swapn premaache books and stories free download online pdf in Marathi

स्वप्न प्रेमाचे

कथा –

स्वप्न प्रेमाचे

---------------------------------------

आजची सकाळ नेहमीपेक्षा खूप छान वाटत होती , माणसाचे मन अधिरतेने ज्या गोष्टीची वाट पाहत असते तो गोष्ट पूर्ण होणे “

हा आनंद खूप मोठा असतो . मन आतुरलेले असते, ,कान अधीर असतात ..

ऐकण्यासाठी -ते स्वर्गीय शब्द .अवघे अडीच अक्षरे .. प्रेमाची ..!

ऐकली की मन तृप्त होऊन जाते .

अनुया खूप छान मूड मध्ये होती , सकाळीच अजितचा फोन यावा असे वाटत असतांना ,त्याचा फोन कॉल

तर नाही आला ,

पण, त्याचा गोल्डन मेसेज आला . फोन -स्क्रीनवर तो मेसेज वाचून तिचे मन

फुलपाखरा सारखे आनंदाने नाचू लागले ,बागडू लागले .

अखेर अजितने तिच्या प्रेमाचा स्वीकार केला होता ,आणि त्याचा मेसेज आला ..

अनुया –आय लव्ह यु टू...!

अनुयाला वाटले आपल्या प्रेमाची ही शक्ती आहे. अजितला आपल्या प्रेमाची जाणीव झाली ,

बस ,यापुढे आणि नंतर आपल्याला काहीच नकोय .

भान हरपून अनुया ..पुन्हा पुन्हा ती सुर्वणअक्षरे पाहत होती , वाचत होती . तिच्या प्रेमाची

तपस्या सफल झाली होती .

आज अजित कडून तिच्या प्रेमाला प्रतिसाद आला खरा ..पण हे सारे होण्यासाठी किती प्रयत्न करावे

लागले ..

बाप रे काही म्हणा .. प्यार के लिये कुछ भी .और बहोत कुछ करना पडता है..!

आणि अगदी तसेच झाले..

तिच्या प्रेमाची काटेरी वाटचाल आज संपली ..ही वाटचाल तिला जशीच्या तशी आठवू लागली ..

अनुया श्रीमंत आई -बापाची लाडकी लेक .दोन मोठ्या भावांची लाडकी धाकटी बहिण .

तिच्या तुलनेत अजित एक सामन्य परिस्थिती असलेला एक तरुण

जो स्थिर होण्याची धडपड करतोय असे त्याच्याकडे पाहून वाटायचे .

अजित वेगळाच होता ...चार-चौघा सारखी नोकरी करून पगाराच्या पैशात मजेत राहण्याची स्वप्ने त्याला पडत नव्हती .

त्याच्या मनाशी उदात्त समाज कार्य करण्याचे स्वप्न घेऊन तो जगत होता . स्वताच्या संस्थेत

तोच एकटा टेबल खुर्ची घेऊन बसायचा ..जगाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करीत होता ..

काय होते त्याचे कार्य स्वरूप .. ?

समाजातील दुर्लक्षित माणसाकडे लक्ष देत त्यांच्यासाठी पुनर्वसनाचे कार्य करायचे

या कार्यात कोलेजच्या दिवसापासून त्याने स्वतःला झोकून दिले होते .

एकच ध्यास ..

अशा दुर्लक्षित ..स्त्री –पुरुष , मुले –मुली ..या सगळ्यांना चांगले आयुष्य जाणायला मिळाले पाहिजे “

एक माणूस म्हणून आपण त्यांना मदत केली तर नक्कीच काही न काही तरी घडेल .

अजितचा आत्मविश्वास ..हळूहळू का होईना त्याला यश देतो आहे ..हे सगळ्यांच्या नजरेस पडू

लागले . त्याच्यासारखीच ध्येयवेडे तरुण त्याला येऊन मिळाले , आणि त्याच्या कार्याला चालना

मिळत गेली , वेग मिळत गेला .आणि त्याने पत्करलेले कार्य ..त्याच्या सोबत्यांनी त्याच्यासाठी

बरेचसे सोपे आणि सहज होण्यास मदत केली ..

गाजावाजा न करता , देखावा न करता ,इव्हेंट न करता “कार्य करता येते ..हे अजितच्या

प्रकाश झोतात न येता काम करीत राहण्याच्या स्वभावामुळे लोकांच्या मनावर खूप परिणाम

करीत गेले . आणि हळू हळू .सामन्य अजितच्या कार्याभोवती एक चांगुलपणाचे वलय आपोआप

निर्माण झाले.

कार्य करण्यात ज्यांना रस आहे “त्यांनीच आपल्या सोबत यावे . कारण माझ्या संस्थेला ती काय

करते हे न सांगता , फक्त कार्य करण्यात जास्त रस आहे “,

बघा विचार करा आणि मगच इथे या .

कारण तुमचा कधी पेपर मध्ये फोटो येणार नाही ,आणि मदत स्वीकारतांना तुम्ही व्यासपीठावर

मिरवतांना दिसणार नाहीत .

हे सगळे टाळणे जमत असेल तरच या ..

तुम्ही निस्वार्थ बनला तरच समाजसेवा करू शकाल “

अनुयाला अजीत नावाच्या अवलिया व्याक्तीमात्वातले हे खूप सारे काही आगळे-वेगळे जाणवले ,

तिच्या मनाला ,तिच्या दृष्टीने अजित याच गोष्टीसाठी ..तिला एकदम हटके वाटला , असामन्य वाटला ,

असा हा अजित मनापसून तिला आवडला होता . अगदी पहिल्या भेटीतल्या

पहिल्या क्षणापासून .अजितने तिचे “दिल जिकून घेतले .

अनुयाने थेट तिच्या हृदयातली खास जागा देऊ केली “.जी तिने आता पर्यंत कुणालाच दिली नव्हती .

स्मार्त ,चटपटीत ,बोलघेवडी ..अनुया ..पाहणार्याच्या मनाची धडकन बनायची “,तिच्यासाठी ,

तिच्या प्रेमात दिवाने “होणे कुणालाही आवडणारे होते .

अनुयाच्या मनात कुणाविषयी

कधी काही वाटत नव्हते . “दिल मे अगर घंटी ही नही बजी ,तो फिर क्या मजा !

अजितला पाहिल्यावर आणि नंतर त्याच्याशो बोलण्याची संधी मिळाली अनेकवेळा भेट झाली

..तेव्हा मात्र ..अनुयाला वाटले .

.अरे , यही तो ही वो ..!

पण आता उलटे झाले , इतके दिवस अनुया कुणाला कधी रीस्पोंस देत नसे ,आता अजित तिला

रीस्पोंस देत नव्हता .

ती मनाशीच म्हणे ..अरे यार , ये तो सब उलटा मामला है !

अजितच्या मनात आपल्याविषयी काही तसे वाटणे “, इतके सहज सोपे नाहीये , अभी बहोत पापड

बेलने पडेंगे शायद ...!

गेले वर्ष –दीड वर्षे झाली होती . ती अजितच्या प्रेमात दिवाणी झाली होती . तिच्या मनाला अजितच्या प्रेमाने व्यापून टाकले होते

त्याच्याशिवाय – मै अधुरी हुं रे ..! असे मैत्रिणी जवळ बोलून दाखवे ..

तेव्हा तिच्या फ्रेंड म्हणत ..

अनु डियर ..तुझे अजितवर प्रेम आहे , तो तुला आवडतो ,त्याच्या प्रेमासाठी तू सारे काही करायला

तयार आहेस , आम्हाला कबुल आहे..,

तू जरा वास्तवात येऊन, जमिनीवर पाय ठेवून विचार करून पहा ..

तुझे प्रेम ..तुझ्या अजितला मान्य होईल का ? तुझ्या पैसेवाल्या आई-बाबांना “अजित

सारखा सामान्य मुलगा –त्यांचा जावई होईल ? ही कल्पना सहन होणे अवघड आहे .

शेवटी तेच होणार ..अमिरी और गरिबी की जंग ! आणि तुम्ही लव्ह स्टोरी ..टोटल फ्लोप ...!

अनुया शांतपणे विचार करू लागली ..तेव्हा तिला सत्य परिस्थितीची जाणीव झाली , प्रेमात वेडे होणे

मनाचे काम आहे , पण, वास्तवात आपले हे प्रेम अजित स्वीकारील का ,

आपल्या आई-बाबांना , मोठ्या भावांना ,

,आपल्या हाय-प्रोफाईल सोसायटीला .. अनुयाची लव्ह स्टोरी “मान्य होईल का ?

बाप रे ..! एका शब्दात सांगायचे झाले तर .. नो, नाही ,मुळीच नाही...!

समजा -आपण बंडखोरी केली तर ?

,असे करणे अजितला आवडणारे नाही ,

मुख्य म्हणजे अजून त्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम वाटते आहे की नाही “

याचाच आपल्याला पत्ता नाहीये .

आपलेच प्रेम..अजून एकतर्फी आहे..

तरी समजा आपण त्याला म्हटले की-

..बाबारे ..माझे तुझ्यावर खूप म्हणजे खूपच प्रेम आहे . मी तुझ्यासाठी सब कुछ छोड

सकती हु ..!

पण ,तू मला हो म्हण अजित ...!

हे सगळे ऐकल्यावर अजित ..

शांतपणे म्हणेल ..अनुया ..तू प्लीज इथून निघून जा ,

येऊन इथे असे प्रेमाचे बिनकामी उद्योग करण्यात वेळ घालवू नको . माझ्याकडून तुझी

निराशा होईल . बघ ,ते चालेल का तुला ?

ही अशी खात्री जास्त असल्यामुळे ..

असे सांगणे म्हणजे ..अनुयाला स्वतःच्या प्रेमाच्या पायावर स्वतःहून

धोंडा पाडून घेण्यासारखे होते.

मग, आता काय करयचे ?

अजितच्या प्रेमाच्या परीक्षेत तर पास होऊनच दाखवायचे ..

अजितला – आज नही तो कल हमारा बनाना ही पडेगा , ये तो शुअर ..!

अनुयाने खूप विचार केला , आपण तर अजितवर आपला जीव लावून बसलो , आपले हे पहिले प्रेम

सहजासहजी आपण सोडू शकणार नाही, जर हे प्रेम असफल झाले तर ? त्याचे दुक्ख पुढे आयुष्यभर

आपल्याला सुखी होऊ देणार नाही.

खरेच का, प्रेम असे असते ? एकदा ज्यावर जडले ..त्याला सर्वस्व मानून चालते , त्याच्याशिवाय

जीवन अर्थहीन वाटू लागते , त्याचे नजरे समोर असणे .मनाला आनंद देणारी एकमेव गोष्ट होऊन जाते .

काय करावे ? अनुयाला काही सुचेनासे झाले , अजित पासून तर दूर राहायची तिची अजिबात तयारी

नव्हती .

तो नजरे समोर असावा , ऑफिसच्या कामाचे का होईना ,पण त्याने बोलत राहावे , इतरांशी आपल्या

संस्थेच्या कार्याबद्दल भान हरपून बोलणार्या अजितकडे सतत पहात बसण्यात आपल्या मनाचे सुख आहे,

आपला आनंद ..फक्त अजितचा सहवास आहे.

तसे म्हणावे तर ..अजित आणि ती दोघे असे एकत्र कुठे जात नव्हते , की कधी दोघेच छान निवांत

एकमेकांच्या जवळ बसलेत , सहवास आणि स्पर्श सुख अनुभवले “ असे तर एकदाही घडले नव्हते .

त्या अर्थाने ..अनुया ..अजितच्या ..प्रेमाची ..प्रेम-पुजारीन झाली होती . तो ,त्याचे प्रेम ..बाकी काही

मिळावे अशी इच्छा तिच्या मनात येत नव्हती.

अजितच्या मनात तर अनुयाचा निकट स्पर्श , तिचे देह सौंदर्य .. तिचे यौवन सुलभ वागणे “,

याबद्दल काहीच विचार येऊ शकत नव्हते , कारण अशा विचारांना ,त्याचे मन ..मनातच शिरू देत

नव्हते . अजितचे निर्हेतुक वागणे ..अनुयाच्या मनात त्याच्याबद्दलचे प्रेम अधिक घट्ट करीत होते.

एक दिवश ..सकाळी ..अनुया ..अजितच्या ऑफिसमध्ये आली, इतक्या साध्या कपड्यात तिला पाहून

तिथे असलेल्या सर्वांनी क्षणभर तिला ओळखलेच नाही. सगळ्यांच्या सोबत खुर्चीत बसत

ती अजितला म्हणाली ..

मला तुझ्या संस्थेच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे..महिला विभागाची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे.

आणि एक पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून मला इथे काम करायचे आहे. माझ्या घरच्यांची परवानगी सुद्धा

घेतली आहे मी .

अजितला अनुयाचे हे सांगणे ..खरे वाटत नव्हते ..पण, तिचा आवेश , शब्दातले सच्चेपण , खोटे नव्हते .

तो म्हणाला .. नव्याचे नाऊ दिवस झाले की ..बस..

सगळा जोश उतरेल ,आणि तू कार्य मध्येच सोडून

गेलीस तर कसे..?

अजित ..माझ्यावर विश्वास ठेव ..मी हे कार्य निवडले आहे ते तुला सोबत करण्यासाठी , अशी साथ

देईन की, तुला कधी तरी खात्री पटेल ..माझ्या भावनांची ..

तिच्या नजरेतील निश्चय आणि निष्ठा पाहून अजितने तिला त्याच्या कार्यात ..कार्यकर्ता म्हणून सामील

होण्यास काही हरकत नाही असे म्हटले ..

हे ऐकून .अनुया मनोमन आनंदून गेली ..प्रेमाचा चक्रव्यूह भेदला होता ..ती आत आली होती ..

आणि यातून तर बाहेर तिला कधीच पडायचे नव्हते.

अनुया अगदी सहजपणे अजितच्या कार्यात समरसून काम करू लागली . एका मोठ्या परिवारातील

मुलीचे हे सामन्य रूप सर्वांना अनपेक्षित होते. अनुयाच्या बोलघेवड्या स्वभावामुळे संस्थेतील सगळ्यांशी

तिचे छान सूर जुळत गेले .

अजितच्या बरोबरीने ती प्रत्येक ठिकाणी सक्रीय दिसू लागली .

काही महिन्यांनी ..अनुयाने अगदी मन मोकळेपणाने .अजितला ..तिच्या मान्तल्या सगळ्या भावनाव्यक्त

केल्या आणि मी आता इथून जाण्यासाठी आलेली नाही .

तू हो म्हणाला , माझ्या प्रेमाचा स्वीकार केलास तर

तुझी सहचारिणी ,अर्धांगिनी होऊन आनंदाने आयुष्यभर राहील , आणि माझे दुर्दैवच असेल ,

तर ,तुझी न होता ..तुझ्या कार्यात एक सहकारी म्हणून राहील , पण, इथून जाणार नाही.

बघ..ही बळजबरी नाही ..पण, माझ्या प्रेमाचे साकडे आहे तुझ्या पायाशी.

ती घडाघडा बोलत सुटली ..तिच्या भावनांच्या धो धो ..धाब्धब्याख्ली .अजित शांतपणे .निश्चलपाने

स्थिर बसून राहिला .

अनुयाला एक शब्दाने काही वावगे न बोलता ,तिचा अपमान न करता , तो नेहमीप्रमाणे त्याच्या कामात

गुंतत गेला . त्याच्या वागण्यातून , बोलण्यात ..तिलाच कधी काही जाणवत नव्हते ..तर इतरांच्या लक्षात

अनुया आणि त्याच्यात काही असेल” अशी शंका सुद्धा येणे शक्य नव्हते.

त्यादिवसापासून एक मात्र झाले .. अनुया अधिक मोकळेपणान अजित बरोबर बोलू लागली, वागू लागली .

त्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे आता ..हे तिची भावना अधिक दृढ झाली ,

आपल्या मनातले त्याच्याविषयीचे प्रेम ..तर त्याला कळालेच आहे, आता रोजच्या वागण्यातून जाणवून देऊ.

हे कठोर मन एक न एक दिवस नक्कीच विरघळेल.

असा हा एक दिवस उजाडला ..एक-दीड वर्षा नंतर ..

अजितच्या प्रेमाचा होकार ऐकून .अनुयाचे मन स्थिर झाले , इतके दिवस चित्त आणि मन थाऱ्यावर

नसायचे ,आत्ता हे सारे थांबले होते.

अनुया ..आई-बाबांच्या रुममध्ये गेली, मोठ्या भावांना ,त्यांच्या बायकांना बोलवून घेत ..

निर्धाराने ..शांतपणे ..तिने आपण आता अजीत बरोबरच लग्न करणार आहोत , त्याचे कारण

सांगितले . आणि अजित तिच्या मागे कधीच नव्हता . उलट ..ही अनुया त्याच्यासाठी वेडी झाली ,

आणि त्याच्या प्रेमाने झपाटून गेली .त्याच्याशिवाय अनुया आता जगूच शकत नाहीये.

तुम्ही आनंदाने परवानगी द्यावी यात सगळ्यांचे सुख आहे ,माझा आनंद आहे.

तुम्हाला दुख्ही करून आमचा आनंद मिळवणे आम्हाला ..म्हणजे अजितला आणि मग मला मुळीच

आवडणार नाहीये.

तुमची संमती आहे असे लोकांना कळाले तर ..कुणी काही म्हणार नाही ,पण, तुमच्या मानाविरुध्ह

मी हे लग्न केले आहे तर मात्र ..माझ्या पेक्षा ..आपल्या घराची,घरातल्या माणसांची चर्चा ,म्हणजेच

बदनामी होईल.

तुम्ही सर्वांनी तुमच्या मुलीच्या या आगळ्या वेगळ्या प्रेमाला संमती द्यावी. अजित नावाच्या माझ्या

आवडत्या माणसाच्या प्रेमाची जीत होऊ द्या .

अनुया ..शांतपणे स्वतःच्या खोलीत जाऊन बसली .

खाली चर्चा झाली , विरोध करून विषय गंभीर करण्यात अर्थ नाही.

..आपल्यातल्या एकमताने घेतलेला निर्णय अनुयाच्या सुखाचा आहे.

अनुयाच्या फोनवर सकाळ नंतर पुन्हा एक मेसेज चमकला ..

अजितला घेऊन ये .आम्ही सगळे त्यचे आनंदाने स्वागत करण्यास उत्सुक आहोत.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथा - स्वप्न प्रेमाचे

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED