आज रुहीला पाहायला मुलगा येणार होता .घरात सगळीकडे तयारी चालू आली . रुहीच मन मात्र फार अस्वस्थ होत . येणारा मुलगा कोण असेल ? तो कसा असेल ? तो आपल्या स्वप्नातल्या राजकुमारा प्रमाणे असेल का ? तो आपल्यावर प्रेम करेल का ? असे , अनेक प्रश्न तिच्या मनात होते . त्यात रुहीला एट्कयत लग्न करायचेच नव्हते . तिला कंपनीत वरची पोस्ट मिळवायची होती , मगच ती लग्न करणार होती .
पण , अनेक स्थळ ही येत होती .त्यामुळे लग्नासाठी आई वडील तिला सारखेच लग्नासाठी फोर्स करत होते . त्यात तिला येता जाताना सारखी मुले त्रस्स देत . कंपनीतील ही एक दोन जनाणी ती लग्नासाठी मागणी घातली होती . आणि वरची पोस्ट कधी मिळेल हे माहीत ही नव्हते .बर मिळेलच ह्याचीही काही खात्री नव्हती . त्यामुळे रुहीने लग्नाचा निर्णय घेतला होता . तिला ' ' आदित्य ' ' नावाच्या मुलाचे स्थळ आले होते .एवढाच तिला माहीत होत . मुलगा पहिल्या शिवाय मी माझा निर्णय सांगणार नाहीं . त्यामुळे तीला बाकीच्या माहितीची गरज ही नव्हती . तिच्या काकांनी हे स्थळ आणले होते .
रुही तयार जाहली .पाहुणे कोणत्याही क्षणी येऊन पोहचणार होते . रुही एकदम सुंदर दिसत होती .अगदी द्रुष्त लागेल अशी . एकदम घरंदाज .ती मुळातच सुंदर होती, अगदी नक्षत्रासारखी ....आणि आज तर तिच्या चेहऱ्यावर सुंदर तेज आले होते . कोणीही पटकन हो ...म्हणावे एत्की सुंदर ती दिसत होती . ऐत्क्यात पाहुण्या
ची गाडी आली .गाडीतून नवऱ्या मुलाची बहीण, त्याचे दाजी, त्याचा चुलत भाऊ, आणि नवऱ्या मुलाची आई एत्की लोक उतरले. सगळे हॉल मधे बसले .थोड्यावेळाने उरकून रुही चहा चा ट्रे घेऊन बाहेर आली . रुहीला पाहून पाहुणे मंडळी खुश जाहली .रुही ने सगळ्याना चहा दिला .चहा देताना, तिने एक नजर नवऱ्या मुलावर टाकली . पण, तिला काही मुलगा फारसा आवडला नाही . मग तिने एकदा ही वर नजर करून मुलगा पहिला नाही .पाहुण्या मंडळी ने रुही ला अनेक प्रश्न विचारले .रुहीने ही त्याची चटकन उत्तरे दिली .सगळी माणसे खुश जाहली . पण रुही मात्र दुःखी होती . तिच्या आई ने हे ओळखले. मुलींची अशी अव्स्ता होतच असते . म्हणून तिने हळू च विचारले, अगं, रुही नवऱ्या मुलाला पाहिले , का? अगं हीच वेळ आहे, नीट बघून घे . उद्या म्हणू नकोस, मी मुलगाच बघितला नाही .आणि तिची आई हसली . रुहीच आणि तिच्या आई च बोलणं, नवऱ्या मुलाच्या आई ने ऐकलं, त्याना रुहीची अडचण समजली, त्यानी रुहीला आणि आदित्य ला एकत्र बोलता यावं .अशी विनंती केली . सगळ्याना ही कल्पना आवडली . आदित्य आणि रुही ला तिथेच एका रूम मधे पाठवण्यात आले .
मुळात च आदित्य हसरा, त्यांत रुही त्याला पसंद असल्यामुळे तो आणखीच खुश आणि हसरा दिसत होता . रुही आणि आदित्य एका रूम मधे आले . दोघे ही तिथे ठेवलेल्या खुर्चीत बसले . रूम मधे शांतता पसरली होती, शेवटी आदित्य ने सुरवात केली .......मी आदित्य, ....तुम्हाला पुढे शिकायला आवडेल का? रुही ने वरती न बघताच उत्तर दिले,.....हो .... तुम्हाला गावी रहायला आवडेल का? ..... रुही ने परत उत्तर दिले, हो .......परत शांतता पसरली .....परत आदित्य ने च सुरवात केली .....तुम्हाला काय विचारायचे आहे का? ....रुही, ....नाही ....आदित्य ...मग एक सेल्फी काढू का ? ... यावर रुहीला काय उत्तर द्यावे, काहीच कळेना . तिने पटकन विरोध करण्या च्या उद्देशाने म्हंटले . अहो, नको तुमच्या बहिणी ने आताच खूप फोटो काढलेत, त्या पैकी तुम्ही कोणता ही फोटो घेऊ शकता . आता फारसं आदित्य ला काही बोलता येयीना. , बरं, मग येतो ...एवढं बोलून तो निघाला . थोडसं रुही च्या मनात वाईट वाटलं .....आपण चुकीचं तर काही बोललो नाही ना ..... ...पाहुणे मंडळी घरी जायला निघाली .दोन्ही कढ्चि माणसे खूप दिसत होती .नवऱ्या मुलाची आई असच तिला चिढ्व्नया च्या द्रुष्टीने म्हणाली ,अरे तिला जातो म्हणून तरी म्हण .....यावर हसत हसत ...आदित्य म्हणाला, जातो कशाला येतो म्हणून सांग .....ते पण लवकरच .....सगळे हसत च बाहेर पडले . एकंदरीत पाहुण्या मंडळी च्या हसऱ्या चेहर्या कडे बघून त्याना रुही पसंद आहे .हे लक्षात येत होते .
रुही खूप कन्फ्यूज़्ड जाहली होती . तिला ऐत्क्यात लग्न ही करायचं नव्हत .तिला कंपनीत चांगली पोस्ट मिळवायची होती . पण, त्या साठी नोकरी आधी टिक वावी लागणार होती .आणि लग्न जाहले की ही नोकरी सोडून मुंबईला तिला शिफ्ट व्हावे लागणार होते, पण, तिला तिच्या वडिलांचे म्हणे पण, पटत होते . आता जर आपण चांगली स्थळ नाकारली, तर उद्या आपल्याला कोण चांगली स्थळ आणणार . शिवाय आता लग्नाचं वय ही झालाय. शिवाय हे स्थळ ही उत्तम आहे . रुही ला वाटले होते की, सगळे एवढे बोलतात तर कांदेपोहे कार्य क्रम होऊन जाऊदे. तस पण लग्नासाठी खूप प्रोसेस असतात . लग्न काय अस लगेच ठरतं . पण तेच आता तिला महागात पडणार होत . मुला कडून होकार आला होता .त्याना रुही पसंद होती .आता वेळ रुही वर आली होती . तिला वडिलांचे बोलणे पटत होते .फक्त आपण आपला च विचार कसा करायचा . आई वडिलांच ही वय जाहाले होते, त्याना ही मुलाची लग्न व्यव्स्तीत पार पडून जबाबदारीतून मोकळे व्ह्याचे असेल . तिला तो विचार पटला . पण, तिला मुलगा फारसा आवडला नव्हता मग, होकार कसा देणार . रुहीच्या मनात नुसतं प्रश्नांच काहूर माजलं होत . दोन मनाची नुसती जुंपली होती . दोन्ही मनाचं तिला बरोबर वाटत होत . बाबांच्या सांगण्यावरून मुलगा चांगला आहे, शिकलेला आहे, शिवाय त्याचा जॉब पण चांगला आहे .पगार पण चांगला आहे, निर्व्यसनी आहे, गावाला घर आहे ते पण स्वतः च्या हिंमत वर, घरी फक्त आई आहे .वडील नाहीत, दोन बहिणी त्याची पण लग्न झलीत, त्या पण त्याच्या संसारात बिज़ी .एकंदरीत राजा राणी चा संसार ... एवढं सगळं चांगलं असताना ँफ्क्त मुलगा दिसायला आपल्याला आवडला नाही, म्हणून लग्नाला नकार देणे तिला योग्य वाटेना .तिने मोठा श्वास घेतला .पाच मिनिटं डोळे बंद केले . डोळे उघडले . आणि तडक बाबांन कडे निघाली .तिने लग्नाला होकार दिला .तिला मुलगा पसंद आहे अस सांगितलं . घरात आनंदी आनंद झाला . आपल्या मुली ला मुलांकडून पसंदी आल्यावर आईवडिलांना कोण आनंद होतो . घरातला आनंद बघून रुहीही खूप खुश जाहली .
आता रुही आणि आदित्य च्या लग्नाची चर्चा दोन्ही घरात होऊ लागली .लग्नात हे करायचं, लग्नात ते करायचं . लवकरच रुही आणि आदित्य च्या लग्नाची बैठक होणार होती, आणि त्यातच साखरपुडा कधी करायचा ते ठरणार होते . रुहीच्या बाबानी तशी सगळ्याना कल्पना ही दिल्ती . ठरल्या दिवशी बैठकीला पाहुणे मंडळी बैठकीला बसली .बैठक आदित्य च्या घरी होती . रुही च्या कडून तिचे बाबा, आणि तिचे तीन, चार काका आदित्य च्या घरी गेले होते .