अंतःपुर - 7 Suraj Gatade द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंतःपुर - 7

७. घरभेदी (ट्रेटर)...

डॅनियलची बीएमडब्ल्यू कधीच कोल्हापूरच्या रस्त्याला लागली होती... बाजूला तो माणूस देखील बसला होता.
"हिमांशू, नम्याला नाईट क्लबला घेऊन ये." डॅनियलने एवढंच बोलून नेव्हीगेशन स्क्रिनवर चालू असलेला कॉल कट करून बंद केला.


शक्ती थांबलेल्या हॉटेलबाहेर उभ्या गाडीतून हिमांशू उतरला आणि हॉटेलकडे गेला.

तीच रिसेप्शनिस्ट, समोर हिमांशूला पाहून ती गोंधळली, घाबरली. तिच्या समोर असलेले एक कपल जाईपर्यंत हिमांशू थोडं मागे उभारला होता. ते जोडपं जसं त्यांना दिलेल्या रूमकडे गेलं, तसा हिमांशू तिच्याकडे आला...
"हाय स्विटी!" तो खट्याळ स्मित करत तिला म्हणाला. डोळ्यांना गॉगल तसाच होता.
"हाऊ कॅन आय हेल्प यु सर..." ती घाबरतच म्हणाली.
इकडे कोणी बघतंय का यासाठी तिची नजर लॉबीभर फिरत होती. दूर मॅनेजर कोणाशी तरी बोलत होता. त्याची नजर विचलित झालेल्या त्या रिसेप्शनिस्टवर पडली. काही तरी गडबड आहे हे लक्षात येऊन तो बोलणाऱ्या व्यक्तीची एक्स्क्यूज घेऊन रिसेप्शन काऊंटर जवळ आला.
"इज एनिथिंग रॉन्ग् सर?" त्याने विचारलं. मग त्याने रिसेप्शनिस्टकडे पाहिलं,
"काय झालं, आशी? काही प्रॉब्लेम?" मॅनेजरने तिला विचारलं.
ती मान हलवून 'नाही' म्हणाली, पण चेहऱ्यावर भीतीची छटा तशीच होती. मॅनेजर अजूनच शंकीत होऊ लागला. याचा संशय जेवढा बळावेल तेवढं आपल्यासाठी धोक्याचं आहे हे लक्षात येऊन हिमांशू बोलला,
"सर, रूम नंबर सव्वीसमध्ये जे आहेत त्यांना भेटायचं आहे."
"आपण कोण?" मॅनेजरने विचारलं.
"मी हिमांशू. माझी बहिण आहे त्या रूममध्ये."
"आय सी." म्हणत मॅनेजरने रिसेप्शनिस्टकडे पाहिलं,
"आशी; कन्फर्म कर!" तो तिला म्हणाला.
"येस सर!" म्हणत तिने गडबडीने फोन उचलला.
बटन प्रेस केलं.

शक्तीच्या हॉटेलरूम मधल्या फोनची रिंग वाजली. नम्याने घाईने क्षणाचाही विलंब न लावता फोन उचलला.
"हॅलो!" ती अधीरतेने म्हणाली.
"हॅलो मॅम, आपले भाऊ आलेत." रिसेप्शनिस्ट बोलली.
"भाऊ?" नम्याने गोंधळून विचारलं.

"हो. हि... हिमांशू नांव आहे त्यांचं..." घाबरलेली रिसेप्शनिस्ट हिमांशूकडे पाहत म्हणाली,
"तुम्हाला भेटायचंय म्हणतायत."

"हो. हो पाठवा. प्लिज... आणि दरवाजाची स्पेअर की आणाल? माझे हजबंड् चुकून लॉक करून महत्वाच्या मिटिंगला गेले आहेत. मी झोपले होते म्हणून त्यांच्या लक्षात आलं नाही..." नम्याने काही तरी जुळवाजुळव केली.

"हो मॅम!" रिसेप्शनिस्टने रिसिव्हर ठेवला.
"त्यांनी तुम्हाला रूममध्ये बोलावलं आहे." ती हिमांशूला म्हणाली.
आणि तिने शक्तीच्या रूमची स्पेअर की त्याच्यासमोर धरली.
"एक मिनिट!" मॅनेजर म्हणाला आणि त्याने बेलबॉयला हाक मारली.
"शंतनू! इकडे ये!"
"गरज नाही. याच दाखवतील की मला रूम." हिमांशू मॅनेजरला म्हणाला. त्याने रिसेप्शनिस्टकडे पाहिलं,
"काही प्रॉब्लेम नाही ना?" त्याने खोटंच विचारलं.
"नो नो." मॅनेजर त्याला म्हणाला,
"आशी, जा यांच्याबरोबर. मी बघतो इथं!"
ती प्रश्नार्थक नजरेनं मॅनेजरकडे पाहू लागली. हिमांशू सोबत जाण्याची तिची इच्छा नव्हती हे तिच्या अशा पाहण्यावरून स्पष्ट दिसत होतं. पण ती मॅनेजरने तिला इंसिस्ट केलं,
"जा. रूम दाखवून लगेच परत ये." मॅनेजर तिला म्हणाला.
त्याला हॉटेलची रेप्युटशन खराब करायची नव्हती.
मग चावी घेऊन रिसेप्शनिस्ट लिफ्टकडे चालू लागली. हिमांशू तिच्या मागून चालला...
रिसेप्शनिस्टने लिफ्टचं बटन प्रेस केलं आणि ती आत गेली. हिमांशू देखील हात शिरला. लिफ्टचं दार बंद झालं आणि लिफ्ट वर सरकू लागली...

लिफ्टमध्ये, दोघे मागील भिंतीला लागून उभे होते.
"यु आर सो ब्युटीफुल. वान्ना गो फॉर अ डेट विथ मी?" हिमांशूने तिच्याकडे सरकत तिला विचारलं.
ती अधिकच घाबरली, पण मान डोलवून नाही म्हणण्याची तिने हिंमत दाखवली. तो हसला आणि बाजूला सरकला.

लिफ्ट शक्तीची रूम असलेल्या फ्लोअरला लागली होती. दार उघडतं न उघडतं तोच रिसेप्शनिस्ट घाईने बाहेर पडली. तिच्या अवस्थेवर हिमांशूला अजूनच हसू आलं.

शक्तीच्या रूमपाशी पोहोचून रिसेप्शनिस्टने घाईने लॉक खोललं. नम्या दाराजवळच येऊन थांबली होती. लॉक उघडण्याचा प्रयत्न होतोय हे लक्षात येऊन ते उघडलं गेल्यागेल्या तिने आधीरपणे नॉब फिरवून दार उघडलं होतं. रिसेप्शनिस्ट मग रडवेला चेहरा झालेल्या नम्याकडे नजर टाकून पुन्हा लिफ्टकडे पळाली.
जात असताना तिला हिमांशूला क्रॉस करून जाणं भाग होतं. तो समोरून संथपणे डाव्या खिशात हात घालून, उजवा हात लोमकळता सोडून रूमच्या दिशेने चालत येत होता. चेहऱ्यावर मग्रुरीचं हास्य होतंच. पण तिने एक नजरसुद्धा त्याच्याकडे टाकली नाही. हिमांशूच्या चेहऱ्यावर पुन्हा स्मित खिळलं.
रिसेप्शनिस्टने घाईने अनेकदा अधीरतेनं लिफ्टची बटन प्रेस केलं. लिफ्ट येईपर्यंत तिला धैर्य नव्हतं. इथं काय होईल काय नाही हे तिला माहीत नव्हतं आणि ते तिला पाहायचंही नव्हतं. ना या हिमांशू नांवाच्या माणसाच्या तावडीत तिला सापडायचं होतं. लिफ्टचं दार उघडलं तशी ती आत शिरली. लिफ्ट बंद करायला पुन्हा तिची तीच घाई. अनेकदा बटन प्रेस केल्यावर लिफ्टचं दार बंद झालं. लिफ्ट खाली सरकू लागली. हे पाहताना हिमांशूला खूप गंमत वाटली. नम्या देखील हे पाहतच होती. पण तिला मजा वाटत नव्हती. भीती काय असते याचा तिने अनुभव जो घेतला होता...
ती हिमांशूकडे अपेक्षेने पाहत होती फक्त...
"डॅनीने नाईट क्लबला बोलवलं आहे!" हिमांशू तिच्याकडे बघून म्हणाला.


"तुझा नेक्स्ट मूव्ह काय असणार आहे?" पंतप्रधानांनी शक्तीला विचारलं.
"तुमच्या पीएची थेट चौकशी" शक्तीने स्पष्ट केलं.
"माझा अजून विश्वास बसत नाही, की माझा पर्सनल असिस्टंट असं काही करेल!" पीएमनी अविश्वास प्रकट केला.
"मग एक टेस्ट करू. तुमची खात्री पटायला." शक्ती म्हणाला आणि त्याने फोन लावला...

"हॅलो सर बोला." मिहीर त्याच्या डेस्कवर काम करत होता.
"मला रेनेसन्सला येऊन भेट!" पलिकडून शक्तीने सांगितलं,
"एसपीला सांग आणि बाहेर पड लगेच. म्हणावं पीएमचे अर्जंट काम आहे आणि त्यांनी बोलावलं आहे."
"पण सर विश्वास ठेवतील?" मिहीरने शंका व्यक्त केली.

शक्तीने कॉल स्पीकरवर ठेवलेला होता. 'मी बोलतो' अशी पीएमनी खूण केली.
"त्याची काळजी करू नको. एसपींशी पीएम स्वतः बोलतील."
"ठीक आहे. येतो सर."
शक्तीने मिहीरचा फोन कट केला.
"लावू?" शक्तीने पीएमना विचारले.
पीएमनी मान हलवली. शक्तीने एसपी ऑफिसचा नंबर डायल केला आणि फोन पीएमना देऊ केला.
"हा. हॅलो मिस्टर गोखले, तुमचा तो मिहीर नांवाचा ऑफिसर जरा माझ्याकडे लावून द्या." पीएमनी एसपींना फर्मान काढलं.

"हो. हो सर!" म्हणत एसपी पळतच केबिन बाहेर गेला. कॉल कट करून तो मिहीरच्या डेस्कपाशी आला,
"मिहीर तुला पीएमनी बोलावलंय!" तो गडबडीत पण कोणाला ऐकू नजाणार नाही अशा आवाजात म्हणाला.
"हो सर!" उठत मिहीर म्हणाला आणि एसपीला सल्युट ठोकून तो पोलीस हेडकॉर्टर बाहेर पडला.


"या मिहीरचं काय करायचं आहे?" पीएमनी शक्तीची योजना जाणून घेण्यासाठी विचारलं.
"आत्तापासून तो एक आयबी ऑफिसर असेल!" शक्ती एवढंच म्हणाला.

इतक्यात दारावर टकटक झाली. पीएम व शक्ती यांनी दाराकडे पाहिलं.
शक्तीने उठून दार उघडलं. पंतप्रधानांच्या पीएला बाहेर तैनात एका एजंटने आत आणलं. पीएच्या हाती एक सुटकेस होती.
त्याला देखील प्रायव्हेट जेटने इथंवर आणलं गेलं होतं. त्यामुळे जवळजवळ १६४० किमीचं अंतर अवघ्या दोन तासांच्याही आत कापलं गेलं होतं...
"सॉरी शुक्ला! ये आपका काम नहीं है, पर मेरे यहाँ होने की बात सिर्फ आप जानते हैं इसलिए आपको ये काम बताना पड़ा। लागता है कुछ दिन यहाँ रहना पड़ेगा!" म्हणत पीएम यांनी शक्तीला शुक्लाच्या हातून सुटकेस घेण्यास इशारा केला.
शक्ती सूटकेस घ्यायला पुढं झाला.
"कोई बात नहीं सर. इट्स माय जॉब टू असिस्ट यु!" शक्तीला सुटकेस देत बिपीन शुक्ला म्हणाला.
शक्तीने ती घेऊन बेडच्या साईडला ठेवली.
"बैठो!"
शुक्ला पीएमच्या सांगण्यावरून बसला.
"ये महानुभाव कौन है?" शुक्लाने बसत शक्तीबद्दल विचारलं.
"यहाँ के रूम सर्व्हिस के हैं!" पीएमने त्याला उत्तर दिलं आणि शक्तीला म्हणाले,
"आपण जा. जेवणाची तयारी करा. आम्ही आणि आमचे पीए आज एकत्र जेवण करू!" पंतप्रधान शक्तीला म्हणाले.
"येस सर!" शक्ती उगाचच बोलला.
कारण जेवणाची ही सूचना शक्तीसाठी नव्हती कारण हे बोलत असताना त्यांनी आपल्या पीएला आत घेऊन आलेल्या एजंट (सुरक्षा रक्षका) कडे नजर टाकली होती. ती त्याला सूचना होती आणि ती तो समजला होता!
"या! अँड हिअर इज युअर की!" म्हणत त्यांनी शक्तीला त्याचं सिक्रेट आयडी कार्ड परत केलं.
"थँक्स सर!" म्हणून शक्ती बाहेर गेला.
त्याच्यासोबत एजंटने देखील रूम सोडली. त्याने बाहेरून दार ओढून घेतले. बेल्टला अडकवलेली त्याची वॉकी-टॉकी त्याने खेचली.
"रूम सर्व्हिस! रूम नंबर फिफ्टीन में खाना भेज दिजीए!"


शक्ती हॉटेलबाहेर येऊन मिहीरची वाटच पाहत होता. मिहीर आला शक्ती त्याने त्याला आपली योजना सांगू लागला...

दरम्यान जेवण घेऊन रूम सर्व्हिसची लेडी जेवणाची ट्रॉली ढकलत लिफ्टमधून बाहेर पंतप्रधानांच्या रूमकडे आली.
तिला एजंट्सकडून दारावरच थांबवण्यात आलं. एका एजंटने प्रत्येक पदार्थ एका डिशमध्ये थोडं थोडं घेऊन ते चाखलं. काही काळ थांबला. त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही हे पाहून हे अन्न आता पंतप्रधानांनी ग्रहण करण्यास योग्य जाणून त्यांनी तिला जाण्यास सांगितलं.
ती स्ट्रॉली तिथेच ठेवून ती निघून गेली. मग एजंटच ती ट्रॉली ढकलत आत घेऊन गेला.
तो डायनिंगपाशी ती ढकलगाडी घेऊन आला. जेवण सर्व्ह करण्यासाठी त्याने त्यावरील पात्रे काढून डायनिंग टेबलबर ठेवले व तो जेवण वाढू लागला.
"डोन्ट बॉदर. विल मॅनेज!" पंतप्रधान त्याला म्हणाले.
"येस सर!" एजंट कमरेत वाकून नम्रपणे म्हणाला आणि तो बाहेर पहाऱ्यासाठी आपली जागा घेण्यास गेला. त्याने दार लावून घेतले.