समर्पण - 2 अनु... द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

समर्पण - 2

समर्पण-२


मला वाचन आणि संगीताची खूप आवड. जेव्हा मी घरी एकटी असायची तेव्हा वाचन करायचं किंवा आवडीचे गाणे ऐकायचे हा माझा नित्यक्रम होता. अभय ला यापैकी काहीच आवडायचं नाही. तो त्याच्या कामातच इतका व्यस्त असायचा की त्याला यासाठी वेळच मिळायचा नाही. सुट्टीच्या दिवशी तो मात्र मला बाहेर घेऊन जायचा, खूप फिरायचो आम्ही पण बोलणं मात्र कामपूरतच व्हायचं आमच्यात. एकदा असच अभय ऑफिस मधून घरी लवकर आला आणि मला बोलला की त्याला पंधरा दिवसांसाठी बंगलोर ला जायचं आहे. मी आधीच खूप कंटाळली होती एकट राहून अन त्यात अभय पुन्हा घरी नसणार हा विचारच करवत नव्हता मला. मी बोलली त्याला,

"अभय, किती दिवस हे चालणार रे आपलं??"

"म्हणजे, काय म्हणायचं आहे तुला?"

"आपण ३ वर्ष झाले सोबत आहोत पण आपण किती ओळखतो एकमेकांना? का तू असा वागतो, लांब राहतो माझ्या पासून, मी आवडत नाही का तुला?"

"असं काहीही नाही नैना, तू जास्त विचार करते आहेस."

"अभय, तुझ प्रेम आहे का रे माझ्यावर??"

"........."

"मी काहीतरी विचारलं तुला अभय?"

"मी नवरा म्हणून कुठे कमी पडलो नैना, सगळंच तर तुझ्या मनासारखं वागतेस तू, आणि मलाही आवडत नाही तुला रोकटोक
करायला, मग अजून काय हवय तुला "

"मला हे सगळं काही नको मला फक्त तुझा वेळ आणि प्रेम हवय अभय, कंटाळली आहे मी या एकटेपनाला"

"हे बघ नैना, हे प्रेम वैगरे मला काही कळत नाही, मला एक कळतं तू माझी जबाबदारी आहे आणि तुझ्या ईच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे, आणि ते मी करत आहे "

"मी फक्त तुझी जबाबदारी आहे? त्या पेक्षा जास्त खरचं काहिच भावना नाहीत तुझ्या माझ्या बद्द्ल?"

"मला उशीर होतोय नैना, मला तयारी करायची आहे, तू मला हेल्प करशील की मी एकट करू सगळ??"

त्याच्या या उत्तरावर मला काहीच बोलावं वाटलं नाही, खूप दुःख झालं जेंव्हा हे कळलं की अभय मला फक्त त्याची जबाबदारी मानतो. पण स्वतःचीच समजूत घातली की एखाद्याला नाही जमत भावना व्यक्त करायला याचा अर्थ हा नाही की त्याला आपली काळजी नाही. कितीही मनाला समजावलं तरी वाईट वाटत होतं की ज्या प्रेमाची अपेक्षा मी करत आहे ते मला मिळणारच नाही आहे.
------------------------------------------------------------------

एका रविवारी माझी मैत्रीण नम्रता मला एका गायनाच्या कार्यक्रमाला घेऊन गेली. अभय ला त्यात काही रस नव्हता त्यामुळे त्याच्या येण्याचा काही प्रश्न नव्हता. नम्रता माझी बालमैत्रीण, खूप चांगल्याने ओळखायची मला. माझा मूड कसा चांगला करायचा हे तिला खूप चांगलं माहीत होतं. मला मनवण्यात तिचा वेळ गेला आणि आम्हाला उशीर झाला कार्यक्रमात पोहोचायला. कसतरी धावत पळत पोहोचलो तर गाण्याचा आवाज कानी पडला,


"तेरा मुझसे है पहले का नाता कोई
यूँ ही नहीं दिल लुभाता कोई
जाने तू या जाने ना, माने तू या माने ना"


जसा तो आवाज कानावर पडला मनातून अस वाटलं की मी ओळखते हा आवाज, मला तो आवाज आपलसं वाटायला लागला.
कार्यक्रम संपला, मला मनातून वाटत होतं की त्या गायकाला त्याच्या गाण्यासाठी शुभेच्या तरी द्यायला हव्या. पण जोपर्यंत मी आणि नम्रता स्टेज पर्यंत पोहोचलो तो गायक निघून गेला होता. पण एक गोष्ट चांगली झाली की आयोजकांकडून त्याचा मोबाईल नंबर मिळाला.

त्या दिवशी रात्री खूप शांत झोप लागली मला. पण स्वप्नांत ही मला तेच आवाज ऐकायला येत होते. एक आठवडा असाच निघून गेला. मी याच विचारात होते की त्या गायकाला मेसेज करू की नको.
मला अनोळखी लोकांसोबत लवकर बोलायला जमत नाही, पण विचार केला की एखाद्याला त्याच्या चांगल्या गोष्टी बद्दल शुभेच्छा द्यायला मेसेज केला तर काय चुकीचं आहे....आणि खूप हिम्मत करून मे मेसेज केला.

📱" सर, तुमचा आवाज खरच खुप छान आहे आणि गाणं पण खूप छान गायीलात तुम्ही, खूप खूप शुभेच्या"

आणि मोबाईल बाजूला ठेऊन मी माझं काम करायला लागली. एक तासाने जेंव्हा मोबाईल हातात घेतला त्या गायकाचा मेसेज होता, खरं तर मला अपेक्षितच नव्हत की तो मला मेसेज करेल आणि तशी मी कल्पना ही केली नव्हती.

📱"धन्यवाद मॅडम, तुमची कंमेंट मला प्रोत्साहन देईल अजून चांगलं गाण्यासाठी"

📱"सर, तुमच्या आवाजात एक ओढ आहे, आणि ते गाणं माझं आवडतं गाणं आहे खूप, माहीत नाही काय पण मनातून वाटलं की तुम्हाला मेसेज करावा आणि केला, माफ करा जर डिस्टर्ब केलं असेल तर"

आता हा मॅसेज करून मी मोबाइल बंद करणारच तेवढ्यात त्याचा पुन्हा रिप्लाय आला,

📱" खरं तर ते माझं पण खूप आवडतं गाणं आहे, खूप मेसेज येतात मला पण मी आजपर्यंत कोणाला रिप्लाय दिला नाही, पण तुम्हाला का दिला हे माझं मलाच कळत नाही आहे, आणि तुम्ही मला खरंच डिस्टर्ब नाही केलं "

यावर मी काय बोलाव मला कळत नव्हतं त्यामुळे मी फक्त 'हम्म' एवढंच पाठवलं.

📱" कस असतं ना मॅडम जर बोलायचं नसेल तर बाय म्हणावं, hmm नाही😆"

📱"मला वाटलं तुम्ही कामात असणार त्यामुळे नाही बोलली"

📱" तुमचं वय काय आहे मॅडम??"

मी विचार केला किती मूर्ख आहे हा माणूस माझं वय विचारून काय करणार आहे, मला आधी विचित्र वाटलं पण तरीही उत्तर दिलं मी,

📱"२४, आता काय आधार कार्ड बनवणार माझं😆?"

📱" मी फक्त २७ वर्षांचा आहे त्यामुळे हे अहो जाहो करून बोलू नको, तू मला तू म्हणून पण बोलू शकते"

📱"ओके, आता कधी आहे तुझा कार्यक्रम? "

📱" बघु, कधी वेळ मिळतो कामातून तेंव्हा..."

📱" कामातून वेळ म्हणजे? तुम्ही गायक आहेत तेच तुझ काम आहे ना..."

📱" नाही ग, गाणं मी आवड म्हणून गातो, खरं तर माझा बिझनेस आहे स्वतःचा"

📱"पण छान आहे आवाज तुझा, खूप कमी लोकं असतात या जगात जे आपली आवड जपतात, नाहीतर काही लोक संसाराच्या बेड्यात अडकून राहतात"

📱" मग नाही अडकून राहायचं ना, बदलायची परिस्थिती, जोपर्यत आपण मनातून आनंदी नाही राहत तोपर्यंत दुसर्यांना आनंद देऊ शकत नाही, त्यामुळे आधी स्वतःच मन प्रसन्न ठेवायचं"

📱"बरोबर आहे, पण नाही शक्य होत कधी कधी ते, कोणीतरी समजून घेणार ही हवं ना"

📱"समजून देण्याचा प्रयत्न करशील तर नक्किच समजून घेतील, आणि जगात असा कोणीच नाही ज्याला प्रॉब्लेम नाहीत, पण आपण हसत खेळत असलो तर ते प्रॉब्लेम पण लवकर सुटतील"

आमचं पहिलं संभाषण अस होईल हे वाटलं नव्हतं, किती सहजपने तो सगळं बोलून गेला. जेंव्हा आपलं मन उदास असतं त्यावेळी कोणी थोडा जरी धीर दिला तरी खूप आधार वाटतो. मला त्या दिवशी खरंच मनातुन खूप छान वाटत होतं. अस नाही की मी अभयला कधी बोलण्याचा प्रयत्न नाही केला पण जेव्हा कधी मी बोलण्याचा प्रयत्न केला त्याला ती कटकट वाटली, त्यानी कधी ते संभाषण पूर्ण केलंच नाही. आणी माझं मन मात्र तसच राहील अबोल.....

जेंव्हा मी त्या गायकाचा नंबर सेव्ह करायला घेतला , अचानक आठवलं, अरे मी तर त्याला नावच विचारल नाही, आणि त्या दिवशी कार्यक्रमाला उशिरा पोचलो त्यामुळे त्याच नावच कळलं नाही मला आणि मी आयोजकांना ही विचारलं नाही त्याच नाव. त्यामुळे मी तो विषय तिथेच सोडून दिला. मी त्या क्षणाला जरी त्याचा विचार सोडून दिला होता तरी माझी नियती माझ्या सोबत काय डाव खेळेल याची मला मात्र कल्पना ही नव्हती........
-----–-------------------------------------------------------------

क्रमशः