Sansaar - 6 books and stories free download online pdf in Marathi

संसार - 6

त्यांत पैशाची चणचण ही होती . म्हणून रुही ने मन रम्व्ण्या साठी नोकरी करायची ठरवली .पण ह्या अनोळखी शहरात कोणी तिच्या ओळखीचे ही नव्हते .त्यांत ह्या सगळ्यात आदित्य तिला मदत करेल, अस ही तिला काही वाटतं नव्हते .शिवाय सासूच्या परवानगी शिवाय घरा बाहेर ही पडता येत नव्हते .पण रुहीने हार नाही मानली, तिने इंटरनेट च्या मदतीने नोकरी शोधण्याचे काम चालूच ठेवले . खूप प्रयत्न केल्यावर तिला तिच्या मनासारखे काम मिळाले .ह्या कामात पैसे कमी होते, घरबसल्या होते .,घरबसल्या ऑनलाइन काम तिने मिळवले होते . हे काम तिने स्वबळावर मिळवले होते .शिवाय ह्या कामामुळे तिचा वेळ ही चांगला जाणार होता .शिवाय डोक्यात कोणते विचार ही येणार नव्हते . शिवाय सासूला बाहेर पडताना काही उत्तरे द्यायची ही गरज नव्हती .रुही खूप खुश होती .
आता रुही तिचा बराच वेळ ऑनलाईन कामात घालवत होती . त्या मुळे तिच्या हातात काही पैसे ही येऊ लागले होते . त्या पैशांतून ती घरात ही काही सामान आणत . त्यातुन तिने स्वतःचे शिक्षण ही पूर्ण करायचे ठरवले . ह्यातच घरात बाळाची चाहूल लागली .
आता रुही तिचं घर, तिचं ऑफीस च काम आणि तिच्या पोटातील बाळ ह्या सगळ्यात च खूप बिज़ी जाहली . आता आदित्य ही रुही कडे जास्त लक्ष देऊ लागला . रुही ची आणि तिच्या पोटातील बाळाची विशेष काळजी घेऊ लागला . आई आणि बहिणी चा विचार न करता, तिला हव्या असलेल्या वस्तू आणून देत होता . खूप छान चाललं होत . अगदी आनंदी आनंद होता . सुख अगदी रुही च्या पायाशी लोटांगण घेत होत . पण, ते फार काळ नव्हतं ....रुहीला बाळाची चाहूल लागून तीन महिने जाहले होते, त्यातच आदित्य ची दोन नंबर ची बहीण ही गरोदर आहे, हे समजलं, घरात द्विगुणित आनंद जाहला . दोन दोन बाळें घरात खेळणार म्हणून सगळीच खूप खुश होती . आदित्य ची आई तर जाम खुश होती .पण, आदित्य च्या बहिणीला पहिल्या बाळा च्या वेळी खूप त्रस्स जाहला होता, त्यामुळे डॉक्टर नी तिला कंप्लीट बेड्रेस्स सांगितला होता . आता रुही घरातील सगळं करून नणंद च्या बाळाची ही सगळं करत होती .शिवाय त्या नणंद च ही सगळं करत . हे सगळं करून रुही दमून जात . हे सगळं करताना तिला फक्त वाटत की, कोणीतरी तिला विचारावे, दम्लीस का? पण, ही आशा ती कोणाकडून च करू शकत नव्हती .आदित्य दिवसभर काम करून दमत असे, त्यामुळे घरी आल्यावर ह्या सगळ्या विषयांवर बोलायला त्याच्या कडे वेळ च नसे . आणि आदित्य ची आई ला तर रुही बदल काहीच वाटतं नसे ....
रुहीला आदित्य हवा होता . तिच्या होणाऱ्या बाळाचा बाबा हवा होता . ती ह्या सगळ्यात आदित्य ला खूप मिस करत होती .त्याच्या प्रेमाला ती खूप मिस करत होती . त्याच्या स्पर्श ला ती खूप मिस करत होती . आदित्य च ही असच काहीसं होत . त्याला ही रुही ची होणारी धावपळ कळत होती .तिला होणारा त्रस्स त्याला कळत होता . त्याला ही ती हवी होती, तिचं प्रेम हवं होत .तिचा स्पर्श हवा होता . पण, आदित्य फार मोठ्या पेचात अडकला होता, त्याच्या बहिणीला पहिल्या मुलाच्या वेळी खूप त्रस्स जाहला होता, तो त्रस्स त्याने त्याच्या डोळ्याने बघितला होता .त्यामुळे तीची आता काळजी घ्यावी लागणार होती .तिच्या सासरी ही तिचं अस करणार कोणी नव्हतं .त्यामुळे जे काही आहे, ते रुहीला आणि आदित्य च्या आई ला च करावे लागणार होते . पण आदित्य आई ला काही बोलू ही शकत नव्हते .तिचे ही वय जाहले होते, तिला ही काम होत नव्हते . शिवाय ऑफीस मधल्या कामामुळे तो खूप थकून जात असे, त्यामुळे तो रुहीला घरकामात मदत करू शकत नव्हता. शिवाय तिला जास्त वेळ ही देऊ शकत नव्हता .
रुहीची सासू आणि तीची नणंद रुही ला खूप त्रस्स देऊ लागल्या .तिचे सगळे काम जाहले, आणि ती ऑनलाइन काम करू लागली, की तिला मुद्दाम काहीतरी काम सांगत .एखादे काम तिच्या कडून
चुकले, किवा राहिले .तर तिला घालून पडून बोलत . आता रुही मात्र खूप चिडली होती, आता तिला सगळे सहन होईना .तिने आदित्य ला ही हे सगळे सांगायचा प्रयत्न केला होता .
पण, आदित्य तिचं बोलणं ऐकायचा, आणि सोडून द्यायचा . आता ह्या सगळ्याला रुहीने च काहीतरी करायचं ठरवलं ,आता सासू कींवा नणंद काही बोलली कीं ती त्याना आता न घाबरता सडेतोड उत्तर देऊ लागली .तिच्या ह्या वागण्या मुळे रुहीची सासू आणि नणंद थोड्याश्या घाबरल्या .. थोडे दिवस त्यानी रुहीला काहीच बोलायचे नाही असे ठरवले . मग हळू हळू त्या दोघी आदित्य च्या मनात रुही विषयी विष कालवू लागल्या . पण, आदित्य कोणालाही जरी काही बोलत नसला, तरी त्याला घरातील सगळी स्तिथी माहीत होती . रुहीच्या ह्या वागण्याला आपणच जबाबदार आहे, हे त्याला माहीत होते .त्याची आई आणि बहीण जरी चुकत असली तरी, तो त्याना काहीच बोलू शकत नव्हता, एक दोन वेळा त्याने त्याना बोलायचा प्रयत्न केला, तर त्या च त्याला उलट बोलू लागल्या, बायकोच्या ताटा खालच मांजर . मग त्याने रुही शी बोलायचं ठरवलं, त्याने रुही ला थोडं शांत रहा .थोडे दिवस गेले, कीं सगळं व्यव्स्तित होईल . मी सगळं व्यव्स्तित करेल अस, आश्वासन दिले .रुही ने ही आदित्य च म्हण पटलं .
आता ती सगळी कडे दुर्लक्ष करू लागली . तिच्या सासू ला आणि नणंद ला आपण जिंकल्याचा कोण आनंद जाहला. अविचारी बुध्ही एखाद्या चा जीव ही घेऊ शकते .तसच काहीतरी आदित्य च्या घरात होत होते .संसार असा असतो, त्यात एवढे प्रॉब्लेम असतात, त्यात आपण एकटे नसतो, ह्यात एकमेकां चा विचार हा करावा लागतो .कोणी काही बोलले तर ऐकून घ्यावे लागते ....रुही च्या आई ने रुही ला सांगितले . पण, रुही ही आजच्या जमान्यात ली मुलगी होती .तिच्या डोक्यात काहीतरी चालले होते .तिला आदित्य च्या आई ला आणि तिच्या बहिणीला योग्य जागा दाखवून द्यायची होती .
तिने एक कामवाली कामासाठी ठेवली, तिचा पगार रुही स्वतःच्या पैशांतून द्यायची . त्यामुळे तिला थोडा आराम मिळू लागला . त्यातून तिने योगा क्लास जॉइंट केले .त्यामुळे तिला मनःशांती मिळू लागली .शिवाय ती घरात फार काळ राहू लागली . तिच्या सासू ला आणि नणंद ला तिला बोलण्याची फारशी संधी मिळेना .सातवा महिना लागल्यावर ती बाळंत पणा साठी माहेरी निघून गेली .तिथे जाऊन आई वडिलांकडून घरातील ई तर माणसा कडून लाड करून घेऊ लागली . ई कडे आदित्य ला रुहीची किमत कळू लागली .तिला तो खूप मिस करू लागला .त्याच्या अयुषत रुहीची काय जागा आहे, ते समजू लागले .त्याचा परिणाम असा जाहला, कीं रुही विषयी जर कोणी काही बोलले, तर तो ऐकून घेत नसे, त्याना लगेच उत्तर देत असे . आदित्य ला रुहीची खूप आठवण येऊ लागली .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED