Samarpan - 6 books and stories free download online pdf in Marathi

समर्पण - ६

समर्पण-६

आज मौसम सच मे सुहाना है,
या ये तेरी सोहबत का असर है।
मैं देख रही हूं जहाँ जहाँ,
बस प्यार ही प्यार नजर आता है।


खुप छान दिवस होता तो, आमची ती पहिली भेट त्यात पाऊस, सगळं काही अतिशय सुंदर. आज ही तो दिवस आठवला की कितीतरी तरंग उठतात मनात. संध्याकाळ झाली, खरं तर अंधारच पडला होता त्यादिवशी, पण गप्पा मारता मारता वेळेचं भानच राहील नाही आम्हाला, त्यामुळे मला थोडासा उशीरच झाला घरी पोचायला. मी बोलली विक्रम ला मी बसने किंवा ट्रेन ने जाईल पण ऐकेल तो विक्रम कसला. मला सोडायला आला माझ्या बिल्डिंग पर्यंत. थोडीशी लांबच उभी केली गाडी त्याने. माहीत होतं दोघांनाही की ही वेळ संपणारच आहे, आपल्याला घरी जावंच लागेल पण का कोण जाणे एक वेगळीच हुरहुर होती. मी गाडीतून उतरणार तोच त्याने पुन्हा माझा हात पकडला आणि अलगद त्याचे ओठ माझ्या हातावर टेकवले आणि मला अचनाक काही सुचनासच झालं आणि मी जाऊन त्याच्या मिठीत शिरली. पण विक्रम चा स्पर्श एवढा प्रामाणिक होता, मला खूप सुरक्षित वाटत होतं त्याच्या मिठीत. विक्रम ला त्याच्या मर्यादा माहीत होत्या अन त्यामुळेच त्याने ती मिठी घट्ट केली नाही. थोडंस जड मनानेच आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. बाय करताना जेंव्हा त्याने माझ्याकडे बघितलं त्याचे डोळे पाणावले होते पण नजर चोरत म्हणाला,
"ए चशमिश पळ ना लवकर, तुझ्यामुळे मला पण उशीर होईल जायला, बायको घरात घ्यायची नाही मला, 😁😁"

किती निरर्थक प्रयत्न होता त्याचा स्वतः च्या भावना लपविण्याचा. हेच आवडायचं नाही मला त्याच, मला त्रास होऊ नये म्हणून त्याने कधीच त्याचा प्रपंच माझ्या समोर मांडला नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा शेवटीही तसाच केला......
------------------------------------------------------------------

घरी पोचली तर अभय माझ्या आधीच आज घरी येऊन बसला होता. मला आश्चर्य वाटलं की आज अभय एवढ्या लवकर घरी कसा आला. मी घरात आली, फ्रेश होऊन सरळ किचन मध्ये गेली. माझ्या मागोमाग अभय ही आला,

"कुठे होतीस, आज उशीर झाला यायला तुला, माझे फोनही उचलले नाहीस?"

तेंव्हा लक्षात आलं अरे आपला फोन तर सायलेंट मोड वर आहे. शीट, मी अभय चे फोन नाही बघितले, कस लक्षात नाही आला माझ्या. मी माझ्याच विचारात होती अभय पुन्हा बोलला,

"काय झालं, कुठे हरवलीस नैना, तब्येत बरी नाही का तुझी"

"नाही रे, ठीक आहे मी, सॉरी मी तुझा फोन नाही बघितला, मी ना आज माझ्या एका मित्रा....."

आणि अभय ला फोन आला त्यामुळे आमचं बोलणं अपूर्ण राहिलं. मला अभयला सांगावस वाटत होतं की मी विक्रम ला भेटली, कारण आजपर्यंत मी माझे कुठलेच फ्रेंड्स अभय पासून लपऊन ठेवले नव्हते. मी स्वयंपाकाच्या तयारीत होती. अभय च फोनवर बोलून झाल्यावर त्याने अचानक येऊन मला मागून मिठी मारली. मी मात्र दचकली आणि माझ्या हातातलं पातेलं जमीनिवर आदळल. अभय लगेच बाजूला झाला,

" सॉरी नैना, तुला लागलं तर नाही ना"

मी फक्त नकारार्थी मान हलवली. आज माझ्यासोबत सगळं अजबच घडत होतं. विक्रम बद्दल मला का एवढी ओढ असावी हा प्रश्न आधीच अनुत्तरित होता माझ्यासाठी अन त्यात नविन भानगड म्हणजे आज अभय च अस वागणं. मी काय बोलू काहीच कळत नव्हतं,

"तुला आवडलं नाही हे नैना? सॉरी,...सोड सगळं आज आपण बाहेर जाऊयात का जेवायला, जर तुझी इच्छा असेल तर?"

"अभय, मी थकली आहे रे, मी बनवते ना घरीच काहीतर"

"बरं असुदे, मी बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करतो, तोपर्यन्त आपण गप्पा मारू"

अभय माझ्याशी खूप बोलत होता. मला चांगलं पण वाटत होतं आणि आश्चर्यही की अचानक अभय का असा वागतोय आज. तस तर गेल्या काही दिवसांत अभय च्या स्वभावात बदल घडत होते पण आज त्याचे रंग काहीतरी वेगळेच दिसत होते मला. जेवण झाल्यावर, सगळी काम झाल्यावर मी झोपायला जाणार तोच अभय ने मला बोलावून घेतलं. मी आणि अभय पती पत्नी म्हणून एका घरात जरी राहत होतो तरी आमच्या बेडरूम मात्र वेगवेगळ्या होत्या. सगळं काही विचीत्र घडत होतं माझ्या सोबत.

"नैना मला बोलायचंय तुझ्याशी"

"बोल ना"

"नाही कळत आहे कसं बोलू.......तू एकदा मला बोललेली ना की आपण आपली फॅमिली पूर्ण करावी....मी विचार केला खूप अन मला वाटत आहे आपण एक नवीन सुरुवात करू शकतो..."

आता हे ऐकून मात्र माझं अंग थरथरत होत. हो, हाच तर विचार करत होती मी आजपर्यंत की अभय ने स्वतःला बदलावं, माझ्या सोबत नवीन सुरुवात करावी, मग आज माझं मन इतकं बैचेन का होतंय. जर माझी इच्छा तीच होती तर भीती का वाटत आहे. आणि जर मला आज हे आवडत नसेल तर त्याच काय कारण असावं. काय द्विधा मनस्थिती होती ही. अरे देवा काय करू....विक्रम....हां विक्रमच..त्यालाच विचारते.... मूर्ख आहे का नैना यावेळेला तू फोन करशील त्याला....असे कितीतरी विचार माझ्या मनात वादळ निर्माण करत होते, मी मात्र अभयला काहीच उत्तर देऊ शकत नव्हती,

"मला माहित आहे नैना अचानक तुला हे सगळं विचित्र वाटत असेल, काही हरकत नाही, तुला वाटेल तेवढा वेळ घे, पण एक करशील प्लिज??"

"काय??"

"आज पासून आपण कमीत कमी एका रूम मध्ये तरी झोपू शकतो ना"

अभय ला नाही म्हणावसं नाही वाटलं मला. कुठे तरी आमच्या नात्याची सुरुवात होत होती. पण माझ्या मनातली चलबिचल काही कमी होत नव्हती. अभय ला ते जाणवलं पण त्याला वाटलं की कदाचित मला अवघडल्यासारखं होतंय त्याच्यासोबत त्यामुळे त्याने अजून काही विचारायचं टाळलं मला. मला सतत माझी अन विक्रम ची भेट आठवत होती. अभय कडे बघितलं तर तो झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. त्याच्या कडे बघितल्यावर जाणवलं की आता माझ्या मनात विक्रम चे विचार यायला नको, मी फक्त अभय चा विचार करायला पाहिजे. पण आपलं मन तर स्वच्छंदी असत आपण कितीही प्रयत्न केला तरी मानला आवरू शकत नाही. शेवटी मला काही झोप लागलीच नाही त्या रात्री.
--------------------------------------------–----------------

दुसऱ्या दिवशी मला थोडी उशिरानेच जाग आली. मी धडपडत उठली तर माझ्या आधी अभय रेडी झाला होता ऑफिस साठी. मी घाईघाईत किचन मध्ये गेली तर अभय ने माझ्या साठी चहा नाश्ता बनवून ठेवलं होतं. मला ते चांगलं नाही वाटलं,

"सॉरी अभय उठायला उशीर झाला, पण तू का बनवलं सगळं, मी केलं असतं ना....

"ठीक आहे ग, मला तुला उठवायची ईच्छा झाली नाही, चल आवर पटकन आज मी तुला सोडतो ऑफिस मध्ये..."

मी भराभर आवरलं आणि जायला निघाले तेवढ्यात अभय ने मला थांबवलं अन मला पुन्हा मिठी मारली. माझ्या मनातून निघालच नाही की मी त्याला काही प्रत्युत्तर देऊ. त्याला कदाचित ते जाणवलं अन लगेच जायला निघाला. खर तर मला वाईट ही वाटत होतं की मी का अशी वागत आहे अभय सोबत. जर तो त्याच्या परीने प्रयत्न करतो आहे सगळं सुरळीत करायचं तर मी पण त्याची साथ द्यायला हवी. पण माझ्याच्याने असं होतं नव्हतं. गाडीत बसल्यावर विक्रम चे खूप मेसेजेस येत होते मला पण अभय सोबत असल्यामुळे आणि तो माझ्याशी बोलत असल्यामुळे मी काही विक्रम ला रिप्लाय देऊ शकत नव्हती.

का अशी अवस्था होत होती माझी?? जो सोबत आहे तो मनात नाही अन जो मनात आहे तो सोबत नाही. प्रश्न खूप होते पण उत्तर मात्र कशाचाच भेटत नव्हतं. कोणाला सांगु, काय करू काहीच कळत नव्हतं. हाच विचार करता करता पोचली ऑफिसला. विक्रम च्या मेसेजेस ना काही उत्तर दिलं नाही त्यामुळे मन खूप बैचेन होत होतं. पण त्याला काय बोलू हे पण कळत नव्हतं. शेवटी फोन केलाच त्याला,

"आली का आठवन माझी मॅडम?"

"आठवन यायला विसराव लागतं अन मी तुला कधी विसरतच नाही विक्रम..."

"चल, काहीतरी तर शिकली तू माझ्या कडून"

"काय शिकली??"

"फ्लर्ट करायचं...😆😆😆"

"तू मला कधीच सिरियसली घेत नाही ना विक्रम, मला आता खरचं राग आलाय, नाही बोलणार मी तुला"

"किती रागवायच ते रागव पण बोलणं बंद नको करू, नाहीतर बघ मग...."

"नाहीतर काय करशील??"

"काहिनाही...फटके देईन 😂😂😂"

"पण जर खरचं अस झालं तर काय करशील??"

"नाही जगू शकणार किंवा जगलो जरी तर शरीरात आत्मा नसेल"

"विक्रम......"

"😆😆😆तुला काय वाटत की तुलाच सेंटी होता येतं, कसा वाटला माझा डायलॉग"

पुन्हा एकदा विक्रम ने निरर्थक प्रयत्न केला त्याच्या भावना लपविण्याचा, पण तो हे विसरला होता की जर तो मला चांगलं ओळखतो तर मी सुध्दा त्याच्या प्रत्येक शब्दा मागचे भाव ओळखू शकते. कसं नातं होत ना आमचं? कधी कधी दोघांनाही खूप विशेष वाटायचं की का आपण एकमेकांसाठी एवढं अस्वस्थ होतो, का एवढी काळजी करतो. त्यावर तो नेहमी बोलायचं असेल काही मागच्या जन्माचे पाप आपले जे या जन्मात सोबत मिळून धुवायचे आहेत🤣🤣🤣 आणि मग यावर खूप हसायचो आम्ही.
पण हे मात्र मी मानत होती की नक्कीच काहीतरी आपला संबंध असला पाहिजे नाहीतर एवढ्या लवकर आम्ही मनाने जुळलो नसतो.

मी त्याला माझ्या अन अभय बद्द्ल सगळं सांगितलं. अर्थातच, त्याला आनंद झाला खूप, मला बोलला,

"अरे वा, मग आज तर मॅडम खूप खुश असतील... तू हसली ना की मला खूप छान वाटतं ग सोनू, आनंदी रहा प्लिज"

"तू सोबत असल्यावर मी नेहमीच आनंदी आहे रे विक्रम"

"मी नाही अभय...."

"तो तर असेलच... पण तुझा काही प्लॅन आहे का मला सोडून जाण्याचा?"

"मी कुठेच जाणार नाही ग, पण...."

" पण काय?"

" काही नाही, ते सोड तुला माहीत आहे का माझे किती फोल्लोवर्स झालेत, सगळ्यांना माझ्या कविता खूप आवडत आहेत... अन मुलीना तर खूपच जास्त😆😆"

"अरे वा, तू तर कन्हैया झालास रे😂😂"

"मग आहेच मी कन्हैया...त्यामुळेच एवढ्या गोपिका आहेत ना माझ्यामागे....🤣🤣🤣"

"त्या सगळ्या गोपिकांमध्ये अजून एकीची भर पडली ना विक्रम..?"

"नाही ग....ती तर माझी राधा आहे....."

विक्रम च्या या बोलण्यावर नक्कीच उत्तर नव्हतं माझ्याकडे, अन त्यालाही कळत नव्हतं की कळत नकळत आम्ही एकमेकांच्या किती जवळ येत आहोत. अन त्यावेळेला आम्हाला याची जाणीव ही नव्हती की राधाकृष्ण सारखं प्रेम, त्यांच्यासारखं समर्पण, आणि त्यांच्यासारख्या त्यागासाठी आमच्या सारख्या सामान्य मनुष्याना कितीतरी असंख्य वेदनेतून जावं लागेल.......
-----------------------------------------------------------------
क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED