Samarpan - 3 books and stories free download online pdf in Marathi

समर्पण - 3


समर्पण-३

मिला था एक अजनबी,
ना लगा वो अजनबी सा।
रीश्ता तो बेनाम था, लेकीन
प्यार दे गया वो अपणो सा।


आपण आयुष्यात खूप नाते निभावत असतो, त्या नात्याना नावही असतात पण काही नाती निनावी असतात आणि ती फक्त निभावण्यासाठी बनलेली असतात. खूप कठीण असतं अशी नाती निभावणं आणि टिकवणं. मला वाटत नात टिकवणं सोप्पं असतं नात निभावण्यापेक्षा. नातं टिकवणं ही गरज असते तर नातं निभावण्यासाठी समर्पणाचा भाव लागतो. विश्वास असावा लागतो एकमेकांवर. मी आणि अभय केवळ बंधनात अडकलो होतो असच मी म्हणेल. मला नेहमी वाटायचं की अभय वाईट व्यक्ती नाही आणि तो नव्हताच. त्याला त्याच्या जबाबदाऱ्या कश्या पार पडायच्या हे कळत होतं पण असं काहितरी आमच्या नात्यात होत जे आम्हाला मनाने जवळ येऊ देत नव्हतं. कधी मी आजारी पडल्यावर त्याची माझ्या साठीची काळजी मला स्पष्ट दिसायची. मला कधी ऑफिस वरून यायला उशीर झाला तर त्याची चिंता कळायची मला. पण त्याने हे स्पष्ट केलं होतं आम्ही सोबत राहतो मी त्याची जबाबदारी आहे त्यामुळे तो माझी काळजी करतो. पण मी त्यात ही आनंदी होती. एखाद्याला नाही व्यक्त होता येत त्यामुळे त्याला आपल्या बद्द्ल भावना नाहीत हे वाटण चुकीचं आहे. पण नातं घट्ट करण्यासाठी कधितरी व्यक्त पण व्हाव लागतं. आपल्या मनात खूप काही असत पण ते न बोलू शकल्या मुळे पण नाती कमजोर पडतात, आणि कधी कधी तुटतात पण. पन या सगळ्या गोष्टींचा अभय वर काही परिणाम होत नव्हता, तो जसा होता तसाच होता. त्याच्या बरोबर राहता रहाता मी मात्र खूप बदलली. नेहमी हसत खेळत असणारी मी खूप शांत झाली. लग्ना आधी सगळ्यांच्या खोड्या करणारी मी अचानक एक समजदार गृहिनी झाली. माझ्या माहेरच्यांना खूप विशेष वाटायच की इतकी हट्टी असणारी मी, का इतकी बदलली. पण मी त्यांना ही काही सांगू शकत नव्हती. एक नम्रता होती जी मला खुप समजून घ्यायची.

-------------------------------------------------------------

त्या गायकाशी बोलून ३-४ दिवसच झाले असतील की एक दिवस मला त्या नंबर वरून फोन आला. मी द्विधा मनस्थितीत होते की फोन उचलू की नको. कारण तेच, मला अनोळखी माणसांशी बोलायला अवघड जात. मेसेज वर बोलणं वेगळं पण अस फोन वर कस बोलू याच विचारात मी फोन रीसिव्ही केला,

"अग कुठे आहेस किती वाट बघायची आम्ही, वेळेची किंमत आहे की नाही तुला"

बाप रे ! एवढा राग, मला का झापतोय हा, पागल झाला का? मी स्वतःशीच विचार केला आणि माझा राग आवारत त्याला बोलली,

"सर मला माहीत नाही तुम्ही कोणाचा राग कोणावर काढताय पण एका मुलीशी असा नाही बोलू शकत तुम्ही, असणार गायक मोठे पण अस विनाकारण कोणाला रागावू नाही शकत तुम्ही😠"

"हॅलो, सरिता बोलत आहे ना की मी चुकीचा नंबर लावला?? 🤔"

"मी कोणी सरिता वैगरे नाही, आणि तुम्ही चुकिचा की बरोबर नंबर लावालाय हे मला कस माहीत,😑"

"सॉरी मॅडम काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय मला, मला कळू शकेल कोण बोलताय तुम्ही?"

किती गर्व आहे ना या माणसाला आत ४ दिवसांपुर्वी एवढ प्रवचन झाडत होता आणि आता मी कोण आहे हे पण ओळखलं नाही. मलाच हौस होती मेसेज करायची की गाणं चांगलं झालं.

"का सांगू मी? त्या दिवशी तर खूप बोलत होता की मला तुम्ही नको तू म्हण, अन काय काय प्रवचन देत होता आणि आज ओळखलं नाही मला ? 😠"

"ओह, तर तू आहेस फॅन नंबर 1, अग काय झालं त्या दिवशी चुकून तुझा नंबर सरिता च्या नावाने सेव्ह झाला , सरिता माझ्या ग्रुप मधली गायिका आहे, आता तुझ्या नावाने सेव्ह करतो"

"ओके असा गोंधळ झाला तर. मला पण तेच वाटलं की त्या दिवशी एवढं चांगला बोलणार व्यक्ती आज एकदम हिटलर का झाला😆😆"

" ए, मी काही हिटलर नाही एकदम डॅशिंग नाव आहे माझं ...विक्रम"

"बोलतो तर असा जसा काही सिंघम आहेस 😁😁,"

"😀😀 आज खूप जोक सुचताय तुला,त्या दिवशी का दुःखी आत्मा झाली होती,😄😄,"

"मी खूषच राहते, नाही होत दुःखी कधी कळलं का सिंघम, कधी कधी होत असं"

"मी सिंघम न तू कोण, लेडी सिंघम??,😁😁"

" चूप रे चांगलं नाव आहे मला, नैनिका..."

"नैनिका, किती वर्ष झालीत लग्नाला?"

" तुला कस कळलं की माझं लग्न झालाय?"

"त्या दिवशी इतकी फिलॉसॉफी झाडत होती ना त्यावरून कळाल"

"हो का ? तुला कळलं म्हणजे तू पण अनुभवी दिसतोस मला, तुला किती वर्ष झाली लग्नाला"

" 2 वर्ष होतील आता, पण मी तुझ्या सारखा दुःखी आत्मा नाही,😆😆,"

" मी पण काही दुःखी वैगरे नाही, खूप चांगला आहे माझा नवरा, तू तुझचं बघ"

" हो बरोबर, तस पण कोणाला वेळ आहे माझ्या कडे बघायला किंवा माझी काळजी घ्यायला, बरोबर आहे तुझं"

"सॉरी यार, तू सिरीयस झाला, मला तुला दुखवायच नव्हतं"

"अरे नाही मी ठीक आहे, जाऊदे तो विषय, माझा कार्यक्रम आहे येशील का बघायला?"

"मला वेळ मिळाला तर नक्कीच येईल"

" ठिक आहे बघ कस जमत ते नाहीतर मी तुला रेकॉर्डिंग पाठवेल, चालेल ना तुला मेसेज केलेला"

"हो चालेल"

त्या दिवसानंतर रोज आमचं बोलणं व्हायला लागलं. कधी तो त्याच्या कविता पाठवायचा, कधी त्याचे गिटार चे रेकॉर्डिंग, कधी गाण्याचे. मला खूप अप्रूप वाटायचं त्याच, की एकाच वेळेला किती सगळ्या गोष्टी करत असतो हा. तो मला नेहमी सांगायचं तुला जे आवडत ते तू कर. खरं तर मला खूप प्रेरणा मिळल्यासारखं वाटायचं जेंव्हा त्याच्याशी बोलणं व्हायचं. खुप बडबड करायचा खूप हसवायचा मला. खुप विशेष वाटायचं मला की एखादा मुलगा पण इतकं बोलू शकतो. अश्या व्यक्तींकडे पाहिलं की वाटत किती मनमुराद आयुष्य जगतात हे लोकं. पण खरं तर हे असत की स्वतःच्या मनातल्या पीडा लपवून दुसर्यांना आनंदी ठेवण्याची कला असते या लोकांमध्ये. स्वतः आनंदी राहणं खूप सोप्प असत पण दुसर्याना आनंदी ठेवण, तेही आपले व्याप विसरून हे खरंच एक वरदान असतं देवाने दिलेलं. विक्रम एक असच व्यक्तिमत्व होत. त्याच्याशी बोलतांना मला नेहमी वाटायचं की या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे नक्कीच काहीतरी गंभीर चेहरा असेल. पण आमची मैत्री अजून तरी अशी झाली नव्हती की मी त्याला हे सगळं विचारू.

--------------------------------------------------------------

मला असं वाटत नवरा बायको मध्ये प्रेम जरी नसेल तरी चांगली मैत्री असणं फार गरजेचे आहे. जर तुमचा जोडीदार तुमचा चांगला मित्र होऊ शकत नसेल तर तुमच्या कोणत्याच प्रकारच्या भावना त्याच्यापर्यंत पोहचत नाही. कारण या जगात मैत्री हे एकमेव अस नात आहे जिथे तुम्हाला व्यक्त होताना कोणताच दबाव नसतो किंवा भीती नसते. आणि पती पत्नी हे तर सगळ्यात नाजूक नातं आहे, त्यामुळेच या नात्याला रेशीमगाठी म्हणतात ना.

अभय जरी माझा नवरा होता तरी त्याच्याशी बोलताना मला शब्दांची जुळवाजुळव करावी लागायची. अस नाही की माझ्या कोणत्या गोष्टी वर तो रागवायचा पण तरीही आमच्यामध्ये एक दरी होती ज्यामुळे आम्हाला एकमेकांसमोर व्यक्त होण कदाचित अवघड जायचं. एक पत्नीचे कर्तव्य निभावताना मी प्रयत्न करत होते की आमच्या नात्यातला हा कमीपणा मी भरून काढावा. पण कोणत्याही नात्यात असे प्रयत्न दोन्ही बाजूने व्हायला हवे. काही नात्यांमध्ये पूर्वजन्माचा संबंध असतो त्यामुळे ते लवकर जुळतात असा मला वाटतं. माझं आणि विक्रमचही तसच काहीतरी असावं. त्यामुळे मला त्याच्याशी बोलताना कोणताच अवघडलेपना वाटायचं नाही.

अभय आणि माझं नातं कसही असेल पण माझ्या सासू सासर्यांनी मला मुली सारखा जीव लावला. आणि हेच मूळ कारण होत की मी माझ्या नात्याला वेळ देन्याचा प्रयत्न करत होते. कारण लग्नच्या बेडीत जरी मी आणि अभय बांधल्या गेलो होतो तरी आमच्या सोबत आमचे कुटुंब पण एकमेकांसोबत जोडल्या गेले होते. त्यामुळे आम्ही आमच्या परीने हा प्रयत्न करायचो की आमच्या मुळे ते दुखावू नयेत. आणि अभयचा हाच स्वभाव मला खूप भावायचा. एक चांगला मुलगा आणि चांगला जावई होण्यात त्याने कुठलीच कमी ठेवली नव्हती.....अशातच माझे सासू सासरे काही दिवसांसाठी आमच्याकडे राहायला आले. मला छान वाटलं, कारण अभय व्यतिरिक्त कोणीतरी होत घरात ज्यांच्यासोबत मी बोलू शकत होती. बोलता बोलता त्यांनी आमच्याकडे बाळाचा विषय काढला. त्यांच्या जागेवर ते बरोबर होते पण मी त्याना सांगू शकत नव्हती की माझ्या मध्ये आणि अभय मध्ये एवढी जवळीक नाही आहे.

पण तरीही मी विचार केला की स्वतःच मुलं झाल्यावर कदाचित काहीतरी सुधारणा होईल आमच्यात. त्यामुळे खूप हिम्मत करून मी अभय ला हे बोलायच ठरवलं.

"अभय, मला बोलायचं आहे तुझ्याशी.."

"बोल ना

"आपल्या लग्नाला ३ वर्षे झालीत, आई बाबा सांगत होते की आता आपलं पण कुटुंब पूर्ण व्हावं"

"म्हणजे मला कळलं नाही?"

"आपण बाळाचा विचार करायला हवा"

"मला वाटत आपण सध्या आपल्या करियर वर फोकस करू नैना"

"ते तर होतच राहील ना रे, पण हे पण महत्त्वाच आहे ना"

"हे बघ नैना मला या विषयावर बोलायच नाही सध्यातरी"

" मग तुला बोलायचं कधी असते रे, आणि कोणत्या विषयावर बोलायच असते, फक्त नावाची बायको करून आणलं आहेस मला या घरात, असच होत तर का केलं लग्न माझ्याशी ?"

खूप चिडली होती मी, खुप दिवसांपासून साठवलेला राग कदाचित बाहेर पडत होता माझा. त्यावेळेला असा वाटलं की सगळं सोडून निघून जावं. पण आवरला स्वतःचा राग. कळतं नव्हतं नेमकं काय चुकत आहे माझं. आणि अभय सांगायला ही तयार नाही की प्रॉब्लेम काय आहे. त्यामुळे अजून जास्त चिडचिड होत होती. मी बोलली त्याला, की जर असच असेल तर मी नाही राहू शकत तुझ्या सोबत. पण तो एकदम निर्विकार पणे बोलला की त्याला वेळ हवा . आणि नेहमीप्रमाणे मी पुन्हा शांत झाली. काय करू शकत होती मी ?? आपल्या समाजात असं आहे ना की काही जरी झाली तरी लग्न निभावन्यासाठी मुलींनीच तडजोड करायची. आणि लहानपणापासून तेच शिकवलं जातं. तेवढ्यात मोबाइल वर मेसेज आला...विक्रम चा होता....


जब भी लगे सब कुछ हार गये हो तुम,
थोडासा हौसला रखके कुछ कदम और चल लेना,
क्या पता अगला कदम शायाद कामयबी का हो।


त्या वेळेला मलाच खरंच खूप हरल्यासारखं वाटत होतं पण मेसेज वाचल्यावर काय माहीत का मला हिम्मत मिळाली, मला लगेच विक्रम ला फोन करण्याची ईच्छा झाली पण रात्र झाल्यामुळे मी नाही केला, तेवढ्यात लगेच त्याचा दुसरा मेसेज आला,

"लेडी सिंघम, सकाळी फोन केला तर चालेल का तुला?"

मी लगेच हो बोलली पण मला खरच खूप आश्चर्य वाटलं हा सगळा योगायोग आहे की आमचं नशीब काही इशारा करत होत आम्हाला. पण जे काही होतं, आमचं हे ' किस्मत कनेक्शन ' नक्कीच काहीतरी वेगळं वळण घेण्याच्या तयारीत होतं........
क्रमश: .......


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED