दोन टोकं. भाग १९ Kanchan द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दोन टोकं. भाग १९

भाग १९

पंडितने तो मुलगा काय बघतोय हे बघायला आत वाकुन पाहिल तर विशाखा टेबलवर हात ठेवून, त्यावर डोकं ठेवून गाढ साखरझोपेत घोरत होती. तीला तसं बघुन पंडितने तर डोक्यावरचं हात मारून घेतला 🤦. जवळ जाऊन तीला उठवलं,
" मॅम........ मॅम...... " हाक मारली पण विशाखा ढिम्म.
पण तो हँडसम मुलगा तीला तसं बघुन हसायला लागला. पंडितने रागाने मागे त्याच्याकडे बघितल तर तो गप्प बसला. पण जसं ह्याने पुढे बघितलं तसं तो परत हसायला लागला. आणि ते पण मोठमोठ्याने हसायला लागला.
" ही...... ही.... आत्ताच.... आली....ये .... ना.. तरी.... झो...पलीये.... 🤭🤭 " हसता हसता त्याने विचारल आणि परत हसायला लागला. इतका हसत होता की त्याला नीट बोलता पण येत नव्हतं.

त्याच्या हसण्याच्या आवाजामुळे विशाखा उठली. आणि वर बघितलं तर समोर पंडित होता.
" काय झालं ?? काही काम होत का ?? "


" ते विदाऊट अपाॅइंटमेंट आत घुसले. मी नको नको म्हणत असताना. "

" कोण ?? " तो हँडसम पंडितच्या मागे उभा होता त्यामुळे तीला अजुन दिसलाच नव्हता.

" ते काय मागे .... " असं म्हणून पंडित बाजुला सरकला.

विशाखा त्याला बघताच एकदम चेअरवरून उठून उभी राहिली आणि ओरडली,

" तु ??? तु इथे कसा ?? तु कसं काय आला इथे ?? म्हणजे इकडे कसा आला तु ?? अरे बोल ना ..... "

" अरे हळु हळु, किती प्रश्न .... आता आलो असाच " आपल्या डोक्यावरून हात फिरवत मस्त स्माईल करत तो म्हणाला.

पण हे सगळं काय चाललंय ते पंडितच्या डोक्यावरून जात होतं. तो आळीपाळीने एकदा विशाखा कडे तर एकदा त्या मुलाकडे बघते होता. .

" असाच कसा आला ?? एक मिनिट मी तर पत्ता दिलाच नव्हता हॉस्पिटलचा मग 🤨 .

" आता The gynaecologist मिस् विशाखा यांना कोण नाही ओळखत हां. स्वतः गुगलने सांगितला तुझा पत्ता. "

" अवघड आहे. पण का आलाय तु इथे ?? "

" अरे आलोय त्याचा आनंद नाहीये‌. का आलाय हेच विचार तु 😏 "

" हे बघ.... हे " विशाखा पुढचं म्हणणार होती पण तेवढ्याच तिचं लक्ष पंडित कडे गेली. तर तो एकदम कन्फ्युज होऊन दोघांना बघत होता.

" तु का थांबलाय ?? " विशाखा पंडितला म्हणाली.

" ते...... मी.... तुम्ही....... " त्याला ह्या दोघांच्या गोंधळात तो का आला हेच आठवत नव्हतं.

" झालं ना काम. आणि येऊदे ह्याला. तु जा. " तीने पंडितराव सांगितलं तसा पंडित त्या मुलाकडे बघते बघत बाहेर जात होता की तो हँडसम मुलगा पंडितला म्हणाला,
" मला माहिती आहे, मी सुंदर दिसतो पण म्हणून तु मी बघावं का 😹 "

पंडितने गडबडुन नजर पुढे फिरवली आणि बाहेर निघुन गेला. गेला तरी त्याच्या डोक्यात तेच विचार चालु होते की कोण होता हा ??? आणि मॅम ह्याला कसं काय ओळखतात ?? त्यांचे तर फ्रेंडस् सगळे माहितीयेत मला. माहिती असायला आहेतच किती 🤦. सायली एकटी तर आहे आणि दूसर तर.......
असाच विचार करत जात होता आणि तेवढ्यात तो हातावर टाळी देत जोरात ओरडला,
ओह म्हणजे हा त्यांचा बॉयफ्रेंड आहे.

आणि त्याच्या ह्या आवाजने प्रीती जोरात दचकली.
" काय झालं सर ?? Are you okay ?? असं जोरात का ओरडलात ?? "

" अगं तुला माहित का ?? मॅमचा ..... " असं पुढे म्हणणार तेवढ्यात थांबला, ही कुठे जाऊन पचकली तर..... आणि परत मॅमला जर कळलं की त्यांच सिक्रेट मला कळालय तर......
विचार करूनच त्याचा चेहरा घाबरा घुबरा झाला.

" सर..... सर.... काय झालं ?? काय झालं मॅमला ?? आणि तुम्ही का एवढं घाबरलायत ?? Is everything alright ?? " पंडित बोलता बोलता मध्येच थांबला तसं प्रीतीने विचारलं.

" अं..... Nothing. Sorry. " अस‌ म्हणून त्याने कल्टी मारली.
प्रीती मात्र गोंधळात पडली.


इकडे केबीनमध्ये पंडित गेल्या गेल्या विशाखा त्या मुलाकडे गेली.

" तु परत पाठलाग करतोयस ना ?? 😏 "

" एक मिनिट, मी का पाठलाग करू ?? उलट माझीच कॉफी उधार राहिली आहे. आठवतंय का काही...... कुणीतरी म्हणालं होत की कॉफी देईन म्हणून मग ती घ्यायला आलोय. "

" हे बघ तु..... एएएएएए तुझ नाव काय आहे याररररर. विसरले मी 😖 "

" तु माझं नाव‌ विसरलीस 🤨🙄. "

" माझ्या कामाच्या नसलेल्या गोष्टी मी लक्षात ठेवत नाही. "

" मी तरी लक्षात आहे का ?? की मला पण विसरलीस 🤨 "

" हां, माझ्या गाडीला धडकला होता 😏 "

" आयला हे बरं लक्षात आहे. पण नाव लक्षात नाहीये "

" सांगणार आहेस का आता 😒. "

" शी यार. ह्याच्यापेक्षा वाईट काय असावं की माझं नाव मीच सांगावं...... अरे बघ यमक जुळला. वाह !!! वाह !!! " स्वतःचीच पाठ थोपटत तो हसत म्हणाला.

" बरं. काम काय होतं ते तरी सांगणार आहेस का आता 😒. "

" अरे आपली कॉफी राहिली ना. मग त्यासाठीच आलोय मी. चल कॉफी प्यायला जाऊ. "

" आत्ता 🙄. साडेबारा वाजता. आणि मी कॉफी नाही पीत मिस्टर..... "

" मिस्टर ऐवजी मास्टर आकाश म्हणलं तर आवडेल मला 😉 "

" उहहहहह.‌ किती ते फ्लर्टींग 😖. पण खरच मला आता काम खुप आहेत आणि माझ डोकं पण खुप दुखतंय. "

" म्हणून तु झोपली होतीस का ?? बरं मग एक काम कर. बाहेर फिरून येऊ आपण परत. तोपर्यंत डोकं पण कमी होईल आणि माझी कॉफी पण मिळेल मला 😉. "

" अरे बाबा. काम आहेत मला खुप. "

" लगेच जाऊन येऊ. आणि असं पण तो आहे की इथल काम बघायला. "

" कोण तो 🙄 "

" तो आत्ता आला होता तो. "

" ओह पंडित. तो माझा ट्रेनी आहे. "

" हो मग तो बघेल ना पेंशटस्. तेवढीच त्याची प्रॅक्टिस होईल. आणि डोकं दुखत असताना तु तरी नको पेशंटस् बघुन, नाहीतर सगळा राग त्यांच्यावर काढशील. बिचारे घाबरून जातील 🤭. "

" मी रागीट नाहीये काय 😤 . "

" मी पार्किंगमध्ये वाट बघतो.लवकर ये. "
आकाश बाहेर आला आणि सरळ हॉस्पिटलच्या बाहेर निघाला होता.त्याच्या मागोमाड विशाखा बाहेर आली. पंडित कडे निघुन गेली.

प्रीती पंडितच्या बोलण्यामुळे पुर्ण कनफ्युज झाली होती. ती तो काय म्हणाला यांचा विचार करतच बसली होती की समोरून आकाश आला. त्याला बघुन ती हँगच झाली.
" कसला हँडसम आहे हा. कोण आहे काय माहिती. पण कसला भारी दिसतोय. काश....... असा हँडसम हंक माझ्या लाईफ मध्ये असता 🤗. किती लकी असेल ना ती मुलगी जीचा हा बॉयफ्रेंड असेल. "
आकाश तीच्या समोरून निघुनही गेला तरी ही त्याचाच विचार करत थांबली होती.

मागुन येणाऱ्या विशाखा ने तीला तसं बघितलं आणि तीच्यावर जोरात ओरडली,
" प्रीती....... What are doing here ?? "

" Nothing mam. I m just..... " तीच्या आवाजाने दचकुन काय उत्तर द्यायचं हे सुचली नाही.

" Go back to your work. "
विशाखा बाहेर आली आणि बघितलं तर तो बुलेट घेऊन आला होता.

" वाॅव 😍. बुलेट..... "

" तुला आवडते ?? "

" विषय आहे का ?? खुप म्हणजे खुप आवडते. "

" घे मग तु चालव. " चावी तीच्या हातात देत आकाश म्हणाला.

" मला येत असती तर आत्तापर्यंत कुठे नेली असती मी गाडी 😏. "

" नाहि येत तुला 🤭. जाऊदे बस. मी शिकवतो मग येईल. "

" हां. "

दोघं गाडीवरून जात होते. बाहेर काळे ढग आले होते. पावसाचं वातावरण झालं होतं. हवेत गारठा होता.
विशाखाला डोक्याला गार हवा लागल्यामुळे आता डोकं दुखायचे तसं कमी झालं वाटत होतं. डोळे मिटून ती बसली होती. केस वा-यावर उडत होते, तेच तोंडावर येत होते. परत कानामागे करून ती बसायची. तरी ते केस परत पुढे यायचे आणि ही ते केस परत कानामागे करायची.

केसाची मस्ती आकाश गाडीच्या आरशामधून बघत होता. कसली निरागस दिसती ही..... बघावी तेवढी कमीच आहेत हीची रूप. कधी रागीट, कधी अकडु, कधी रडकी, कधी प्रेमळ तर कधी एकदम लहान बाळासारखी निरागस.

आकाशने गाडी बाजुला उभी केली तसं विशाखा ने डोळे उघडुन त्याला विचारल,
" गाडी का थांबवली ?? भारी वाटत होतं ना. "

" अरे कॉफी घेऊ ना. "

" हो पण मला ..... "

" चहा. माहितीये मला " तीच बोलण मध्येच तोडत आकाश म्हणाला.

निसर्गाचा आस्वाद घेता घेता दोघं चहा - कॉफी घेत होते. आकाशच्या डोक्यात मात्र त्या दिवशीच तो फोन कॉल आणि ते लव्ह लिहिलेल नाव हेच चाललं होत डोक्यात. तीला विचारावं वाटत होतं पण कसं विचारायचं असं डायरेक्ट. एखाद्याला नाही आवडत आपल्या पर्सनल गोष्टी सांगायला. उगाच मी विचारायला जायचो आणि माझ्यावर चिडली तर किंवा मला नंतर बोललीच नाही तर...... बापरे. नकोच विचारायला.
तेवढ्यात परत तीचा फोन वाजला, त्याने बघितलं तर तेच नाव होतं लव्ह.

" हां बोल. "
" अरे डोकं दुखत होत खुप म्हणून बाहेर आले होते रे. "
" हो हो. आता बरं वाटतंय. "
" इइइइइइ त्याला गोळी घ्यायची काय गरज आहे. चहा पुरेसा आहे . "
" हो हो. नक्की सांगते. हो बाय "

एवढं बोलून तीने फोन ठेवला आणि आकाशकडे बघितलं तर तो वेगळ्याच विचारात होता. तीला आठवल, त्या दिवशी पण फोन वाजल्यावर असाच हरवला होता.

" काय रे. काय झालं ?? "

" काही नाही. बरं कुणाचा फोन होता म्हणजे घरून होता का ?? मी सोडु का घरी ?? "


" नाही घरून नव्हता. सायलीच्या फोन होता. विचारत होती कुठंय असं "


" सायली कोण ??? पण तीने तर लव्ह लिहिलं होतं ना मग..... "

" सायु माझी मैत्रीण. Even मैत्रीणीपेक्षा जास्तच. आणि तीचा नंबर मी लव्ह नावाने सेव्ह केलाय. "

" वाव 🤩. " तीच ऐकुन आकाश आनंदाने ओरडला.

" त्यात वाव काय 🙄🤨 "

" अरे वाव म्हणजे छान ना. की फ्रेंडच नाव असं लव्ह म्हणून सेव्ह केलय. पण मग बॉयफ्रेंड चिडत नाही का तीच नाव‌ असं सेव्ह केल म्हणून. " एक लाईन तर क्लिअर होती की तो फोन मैत्रीणीचा होता पण दुसरीही लगेच क्लिअर करून घ्यावी म्हणून त्याने पटकन विचारून टाकलं.

" 🤣🤣🤣🤣😹😹 "

" ओह 😒. त्यात हसण्यासारख काय आहे ?? विचारलं सहज मी. "

" अरे बॉयफ्रेंड असला तर चिडेल ना. "

" म्हणजे तुला बॉयफ्रेंड नाहीये. "

" नाही. "

तीच्या नाही म्हणण्याने आपल्याला झालेला आनंद आकाश खुप लपवायचा प्रयत्न करत होता. स्वतःला नॉर्मल ठेवत त्याने परत विचारलं,
" का केला नाही ?? "

" अरे हा काय प्रश्न आहे 🤨. म्हणजे एखाद्याचे केस वाढले तर त्याला कटिंग का केली नाही हे विचारायचं. ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो. आणि तसंही मला जे जमत नाही ते मी करायला जात नाही. "

" न जमायला काय झालं 😏. पाण्यात पडला की माणूस पोहायला शिकतच. "

" मला जमत नाही. मी खुप विसराळु आहे. मला नाही जमत बाबा हे असलं first month anniversary, first hug, first coffe date हे असले फालतु चाळे माझ्या लक्षात रहात नाहीत rather than मी लक्षात ठेवत नाही. आणि परत जेवला का ?? झोपला का ?? उठला का ?? नाचला का ?? असल्या वायफळ बडबडी साठी वेळही नाही. मला काम असतात खुप. "

तीच नाचला का हे ऐकुन आकाश हसायलाच लागला.
" भारी आहेस राव तु. 🤣🤣 "

" चला निघायचं का ?? आता परत हॉस्पिटलमध्ये जाऊन पेंडिंग पेशंटस् बघेल मी. चल‌ लवकर. "

" हो चल. "

जाताना परत तेच वातावरण होतं. पण ह्या वेळी गार हवेसोबत पावसाचे थेंब पडत होते. विशाखा डोळे मिटून ते थेंब आपल्या अंगावर झेलत होती. हवा परत तीच्या केसांना खेळवत होती. ती सावरत होती पण ऐकणार ते केस कसले ?? आकाश तीची गम्मत बघत होता पण आज खुप खुश होता.
शेवटी त्याला चान्स होता ना आता 😁😉. तीला तसं बघुन त्याला गाणं सुचलं, आणि तो गुणगुणायला लागला,


या रिमझिम झिलमिल पाऊसधारा
तनमन फुलवून जाती

या रिमझिम झिलमिल पाऊसधारा
तनमन फुलवून जाती

सहवास तुझा मधुमास
फुलांचा गंध सुखाचा हाती

हा धुंद गार वारा,
हा कोवळा शहारा

उजळून रंग आले,
स्वच्छंद प्रितीचे

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रितीचे

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रितीचे

❤️