समर्पण - ७ अनु... द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

समर्पण - ७

समर्पण-७

तेरा ही नशा तेरी ही खुमारी,
हर वक्त मुझपे छाये रहती है।
तू ही तू मुझमे साँस लेने लगा है,
धडकने मेरी कहने लगी है ।


असच काहीस होत होतं मला आज काल. मला आनंद, दुःख, उत्साह, काहीही वाटत असेल तर मला आधी विक्रम आठवायचा. माझ्या मनात कुठलाही विचार येत असेल मला आधी विक्रम ला बोलावसं वाटायचं. आणि विक्रम च्या बाबतीत ही असच घडत होतं. मी तर म्हणेल की आमची एकमेकांशिवाय सकाळ ही होत नव्हती आणि रात्र ही सरत नव्हती. पण नेहमी मनात एक विचार असायचा की हे जे काही घडत आहे ते चूक आहे की बरोबर आहे.

आमच्या कडे गणपती बसणार होते त्यामुळे घरात खूप काम होती. सगळी साफ सफाई, गणपती ची खरेदी सगळं काही मलाच करायचं होतं. अभय त्याच्या कामातून वेळ काढून त्याच्या परीने मला मदत करतच होता. इतक्यात विक्रम शी पण काही व्यवस्थित बोलणं झालं नव्हतं. त्या दिवशी रविवार होता अन दुसऱ्या दिवशी गणपती बसणार त्यामुळे पुन्हा मला वेळ मिळणार नाही बोलायला या विचाराने मी विक्रम ला फोन केला. पहिला फोन त्याने उचलला नाही. मला वाटलं सुट्टी आहे आराम करत असेल त्यामुळे मी पुन्हा फोन केला नाही. कारण मला माहित होतं माझा मिस कॉल बघितल्यावर तो मला नक्की मेसेज किंवा फोन करेल. तिन चार तास उलटून गेले तरीही त्याचा काही रिप्लाय नाही आला त्यामुळे मी पुन्हा फोन केला तर त्याने उचलला नाही. माझं मन बैचेन होत होतं पण मी मात्र स्वतःला समजावत होती की तो काहीतरी कामात असेल नाहीतर नक्कीच त्याने मला फोन केला असता.

आता मात्र संध्याकाळ झाली, रात्र झाली पण त्याचा काहीच पत्ता नाही. मला खूप रडायला येत होतं, मन खूप अस्वस्थ होत होतं. मला कळत नव्हतं का अस होतंय मला. पण माझी ही घालमेल अभय च्या नजरेतुन काही सुटली नाही आणि त्याने शेवटी विचारलंच मला,
" काय झालं नैना, काही प्रॉब्लेम आहे का, तू टेन्शन मध्ये का दिसतेय??"

"काही नाही रे, या दोन तीन दिवसांत खुप दगदग झाली ना माझी त्यामुळे कदाचित थकायला होत आहे"

"डॉक्टर कडे जाऊयात का?"

"नाही इतकं काही नाही, ठीक आहे मी"

मी अभय ला तरी काय सांगू मला हेच कळत नव्हत. एकीकडे हे पण वाईट वाटत होतं की अभय माझी किती काळजी करतो अन मी त्याचा विचार सोडून विक्रम च टेन्शन घेत बसली. एक विचार हा पण आला की ठीक आहे ना फक्त मित्र आहे ना विक्रम, का मी त्याची एवढी काळजी करावी, अन तस पण सुट्टी आहे आज, तो कदाचित दिशा सोबत कुठे बाहेर गेला असेल, त्याला पण वेळ द्यायला पाहिजे ना बायकोला. असे कितीतरी विचार माझ्या डोक्यात वादळ निर्माण करत होते. पण असही वाटत होतं की जरी बायको सोबत बिझी असेल तरी कमीत कमी एक मेसेज तर नक्कीच करू शकला असता ना.....पण नंतर वाटायचं एवढा काय अधिकार आहे नैना तुझा त्याच्यावर इतकं रागवायला?

आपलं मन पण कस असतं ना, कितीही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच वाटेला जाणार. माझं मन ही माझ्या ताब्यात राहील नव्हतं. अभय कडे बघितल्यावर स्वतःला आवरलं मी कसतरी. जेवण झाल्यावर अभय बाहेर गेला काही कामाने आणि मी मनसोक्त रडून घेतलं. स्वतःचा राग ही येत होता अन विक्रम चा ही की किती खुशाल तो मला विसरून गेला. मी मोबाईल बंद केला रागारागत आणि झोपायला गेली. पण झोप मात्र लागत नव्हती. रात्री १:३० वाजेच्या सुमारास मी मोबाईल सुरू केला आणि विक्रम चे खूप सारे मेसेज होते मला,

📱" खूप खूप सॉरी सोनू, पण मी अश्या परिस्थिती मध्ये होतो की तुझे फोन नाही उचलू शकलो, त्यात दिशा पण सोबत होती त्यामुळे.... मला माहीत आहे तू रागावली असणार माझ्यावर पण प्लिज ऐकून घे माझं"

मला खुप राग आला होता त्यामुळे मी त्याच्या मेसेज ला काही रिप्लाय च दिला नाही, मला दुःख ही होत होतं की विक्रम ला माझा एकदाही विचार आला नसेल का आज, त्यात पुन्हा त्याचा मेसेज,

📱"ऑनलाइन आहेस तरी रिप्लाय नाही देत आहेस, खुप रागावलीस ना, सोनू प्लिज एकदा तरी बोल ना ग"

आता मात्र माझं मन वितळल. स्वतःला दोन शिव्या घातल्या आधी....मूर्ख नैना, खरच काहीतरी अडचण असेल त्याला, काय कामाची ही मैत्री जर तू त्याला अडचणीच्या वेळी समजून नाही घेतलं तर, न मी मेसेज केला त्याला,

📱"काय झालं रे, तू ठीक आहेस ना? दिशा ठीक आहे?"

📱"हो ग ठीक आहे आम्ही दोघेही, पण ऑफिस मधल्या एकाचा अपघात झाला, आधी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, घरी परत आलो तर दिशांच्या बाबांची तब्येत बिघडली अस कळलं तर माझी अन दिशाची तिथे धावपळ झाली, सॉरी माफ कर ना प्लिज"

आता मात्र मला खूप खूप राग आला स्वतःचा. मी कसा हा मूर्खपणा केला, मी माझ्या इतक्या चांगल्या मित्रावर विश्वास नाही ठेऊ शकली. स्वतः वरच खूप चिडचिड होत होती माझी,

📱" तू नको माफी मागू विक्रम, खर तर मीच माफी मागते, तुझी परिस्थिती न समजून घेता चिडली मी तुझ्यावर, दिशा कशी आहे अन तिचे बाबा बरे आहेत ना आता अन तू जेवण केलं का?"

📱" दिशा अन तिचे बाबा दोघेही ठीक आहेत अन दिशा आज माहेरिच थांबणार आहे, अन मी नाही जेवलो अजून कारण मला माहित आहे की तू पण जेवली नसशील"

किती चांगलं ओळखतो विक्रम मला. मला खरच जेवण गेलं नाही त्याच्या विचारात. का मी इतकी चिडले विक्रम वर. त्यासाठी मी कितीतरी वेळ माफी मगितली त्याची,

📱"हे बघ सोनू सॉरी ने पोट भरणार नाही आहे 😆😆त्यामुळे तू खा काहीतरी अन मी पण जेवतो, उद्या निवांत बोलू, पण प्लिज उपाशी झोपू नको"

खर तर विक्रम शी बोलल्यावरही मी जेवलीच नाही, कारण आता माझं मन ही अन पोट ही विक्रम शी बोलूनच भरलं होत. आता मला मात्र शांत झोप लागणार होती.
-----------------------------------------------------------------

दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच बाप्पा येणार म्हणून माझी अन अभय ची धावपळ सुरू होती. अभय मला सर्वपरीने मला मदत करत होता. त्याने आज पहिल्यांदा माझ्या साठी साडी आणली होती. आमच्या लग्नानंतर ची ही पहिली भेट होती त्याची मला. त्याची ईच्छा होती की मी ती साडी नेसायला हवी, त्यामुळे मी साडी नेसून तयार झाली अन तेवढ्यात अभय आला. तो माझ्याकडे एकटक पाहत होता, बघता बघता तो माझ्या एकदम जवळ येऊन उभा राहिला, माझी धडधड मात्र वाढत होति, आणि हळूच माझ्या कानात येऊन बोलला,
"खुप सुंदत दिसते आहेस...."

मला छान वाटलं की कितीतरी दिवसांनी अभय ने माझ्याकडे लक्ष दिलं होतं. मला विक्रम नेहमी म्हणायचा की मी साडीत खूप सुंदर दिसेल, अन मला लगेच आठवल ते आणि मी माझा एक फोटो विक्रम ला पाठवला. त्यानंतर लगेच त्याने मला व्हिडिओ कॉल केला,

"व्हिडीओ कॉल का केला लगेच, मला खूप ओकवर्ड फील होतंय"

"कोणीतरी आज खुप छान दिसत आहे😍😍 त्यामुळे...आणि ना तुला ओकवर्ड फीलिंग नाही लाजायला होत असेल😂😂"

"विक्रम...जा ना रे...तू अस चिडवशील तर मी ठेवते फोन"

"सॉरी.....पण तू इतकी सुंदर दिसते आहेस ना, मला राहवल नाही गेलं, खूप खूप गोड दिसतेस"

"तुला काय एकच चव माहीत आहे का??. ...फक्त गोड😆😆😆"

"माहीत सगळंच आहे ग, पण तू नागपूरची संत्रा बर्फी आहेस ना त्यामुळे गोड🤣🤣"

"काही पण बोलतो विक्रम तू...तुला एक सांगू ही साडी मला अभय ने गिफ्ट केली, अन मी छान दिसते हे पण बोलला"

"अरे वा छान...मग आज कोणीतरी खूप खुश पण आहे...तुला एक सांगू सोनू, तुझं अन अभय च सगळं ठीक झाल्यावर मला विसरणार तर नाही ना तू?"

"वेडा काही पण बोलतो का, या जन्मात तरी मी नाही विसरणार तुला"

"हम्म मग पुढच्या जन्मी माझी होशील??"

"विक्रम...😲😲"

"अग पुढच्या जन्मी पण माझी फ्रेंड होशील का?😂😂😂"

अस नाही की मला विक्रम च बोलणं कळत नव्हतं, पण मला ते स्विकार करायचं नव्हतं. कदाचित त्यावेळेला मला स्वतःला समजत नव्हतं की माझ्या सोबत काय घडत आहे. पण एक नक्की मला कळत होतं की माझी कोणतीही गोष्ट विक्रम शिवाय पुर्ण व्हायची नाही. असं नाही की माझं अभय कडे दुर्लक्ष होत होतं, पण अभय विषयी मला फक्त आदर वाटायचा, त्याची काळजी नक्कीच होती मला, पण अभय वर माझं प्रेम आहे की नाही हे मला माहित नव्हतं. कदाचित प्रेम ही भावना काय असते तेच मला माहित नव्हतं किंवा मी अनुभवली नव्हती. मला असं वाटायचं मी आणि अभय सोबत राहतो तर प्रेमाचं काय आहे ते तर करूच आम्ही एकमेकांवर. पण मला तेंव्हा हे कुठे माहीत होतं की प्रेम करायचं नसतं ते तर होत असतं. आणि प्रेम आपल्याला आयुष्यच्या कुठल्याही वळणार होऊ शकतं.
----------------------------------------------------------------

विक्रम ला भेटून दहा दिवसच झाले होते पण असं वाटत होतं की किती महिने झाले आम्ही भेटलो नाही. त्यात तो पण खूप मागे लागला होता भेटण्यासाठी पण गणपती मुळे काही भेटणं झालं नाही आमचं. मला पण खूप ओढ लागली होती त्याला भेटायची.

इतक्यात माझं अन अभयच ही सगळं व्यवस्थित सुरू होत...कमीत कमी माझ्या बाजूने तरी...पण अभयच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होत. त्याच्या नुसार आता मी मुद्दाम त्याला माझ्यापासून दूर ठेवते आहे असं वाटायचं त्याला. तो मला खूपवेळा त्याबद्दल बोलला पण. मी समजू शकत होती की मनापासून अभय तयार झाला आहे माझा स्विकार करायला पण माझं मन का तयार होत नाही आहे हा मात्र खूप मोठा प्रश्न होता माझ्यापुढे. एक रात्री मी अन अभय मुव्ही बघून घरी आलो, मी फ्रेश होऊन झोपायच्या तयारीत होती की अभय ने मला मागून मिठी मारली अन मला बोलला,

"नैना तू मला खुप आवडायला लागलीयेस, प्लिज नको ना लांब राहू माझ्यापासून"
मी त्याच्या मिठीतुन स्वतःला सोडवल, अन त्याच्याशी नजर चोरत बोलली,

"कुठे लांब आहे, सोबतच तर आहोत ना आपण अभय"

अभय पुन्हा माझ्या जवळ येत बोलला,

"तुला खरंच कळत नाही आहे मला काय म्हणायचं आहे ते की मुद्दाम न कळण्याचा आव आणत आहेस"

"मला कळतय अभय, पण मी पण बोलली तुला की थोडा वेळ जाऊदे, तस पण एवढे तीन वर्षे आपण सोबत अहोत तेंव्हा तर तुला काही वाटलं नाही, मग आता का घाई एवढी? तुला बोलली ना मला वेळ दे, कळत का नाही तुला?"

मी खूप चिडली होती आणि न कळतपणे मी अभय ला दुखावलं होत...माझ्या चिडण्याचं कारण मला ही कळत नव्हतं. मला हे कळत होत की अभय माझा नवरा आहे त्याचा अधिकार आहे माझ्यावर पण ज्या गोष्टीसाठी मी तयार नाही ती गोष्ट कशी देऊ शकते मी अभयला,

"सरळ सांग ना नैना, या तीन वर्षाचा बदला घेत आहेस तू म्हणून, तीन वर्षे मी कसा वागलो हे दिसलं तुला,पण आता मी किती बदलत आहे स्वतःला तुझ्यासाठी हे नाही दिसत तुला....मला वाटते मीच घाई केली, मला नाही वाटत तू या तीन वर्षांत मला कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला अन तू भविष्यात ही मला समजू शकशील अस वाटत नाही मला...."

रागारागत अभय दार आपटून गेला बाहेर झोपायला. मला खूप रडायला येत होतं....खरचं मी अभयला समजून घेतलं नाही...असा कसा बोलू शकतो तो की मी बदला घेत आहे, आज त्याला इतका त्रास झाला आणि तीन वर्ष माझी तळमळ नाही दिसली त्याला... मला खूप राग आला त्यावेळी अभयचा... आणि एक मन हेही बोलत होत की अभय खूप बदलला आहे मी अस नको वागायला होत त्याच्यासोबत ..ज्या नात्याला वाचवण्यासाठी माझे इतके प्रयत्न सुरू होते, आज मी ते सगळे व्यर्थ घालवले होते...अभय नाराज होऊन बसला होता, माझ्या डोक्यातही राग होता, याचा काय परिणाम होणार होता हे कोणालाच माहीत नव्हतं.........
--------------------------------------------------------------------
क्रमशः