Sansaar - 9 books and stories free download online pdf in Marathi

संसार - 9

पण ,हे सगळ रुहीला आदित्य ला सांगण्याची हिंमत होत नव्हती .ती आदित्य ला ऐत्के काय बोलली, होती की, आता आदित्य आपण हे सगळ सांगितल्यावर आपल्या ला माफ करेल का? तिला आदित्य ची भीती वाटू लागली होती .तिला आता खूप वाईट वाटत होते, आपण आदित्य ला बोलत होतो की, तो खूप स्वार्थी आहे, तो फक्त स्वतःचा च विचार करतो, पण, आपण तरी काय केल? स्वप्नांच्या ऐत्के मागे लागलो होतो, की आदित्य ला त्याच्या मुली पासून तोडले, आपल्याला वाटले, की मीच ह्या बाळाची आई आणि बाबा होईल, .....पण, मी ह्या बाळाची आई आणि बाबा का होऊ? तिचा बाबा तर आहे ? तिचा पूर्ण अधिकार आहे त्याच्या प्रेमाव र .....आणि आदी चा ही आहे त्यच्या मुलीच्या प्रेमवर अधिकार पण आपण काय केल ? एका बाप लेकीला दूर केल .फार मोठा अपराध केला आपण,....देव कधीच माफ करणार नाही ह्या अपराधाबदल... एवढ कस आपण मूर्ख...... आदी च्या घरच्यांच्या चुकीची शिक्षा आपण त्याला का देतोय? मान्य आहे, की त्याने नवरा म्हणून, आपल्या कडे थोडस दुर्लक्ष केल .पण, कधी तरी काही क्षणापुरत तरी आपण त्याच्या वरती प्रेम केल ना? त्या प्रेमाच फळ म्हणून हे आपल बाळ, आपली राधा . तिच्यापासून आपण एक क्षण ही दूर राहू शकत नाही .आणि आपण राधा पासून आदित्य ला ऐत्के दिवस दूर ठेवल. तो ड्रिंक करतो, हे आपल्याला लग्ना आधी त्याच्या बहीनीनी संगितले नाही ,पण लग्न झल्याव र।त्याला दारू पासून दूर ठेवणे, ही आपलीच जबाबदारी होती .शिवाय त्याला शीतल पासून दूर ठेवणे, ही सूध्हा आपलीच जबाबदारी होती .मान्य आहे, त्याला आपण शीतल पासून दूर रहा, अस खूप वेळा संगितले, पण त्यानी काही आपले ऐकले नाही ....पण, आपण पण हक्काने कान धरून परत परत त्याला सांगायला पहिजे होत .आपली पण, ही फार मोठी चुकीच जाहली .आपण आपल्या हाताने आपल्या संसाराची माती केली . ज्या लोकाना धडा शिकवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला होता, त्यांच तर काहीच नुकसान जाहाले नाही, पण आपल मोठ फार नुकसान जाहले, आणि हसू ही ....ती मोठमोठ्याने रडू लागली .आपल्या चुकीची तिला जनीव जाहाली .पण, आपण जर आपली चुकी मान्य केली, तर आदी आपल्याला....... माफ .....करेल का? ........ तिने डोळे पुसले .....करेल तो माफ..... त्याच प्रेम आहे मझ्यावर ....मझ्या कडे बघून ......नाहीतर निदान राधा कडे बघून तरी तो, मला माफ करेल ....हो, ....नक्कीच ..... पण, राधा कडे बघून तरी तो का माफ करेल मला? मी राधा कडे कधी बघू दिलय त्यला ...आता पर्यंत मी त्याला स्वार्थी समजत होते, पण, स्वार्थी तो नाही तर मी आहे . मी .....हो ...मीच ......त्याच्या घरच्या ची शिक्षा मी त्याला दिली .मान्य आहे तो चुकला .पण त्यला कान धरून त्याची चुकी दाखवणे हे माझे काम होते, मी मझ्या हाताने मझा संसार मोडला . जगाचे हसू केले . पण, आता मी हे सगळ नाही होऊ देणार .जर चुकी मी केली, तर माफी ही मीच मागणार .आणि सगळ व्यव्सतीथ पण, मीच करणार. आई बाबांची ही माफी मागून त्याना हे सगळ संगितले पहिजे, तेव्हा कुठे त्यांचा मझ्याव्र्चा राग दूर होईल .आणि हे सगळ संगितले, ऐकून त्यांना खूप आनंद ही होईल . पण त्याना हे सगळ कस सांगायच? ते मझ्याशी बोलत सूध्हा नाहीत, का मला घरात सूध्हा घेत नाही .शेजारून गेले तर ना मझ्या कडे बघतात, ना राधा कडे . कस हे सगळ त्याना सांगायाचं आणि, त्यांना हे सगळ सांगताना एवढी भीती वाटते तर आदित्य च काय? तो कसा रिक्ट करेल, शिवाय त्याच्या आई आणि बहिणी तर पूर्वी पेक्षा जास्त त्रस्स देतील .पण, आता त्याचा विचर करून मला गप्प बसता येणार नाही .मला सगळ्यासमोर आपली चुकी मान्य करून हे सगळ पूर्वी सारख केल पहिजे . आता मला परिणामाची काळजी नाही करता येणार . रुहीने मनात काही निश्चय केला, आणि ती ने फोन उचला आणि आपल्या बाबांना फोन केला .रुहीचा फोन बघून त्यांना थोड आश्चर्य वाटल, कारण ते रुहीला चांगलेच ओळखत होते, रुही ही खूप मॉडर्न विचाराची होती, अन्याय सहन न करणारी होती . आपल्या स्वप्नांसाठी काहीही करणारी .ती ने जे काही आज पर्यंत मिळवले होते, ते स्वबळावर मिळवले होते .तिने कधीही हार मानली नव्हती . आणि तिने जे ठरवले, ते तिने करूनच दाखवले, मग अस असताना, ती ने का फोन केला असेल, तिला माहीत आहे, आह्मी तिच्याशी कधीच बोलणार नाही, तिने घर सोडले, पण निर्णय नाही बदलला, एवढ सगळ असताना, तिने एट्क्या दिवसानी फोन का केला असेल .काही विचित्र तर घडले नसेल ना? राधा बरी असेल ना? त्याच्या मनात एक ना अनेक प्रश्न उभे राहिले . त्यानी सगळ विसरून काळजी पोटी तिला फोन करायचा ठरवला .त्यानी लगेच फोन घेतला, आणि पटपट नंबर दाबून रुहीला फोन केला ,समोरून बाबांचा फोन येताच रुही खूप खुश जाहली,आणि तिने एका रिंग मधेच फोन उचला. समोरून काळजी पोटी हेलो, म्हणा ऱ्या बाबांचा आवाज ऐकून तिला खूप आनंद जाहला. कोणत्या प्रकारची अढी मनात न ठेवता बाबा म्हणाले, काय ग? रुही सगळ व्यव्सतीथ आहे ना..... राधा ला काही जाहाले तर, नाही ना? ...त्याच्या मनातील काळजी ओळखून, त्याना मधे च थांबत, रुही बाबांना म्हणली, बाबा, सगळ व्यव्स्तीथ आहे, राधा पण बरी आहे .माज शिक्षण आता पूर्ण जाहले आहे, आणि आता मी गावातील लोकां साठी नवीन कॉम्पुटर क्लास चालू करणार आहे . .....समोरून काहीतरी आवाज आला .....नाही बाबा, सगळ पैसे च पण झलय, पण हे सगळ करताना मी तुम्हाला आईला आणि आदित्य ला खूप मिस करत होते .आता तुमच्या शिवाय राहणे, नाही जमणार अह्मला . बाबा, प्लीज मला ह्या सगळ्या साठी माफ करा .माझा निर्णय चुकला .पण, बाबा मी आता हे सगळ पूर्वी प्रमाणे नीट करेन . फक्त तुम्ही मझ्या सोबत उभे रहा . आणि रुही रडू लागली . रुहीच रडणे ऐकून बाबाच मन पघ्ल्ल. त्यानी रुहीला माफ केल .रुही तूझ्या मनात आता आदित्य रावांविषयी कोणता ही राग नाही, हे ऐकून बर वाटल .तुम्ही दोघे फक्त खुश रहा .आह्मी तुमच्या सोबत आहोत. तू सुखी रहावी एवढीच आमची अपेक्षा आहे .आता तू घरी ये .आपण सगळे मिळून आदित्य रवाषि बोलू .ते खूप चांगले आहेत, ते माफ करतील तुला . आणि जर तशी वेळ आली तर, त्याच्या घरच्यांशी सूध्हा बोलेल मी, तू नको काळजी करू, सगळ व्यव्सतीथ होईल .फक्त तू आता तूझा हा निर्णय बदलू नको .ये लवकर घरी .....कधी एकदा राधा ला आणि तुला पाहतोय अस झाल्य. बाबाच बोलण ऐकून रुही खूप खुश जाहाली .बाबानी आपल्याला माफ केले .ह्याचा खूप आनंद झाला तिला, पण ..,तिने बाबांना संगितले, बाबा मी घरी येते .पण, आदित्य शी किवा त्याच्या घरच्यांशी ह्या बाबतीत फक्त मी बोलणार .तुम्ही किवा आई काहीही कोणाशी बोलणार नाही ...




इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED