Samarpan - 5 books and stories free download online pdf in Marathi

समर्पण - ५






समर्पण-५


विक्रम ला गाण्याची फार आवड होती. त्याला खरं तर गायन क्षेत्रातच नाव कारायच होत अस नेहमी म्हणायचा तो पण जबाबदाऱ्या निभावता निभावता ते राहूनच गेलं. पण माझा त्याला नेहमी आग्रह असायचा की त्याने त्याची आवड जपावी. तो मला रोज एक गाणं म्हणुन दाखवायचा. त्याची ईच्छा होती त्याच्या एखाद्या कार्यक्रमात माझ्या समोर माझ्या डोळयांत बघून गायची. माहीत नव्हतं ही ईच्छा कधी पूर्ण होणार होती, पण त्या आधी त्याची मला भेटायची खूप इच्छा होती. खरं तर मला ही खूप ओढ लागली होती त्याला भेटायची पण काही वेळ च मिळत नव्हता.

पण म्हणतात ना जर मनाने काही ठरवलं तर आपण ते करतोच. आणि नशीब ही त्यात आपल्याला साथ देतो. विक्रम ची काहीतरी महत्त्वाची मीटिंग होती अन त्याच्या मीटिंग ची जागा अन माझं ऑफिस जवळच होत, त्यामुळे त्याने आधीच मला सांगितलं होतं की आपण भेटू, त्यानुसार मी ऑफिस मधून हाल्फ डे सुट्टी घेतली होती. शनिवारी आमचं ठरलं की आम्ही बुधवारी भेटणार आहोत. पण मला ते चार दिवस कधी निघतील अस झालं होतं. विक्रमचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. मी विक्रम चा विचार करत होती अन माझा फोन वाजला, अर्थात विक्रमचाच होता,

"सोनू ऐक ना मला खूप महत्त्वाच विचारायच आहे ग तुला एक??"

"बोल ना, काय झालं, काही प्रॉब्लेम?"

"हो ग खूप मोठा प्रॉब्लेम आहे"

हे ऐकूनच मी घाबरली. आजकाल माझी अवस्था अशी होती ना की विक्रम ला काही त्रास व्हावा हा विचार ही मला नकोसा वाटायचा.

"काय झालं विक्रम? तुझी तब्येत बरी आहे ना? की घरी काही प्रॉब्लेम? बोल ना पटकन"

"अग आज सोमवार आहे "

"हो मग काय झालं?"

"सोमवार नंतर बुधवार का येत नाही ग,😆😆😆😆"

"वेडा आहे का रे तू, किती घाबरली होती मी, मला वाटलं तुला काहीतरी झालाय आणि...."

"अग हो हो.....शांत हो आधी मी ठीक आहे , नको एवढी काळजी करत जाऊस माझी, मला सवय नाही"

"सवय नाही तर सवय करून घे मग आता, मला खरच खूप काळजी वाटते रे तुझी, तू नेहमी इतका फिरत असतोस, कितीतरी बिझी असतो, त्यात वेळे वर जेवत नाही, काळजी वाटते मला, जाऊदे नाही कळणार तुला"

"सगळं कळतंय मला सोनू, नको काळजी करू एवढी, कधी चुकून विदर्भ वेगळा झाला तर मला त्रास होईल 🤣🤣"

"झालं तुझं सुरू पुन्हा, कधीतरी सिरीयस हो"

"सिरियस राहून कोणाचं भलं झालाय, ते जाऊदे मला एक सांग ना प्लिज"

"बोल ना"

"सोमवार नंतर बुधवार का येत नाही😂😂😂"

असाच होता तो नुसतं हसण अन हसवन, असाच त्याचा स्वभाव होता. पण मनाने मात्र तेवढाच हळवा. तसं तर मला पण हाच प्रश्न पडत होता की कधी बुधवार उगवतो एकदाचा😆😆

----------------------------------------------------------------

फायनली आला बुधवार, अन सकाळ पासून मी चार ड्रेस बदलले होते, कळतच नव्हतं कोणता ड्रेस चांगला दिसेल माझ्यावर. शेवटी विक्रम अन माझा आवडता रंग निळा, त्यामळे मी आकाशी रंगाचा ड्रेस घातला आणि निघाली ऑफिस ला. सकाळ पासून विक्रम मीटिंग मध्ये बिझी असणार होता त्यामुळे मीटिंग संपल्यावरच तो मला फोन करणार होता. दुपारी विक्रम चा फोन आला,

" मी तुझ्या ऑफिस च्या खाली आहे ये पटकन"

"तू एवढ्या लवकर कसा आलास, अटलिस्ट १० मिनिट आधी तरी फोन करून सांगायच ना?"

"वाटलं तुला सरप्राइज द्यावं, आता येतेस पटकन की जाऊ मी"

"थांब आलीच..."

अचानक माझं हृदय रेल्वे च्या स्पीड ने पळायला लागलं, खूप धडधडत होत मला. असा माझ्या सोबत पहिल्यांदाच घडत होतं आणि मला कळतही नव्हतं का असा होतंय मला. मी लगबगीने ऑफिस च्या खाली उतरली, आणि अचानक पाऊस सुरू झाला.
माझ्या कडे छत्री नव्हती आणि पाऊस बंद व्हायची वाट बघावी एवढे संयम माझ्यात नव्हते. त्यामुळे धावतच गाडीत जाऊन बसली विक्रम च्या बाजूला. तस ऑफिस च्या गेट पासून विक्रम ची गाडी १५-२० पाऊलांवरच उभी असेल पण पाऊस जोरात असल्यामुळे मी थोडीशी भिजलीच.

माझी धडधड अजून ही बंद झाली नव्हती अन त्यात मला विक्रम कडे पहावल्याही जात नव्हत. मला का अस होतंय माझं मलाच कळत नव्हतं. त्यामुळे विक्रम नेच बोलायला सुरुवात केली.

"आता बघशील माझ्याकडे एकदा की पूर्ण वेळ लाजण्यातच घालवशील"

"मी का लाजू, माझे केस ओले झालेत त्यामुळे आणि आणी..."

"घ्या आता शब्द ही सुचत नाहीयेत का तुला😆😆"

"तू २ मिनिट शांत बसतो का प्लिज 😡"

" ठीक आहे आधी लाजून घे मग बोलू आपण,😁😁"

५-१० मिनिटांनंतर माझी धडधड थोडी कमी झाली आणि मी विक्रम कडे बघण्याची हिम्मत केली. तसं तर एकमेकांचे खूप फोटो बघितले होते आम्ही आणि रोज फोनवर बोलणं ही व्हायचं पण आज प्रत्यक्षात भेटल्यावर मात्र उत्साह, लाज, आनंद सगळेच भाव एकदम निर्माण झाले होते मनात. मित्र म्हणून आम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखायचो. त्यामुळे विक्रम ने माझे आवडीचे चॉकलेट आणले होते आणि मी मात्र माझ्या या धडधडीत काहीच नेलं नाही त्याच्यासाठी, मला खूप ओशाळाल्यासारखं झालं.

आमची ही पहिली भेट होती पण असं वाटत होत की आम्ही खूप आधीपासून ओळखतो एकमेकांना. आणि विशेष म्हणजे तो ही निळ्या रंगाचाच शर्ट घालून आला होता.

"तुला माहीत आहे सोनू?"

"नाही माहीत,😆😆"

"त्यामुळेच सांगतोय, तुझे डोळे खूप बोलके आहेत, पण तुला चष्मा आहे ना त्यामुळे डबल बॅटरी झालेत🤣🤣"

"विक्रम...जा नाही बोलणार मी तुला😡😡"

"नको रागवू ग, नाहीतर तुझे गब्बू गाल अजून फुगतील😂😂"

"आता तर थांबणारच नाही मी, जाते मी..."

मी नाटकी रागवून गाडीच्या बाहेर उतरणार तोच विक्रम ने माझा हात पकडला. मला त्या स्पर्शाने शहारून आलं, माझ्या पोटात फुलपाखरू उडायला लागले, पण हे मी विक्रम ला बोलून दाखवू शकत नव्हती कारण मलाच माझ्या भावना कळत नव्हत्या.

"तुझे गब्बू गाल ओढावेसे वाटतंय ग, खूप गोड दिसतेस रागवल्यावर, आणि हो जर हे तुला फ्लर्ट वाटत असेल तर मी फ्लर्ट करणार करणार करणार...,😆😆"

" तू नाही सुधारणार ना विक्रम, नालायक आहेस नुसता"

"😁😁 बघ आता जसा पण आहे तुझाच......"

आणि हे बोलता बोलता आम्ही एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेलो. खूप सुंदर भावना होती ही. ती कदाचित मी शब्दांत मांडूच शकत नाही. विक्रम नेहमी म्हणायचा काही काही गोष्टी फक्त फील करायच्या असतात, त्या आपण बोलू शकत नाही. आणि ही फीलिंग पण त्यापैकीच एक होती.

विक्रम शी बोलता बोलता दोन तास कसे निघून गेले काही कळलच नाही. त्यावेळेला आम्ही सगळं काही विसरून हरवून गेलो होतो एकमेकांमध्ये. खूप खूप छान वाटत होतं. विक्रम ने त्याचा मोबाईल बंद करून ठेवला होता. त्याला विचारलं का बंद केला तर बोलला,

"सोनू हा वेळ मी फक्त आणि फक्त तुझ्या साठी काढला आहे, अन आता तरी मला आपल्या मध्ये तिसरं कोणीच नको"

मला त्यावेळी खरच खूप स्पेशल फील झाल्यासारखं वाटत होतं.
कोणीतरी आपल्याला एवढ जपतो, आपली एवढी काळजी करतो, आपली एवढी कदर करतो ..ही भावनाच खूप वेगळी आहे. त्यावेळेला मी माझी सगळी दुनिया विसरून गेली होती. मी कोण आहे , काय आहे, किंवा माझं लग्न झालय..मला काहीच लक्षात नव्हतं. मी फक्त ते क्षण मनापासून जगत होती.


तुझमे खोकर मैने आज खुदको पाया है,
ना तो तू हमसफर है मेरा ना हमसाया है।
फिर भी कुछ तो राबता जरूर है तुझसे,
जो तुझे मैने अपने दिल का करिबी पाया है ।


विक्रम ने जरी त्याचा मोबाइल त्या वेळेला बंद केला होता तरी माझा मोबाइल मात्र सुरूच होता. आणि मी वेळेच भानच हरवून बसली होती. विसरून गेली होती की या वेळेला मला घरी पोचायला हवं. आणि त्यात अभय चे १० मिस्ड कॉल येऊन गेले होते. आणि मी मात्र विक्रम मध्ये स्वतःलाही हरवून बसली होती.......

--------------------------------------------------------
क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED