समर्पण - ४ अनु... द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

समर्पण - ४

समर्पण-४

क्या कंहू तेरे इंतजार मे,
रात कुछ ऐसे गुजरी,
निंद का भी जवाब मिला,
ईन आंखो मे मेरी जगह किसीं और ने लेली।

काही लोकांचं नुसतं बोलल्यानेही मनाला प्रसन्न वाटायला लागतं. त्यांचा आवाज ऐकल्यावरही खूप धीर मिळतो मनाला. माझ्या बाबतीतही असच घडत होतं. ती रात्र मला खूप मोठी वाटायला लागली. तस तर जागरण वैगरे माझ्याने व्हायचं नाही पण त्या रात्री मला झोपच लागली नाही. अस वाटत होतं की कधी एकदाचा दिवस उगवतो आणि कधी मी विक्रम शी बोलते. माझं मलाच नवल वाटत होतं की किती आतुरता आहे मला.

एकदाची सकाळ झाली, मी भराभर काम आटोपली, अभय चा टिफिन, माझी सगळी काम झाल्यावर मी फक्त घड्याळ बघत होती की विक्रम कधी फोन करतो मला. आज मी सुट्टी घेतली होती तरीही सगळं काही लवकर लवकर आटोपन्याचा प्रयत्न करत होती. मला त्या दिवशी संयम धरवत नव्हता. एक वेळ वाटलं की मीच करते त्याला फोन पण आवरलं स्वतःला. मी वारंवार मोबाइलला बघत होती की कधी येतो फोन आणि एकदाच मोबाइल वाजला,

"गुड मॉर्निंग मॅडम, झाली का झोप?"

"हो, तसही मला उशिरापर्यंत झोपायची सवय नाही"

"असं का, की माझ्याशी बोलायचं होत त्यामुळे लवकर उठली?"

मला आश्चर्य वाटलं की याला कसं कळून जात नेहमीच मला काय वाटत असते ते,

" अस काही नाही, आणि मी का वाट पाहू तुझ्या फोन ची?"

"ते तुलाच माहीत पण मला रात्री अस वाटलं की बोलावं तुझ्याशी पण उशीर झाला होता खूप"

"हम्म, बोल काय काम होतं"

"ओह, काम असल तरच बोलायला पाहिजे का? अस नाही बोलू शकत?"

"तसं नाही रे पण एवढ्या रात्री तुला बोलावं वाटत होतं ना माझ्याशी त्यामुळे विचारलं"

"काही नाही तुझा dp बघितला, खूप गोड दिसतेस आणि आवाज पण गोड आहे तुझा"

"फ्लर्ट करतोस सकाळी सकाळी😡😡, सांगू का तुझ्या बायकोला"

"त्याला फ्लर्ट म्हणतात होय😆😆, म्हणजे कोणाची स्तुती केली तर फ्लर्ट, भलाई का तो जमाना ही नही रहा आणि यात माझी बायको का मधात आली ग"

"मग गोड दिसतेस म्हणजे काय, मी जितकी गोड आहे ना तितकी तिखट पण आहे त्यामुळे सांभाळून राहा😁😁"

"तस ही विदर्भाच्या लोकांना तिखटच राहता येत, प्रेमाची भाषा कळतच नाही ना तुम्हाला"

"ए विदर्भाला काही बोलायचं नाही हा, इगो दुखवतो आमचा"

"😆😆 चिडकी, किती चिडते ग, हे असे बालिश अन चिडके लोकं आहेत विदर्भात त्यामुळे आम्ही विदर्भ वेगळा देत नाही😆😆"

"नालायक गप्प बस"

"बाप रे, शिवी डायरेक्ट ते पण मला"

"नालायक शिवी नाही रे ती तर पदवी आहे तुझ्यासारख्या फ्लर्ट लोकांसाठी🤣🤣"

"जाऊदे, माझ्या फ्लर्ट करण्याने तुला हसायला येत असेल तर मी फ्लर्ट करणार करणार करणार😂😂"

"निर्लज्ज आहेस तू"

"बघ आता जसा पण आहे तूझाच..."

आणि हे बोलता बोलता तो थांबला, दोन मिनिटांसाठी मला कळलंच नाही काय बोलावं. खूप वेळा मनातले भाव आपण नकळतपणे बोलून जातो, आपल्या भावना आपल्याच ताब्यात राहत नाही. पण जेव्हा वास्तवाची जाणीव होते तेंव्हा मात्र कळत की आपण काय बोललो.

" मला अशी बकबक करायची सवय आहे ग, तू सांग काल का नाराज होतीस, म्हणजे चांगला मित्र म्हणून सांगु शकतेस तू मला"

"दिशा खूप नशीबवान समजत असेल ना रे स्वतःला, किती सहजपणे तू समजून घेतोस ना सगळ्यांना"

"माहीत नाही ती काय समजते अन काय नाही, किंवा तिला वेळ तरी आहे की नाही माझ्या बद्दल विचार करायला"

"का रे, सगळं ठीक आहे ना तुमच्या मध्ये?"

"सगळं ठीक आहे, तू ना नको तिथे जास्त डोकं नको लावू, आधीच डोकं कमी आहे तुला😆😆"

"मी डोकं लावते कारण मला वाटतं जी माझी परिस्थिती आहे ती कोणाची व्हायला नको"

"कंटाळा नाही येत का ग एवढे सेंटी डायलॉग मारून, बरं सांग ना काल काय झालं होतं, का तोंड फुगवून बसली होती,😁"

"असच, राग आला होता.......तुला काही सांगू शकते मी? म्हणजे तुला वेळ असेल तर?"

"अरे आपके लिये तो वेळ ही वेळ है, तू बोल फक्त"

"आधी तर हे फ्लर्ट बंद कर, मग सांगेन"

"बरं बोल, मी तर फक्त तुझा मूड चांगला करण्यासाठी बोलत होतो अन तू मलाच रागव☹️, बोल पटकन काय ते"

त्याच असं लहान मुलांसारखं रुसणं, मला हसवण्याच्या प्रयत्न करणं, त्याची सतत ची बडबड, माझी काळजी करणं मला खूप आवडायला लागलं होतं. मी त्याच्यासाठी नैना ची सोनू कधी झाली हे नाही कळलं मला. नक्कीच विक्रम माझा हक्काचा असा मित्र झाला होता ज्याला मी माझ्या मनातलं काहीही सांगू शकत होती आणि तो पण तेवढ्याच शांततेने ऐकून घ्यायचा. माझं आणि अभय बद्दल पण मी त्याला सगळ सांगितलं होतं. तो मला धीर द्यायचा, सल्ले द्यायचा की मी कस माझं अन अभय चे प्रॉब्लेम दूर करू शकते. त्याने मला कधीच चुकीचं मार्गदर्शन केलं नाही. एक मित्र म्हणून तो नेहमीच माझ्या अडचणीत उभा होता. आम्हाला एकमेकांनाही कळलं नाही एवढ्या लवकर आम्ही कसेकाय इतके चांगले मित्र झाली. कदाचित मैत्री पेक्षा ही जास्त अस काहीतरी होत जे आम्हाला बांधून ठेवत होत. एकदा असाच त्याने विचारल,

"सोनू, एक अनोळखी व्यक्ती वर कसा एवढा विश्वास ठेवलास ग तू, तुला भीती नाही वाटली?"

"माहीत नाही रे, पण मला तू कधीच चुकीचं काही करशील माझ्यासोबत असं वाटलंच नाही, मनातून वाटलं तुझ्यावर विश्वास ठेवावा, नाही तोडणार ना माझा विश्वास तू विक्रम??"

"नाही कधीच नाही तोडणार, आता जर मी काही बोललो तर तुला फ्लर्ट वाटेल पण तू खूप स्पेशल आहेस ग माझ्यासाठी, मी तुला दुखावण्याचा विचार ही नाही करू शकत, न ज्या दिवशी तुला माझ्या मुळे त्रास झाला ना सोनू, मी न बोलता तुझ्या आयुष्यातुन निघून जाईन, पण माझ्यामुळे तुला त्रास झालेला नाही सहन करु शकणार मी"

कोणाला माहीत होतं त्याचे हे शब्द खरे ठरतील अन तो असाच काही न बोलता निघून जाईल माझ्या आयुष्यातून. तो मला नेहमी म्हणायचा माणसाने खूप जास्त हळवं पण राहू नये, माणूस जेंव्हा हळवा होतो तो स्वतःला दुःख करून घेतो. पण खर तर हे होत की विक्रम इतका हळवा मुलगा मी कुठेच बघितला नव्हता, कोणाचंही दुःख ऐकून लगेच पाणी यायचं त्याच्या डोळ्यांत.

त्याला खुप मनातून वाटायचं की माझं अन अभय च नातं चांगलं व्हावं, अभय ने माझ्या कडे लक्ष द्यावं आणि त्याही तगमग कळायची मला. मलाही तेवढ्याच प्रकर्षाने वाटायचं की दिशाने त्याची काळजी घ्यावी त्याला मानसिक आधार द्यावा.

आमची मैत्री काय वळण घेणार होती माहीत नव्हतं पण माझ्या स्वभावात मात्र खूप बदल होत होते. आणि ते अभय ला ही जाणवत होते. अभय बोलत नाही त्यामुळे मी पण त्याच्याशी कामपूरताच संवाद ठेवत असे पण विक्रम आल्यापासून मी आनंदी राहायला लागली. तो मला अभय ची सकारात्मक बाजू दाखवून द्यायचा त्यामुळे माझी अभय वरची चिडचीड कमी व्हायला लागली. एक बायको म्हणून मी अभय ची काळजी तर आधी पण घेत होती, पण गेल्या काही दिवसांत औपचारिकता म्हणून मी ते करायची. आता मात्र मी पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करत होती अभय ला समजून घेण्याचा. अर्थातच हे सगळं विक्रम मुळे मी करत होती. हळूहळू माझा अन अभय चा संवाद व्हायला लागला. ऑफिस मधून घरी आल्यावर तो माझ्याशी काहीतरी कारण काढून बोलायचा.

मी जेंव्हा विक्रम ला हे सगळं सांगायची त्याला खुप आनंद वाटायचा. काही लोक इतके सकारात्मक असतात की आपलं आजूबाजुच परिसर ही तसच बनवून टाकतात. विक्रम माझ्या आयुष्यात एक आशेचा किरण बनून आला होता.

अनेकदा आपण आपल्या आयुष्याच प्लॅनिंग करत असतो की भविष्यात मी हे करणार ते करणार. पण हे करत असताना आपण विसरून जातो की नियतीला कंट्रोल करू शकत नाही. मी ही ते विसरून गेली होती की देवाचे प्लॅन्स काहीतरी वेगळेच आहेत माझ्यासाठी.

अभयला माझे सगळे मित्र मैत्रीण माहीत होते पण विक्रम बद्द्ल त्याला काही कल्पना नव्हती. माझ्या आणि अभयच्या नात्यात प्रेम जरी नव्हतं तरी विश्वास होता. आणि हा कदाचीत विश्वासच होता जो आम्हाला अजून एक संधी देत होता हे नातं टिकवण्यासाठी.
मी आणि अभय एकदा बाहेर फिरायला गेलो. त्या दिवशी अभय माझ्याशी खूप भरभरून बोलत होता. आम्ही सोबत चालताना कितीतरी वेळ त्याने माझा हात घट्ट धरून ठेवला होता. सगळं काही माझ्या मनासारखं घडत होतं तरी आतमधून काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. त्या दिवशी विक्रम शी काही बोलणंच झालं नाही. घरी जायला ही उशीर झाला होता, त्यामुळे विक्रम ला फोन ही नाही केला मी.

दुसऱ्या दिवशी सकाळी आधी विक्रम ला मेसेज केला. पण खूप वेळ झाल्यानंतरही त्याचा काही रिप्लाय आला नाही त्यामूळे मी विचार केला की त्याला फोन च करते.

"कुठे आहेस रे, माझा मेसेज बघितला नाही का? काही रिप्लाय पण नाही दिलास"

"ओह तुला वेळ मिळाला माझ्यासाठी आज?"

"असा का बोलतो रे, मी बोलली होती ना तुला की मी अन अभय बाहेर जातोय, त्यामुळे नाही बोलू शकली"

"हम्म....."

"काय झालं दिशा सोबत भांडलास का अन त्याचा राग माझ्यावर काढतोस"

"आपण बोलत असताना अभय अन दिशा ला मधात आणणं गरजेचेच आहे का? फक्त आपल्या दोघांबद्दल बोलू शकत नाहीस तू?"

"पागल झाला का तू? काय झालंय सांग तरी"

"मला नाही माहीत मला काय झालं सोनू, पण मला काल तुझी खूप आठवण आली"

"हो ठीक आहे ना मग म्हणून काय इतकं चिडायचं,"

"मी चिडत नाही आहे ग, पण मला आजकाल भीती वाटते तू राहशील ना माझ्या आयुष्यात???"

"हो नक्की, इतक्या सहजसहजी तुला त्रास देन थांबवणार नाही मी😆😆"

",😁😁 हो माहीत आहे त्यामुळेच विदर्भ वेगळं देत नाही आम्ही"

त्यादिवशी तर ती गोष्ट आम्ही हसण्यावर नेली पण आतमधून दोघांनाही कळत होत की काहीतरी वेगळी भावना आमच्या मनात घर करत आहे ज्याच्याशी आम्ही अनभिज्ञ होतो आणि आजपर्यंत आम्ही भेटलो ही नव्हतो, त्यामुळे आमची भेट कशी रंगणार होती हे फक्त वेळच सांगणार होती.......

--------------------------------------------------------------
क्रमशः....