Sansaar - 4 books and stories free download online pdf in Marathi

संसार - 4

रुही ही नवीन विचाराची होती .तरीही जुनं ते सोनं असतं, हे मानणारी रुही होती .तीच तापट डोकं, तिला वारंवार सांगत होत की, जे आपल्या मनाला पटत नाही, रूज्त नाही, त्याचा नाद सोडलेलाच बरा ....म्हणजे कोणीही न दुखवता आपल्या आपल्या मार्गाने गेलेलं बरं ,तीच मन तिला सांगत होत, आदित्य तिला फोन करत नाही, ह्याला ठोस अस काहीतरी कारण असणार, पण तीच दुसरं मन तिला सांगत होते, की कदाचित तीच चुकीचा विचार करत असेल ,तीच आदित्य ला नीट समजून घेत नसेल . आई च्या सांगण्यावर पण थोडासा विश्वास ठेवूया. म्हणून, तिने तिच्या आणि आदित्य च्या नात्याला एक संधी द्यायची ठरवली .
घरात आनंदी आनंद वातावरण होते .लग्नाची सगळी तयारी जाहली होती .दोन दिवसांवर लग्न आले होते .घरात सगळीकडे भराभर चालू होती .काही चुकू नये, विसरू नये .म्हणून, आई एक एक गोष्ट चार चार वेळा चेक करूं बघत होती . रुही ने ही खूप आदित्य सोबत खल्व्याची अनेक स्वप्ने पहिली होती . रुहीच्या हातावर मेहंदी लागली होती .घर अगदी पाहुण्यांनी भरून गेले होते .अचानक रुही ची चुलत बहीण रुहीला म्हणाली, काय ग? रुही तूझ्या नवऱ्याच तूझ्यावर कमी प्रेम आहे .रुहीला काही समजेना? तिने तिला तिच्या बोलण्याचा अर्थ विचारला ..... ती हसत रुहीला म्हणाली, अगं, तूझ्या हातावर ची मेहंदी च सांगते, ती काय फारशी रंगली नाही . अस, म्हणतात की, जर नवऱ्याच प्रेम जर कमी असलं की, हातावर ची मेहंदी कमी रंगते आणि प्रेम जास्त असेल, तर जास्त रंगते . तूझ्या हातावरची मेहंदी काही रंगली नाही .... आणि ती हसत निघून गेली . तीच बोलणं रुही च्या मनाला लागलं, ती बोलली, ते खरं असेल का? अस, असतं ....हातावर ची मेहंदी जर कमी रंगली, तर नवऱ्याचे आपल्यावर कमी प्रेम असते ....म्हणजे खरच आदित्य च मझ्या वर कमी प्रेम आहे ..किंवा नाहीच......... आदित्य च्या वागण्याचा अर्थ ती त्या एका वाक्या शी लावू बघत होती .....लग्नाच्या आधल्या रात्री हे सगळे विचार मनात येणे चुकीचे आहेत ...तिने स्वतःचीच समजूत काढली .आता माघार घेणे नाही, जे येयील त्याला आता सामोरे जायचे. अगदी बेधडक, बिनधास्त.... निदान आपल्या आईवडिलांनसाठी तरी .........तिने डोळ्यातून घळ घळ वाहणारे अश्रू पुसून टाकले .ऐत्क्यात तिचा फोन वाजला आदित्य चा फोन आहे, तिच्या ओठांवर अलगद हसू आले, आणि मनात थोडीशी शांतता.....
दुसरा दिवस उजाडला, लग्नाचा दिवस उजाडला, घरात जायची त्याची आवराआवर चालू होती . रुही ने सुंदर अशी न्व्हरी घातली होती .त्या प्रमाणे दागिने ही घातले होते, खूप सुंदर अशी ती दिसत होती . सगळे जण आवराआवर करून, लग्नाच्या हॉल मधे जायला निघाले .रुही गाडीत बसून निघाली . सगळं मागे टाकून, नव्याने आयुष्य सुरू करायला, नवीन स्वप्न तिची वाट बघत होती ....
रुही आणि आदित्य दोघांच लग्न व्यव्सतीथ पार पडलं. रुही अगदी नक्षत्रासारखी दिसत होती .आणि आदित्य ही छान दिसत होता .आदित्य हा खूप खुश दिसत होता . त्याचा चेहरा च हसरा होता ,शांत, तेजस्वी ...दोघेजण ,लग्न करून आदित्य च्या घरी आले .दुसऱ्या दिवशी देवदर्शन आणि मग तिसऱ्या दिवशी गोंधळ आणि पूजा .....सगळे कार्य क्रम ठरलेले होते .त्या नुसार ते व्यव्सतीथ पार पडले . आलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी पार परतली, आता एक दोन पाहुनी होती अजून, घरी ...ती दोन तीन दिवसानी जाणार होती . त्यामुळे तितकीशी मोकळीक नव्हती मिळाली, आदित्य आणि रुहीला ..... पण, तरीही आदित्य रुहीची जेवढी जमेल तेव्हढी काळजी घेत असे . रुहीही घरात रुळाय चा प्रयत्न करत होती .घरातल्या कामात सगळ्याना मदत करत होती .आज सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले . आज आदित्य आणि रुहीची पहिली रात्र होती . आदित्य तर खूप खुश होता, आणि रुही सुध्दा खूप खुश होती, पण तरीही दिवसभराच्या कामाने जरा दम्ली होती . लग्ना आधी तिला घरकामाची फारशी सवय नव्हती . रात्र झल्यावर ती आदित्य च्या रूम मधे गेली . तिथे गेल्यावर तिला वेगळच द्रुष्य दिसलं .तिला वाटलं आदित्य आणि तिच्या सहजीवनाची पहिली रात्र आहे, म्हंटल्यावर आदित्य ने काही स्पेशल तयारी केली असेल, पण आत रूम मधे येऊन बघते तो, काय? त्याच्या चुलत भावांनी त्याची चेष्टा करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या ऐवजी झेन्डु च्या पाकळ्या टाकल्या होत्या . आणि ते सगळं आदित्य गोळा करत होता . रुही ला हे सगळं बघून खूप वाईट वाटलं .तिच्या सह्जीवनाची ती पहिली रात्र, अयुषत ही रात्र एकदाच येते, प्रत्येक जण ह्या रात्रीची अनेक स्वप्न पाहत पण ........रुही विचार करत दारातच उभी होती . आदित्य ने तिला हाक मारली .ती दारातून आत गेली . आदित्य ने सगळी रूम आवरली होती . त्याने रुहीला अलगद हात पकडून आत आणले . तिला प्रेमाने जवळ घेतले . तिला उचलून बेडवर टाकले .तिच्या लांबसडक केसामधुन त्याने हलकासा हात फिरवला . तिला आज आपल्या प्रेमा मधे चिंब भिजवून टाकायचे, अस आदित्य ने ठरवलं होत . दोघे ही खूप खुश होते .रुहीला खूप त्रास होत होता . तिला तो त्रास असह्य होत होता . तिच्या डोळ्यातून आता अश्रू बहु लागले .आनंदाचं विरजण आता दुःखात जाहले होते . आदित्यने रुहीला सोडून दिले . तिला शांत केले .तिला झौप्व्ले . रुही शांत पडून होती .तिला कधी झौप लागली, तेतीचे तिला च कळाले नाही . तिच्या शेजारी च आदित्य झौप्ला होता . तो तळमळत होता, रुहीच वागणं त्याला अजिबात पटलं नव्हतं अस, कोण वागत का? पहिल्या रात्री सगळ्यांनाच त्रास होत असतो, मग सगळेजण सहन करतातच ना ......कोण्ही रडत का? रुही च्या अश्या वागण्या मुळे आमची पहिली रात्र खराब जाहली . विचार करत करत तोही झोपी गेला .
दुसरा दिवस उजाडला होता सुंदर
कोवळं ऊन पडलं होत . एकदम प्रसन्न अस वाटतं होत . रुही झोपेतून उठली .आदित्य तिच्या शेजारीच झौप्ला होता .रात्री आदित्य ने तिला समजून घेतल्या मुळे तिला आदित्य चा अभिमान वाटतं होता .आणि भरपूर प्रेम सुध्दा .......तिने आदित्य च्या गालावर हलकेच किस घेतली .ऐत्क्यात आदित्य गालात हसला, त्याने तिला जवळ घेतली .आणि मिठी मारली . तो मिठितिल स्पर्श दोघां ना ही हवासा वाटणारा होता .दोघे ही त्या गोड स्पर्शाने चिंब भिजले होते .
रुही आणि आदित्य आता हनिमून ला जायला निघणार होते .आधी आदित्य ने उटी ला जायचे ठरवले होते .पण, त्याची आई आजारी असल्यामुळे त्यानी उटी ला न जाता जवळच चार दिवसासाठी महाबळेश्वर ला जायचे ठरवले होते . महाबळेश्वर चे चार दिवस आदित्य आणि रुहीच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवस होते . दोघानी खूप एन्जॉय केला .खूप गप्पा मारल्या .एकमेकांचे भावी आयुष्याविषयीचे प्लान विचारले, ते पूर्ण करण्या साठी एकमेकाना मदत करण्याचे वचन दिले .पण, ह्या सगळ्यात आदित्य ने रुहीला एका मुली विषयी सांगितले, जेव्हा पासून त्यांचे लग्न जाहाले होते, तेव्हा पासून आदित्य एका मुली विषयी सारखं बोलायचा, आणि तीच ही मुलगी .....






इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED