World - 5 books and stories free download online pdf in Marathi

संसार - 5

शेवटी रुही ने आदित्य ला त्या मुली विषयी विचारले, आणि आदित्य ने ही रुहीला काहीही आढेवेढे न घेता सगळं, सांगितल, एन्फक्ट, त्याला तिला हे सगळं सांगायचंच होत, ईतर, कोणाकडून जर रुहीला हे सगळं कळलं असतं, तर तिला वाईट वाटलं असतं, म्हणून ई तर कोणाकडून न कळू देता, त्याने स्वतः च हे सगळं सांगायचं ठरवलं .
आदित्य सांगू लागला, ती मुलगी ,म्हणजे शीतल, खूप गोड मुलगी ..... एकेकाळी माझं तिच्यावर खूप प्रेम होत . पण तिचं मझ्यावर कधीच प्रेम नव्हतं ..., पण मी मात्र वेड्या पाखरा सारखा तिच्या मागे फीरय्चो . पण आज बरं वाटतं ती
अयुषत नाही ....कारण ती असती तर तू नसती .आणि तूझ्या सारखी गोड मुलगी मझ्या अयुषत आली नसती .
आणि त्याने तिला अलगद मिठी मारली .त्या मिठीत रुही सुखव्ली .लाख गुणाचा आपल्याला नवरा मिळालाय, म्हणून त्या देवाचे तिने आभार मानले .जन्मोजन्मीं हाच नवरा मिळू दे .म्हणून देवाजवळ मागणी ही केली . जोडीदार म्हणून दोघेही खूप खुश होते .
रुही आणि आदित्य चे हौनेय्मून चे दिवस संपले, दोघे ही परतीच्या प्रवासाला निघाले . महाबळेश्वर वरून गेल्यावर रुही तिच्या माहेरी सोळाव्या साठी जाणार होती . रुही ने माहेरी जाऊ नये म्हणून, आदित्य ने खूप विनवण्या केल्या, कारण रुही गेल्यावर त्याला करम नार नव्हते, पण तशी रीत असल्यामुळे रुही ला जावेच लागणार होते . घरी जाताच रुहीची मांडव परत नीची तयारी सुरू जाहली .तिचे काका येणार होते .तिला नेहय्ला, रुही जाते हे पाहून आदित्य चे डोळे भरूं आले . त्याला रुही ने कधीच सोडून जाऊ नये अस, वाटतं होत .रुहीला ही काहीसं तसच वाटतं होत .
रुही माहेरी जाताच तिच्या मैत्रिणी आदित्य च नाव घेऊन तिचा छळ करू लागल्या .रुही ही आदित्य च कौतुक करून थकत नव्हती .तिच्या चेहऱ्यांवरच हसू बघून, आईवडिलांना समाधान वाटले . मुलगी सासरी सुखी आहे . ह्या शिवाय एका मुलीच्या आई वडिलांना आणखी काय हवं असतं . घरी आल्यापासून नुसतं रुही च आदित्य असा आहे, तो तसा आहे? नुसतं आदित्य ........हसत खेळत चार दिवस कसे पटकन निघून गेले, रुहीला आणि तिच्या आई वडिलांना कळाले सुध्दा नाही .आता रुही परत सासरी जायला निघाली .तिची सगळी तयारी जाहली होती, तिथून ती मुंबई ला जाणार होती ,आदित्य सोबत .... ती खूप उत्सुक होती, मुंबई ला जाण्यासाठी .... तस पण, मुंबईला जाण्यासाठी कोण उत्सुक नसतं ..... ..
रुही ची नणंद आली होती .तिला न्ह्यायाला.... रुही च्या आई ने तिच्या नंदेचा चांगला पाहुणचार करून तिला सासरी पाठवले . रुहीला घरी आलेले पाहून आदित्य ला खूप आनंद झाला. ती आल्यापासून आदित्य सारखं तिच्या मागे मागे करत होता . रुहीला ही ते खूप आवडत होत . संध्याकाळी च्या बस ने रुही आदित्य आणि त्याची आई तिघेजण मुंबई ला जायला निघाले . सगळी तयारी जाहली होती .रुही खूप खुश होती . बस आली, तिघेजण गाडीत बसले आणि मुंबई ला जायला निघाले . गाडी पुढे चालत होती, आणि रुही च सासर मागे पडत होत . आणि कदाचित .......
रुही आणि आदित्य त्याची आई मुंबईत आले .ते मुंबईत आले, रात्री चे दोन वाजले होते, तिघे ही गाडी तून उतरून घरी आले . येताना त्यानी भरपूर सामान आणले होते, तीन रूम च त्यांचं घर होत .बेडरूम, हॉल आणि किचन .....घर तस बरं होत ... पण, रुहीला तस ते फार काही नव्हतं आवडलं ...पण, ती तस कोणाला काही बोलली नाही .घरात काही वस्तू ही नव्हत्या. फक्त एक टी वी होता, तो ही खालीच ठेवला होता . बेडरूम मधे ही काही सामान नव्हते .किचन मधे ही जास्त काही वस्तू नव्हत्या . आणि आदित्य च ते मुंबईत ल घर ही भाडय़ाच होत . ज्याचं लग्नाच्या गडबडी मुळे दोन महिन्याचं भाडं थकल होत .रुही आता सगळं नकोस झलत. पंधरा दिवसात ती अगदी स्वप्नांत आहे .असच तिला वाटतं होत . आणि त्या पंधरा दिवसांवर च तिने अनेक स्वप्ने पहिली होती .पण, ते सगळं बघून ती मात्र दचकलीच . पण, तिने तस आदित्य ला दाखवलं नाही, उलट ह्यातुंच तिने स्वर्ग निर्माण करायचा ठरवला . दुसरा दिवस उजाडता च तिने तिच्या लग्नात मिळालेल्या वस्तू तिने मुंबईला आणल्या होत्या .तिने त्या वस्तू मांडल्या .बाजारातून काही सामान आणले .त्याने ते घर सुंदर सजवले. तिला तिच्या आई चे वाक्य आठवले .मोड्क्यात ही तुळशी सारखा संसार फूल्वय्चा . नवीन संसार उभा करून आदित्य आणि रुही खूप खुश होते . पण दुधात कधीतरी मिठाचा खडा पडणारच. आदित्य आता रुही वर मनापासून प्रेम करायला लागला होता .तिच्या मागे मागे करत होता, तिला काय हवं काय नको, ते पाहत होता . पण, त्याच्या अश्या वागण्या मुळे त्याच्या आईला कॉंप्लेक्स आला होता .पण, तिने तस काही आदित्य ला बोलून नाही दाखवलं .पण, आदित्य च्या बहिणी जेव्हा कधी आदित्य च्या आई ला फोन करत, तेव्हा त्या रुही बदल तिला भड्क्व्त, मग आदित्य ची आई रुहीला खूप त्रास देत . तिला छोट्या छोट्या गोष्टी वरून बोलत . आदित्य आणि ती दोघे कुठे फिरायला गेले, की घरी आल्यावर आदित्य ची आई रुही शी बोलत नसे . रुहीला किचन मधे काम करू देत नसे . आदित्य शी ही जरा तोडू नच बोलत असे .हळू हळू आदित्यच्या हे लक्षात येऊ लागले होते .मग आदित्य ने रुहीला कुठे बाहेर फिरायला नेह्ने टाळले. तिला काय गिफ्ट दिले, तरी आदित्य च्या बहिणी त्या वरून टोमणे देऊ लागल्या . ह्या सगळ्यात रुही मात्र खूप एकटी पडली .घरात बसून बसून तिला खूप कंटाळा येऊ लागला .दोन दोन महिने ती घरातून बाहेर पडत नव्हती . माहेर ही जवळ नव्हतं, लग्न झल्यामूले मैत्रिणी ही दूर झल्याहौत्या .जवळ च हक्कच अस कोणीच राहील नव्हत .आदित्य तर तिच्या पासून खूप दूर गेला होता .रात्री ही कामामुळे त्याला यायला उशीर होऊ लागला होता .आल्यावर तो ऐत्का दमयचा, की आल्यावर दमून झोपून जायचा . शिवाय सुट्टी च्या दिवशी ,त्याची मुंबई मधली बहीण घरी यायची .त्यामुळे रुहीचा दिवस कामात जायचा आणि आदित्य चा दिवस बहिणी मधे आणि तिच्या मुलांमध्ये जायचा . काही जाहले तरी त्याना एकत्र वेळ घालवायला अस मिळत नव्हता .त्या मुळे रुहीची थोडी चिडचिड व्हायची .आदित्य च आपल्याकडे लक्ष च नाही अस वाटायचं .ती एकटी एकटी राहू लागली, सतत कोणत्या तरी विचारात, हरवल्या सारखी राहू लागली . रुही हे सगळं सहन करत होती, आता तिच्या नंदा तिला तिच्या समोर घालून पडून बोलू लागल्या . आता हे सगळं रुहीला सहन न होण्या सारखं होत . तिने हे सगळं आदित्य ला स्पष्ट च सांगायचं ठरवलं .ती ची होणारी घुसमट....... तिने आदित्य ला तस सांगितलं ही, पण आदित्य चा ही नाईलाज होता . त्या आई आणि बहिणी ला ही दुखवता येणार नव्हते .इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED