Sansaar - 7 books and stories free download online pdf in Marathi

संसार - 7

आदित्य ला तर रुही ची किंमत समजली होती .पण, आदित्य च्या आई आणि बहिणीच्या मनामधे रुहिविष्यि जास्तच राग निर्माण जाहला. त्या आदित्य ला तस बोलून ही दाखवू लागल्या . पण, आता आदित्य ला कोणत्याच गोष्टीचा फरक पडणार नव्हता . कारण आदित्य ला त्याची जबाबदारी कळली होती .
रुही सगळी घरातील कामे करत असल्यामुळे आदित्य च्या आई ला काही काम नसे, पण आता रुही घरात नसल्यामुळे, आदित्य च्या आई लाच घरातील सगळं करावे लागणार होते . आता तिला रुहीची खरी किंमत कळाली. रुही ची तिला थोडी दया पण आली, ती एवढी कामे, एवढ्या अव्घ्ड्लेल्या अव्स्टेथ ती कशी काय करत असे .
ईकडे रुहीला मुलगी जाहली, मुलगी झल्यामूले रुही खूप खुश होती .आपल बाळ ह्या जगात आले, हे ऐकून आदित्य ही खूप खुश होता . घरातील सगळी खूप खुश होती . रुही अजून ही बाळा ला घेऊन माहेरी च होती . पण आदित्य तिला तिथे भेटायला जात असे, तिला तिच्या बाळा ला काय हवं, काय नको ते पाहत असे, सगळे खूप खुश होते, रुही तर खूप खुश होती, तिचा आनंद गगनात मावत नव्हता . बाळा च करण्यात तिचा सगळा वेळ जात असे .तिचा बाळाच्या संगोपन बरोबर घरबसल्या ऑनलाइन जॉब चालूच होता . आता तीन महिने होऊन गेले होते, रुही ला बाळंत होऊन आता रुही बाळाला घेऊन सासरी जायील अस, सगळ्याच म्हण होत. आदित्य ने ही रुहीला घरी आणायचा निर्णय घातला .खरतर हा निर्णय आदित्य च्या आई आणि बहिणी ला पसंद नव्हता . रुही घरात आली, तर स्वातंत्र्य जात, म्हणून त्याना अस बट्ट होत .पण आदित्य च्या पुढे कोण जाणार?
पण, रुही ने ही एक निर्णय घेतला, तो निर्णय ऐकल्यावर कदचित सगळ्यांना धक्का बसणार होता, पण तो निर्णय घेणे, पण तितकाच गरजेचे होते . आणि तो निर्णय घेताना, रुहीला स्वतःला खूप त्रस्स जाहला होता, पण तिने खूप विचार करून तो निर्णय घेतला होता . आदित्य चा रुहीच्य आई वडिलांना फोन आला, तो रुहीला दुसऱ्या दिवशी त्यच्या घरी मुंबई ला घेऊन जाणार होता . रुहीच्या आई वडिलांना खूप आनंद जाहला . त्यानी रुहीला ही आनंदाची बातमी सांगितली .पण, ते ऐकून रुही मात्र खुश जाहली नाही . एवढी आनंदाची बातमी सांगून ही रुही खुश का जाहली नाही, हे मात्र रुहीच्या आई वडिलांना कळले नाही . ती तिच्या निर्णयाबदल त्याना स्पष्टच सांगणार होती, पण त्याना सांगण्या आधी तिने आदित्य शी बोलायच ठरवल . ती आई वडिलांना काहीही न बोलता बाळाला घेऊन निघून गेली .
रुही बेडरूम मधे येताच, तिने बाळाला पाळण्यात शांत झौपव्ले, बाळाच्या तोंडावरून हलकेच हात फिरवला, त्याच्या त्या निरागस चेहरा बघत राहिली .आपण घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही, हा पण प्रश्न तिला पडला . पण पुन्हा तिने मनाचा निर्धार केला, आणि तिने आदित्य ला फोन केला . आदित्य कामात थोडासा बिज़ी असल्यामुळे त्याला फोन उचलायला थोडासा उशीर केला .पण, त्याने फोन उचला . रुही बोलायला लागली, 'आदी तू खूप बिज़ी तर नाहीस ना? ' नेहमी प्रमाणे,आदी बोलला, नाही, का ग? सगळ व्यव्सतीथ आहे ना? बाळ बर आहे ना? त्याने एका दमात अनेक प्रश्न विचरले? ह्यावर त्यला दिलासा देण्याच्या उदेषने रुही म्हणली, नाही, रे सगळ व्यव्सतीथ आहे? तू काळजी करू नको? मला तुला कहितरि सांगायचंय, तू प्लीज, मला बोलू दे, मग तूझा निर्णय सांग? रुहीने मोठा श्वास घेतला, आणि एका दमात बोलू लागली, आदी, मला वाटतय आपण, दोघ, म्हणजे......आपल्या दोघांसाठी हे योग्य आहे, हे बघ तू गैरसमज करून घेऊ नको ......पण, मला वाटतय आपण, दोघ वेगळे होऊ . रुहीने सुटकेचा श्वास सोडला . समोरून काहीच आवाज येत नव्हता .आदी ला काहीच समजेना . त्याने रुहीला त्याबदल विचरले . पण, रुहीने परत तेच संगितले . आदित्य ला धक्का च बसला .ती काय बोलते, त्यला काहीच कळेना .पण ती खरच बोलत असेल, तर ...आदित्य च्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. पण, फोन वर बोलणे योग्य नाही, हे ही त्यला माहीत होत . त्याने तिला भेटायचे ठरवले .
त्याने तडक रुहीचे घर गाठले. आदित्य ला बघून रुहीचे आई बाबा खूप खुश जाहले .जावया चा पाहुणचार करण्यात ते रमून गेले .त्यांचा आनंद बघून रुहीने ह्याना काही संगितले नसेल, ह्याचा अंदाज आदित्य ला आला, म्हणून त्याने त्याना काही न सांगण्याचे ठरवले. थोड्यावेळाने काहीतरी कारण सांगून तो रुहीला टेरेस वर घेऊन आला . टेरेस वर जाताच , आदित्य ने तिला अस का बोललीस? हे विचारू लागला . रुही आता आदित्य ला सांगू लागली, सगळ ....मनातल, जे खूप्त होत, जे रूपत होत .ते सगळं..... ती बोलू लागली, आदित्य मला आता हे नातं नको, मला कंटाळा आलाय, प्रत्येक वेळी मीच चुकते, अस नाही . मला न्याय मिळत नाही, तूझ्य घरात, तुला काय वाटत मला काही कळत नाही, तू ड्रिंक करतो, तू शीतल शी अजून ही कॉंटेक्ट मधे आहे . अजून ही तिचा आणि तूझा एकत्रित चा फोटो तू जपून ठेवला आहे . तो तू का? तू जपून ठेवलास? ते मला नाही माहीत...... आणि मला ते जाणून सुध्दा घ्याचे नाही .तूझ्या बहिणी ही मला वाटेल तश्या बोलतात, त्याना ही तू काहीच बोलत नाही . एकवेळ मी तरी हे सगळ सहन करेन, पण मझ्या ह्या बाळा च काय? तुला जेव्हा कळल की तुझी बहीण प्रेग्नंट आहे ,तेव्हा तू मला विसरलास, आपल्या ह्या बाळाला सूध्हा विसरलास . जेव्हा मला तुझी खूप गरज होती, तेव्हा तर तू तिथे नव्हतास. मला, अस आयुष्य नाही जगय्चय आदी ....मला स्वच्छंद ऐकख्द्या पक्षा सारख जगयचय. मला वाटले तू मला मझी स्वप्न पूर्ण करयला मदत करशील, साथ देशील ...मी तुझी, तू माझी अशी दोघे मिळून आपण एकमेकांची स्वप्ने पूर्ण करू ....पण, तस काही जाहले नाही ...आणि ह्या पुढे ही होणार नाही . मला माहीत आहे .मला माहीत आहे, तूझ मझ्याव र खूप प्रेम आहे .पण, मला तुला मझ्यामूले काहीच प्रॉब्लेम झलेला चालणार नाही . मझ्यामूले तूझ्या बहिणीशी तूझ्या आई शी तू वाईट बोलव अस मला अजिबात वाटत नाही .फक्त तू मला माझी जागा द्यावी अस वाटतय ....तूझ्या मनात आणि तूझ्या घरात ....पण, ती जागा मला मिळेल अस नाही वाटत मला .. मला तू पहिजे मला आदी.... माझ खूप प्रेम आहे तूझ्या वर ....पण माझी खूप घुसमट होती, तूझ्या घरात .... मी नाही खुश राहू शकत, तूझ्या घरात, म्हणून मी हा निर्णय घेतला .ह्या पुढे माझ पूर्ण आयुष्य मझ्या बाळा साठी आणि मझ्या स्वप्नांसाठी ..... मला माहीत आहे, थोडासा त्रस्स होईल, पण, होईल सवय ....घेईल मी जमवून सगळ .... तुला पण हे सगळ करताना तितकाच त्रस्स होईल ,पण थोड्या दिवसानी तुला ही त्याची सवय होऊन जयील ....मग दोघे ही आपण आपल्या आपल्या अयुषत सुखी होऊ.












इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED