदिराचे काम सन ७५० मध्ये राष्ट्रकुल घराण्यातील दंतदुर्ग यांनी सुरु केले.
मंदिराचा अर्धा भाग लाल पाषाणात तर वरील भाग विटा व चुन्यात बांधलेला आहे.
प्रमाणबद्ध कळस सोन्याच्या पत्र्याने मढवलेला आहे.
अहिल्याबाईंनी येथील तीर्थकुंडाचा जिर्णोद्धार केला.
तीर्थकुंडाचा आकार एक एकर असून चोहीबाजूने प्रवेशद्वार आहेत.
वरपासून खालपर्यंत ५६ दगडी पायर्‍या आहे
कुंडातील महादेवाची आठ मंदिरे ही भारतातील अष्टतीर्थांची प्रतिकात्मक बांधकामे आहेत.

या मंदिराच्या उत्तरेस काशी तीर्थ, ईशान्येस गया, पूर्वेस गंगा, आग्नेयेला विरज, दक्षिणेस विशाल, नैॠत्येस नाशिक, पश्चिमेस द्वारावती व वायव्येस रेवा तीर्थ आहे.
या तीर्थांची लांबी-रुंदी १८५ बाय १८५ फूट आहे.
प्रत्येक कोपर्‍यात दगडाच्या दोन अशा एकूण आठ खोल्या आहेत .
या ठिकाणी पूर्वेकडून पायऱ्या उतरल्यानंतर डाव्या बाजूस शिलालेख आहे.

या शिलालेखात ‘श्री शके १६९१ शतकात अहिल्याबाईने श्री तीर्थराज शिवालयाचा जीर्णोद्धार केला असा उल्लेख आहे.
घृष्णेश्वरमंदिराच्या शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवरआहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थने वरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.


श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टची स्थापन १८८५ मध्ये झाली.
त्यापूर्वी देवस्थानचा कारभार तहसीलदारांच्या अधिपत्याखाली होता.
हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिपत्याखाली आहे.
पवित्र श्रावण महिन्यामध्ये घृष्णेश्‍वराचे दर्शन घेण्याचे मोठे धार्मिक महत्व आहे.
त्यामुळे या महीन्यात दर सोमवारी राज्यासह परप्रांतातून घृष्णेश्‍वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात.
या मंदिरात जाण्यासाठी आता नवीन मोठ्या दरवाजाचे काम करण्यात आलेले आहे.
दर्शनासाठी भाविकांनी आत प्रवेश केल्यानंतर या दरवजामध्ये मेटल डिटेक्टरद्वारे त्यांची तपासणी केली जाते. मोबाइल, कॅमेरा, पिशव्या, पर्स मंदिराबाहेर ठेवाव्या लागतात.

घृष्णेश्वरऔरंगाबादच्या वेरुळ गुंफांजवळ असणारं घृष्णेश्वर शिवलिंगाची दंतकथा रोचक आहे. चमत्काराने भगवान शंकराने एका मातेला तिचा मृत पुत्र पुन्हा जिवंत करून दिला असल्याचं सांगितलं जातं. यानंतर शिवशंकर लिंगरुपाने याच ठिकाणी राहिल्याचं म्हटलं जातं.

याविषयी एक सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते.

सुकर्मा नावाचा एक ब्राह्मण आणि त्यांची पत्नी सुदेश हे दक्षिण भारतातील देवगिरी पर्वताजवळ राहत होते. दोघेही भगवान शिवांचे भक्त होते.
परंतु त्यांना मूलबाळ झाले नाही, यामुळे ते फार दु:खी होते.
ज्यामुळे त्यांची पत्नी त्यांना दुसरे लग्न करण्याचा आग्रह करत असे.
पत्नीच्या आग्रहाने सुकर्माने आपल्या पत्नीची बहिण घृष्णेशी लग्न केले.

घृष्णा देखील शिवांची प्रख्यात भक्त होती .
भगवान शिव यांच्या कृपेने त्यांना एक मुलगा झाला. मुलाच्या प्राप्तीमुळे घृष्णेचे महत्व वाढले, परंतु यामुळे सुदेशला तिचा हेवा वाटू लागला.

हा मुलगा मोठा झाल्यावर त्याचे लग्न झाले आणि हे सर्व पाहून सुदेहाच्या मनात अधिक मत्सर निर्माण झाला. यामुळे तिने या मुलाचा नाश करण्याचा निर्णय घेतला आणि एके दिवशी सर्वजण रात्री झोपी गेल्यावर तिने घृष्णेच्या मुलावर चाकूने वार केले आणि त्याचे तुकडे तुकडे केले
ज्या तलावात रोज घृष्णा स्नान करायची मृतदेह त्या तलावामध्ये फेकून ती घरी आली आणि आरामात झोपली.

दररोजप्रमाणे सर्व लोक आपल्या कामात व्यस्त आणि नियमित कामात मग्न झालेले होते .

सुदेहासुद्धा आनंदाने घरातील कामांमध्ये गुंतली.
पण जेव्हा घरची सुन झोपेतून उठली तेव्हा तिला अंथरुणात रक्ताचे डाग पडलेले आढळले व तेथे पडलेले मांसाचे तुकडे पाहून ती आपल्या सासु घृष्णेकडे गेली आणि रडत तिच्या नवऱ्याबद्दल विचारले आणि शोक करू लागली.
सुदेहा देखील तिच्या दु:खामध्ये सामील झाली म्हणून कोणीही तिच्यावर संशय घेतला नाही .
सुनेचे बोलणे ऐकून तिने विचलित न होता रोजच्या पूजा आणि व्रते चालू ठेवली आणि सुधर्माही त्याच्या रोजच्या उपासनेत व्यस्त होता.
पूजा संपल्यावर घृष्णेने मुलाची शय्या रक्ताने भिजलेली पाहिली.
हे विचित्र दृश्य पाहुनसुद्धा तिला कोणत्याही प्रकारचा शोक झाला नाही.

ती म्हणाली की ज्याने मला पुत्र दिला आहे तो शिवशंकर त्याचे रक्षण करेल.
तो काळाचा सुद्धा काळ आहे, आणि तो आमचा संरक्षक आहे.
चिंता केल्यामुळे काहीही होणार नाही.
तिने भगवान शिवांची प्रार्थना केली आणि धैर्य ठेवून, ती या दु:खापासून मुक्त झाली.
आणि नेहमीप्रमाणे शिवमंत्र 'ओम नमः शिवाय' असा जप करत राहिली .
जेव्हा आपल्या मुलाचा पृथ्वीवरील मृतदेह घेऊन ती तलावाच्या काठावर गेली आणि तिने तो पार्थिव देह तलावामध्ये विसर्जित केला.
आणि तेव्हा तिने वर पाहीले तेव्हा तिला दिसले की तिचा मुलगा तलावाच्या काठावर उभा होता.
आपल्या मुलाकडे पाहताना तिला आनंद झाला.
भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले.

त्यांनी सांगितले की ते घृष्णाच्या भक्तीवर खूप प्रसन्न झाले आहेत आणित्यांनी तिला वरदान मागण्यास सांगितले.
भगवान म्हणाले की, जर आपल्याला आपल्या बहीणीला त्रिशूळाने ठार मारण्याची इच्छा असेल तर तसे सांगावे. पण घृष्णाने आदरपूर्वक महेश्वराला नमन केले आणि म्हटले की मोठ्या बहीणीचे रक्षण केले पाहिजे आणि आपणही तिला माफ करावे.
घृष्णाने विनवणी केली की मी गैरवर्तन करू शकत नाही आणि जे वाईट करतात त्यांचे चांगले करणे हेच चांगले मानले जाते.
तिचे विचार ऐकुन भगवान शिवांना खूप आनंद झाला आणि ते म्हणाले,
तु दुसऱ्या वराची मागणी करू शकतेस .
घृष्णा म्हणाली , महादेवा जर तुम्ही मला वर देऊ इच्छित असाल तर लोकांच्या संरक्षण आणि कल्याणासाठी तुम्ही येथे कायमच रहावे.
या प्रार्थनेने प्रसन्न होऊन, महेश्वर शिवजींनी त्या ठिकाणी कायमचे राहण्याचे वरदान दिले आणि तिथे तलावाच्या जवळ आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून वास्तव्य करायला सुरुवात केली.

घृष्णेच्या नावावरूनच या स्थानाला घृष्णेश्वर असे नांव पडले.

क्रमशः