Novhel Premaavin vyarth he jeevan Part 26 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 26 वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

भाग - 26 वा

-------------------------------------------------------------------------

अभिजितला सकाळी सकाळी त्याच्या अजयजीजू आणि रंजनादिदीचा फोन येऊन गेला ..

त्यांच्याशी बोलून झाल्यावर ..त्याच्या मनात विचार येत होते की..

या अनुशाला मानलेच पाहिजे ..किती दूरवरचा विचार करून ,केवळ आपल्यावरच्या प्रेमापोटी

ती स्वतःची ओळख लपवते आहे . यामागे तिचा एकच उद्देश आहे आणि

तो म्हणजे आपले बाबा आणि त्यांचा iपरिवार हे सारे पुन्हा नव्याने जोडले जावेत.

आपल्या बाबांच्या मनातील जिव्हाळ्याची ,प्रेमाची भावना पार आटून गेलेली आहे ..हा लुप्त झालेला

भावना -प्रवाह सुरु व्हावा .आणि आपल्या बाबांना जाणीव व्हावी की..

माणसाचे लौकिक जीवन कितीही संपन्न असू दे. त्यात प्रेमाचा अभाव असेल तर ..

“प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..अशी परिस्थिती असते.

हेच बाबांना जाणवून देण्यासाठी आपल्या अनुशाने हा सगळा प्लान केला आहे ..किती खटपटी

करून , ती गोष्टी गोष्टी म्यानेज करते आहे..” म्हणूनच तिच्या धडपडीचे कौतुक ..

रंजना दीदी आणि अजय जीजू .दोघांनी अगदी मनापासून केले आहे ..

हे जाणवून अभिजीतच्या मनात अनुषा बद्दलचे प्रेम अधिकच घट्ट होत होते.

आपली निवड चुकलेली नाही ,अनुषाच आपली खरी जोडीदार आहे. तिच्याविना ..आपले जीवन ब्यार्थ आहे.

कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमाची रेकॉर्डिंग अनुशाने करून ठेवली ..आहे, कारण.. स्वतहा बाबांनी

तिला अट घातली आहे की .अनुषा त्यांच्या ऑफिसमध्ये येईल तेव्हा ते तिच्या सोबत बसून सगळा

कार्यक्रम पाहणार ..

खरी गोष्ट अशी आहे की -

रंजनादीदीने – बाबांना अजयजीजुंच्या बद्दल काही सांगितले नाही , एका अर्थाने दीदीने लव्ह-स्टोरी लपवून ठेवीत

त्यांची परवानगी न घेता , काही न सांगता गुपचूप अजयजीजू बरोबर रजिस्टर्ड- लग्न केले ..

दीदीच्या या अशा वागण्याचा बाबांना प्रचंड राग आला ,त्या भरात त्यांनी

या पुढे या दिदिशी ..आपले काही संबंध नाहीत .. असे आईच्या समोर सांगून टाकले ..

आणि बाहेर मित्र परिवारात ..विषय निघाला तर .ते म्हणू लागले .. मला मुलगी नाहीये .

असा तीव्र विरोध असतांना , मनात राग असतांना ..बाबांनी ..अनुशाजवळ कार्यक्रम दाखवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे

“ याचेच राहून राहून आश्चर्य वाटत होते , या मागे त्यांचा नेमका काय उद्देश आहे ?

कार्यक्रम झाला की दुसरे दिवशी रेकॉर्डिंग दाखवणार “ ही त्यांची अट अनुशाने कबुल केल्यावर तिला

बाबांनी दोन-तीन दिवस तिच्या प्रोजेक्ट वर्क ला सुट्टी देण्याचे कबुल केले होते.

त्याने घड्याळात पाहिले ..सकाळचे नऊ वाजत आले होते .

.बाबा दहा वाजता ऑफिसला निघतील ,आणि अनुषा अकरा वाजेच्या आत त्यांच्या ऑफिस मध्ये .पोन्चेल .नंतर

अनुषा बाबांना कार्यक्रम दाखवणार ..

बाबा पहिल्यांदा अजयजीजूना पाहणार ..दीदी आणि जीजू या जोडीला पाहणार ..

या दोघांचे मनोगत ऐकून ..बाबांच्या मनावर त्याचा काही परिणाम होईल का ?

याचीच उत्सुकता ..आहे ..सगळ्याना ..

नेमके काय म्हणाले बाबा ? याचे उत्तर अनुशाला आज संध्याकाळी भेटल्यावरच कळेल

..आणि आता पुढे काय करायचे ? याबद्दल अनुष सांगेल काही ना काही.

इकडे ....अनुशाच्या घरी ..

अनुषा सागर देशमुखांच्या ऑफिसला निघण्याच्या तयारीत होती ..दोन –तीन दिवसांच्या सुट्टी नंतर

तिला पुन्हा तिच्या प्रोजेक्टला सुरुवात करयची होती ..आता दिवस आणि वेळ पण थोडा शिल्लक होता ..

त्यामुळे या पुढे सागर देशमुख याना या बद्दल बोलू की नको ? ,या बद्दल विचारू की नको ?

असा गोंधळ या पुढे आपल्या मनात होऊद्यायचा नाही असेच आपल्या मनाशी अनुषा ठरवत होती.

नाश्ता आटोपल्यावर ..चहा घेत असतांना तिचे आई-बाबा म्हणत होते ..

अनुषा ..आता तुझे परीक्षेचे दिवस जवळ येत आहेत ..तुझ्या अभ्यासाची तयारी अजून नेहमी सारखी

सुरु झालेली दिसत नाहीये .

कोलेज ठीक चालू आहे न तुझे ?

आणि हो ..ते तुझे स्टडी –प्रोजेक्ट ..कुठपर्यंत आले आहे ?

अनुषाला प्रश्न पडला ..सांगावे की नको ? जाऊ दे ,

इतक्यात नकोच .असे ठरवत ती म्हणाली ..सगळे काही ओके आहे.

चला निघते मी..माझे काम दोन –तीन दिवस बंद पडले होते .

येते मी ..बाय ..

असे म्हणून ती बाहेर आपल्या बाईक जवळ आली ..बाईक साफ करीत असतांना ..

तिचा मोबाईल वाजतो आहे ..हे जाणवले ..

तिने पर्स मधून मोबाईल काढीत पाहिले ..

अविनाश जळगावकर ..हे नाव दिसले ..ते पाहून .

यांचा फोन का आला असेल बरे ? अनुषा विचारात पडली

तिला आश्चर्यच वाटले ..ऑफिसमधून मधून कॉल..काय झाल बुवा ?

तिने फोन कानाला लावीत म्हटले ..

हं.बोला अविनाश अंकल , मी अनुषा ..

अनुषा ,तू ऑफिसला निघाली असशील तर ..घरीच थांब ..येऊ नकोस ऑफिसला ..

एक बातमी सांगायची आहे तुला ..म्हणून फोन केला ..

बोला ..सांगा अंकल . काय झाले ?

ऐक -अनुषा –

सागर देशमुख रोजच्या प्रमाणे ऑफिसला येण्यासाठी निघाले होते ,

ते कारशेड मध्ये उभेच होते ..कारच दरवाजा उघडला आणि आत बसणार तोच ..

ते खाली जमिनीवर कोसळून पडले ..

ते बघून ..कंपाउंडमध्ये असलेल्या ऑफिसचा स्टाफ आणि सिक्युरिटी गार्ड धावतच आले ..,आणि

सगळ्यांनी मिळून त्यांना गाडीत टाकले ..आणि लगेच जवळच असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेले .

इमर्जन्सी पेशंट म्हणून ..सरळ आय सी यु मध्ये admit केलाय .

डॉक्टरांनी सांगितले ..कंडीशन क्रिटीकल होता होता वाचली ...जीवावर बेतले नाही हे नशीबच .

स्ट्रोक येऊन गेलाय त्यांना , लकीली त्यांच्या हार्टला काही डेमेज झाले नाही , पण पैरालीसीस झटका येऊन गेलाय

त्यामुळे त्यांच्या उजव्या बाजूची बरीच हनी झाली असावी .असा अंदाज आहे.

पण आपण असा अंदाज वगरे काही करणे बरोबर नाही होणार आणि अधिक .आता लगेच काय ते कळणार नाही...

घराच्या आवारातच हा प्रकार घडला ते एक प्रकारे चांगलेच झाले म्हणयचे .ऐनवेळी मदत मिळाली

आणि साहेबांना हॉस्पिटल मध्ये वेळेवर admit करता आले .

बाईसाहेब पण लगेच दुसर्या गाडीने हॉस्पिटल मध्ये पोन्च्ल्या आहेत.

आणि त्यांनी सांगितल्यामुळे.

मी लगेच साहेबांच्या मुलाला –अभिजितला फोन करून .. काय कंडीशन आहे हे सांगितले आहे ,तो पण लगेच आला आलेला आहे .

हे ऐकून ..अनुशाच्या पायाखालची जमीनच सरकते आहे .असे वाटून गेले ..

बाईक जवळ .अनुषा तसीच नि:शब्द उभी आहे ही पाहून..

तिचे आई –बाबा घाबरूनच तिच्याजवळ आले ..

काय झाले अनुषा ?

कुणाचा फोन होता , काही तरी भयंकर घडले आहे आणि तू ते ऐकून अशी भेदरून गेलेली आहेस..

आई-बाबांनी तिला घरात आणून बसवले ..

आईने तिला पाणी देत म्हटले ..

अनुषा ..तू अगोदर शांत हो..आणि मग ..बोलू आपण .

बाबा धीर देत म्हणाले ..

अनुषा ..सावर स्वतःला ..नक्कीच काही तरी घडले आहे ..जे तुझ्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीशी

आहे..म्हणून तू इतकी अस्वथ झाली आहेस .हो ना ?

जरा वेळाने सावरल्यासारखे वाटले .तेव्हा अनुषा म्हणाली ..

आई-बाबा ..

सागर देशमुख यांना आत्ता सकाळी १० वाजता स्ट्रोक –ataack आलाय , घरून ऑफिसला जाण्यासाठी

ते त्यांच्या कार मध्येच बसणार ..तोच चक्कर येऊन खाली कोसळून पडले . समोरच घरातच असलेले छोटे ऑफिस

आणि स्टाफ आहे म्हणून बरे झाले .आणि .सिक्युरिटी गार्डस आहेतच ..या सगळ्यांनी

मिळून लगेच त्यांना हॉस्पिटल मध्ये admit केले , अगदी वेळेवर मदत मिळाली ..

हार्ट-र्पोब्लेम नाहीये , त्यमुळे ..बाकी काय काय झाले ते दुपारी कळेल .

अनुशाने सांगितलेले ऐकून ..आई-बाबा पण क्षणभर परेशान झाले .

ते म्हणाले ..

अनुषा ..तू जा लगेच हॉस्पिटल मध्ये ..

भले ही त्यांच्या फामिलीतले कुणी तुला परिचित नसतील ..पण.. स्वतहा सागर देशमुख

आणि त्यांच्या कंपनी ऑफिस मधील स्टाफ तर तुला ओळखणारा आहे.

आणि तिथे जाऊन आपण तिथे आहोत एव्हढेच दाखवयचे असते अशा वेळी ..

बाबांचे सांगणे अनुशाला अगदी योय वाटले ..

ती मनात म्हणाली ..(यांना कुठे माहिती आहे ..की ..त्यांच्या मुलाला ..आधार देऊ शकणारी ..

फक्त ही एकमेव अनुषा आहे..तिला तर तिथे असणे गरजेचे आहे ).

अनुशाची आई म्हणाली ..

हे बघ अनुषा ..तुला तिकडे जाणायचे असेल तर जरूर जा . पण.लगेच उपाशी पोटी नको जाउस .

काही खाऊन जा..तिथे किती वेळ बसणार ,थोडेच आत्ता ठरवणार आहेस .

ठीक आहे आई ..तू म्हणतेस तर चार घास खाऊन जाते मी.

जेवतांना अनुशाच्या मनात एकच विचार येत होता ..

हे तर काही तरीच विचित्र घडले आहे ..आता या मुळे आपले प्रोजेक्ट गेले ही आपल्यासाठी वाईट झाले. ..

खूप मोठ्या मेहनतीने जुळवून आणलेल्या गोष्टी, काही उपयोग नाही कशाचा .

..आता या पुढे आपल्या कल्पनेने घडणे ,अपेक्षा करणेचुकीचे आहे .

अनुशाच्या मनात निराशा दाटून आलेली होती. काय करावे सुचेना .

पण.आता काय घडले आहे, त्याला सामोरे जाणे आवश्यक होते , अभिजीतच्या मागे खंबीरपणे

उभे रहाणे ही सर्वात गरजेची गोष्ट होती.

पण,..तिला सगळ्यांच्या समोर ..अभिजीतशी असलेले नाते उघडपणाने दाखवता येणे शक्य नाहीये ,

ते योग्य पण नाहीये ..याची जाणीव झाली .

देशमुख सरांची कंडीशन कशी आहे ?..हे संध्याकाळी समजणार , मग ..त्यावर उपचार ..मग रिकव्हरी

.म्हणजे ..खूप वेळ लागणार सगळ्या गोष्टींना .

आपल्या हातात आता तरी काहीच नाही ..बघू पुढे काय काय होणार आहे ते..

सध्या आपण एकच गोष्ट करू शकतो ..ती म्हणजे ..

देशमुखसर- या आजारातून लवकर बरे व्हावे याची प्रार्थना

,आणि आपल्या प्रिय अभिजीतला यातून बाहेर पडण्यासाठी बळ मिलो ..याची प्रार्थना करणे.

ती हॉस्पिटलकडे जाण्यास निघाली ..तिला वाटत होते ..कॉलेजमध्ये झालेला कार्यक्रम देशमुखसर

कधी पाहू शकतील ?

अनुशाने अभिजीतला कॉल केला ..

आणि म्हणाली .

मला अविनाश जळगावकर अंकलनी फोन करून सानिग्तले आहे .म्हणून मी तिकडे येते आहे.

आणि हो ..आपली ओळख आहे ..हे मी तिथे कुणाला जाणवू देणार नाही. आणि आपली ओळख

तिथे कुणी तरी करून देईलच ..त्या नंतर परिचित म्हणून आपण बोलुत बसुत.

मी तुझ्यासोबतच तिथे असणार आहे , बसणार आहे .या बाबतीत तू काही बोलायचे नाहीस .

त्यावर अभ्जीत म्हणाला –

मी कशाला नको म्हणू तुला , उलट तू हवी आहेस माझ्या सोबत ..

मला धीर देणारी ,सावरणारी ..अशी तू एकटीच आहेस..अनुषा , ये लवकर .

अभिजीतचे हे शब्द ऐकून ..अनुशाला पुन्हा एकदा त्याच्या प्रेमाचा साक्षात्कार झाला होता .

अशा कसोटीच्या क्षणी ..अभिला अनुशाच हवी आहे..

या जाणीवेने ..अनुशाचे मन ..त्याच्यावरील प्रेमाने भरून आले ..

ती म्हणाली ..

अभी ..राजा ..घाबरून जाऊ नकोस , तुझ्या बाबांना काही होणार नाही.

ही मी आलेच तुझ्या सोबतीला .

लव्ह यु राजा ..!

हॉस्पिटल समोर तिची बाईक थांबली .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात

भाग ..२७ वा लवकरच येतो आहे ..

----------------------------------------------------------------------

कादंबरी ..प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय