Samarpan - 10 books and stories free download online pdf in Marathi

समर्पण - १०

समर्पण-१०

एक तुम्हारे ना होने से,
सारा जहाँ विराणा हो गया।
तुम आँखो से ओझल क्या हुए
मेरा उजाला भी अंधेरा बन गया।


विक्रमला न बघुन मी खूप घाबरली. मला कळत नव्हतं काय करू. आणि तेवढ्यात मला विक्रमचा आवाज आला, मी मागे वळून बघितलं तर विक्रम उभा होता, हातात गुलाबाचं फुल घेऊन. मी खूप चिडली पण मी दाखवलं नाही. विक्रम माझ्या जवळ आला आणि मला गुलाबाचं फुल देत बोलला,

"तुला खरच ऐकायचं आहे, तू माझ्यासाठी काय आहेस?"

"नाही मला काही ऐकायचं नाही, चल मला घरी सोड"

आणि मी त्याच्याकडे पाठ फिरवून उभी झाली. माझ्या डोळ्यातुन अश्रू वाहत होते, विक्रम बोलला,

"तुला ऐकायचं तर नको ऐकू पण मी तर बोलणारच सोनू तू माझ्यासाठी काय आहेस"

दोन मिनिटे तिथे भयाण शांतता होती. पावसाच्या वातावरणामुळे थंड वारा सुटला होता आणि थोड्या वेळाने मला विक्रम चा गाण्याचा आवाज आला,


परमात्मा का स्पर्श हो राधे
परमात्मा का स्पर्श हो
पुलकित हृदय का हर्ष हो
परमात्मा का स्पर्श हो
पुलकित हृदय का हर्ष हो
तुम हो समर्पण का शिखर
तुम हो समर्पण का शिखर
तुम ही मेरा उत्कर्ष हो....


मी मागे वळून बघितलं तर विक्रम बाकावर बसला होता, त्याचा हातात गिटार होता, तो एकटक माझ्या कडे बघत होता पण त्याचे डोळे पाणावले होते, त्याच्या आवाजातून जाणवत होत की त्याचा कंठ दाटून आला आहे, पण तरीही त्याने पुढे गाणं म्हणायला सुरुवात केली,


तुम प्रेम हो तुम प्रीत हो
मेरी भावना की तुम राधे जीत हो
तुम प्रेम हो तुम प्रीत हो
मनमीत हो राधे, मेरी मनमीत हो
तुम प्रेम हो तुम प्रीत हो
मेरी बांसुरी का गीत हो


मी आणि विक्रम भान हरवून बसलो होतो, विक्रम ला खूप गहिवरून आलं होतं, पण तरीही तो ते लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता, त्याचे पाण्याने भरलेले डोळे मात्र त्याची सगळी अवस्था प्रकट करत होते, आणि मी.....मला कदाचित माझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं भेटली होती. इतक्या दिवसांपासून जो माझ्या मनात द्वंद सुरू होता त्याचा अंत झाला होता. बुद्धी आणि मनाच्या लढाई मध्ये मन जिंकलं होत....हो मला कळाल होत विक्रम च माझ्यावर खूप जीवापाड प्रेम आहे आणि माझं.....मला ओरडून ओरडून सांगावस वाटत होत विक्रमला की मी खुप खूप प्रेम करायला लागली आहे तूझ्यावर आणि हे कधी कस केंव्हा झालं मलाही नाही कळाल... धावत जाऊन त्याच्या मिठीत शिरावस वाटलं पण आवरलं स्वतःला, स्वतःचे अश्रू बांधून ठेवले आणि नजर चोरत विक्रमला बोलली,

"खूप छान होत रे गाणं... कुठे गायब झाला होता मधातच, मी घाबरली होती ना"

"खरंच गाणं चांगलं होत सोनू?"

मी विक्रम कडे बघणं टाळत बोलली, आणि त्याला पाठमोरी उभी झाली
"अरे हो ना, खरच चांगलं होत कितीवेळा सांगू"

विक्रम ने माझा हात पकडून त्याच्याकडे मला वळवत बोलला,
"कितीवेळा नाही फक्त एकदाच सांग अन तेही माझ्या डोळ्यांत डोळे घालून बोल, आणि सांग मला की मी इतका वेळ तुला जे सांगण्याचा प्रयत्न करतोय ते तुला कळत आहे पण वळवून घ्यायचं नाही..."

"विक्रम...ते ना मी.."

"इतका वेळ राग धरून बसली होती की विक्रम ला माझ्या बदल काही वाटत नाही आणि आता जे वाटतंय ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुला समजून नाही घ्यायचं ना सोनू....ठीक आहे स्पष्टच सांगतो, मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर आणि हे मागच्या कित्येक दिवसांपासून मला जाणवत आहे पण तुला आजपर्यंत सांगितलं नाही, पण जेव्हा तू रुसून बसली अन बोलली की तू माझ्या सोबत मैत्री पण तोडशील असं वाटलं की आता मी तुला कायमच गमावून बसलोय आणि त्यामुळेच आज तुला भेटायला बोलवलं.....आता कळाल तू काय आहेस माझ्यासाठी...."

मला कळत नव्हतं काय बोलू. माझ्या नशिबावर हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. कोणीतरी आपल्यावर खूप प्रेम करतो ही भावनाच खूप खास आहे पण मी यात आनंदी होऊ की दुःखी होऊ हेच कळत नव्हतं. नशिबाने मला आयुष्याच्या अश्या वळणावर आणून ठेवलं होतं की विक्रम च प्रेम मी स्वीकारू ही शकत नव्हती अन त्याला माझ्या पासून दूर ही करू शकत नव्हती,

"विक्रम.....मला नाही कळत आहे मी काय बोलू, तुला काय सांगू, पण एक सांगते आयुष्यच्या रखरखत्या उन्हात जेंव्हा मी एकटी उभी होती तू येऊन मला सावली दिलीस, पण मी इतकी स्वार्थी नाही होऊ शकत रे...हे चुकीचं आहे विक्रम, ही भावना आपल्या मनात येणं हेच चुकीचं आहे मुळात"

"चुकीचं आहे ??? हे सगळं ठरवून केलंय का आपण सोनू ?? हे घडत गेलं आणि आपल्यालाही नाही कळाल ते आणि प्रेम ठरवून तर होत नाही ना सोनू, आणि काय चूक काय बरोबर हे मला नाही माहीत, पण एखाद्यावर प्रेम करणं हे नक्कीच चुकीचं नाही"

"नाही चुकीचं...प्रेम करणं नक्कीच चुकीचं नाही पण आपलं प्रेम चुकीचं आहे विक्रम, कारण आपण कोणाचेतरी जीवनसाथी आहोत, आपल्या सोबत ते दोन लोक बांधल्या गेले आहेत ज्यांच्या सोबत आपण सात वचन घेतलीत... त्यांच काय विक्रम?? आपण इतके स्वार्थी तर नक्कीच नाहीत ना रे, माझा कान्हा मला या गोष्टीची कधीच परवानगी देणार नाही, हे चुकीचं आहे....अभय आणि दिशाचा विचार करायला हवा आपण "

"हो अभय आणि दिशाचाच विचार करून एवढे दिवस गप्प बसलो मी, आणि मला पण कळतं ते दोघे आपल्याशी जोडलेले आहेत, पण मी खूप काळ तुझ्यासाठी माझ्या भावना लपवू शकलो नसतो, अन मला लपवायच ही नव्हतं कारण तुझ्याशी प्रत्येक वेळेस बोलताना मला असं वाटायचं मैत्री च्या नावाखाली मी तुला धोका नाही द्यायला पाहिजे आणि काल जेंव्हा तू चिडली आणि बोलली ना की तुला माझ्यासोबत मैत्री ही नको, मी रात्रभर झोपू शकलो नाही...आणि मला खर खर सांग तू तरी झोपू शकली का?"

"हे सगळं बरोबर आहे विक्रम, पण आपण आयुष्याच्या अश्या वळणावर भेटलो आहे की जिथे या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, समाज मान्य नाही हे...आणि अस देवाच्या दारात हे सगळं घडत आहे मला खुप अपराध्या सारख वाटत आहे रे...."

"तू कान्हा ला खूप मानतेस ना सोनू, मग डोळे बंद करून तुझ्या कान्हाला च विचार की हे चुकीचं आहे का....मला विचारशील तर मला नाही वाटत काही चुकीचं, तुझ्या कान्हाला पण कुठे राधा मिळाली ग, आणि राधेने पण कान्हाला मनात ठेवून तिचा संसार निभावलाच ना....ते एकमेकांच्या मनात होते सोनू...आणि जर तुला अस वाटत असेल की मी माझं प्रेम व्यक्त करून तुझ्याकडून काही अपेक्षा ठेवतो आहे तर अस अजिबात नाही, मला तुझ्याकडून काहीच नको, मला फक्त तुला आनंदी बघायचं आहे...हा एवढं मात्र अपेक्षा आहे की कधी तू माझ्यावर रागावली तर चालेल पण मला चुकीचा मात्र समजू नको..."

"मी तुला कधीच चुकीचा नाही समजत विक्रम पण तुला खरचं एवढ सोप्प वाटत या प्रकारचं प्रेम निभावणं ...खूप कठीण आहे रे.... आपण कधीच राहू शकत नाही एकमेकांसोबत मग काय अर्थ आहे या सगळ्यांचा...."

"तुला कोणी सांगितलं ग की प्रेम सोबत राहण्यासाठीच करतात...मुळात प्रेमात कोणती अपेक्षा ठेवनच चुकीची आहे आणि तू मला शरीराने कधीच नको आहेस आणि तसा विचार ही माझ्या साठी पाप आहे..तू माझी प्रेरणा आहेस सोनू, तू जे प्रत्येक वेळेस मला माझ्या करिअर बदल, गाण्याबद्दल सांगत राहतेस मला खूप हिम्मत मिळते, प्रेमाच्या आधी ही आपण चांगले मित्र आहोत हे नको विसरू...."

"तुला माहीत आहे विक्रम ज्या दिवशी मी तुझ्यावर चिडते ना, माझी सगळी चिडचिड अभय वर निघते, तू रोज दोन मिनिटं जरी वेळ काढून माझ्याशी बोलला ना माझा दिवस चांगला जातो, तू मला हवा आहेस माझी ताकत बनून माझ्या आयुष्यात पण मग आता सगळंच गुंतागुंतीचं झालं आहे रे.....मी अभय सोबत असून पण त्याच्यासोबत नसते, माझ्या डोक्यात मनात तूच असतो नेहमी आणि आज च्या नंतर तर माहीत नाही मी अभय ला कशी नजर देऊ....आणि कधी चुकून दिशा माझ्या समोर आली तर तिला ही नजर मिळवण्याची हिम्मत नाही माझी...."

"नको एवढा विचार करू सोनू....यामुळेच मी तुला सांगत नव्हतो...माझं ऐक, आपल्या मैत्री मध्ये काहीच फरक पडणार नाही यामुळे आणि राहिला प्रश्न अभय अन दिशा चा तर त्यांच्या साठी आपले जे कर्तव्य आहे ते आपल्याला नक्कीच पार पडायचे आहे, आज मी तुला हे सांगितलं कारण जर मी तुला आज बोललो नसतो ना सोनू, तर कदाचित मला हेच वाटलं असत की तू मला मित्र समजते आणि माझ्या मनात तुझ्यासाठी ह्या भावना ठेऊन मी स्वतःला फसवलं असत...आणि एक विसरू नको राधा पण कान्हा ची सखी होती, आणि आपल्या सखीवर प्रेम करणं चुकीचं तर नाही ना..."

"मला कळतंय रे...राधाकृष्ण देव आहेत विक्रम...आणि आपण सामान्य व्यक्ती, तुला काय वाटत त्यांच्या इतके संयम, त्यांच्यासारखी पवित्रता आपल्या नात्यात असेल??"

"का नसेल? मला सांग तू मला काय बोलली की मी तुझी ताकत आहे, आणि मी तुला बोललो तू माझी प्रेरणा आहेस, यापेक्षा जास्त आपल्याला एकमेकांपासून काहीच अपेक्षा नाहीत, मग आपलं नातं पवित्र का नाही, प्रेम हे कोणत्याही परिस्थितीत पवित्र च असत सोनू जोपर्यंत आपण त्याचा गैरफायदा घेत नाही, आज माझं तुझ्यावर कितीही प्रेम जरी असेल ना तरी मला मनापासून वाटत तू अभय बरोबर खुश राहावी, त्याचा मनापासून स्वीकार करावा, तू तुझ्या संसारात आनंदी असलीस ना, माझ्या पेक्षा जास्त या दुनियेत कोणी खुश नसेल, आणि तुझं अन अभय च नातं घट्ट करण्यसाठी मी काहिही करायला तयार आहे..."

"माझं आणि अभय च्या नात्यासाठी एवढी चिंता करतो....आणि दिशा सोबत सगळं व्यवस्थित कधी करणार तू? म्हणजे तुला काय वाटत रे की तू दिशा सोबत असूनही असा एकटा राहिल्यास मी खरच आनंदी राहील अभय सोबत?"

"मी ठीक आहे ग माझी नको काळजी करू..अन राहिला प्रश्न माझा आणि दिशा चा तर जस तुला आणि अभय ला वेळ लागेल तसच आमचंही"

"कस काय होईल तुमच्यात नीट सगळं? एवढा बिझी असतो तू अन त्यात जो वेळ मिळतो तो माझे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी घालवतो....अस नाही चालत विक्रम, तू खूप चांगला नवरा असशील यात काही वाद नाही पण जी चूक अभय ने माझ्या बाबतीत केली ती तू दिशा सोबत करू नको, वेळ दे तिला..."

"तुला खर सांगू सोनू, मी दिशा सोबत जरी असलो ना तरी माझ्या मनात तूच असते..."

"हेच नकोय मला विक्रम...आताच तू मला बोलत होता की अभय माझं सर्वकाही आहे अन मग तुझ्यासाठी पण दिशाच महत्वाची आहे मी नाही...तू मला वचन दे विक्रम की तू माझ्या मुळे दिशाला दूर करणार नाहीस स्वतःपासून..."

"अस आहे तर तू पण तसच वचन मला दे की तू अभय ला लांब ठेवणार नाही आणि त्यादिवशी सारखा मूर्खपणा तर अजिबात करणार नाहीस.….."

"खूप कठीण आहे रे हे विक्रम..ज्या व्यक्तीवर आपण प्रेम नाही करत त्याच्यासोबत कस सगळं...तुला कळतय ना रे"

"मला सगळं कळतय सोनू आणि माझ्यासाठी पण हे खूप कठीण असनार आहे पण तूच बोलली ना की आपण स्वार्थी नाही तर मग तू हा विचार कर की अभय तुझ्या साठी किती बदलला आणि प्रेम देण्याचं नाव असत सोनू, आपण आपल्या स्वार्थसाठी आपल्या जोडीदाराला दुखवू शकत नाही, आणि माझी सोनू तर कधीच स्वतःसाठी दुसर्यांना दुखवू शकत नाही, हो ना...."

"आणि आपल्या दोघांचं काय विक्रम?"

"आपण दोघे तर आहोतच ना एकमेकांना त्रास देण्यासाठी चांगले मित्र म्हणून... आणि सोबत राहू अथवा न राहू एकमेकांच्या मनात आहोत हेच एक कारण पुरेस आहे आयुष्य जगण्यासाठी..."

"हो ते तर आहेच...पण तू असशील ना रे माझ्या बरोबर"

"हो ग नेहमीच आहे तुझ्या बरोबर... तू कितीही जाडी झाली, तुझ्या चष्माच्या नंबर कितीही वाढला, आणि तू कितीही म्हातारी झाली तरी तुझ्या सोबतच असेल 😂😂😂"

"विक्रम.....जा मी नाही बोलणार, खूप खराब आहेस तू☹️☹️"

"हो का मग मी पण बघतो कशी राहते मला सोडून ते😜"

"नाहीच राहू शकत..माहित तर आहे तुला, त्यामुळेच सांगते माझ्यावर चीड, मला रागव पण मला न बोलता, मला कधीही सोडून जाऊ नकोस"

"नाही जाणार ग, पण आता घरी तर जावं लागेल ना, नाहीतर तुझा नवरा येईल तुला शोधत, लाडाची बायको आहेस ना त्याची😅😅"

"तू नाही का लाडका तुझ्या बायकोचा😅"

"पण तू अजूनही बोलली नाहीस जे मला ऐकायचं आहे"

"काय ?"

"तुला माहीत आहे काय ते? "

"तूच म्हणतो ना प्रत्येक गोष्ट बोलायची नसते, काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात, तर तू समजून घे....अन चल पटकन घरी..."

"तुझ्या कडून एकदा तर ऐकूनच घेईल मी, भलेही त्यासाठी तू रडली तरी चालेल😜😜"

खर बोलला तो, खूप रडली मी, खूप वेळा सांगितलं माझं प्रेम आहे विक्रम तुझ्यावर पण नाही ऐकलं त्याने....गेला सोडून...
विक्रम जरी बोलला होता की या प्रेमात काहीच अपेक्षा नाहीत किंवा मी जरी ठरवलं होतं की हे नातं फक्त मैत्रिच आहे, हे निभावणं किती कठीण आहे याची कल्पना मात्र आम्हाला नव्हती...आणि आम्ही विसरलो होतो की हे नातं कितीही साफ असेल, निर्मळ असेल तरी दुनियेच्या नजरेत चुकीचंच आहे...

खुप वाईट वाटत हा विचार करून की आपल्या समाजात एक मुलगा आणि एक मुलगी अजूनही चांगले मित्र म्हणून राहू शकत नाही...खरंच आपल्या चांगल्या मित्रावर प्रेम करणं इतकं चुकीचं आहे का, प्रेम म्हणजे काय फक्त मिळवणं च असत का?? आपण आपल्या आई वडिलांवर प्रेम करतो, भावा बहिणीवर प्रेम करतो, मुलांवर प्रेम करतो तेंव्हा काय विचार करतो की ते नेहमी आनंदी राहिले पाहिजे, तेंव्हा आपण त्यांना फक्त देण्याचा विचार करतो, त्यांच्या कडून काही घेण्याची अपेक्षा कधीच करत नाही..आपण त्यांना खुल्या मनाने बोलू शकतो की माझं तुमच्यावर प्रेम आहे...पण या सगळ्या पुस्तकी गोष्टी समाज मान्य करत नाही...

आम्ही आमच्या परीने आमच्या जबाबदाऱ्या कर्तव्य अगदी मनापासून निभावत होतो, पण हे सगळं करताना आमच्या मनाची स्तिथी काय होणार होती याची कल्पना आम्ही केली नव्हती...आणि या सगळ्यात मी विसरली होती की मला अभय ने घरी लवकर बोलावलं आहे.....

----------------------------------------------------------------

क्रमशः

( "तुम प्रेम हो" या गाण्याच्या ओळी राधाकृष्ण सिरीयल मधील आहे....आणि कथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा..पहिलीच कथा आहे त्यामुळे काही चुका असल्यास क्षमस्व 🙏🙏...)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED