kadambari premaavin vyarth hee jeevan Part 20 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 20 वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

भाग – २० वा

-------------------------------------------------------

सागर देशमुख – हे प्रोजेक्ट सुरु करून अनुशाला आता तीन आठवडे झाले होते

पुढचा आठवडा झाला की ..एक महिना पूर्ण होणार ..म्हणजे ..येणारा एक महिनाच

खर्या अर्थाने सगळे काही करण्याचा महिना असणार आहे ..नाही तर ..

इतका खटाटोप करून हाती काहीच लागले नाही ,असे व्हायला नको..

या सगळ्यात एक गोष्ट मोठ्या समाधानाची घडत होती ..

ती म्हणजे ..सागर देशमुख स्वतहाहून -

अगदी मोकळ्या मनाने तिला आपल्या यशाची आणि अपयशाची कहाणी सांगत आहेत ,

त्याच बरोबर मोठ्या खुबीने आपल्या वैयक्तिक आयुष्याचे संदर्भ या बोलण्यात अजिबात

येणार नाहीत याच काळजी घेत त्यांनी ..बाकी इतर गोष्टी सांगितल्या आहेत

हे तिला जाणवत होते.

गेल्या आठ-दहा दिवसात देशमुख सरांनी दिलेल्या फाईल आणि फोटो अल्बम ..यांची सुसंगत जुळवाजुळव करून

गेल्या आठ-दहा दिवसात अनुशाने अगदी लक्षपूर्वक काम करून

सागर देशमुख यांच्या कार्य-कर्तृत्वाचा एक आलेख तयार करून तो फाईल मध्ये क्रमवार लावीत

व्यवस्थित झालेला आहे याची खात्री करून घेतली .होती आणि त्या नंतरच

आणि आज ती त्यांना अवलोकनार्थ फाईल घेऊन त्यांच्या ऑफिसला निघाली होती ..

जातांना तिच्या डोक्यात विचार चालूच होते ..

रोजच्या भेटीत आणि बोलतांना ..अनुशाला आपण तारेवरची कसरत करीत आहोत “या जाणिवेचे

टेन्शन असायचे .

आपल्याबद्दल तर त्यांना माहिती झालीच आहे..पण..या प्रोजेक्टचा हेतू वरवरचा आहे ,आपल्या मनातला

हेतू बद्दल तर त्यांना शंका आलेली नाहीये ..,आणि असे काही वाटावे .असे आपल्या बोलण्यातून

अजिबात काहीही आलेले नाहीये .

एक बरे आहे त्यातल्या त्यात –अभिजित काय आणि त्याची दीदी काय , या दोघांशी देशमुखसरांचा

अलीकडच्या काळात प्रत्यक्ष्य संबंध नाहीये .

आणि आपल्या बाबतीत म्हणयचे तर..अभिजीतच्या घराशी म्हणजे ..त्याच्या आई आणि बाबांशी आपला

यापूर्वी कधीच काही संबंध आलेला नाहीये .

कदाचित या मुळे..

देशमुख सरांना ..मी त्यांच्यवर प्रोजेक्ट करणारी एक कोलेज विद्यार्थिनी आहे,

ही आणि इतकीच माहिती झाली आहे .

जरी ते आपल्या आई-बाबाना ओळखतात ,त्याने फारसा फरक पडला नाही. कारण अभिजित आणि

आपण खूप जवळचे मित्र आहोत ..हे आपल्या आई-बाबंना माहिती नाहीये .

पण जर यापुढे आपला हा प्रोजेक्ट पर्सनल आयुष्याशी काही सबंध जोडला जाणार आहे “,याची शंका आली

तसा संशय देशमुख सरांना आला तर ?

मग, काय होईल ?

ही भीती तिच्या मनातून काही केल्या जात नव्हती .हाती घेतलेले हे काम तर तिने स्वतहा

ठरवून घेतले होते ..

आपल्या आणि अभिजितच्या प्रेमाची परीक्षा असणार आहे “याची कल्पना असून ही अनुशाने हे काम हाती घेतले होते ..

ते मध्येच सोडून कसे देणार ? जे होईल ते होईल ..!

असे म्हणत स्वतःला सवरून घेत अनुषा रोज सागर देशमुखांच्या ऑफिसात येऊ लागली.

गेल्या अनेक दिवसात .देशमुखांच्या भेटीत काय झाले ? याबद्दलचे अपडेट देण्याइतकी तिची

आणि अभिजीतची भेट होऊ शकली नव्हती .

त्याला भेटणे आवश्यक होते ..दोघंच्या भेटीतून पुढे कसे करायचे ..?

याची चर्चा खूप उपयोगाची आहे .

यातूनच या कामाला योग्य दिशा मिळण्यास मदत होईल “असे सारखे अनुशाच्या मनात

येत होते.

येत्या आठवड्यात अभिजीतला भेटू या “असे ठरवल्यावर तिला बरे वाटले .

ऑफिसला ती पोंचली ..वक्तशीर देशमुखसर ..त्यांच्या केबिनमध्ये असून ,

ते तिच्या येण्याची वाटच पाहत आहेत , असे अविनाश जळगावकर यांनी आल्याबरोबर सांगितले.

अधिक वेळ न दवडता ..अनुषा ..देशमुख सरांच्या केबिन मध्ये गेली ..

नमस्कार करीत तिने .. तिच्या हातातली फाईल .टेबलवर ठेवीत म्हटले ..

सर, तुम्ही दिलेले पेपर न्यूज कटिंग , वेगवेगळ्या मासिकातून आणि पेपरमधून

तुमच्याविषयी वेळोवेळी आलेल्या तुमच्या मुलाखती .आणि फोटो ,यांच्या आधारे

तुमच्या कार्यालयीन प्रवासाचा हा मोठा आलेख ..मी तयार केला आहे..

या आठवड्यात तो तुम्ही नजरेखालून घालावा ..म्हणजे काही महत्वाचे राहून तर गेले नाहीये ना !

हे पाहावे ..

मला जे जाणवले ..त्यातून मी तुमचे व्यक्तिमत्व माझ्या शब्दातून असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे .

थोडक्यात माझ्या प्रोजेक्टचा फर्स्ट पार्ट पूर्ण होत आलाय असे तुम्ही नक्कीच म्हणाल .

अनुशाचे बोलणे ऐकून देशमुखसर म्हणाले ..

ते आता झालाय ना , बाकी नंतर ऐकव मला ,

त्या आधी तुझ्याबद्दल मला काय वाटते आहे -

हे अगोदर सांगतो ते तू ऐक -

अनुषा -तुझे काम पाहून , हाती घेतलेल्या कामात झोकून देत ते पूर्ण करण्याची तुझी धडपड

आणि कार्याप्रती तुझ्या मनात असलेली तळमळ “ तुझी ही वृत्ती मला आवडली.

तुझ्या अभ्यासाचा विषय आणि आणि जन-संपर्क हे दोन्ही विषय ..तुझ्या आवडीचे आहेत

असे मला वाटते .

नित्य नेमाने तू रोजच नव्या माणसांच्या सहवासात येत असतेस ,

त्यांच्याशी भेटी , त्यांच्याशी संवाद भेटी ..यामुळे ..विषयानुरूप संवाद करण्याचे कौशल्य

तुला नक्कीच साध्य झाले आहे .

तुझ्या वयाच्या मुलींशी अनेक वेळा मी बोलतो , आणि आता तुझ्याशी बोलल्यावर मला एक फरक

जाणवला की..तू तुझ्या सोशल सर्कल मधल्या वावरण्याने ..स्वतःला एक माणूस म्हणून छान

घडवले आहे..त्यामुळे ..तुझ्या समवयस्क तरुणाई मध्ये जी चंचलता दिसते ,बेफिकीरपणा मला दिसतो ,

तो तुझ्यात अजिबात दिसला नाहीये.

तुझ्या या गुणाने मला खूप प्रभावित केले आहे.

त्यांच्याकडे पाहत अनुषा म्हणाली ..

अहो सर , इतकी तारीफ नका करू ..तुमच्या समोर मी एक सामन्य माणूस आहे.

आणि तुमचे बोलणे ..आभार प्रदर्शन वाटते आहे ..

मी इतक्या लवकर नाही जाणार इथून ..अजून खूप महत्वाचा भाग राहिलंय ..

माझ्या प्रोजेक्ट मधला .

देशमुख सर तिला म्हणाले –

तू निश्चिंत रहा .. तुझ्या कॉलेजने तुला जी टाईम-लिमिट दिलीय ,त्यात तुझे प्रोजेक्ट

पूर्ण होईल ,मी तसा शब्द दिलाय तुझ्या सरांना आणि तुला आज पुन्हा एकदा शब्द देतो .

अनुषा –निव्वळ योगयोगाने तू माझ्या संपर्कात आलीस ..

तुझ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आपल्या भेटी होत आहेत .पण,

एकदा ही मला माझ्या मूळ स्वभाव प्रमाणे मी वागावे , असे मला वाटले नाहीये !

याचे माझे मलाच आश्चर्य वाटते आहे ..

अरेच्च्या ..मी असे वागू शकतो ..लोकांना छान वाटेल असे ?

खरे सांगायचे झाले तर – मी माझ्या तुसड्या स्वभावा प्रमणे ..

समोरचा माणूस जेजे करू इच्छितो , बोलू इच्छितो ते ते त्याला मी अजिबात करू दिले नाही, कधीच करू देत नाही

कारण सगळे लोक ज्या ज्या गोष्टींना योग्य आणि बरोबर आहे असे म्हणतात ,

मी बरोबर त्या उलट वागत आलेलो आहे “हा माझा स्वभाव आहे “ याची सगळ्यांना मी सवय लावलीय.

परंतु ,त्यादिवशी आणि त्या वेळी तसे झाले नाही .

ज्यादिवशी मला ..तुझे प्रिन्सिपलसर.भेटून गेले ,बोलून गेले

त्यवेळी या माझ्या जुन्या मित्राने –तुझ्या सरांनी ..मला एक जाणीव करून दिली -

ते म्हणाले –

देशमुख , तुम्हाला काही शिकवावे .अशी माझी योग्यता मुळीच नाहीये ,

पण, तुमच्या विद्यार्थीदशेपासून मी पाहत आलोय तुम्हाला .या अर्थांने तुम्ही

या आधी कसे होता ,आता कसे आहात ..ते कशामुळे , त्याची कारणे माहिती आहेत

नाही असे नाही .

मला तुमच्याबद्दल जे काही माहिती आहे ,त्यावरून इतकेच सांगेन की

झाल्या गोष्टी होऊन गेल्यात , त्या गोष्टींना आता .. ताणून धरण्यात काही अर्थ नसतो .

दोष कुणाचा –शिक्षा कुणाला ..असा आंधळा न्याय काय कामाचा ?

परिस्थिती माणसाला बिघडवते ..तसेच ती त्याला सुधारण्याची संधी पण देत असते ..

तशी संधी तुमच्यासाठी मी आणून दिली आहे असे समजा ..

आणि माझी विद्यार्थिनी अनुषा – तुमच्या जीवनावर प्रोजेक्ट करणार आहे

त्या निमित्ताने ..जुने जे जे काही घडले , त्यातून बाहेर पडा म्हणजे

या प्रोजेक्ट मधले सागर देशमुख यांचे सहज-स्वाभाविक व्यक्तिमत्व जनमाणसासमोर यावे

एक मित्र म्हणून माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी ..तुम्ही तिला मनापासून सहकार्य करा .

आयुष्यात एक वेळ अशी येते की आपण आपल्या भल्यासाठी स्वतहा मध्ये बदल करून घ्यावेत .

आयुष्याच्या शेवटी तरी -निदान-

मन पश्चातापाने होरपळून गेलेले नसावे .हे जमले तरी अनेकांचे

आयुष्य सावरले जात असते , अनेक गोष्टींची नव्याने सुरुवात करता येते .

म्हणून ..समज,गैरसमज संशय या गोष्टीतून न बघता क्षमाशील मनाने घडून गेलेल्या गोष्टींचा

विचार केला तर असे जाणवेल ..आपल्या चुकीच्या वागण्यामुळे नक्कीच अन्याय झाला असेल,

आय्शुभर दुखः सोसावे लागले असेल, त्यांचा विचार करा .

जर त्याचे परिमार्जन करण्याची संधी कुणी दिली तर आपण ती सोडू नये !

माझ्या मित्राच्या –तुझ्या सरांच्या या मनापासूनच्या बोलण्याने ..आयुष्याच्या संध्याकाळी मला

खरेच विचार करण्यास भाग पाडले आहे...

मी काय काय चुकीचे वागलो , का वागलो ..हे तुला नक्कीच सांगेन ..त्यातून मी बाहेर कसे पडायचे

यासाठीची मदत तुला करावी लागणार आहे .

करशील न हे सगळं ?

अनुषा ही संधी तुझ्या प्रोजेक्टमुळे आली आहे असे मला वाटते ..

सागर देशमुख जसा दिसतो ..तो का दिसतो ? यावर काय उपाय आहेत ?

मला माझ्यात खूप बदल घडून यावेत असे गेल्या काही दिवसापासून वाटते आहे...

देशमुखसर असे इतके भावनिक होऊन बोलतील ..? याचा अंदाज केला नव्हता ,

बापरे ..इतके दिवस – आपल्या मनात किती गोंधळ उडालेला आहे की –

या विषयावर कसे बोलयचे , कशी सुरुवात करायची ?

आणि प्रत्यक्षात ..सागर देशमुख ..आपल्या मनात जे आहे त्याच गोष्टींचा विचार

करीत आहेत ..ओ माय god...!

अनुषा देशमुखसरांच्या चेहेर्याकडे पाहतच राहिली ..! वरवर कठोर, आणि रूड वाटणार्या

या माणसाच्या मनात इतकी खळबळ माजलेली आहे..? खरेच वाटत नाहीये .

माणूस जेव्हा आपल्या चुकांचे खापर दुसर्यांच्या डोक्यावर फोडत असतो , त्या भरात आपण चुकीचे

आहोत हे समजून घेण्याची तयारीच नसते “,

मिळालेले यश हे एकट्याचे कधीच नसते ..पण, यशची धुंदी ..हे विसरायला लावत असते .

असेच काहीसे झाले असेल का या माणसाच्या बाबतीत ?

आता यांच्या अंतरंगात कसा शिरकाव मिळावा आपल्याला ?

तो मिळवता आला तर गोष्टी अजून सोप्या होतील .

अनुशाला खूप धीर आला ..

आपल्या प्रिन्सिपल सरांनी आपले काम खूप सोपे करून ठेवलाय ..

हे आज देशमुख सरंनी सांगितले म्हणून कळाले ..

नाही तर ..आपण भीतीपोटी घाबरत राहिलो असतो ..!

देशमुखसरांच्या आजच्या अनपेक्षित बोलण्याने ,त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेने अनुशाला

एक नवी उमेद मिळाली . मनात आशेचे नवे कोंब फुलते आहेत असे तिला वाटू लागले .

उद्यापासून अजून वेगळ्या पद्धतीने कामास सुरुवात करू या.

अभिजितला ..देशमुखसरांचे हे नवे रूप .त्यांच्या मनातल्या गोष्टी ..इतक्यात बोलून दाखवणे

नकोच..फक्त मोघम अपडेट देऊ..

चार वाजले तशी अनुषा मोठ्या समाधानात घराकडे निघाली ..आजचा दिवस इतका छान असेल

कल्पना नव्हती ..!

अभिजीतला भेटण्यासाठी मनाची अधीरता वाढली आहे हे तिला जाणवले.

तिने फोन केला ..

अभि, आज भेटू या रे..खूप दिवस झाले ..भेटलो नाहीत ..

मिस यु राजा ..!

ये लवकर आपल्या नेहमीच्या ठिकाणी ..

लव्ह यु अभि...!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात

भाग -२१ वा लवकरच येतो आहे

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED