संसार - 8 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संसार - 8

आदित्य ने रुहीचे बोलणे ऐकले. लग्न झल्यापसून रुहीशी त्याच वागण थोडेसे चुकीचे होते हे त्याने मान्य केल होत .पण त्याचा परिणाम म्हणून रुही ऐत्का टोकाचा विचार करेल अस, वाटल नव्हत. त्यला वाटत होत रुही खुश आहे त्यच्या सोबत....त्याच्या घरात .....पण, अस तिला का वाटावे बर ....की तीने मला सोडून दिले म्हणजे ती खुश राहील .....खरच मी ऐत्का वाईट आहे का? की मला मझ्या बायको साठी काहीच करता येणार नाही ...आणि माझ पिलू...... ज्याने आताशी कुठ दुनिया बघितली, आता शी कुठे त्याची आणि माझी ओळख जाहली .आणि आता त्याच्या पासून त्याचे आई आणि बाबा दोघे ही वेगळे होणार . नाही ....मी अस होऊ देणार नाही .माझ खूप प्रेम आहे रुही वर ......माझी बायको आहे ती ....मझ्या बाळाची आई आहे ती , ती मला वाटेल ते बोलू शकते, माझ्यावर रागावू शकते .पण, मी तिला कधीही सोडणार नाही .....मी चौक्लौय मला मान्य आहे, पण त्याची एवढी मोठी शिक्षा ....नाही....
आदी,..... आदी..... रुहीच्या आवाजामुळे आदित्य शुधी वर आला, आपण हा काय विचार करतोय, आदित्य च्या लक्षात आले .त्याने रुही ला खूप समजावण्याचा प्रयत्न केला ...पण, रुही चा निर्णय ठाम होता .तिला ह्या नात्यातून सुटका हवी होती . रुही आजची मुलगी होती .अन्याय सहन करणारी नव्हती .आदित्य ला तिने चांगला च धडा शिकवला होता .ज्या आदित्य ला तिच्या आणि तिच्या बाळासाठी अजिबात वेळ नव्हता .तो आदित्य आज त्याच्या साठी धावत पळत आला होता .
आदित्य ला कळून चुकल होत, की काही जाहाले, तरी रुही काही आपले ऐकणार नाही. कारण त्यानी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला .पण, ती काही ऐकेना, शेवटी त्याने तिला तिचा वेळ दयचा ठरवला, कारण त्याला माहीत होते की, कधीतरी रुही ला तिचा हा निर्णय चुकीचा वाटेल ....आणि ती मझ्या कडे परत येईल, माझी बायको बनून, मझ्या बाळाची आई बनून....आदित्य ने रुहीच्या आई बाबांचा निरोप घेतला, आणि तो तेथून निघून गेला . आदित्य असा अचानक निघून का गेला? म्हणून रुहीची आई ने रुहीला विचरले, रुहीने ही न घाबरता, तिच्यात आणि आदित्य च्या त जे काही बोलण जाहाले, तिचा, आदित्य ला सोडायचा ,निर्णय सगळं संगितले. यावर रुहीच्या आई वडिलांनी रुहीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण, ती काही ऐकून घ्याला तयार च नव्हती .तिचा निर्णय ठाम होता .
रुही ने आता आई बाबाचे घर सोडायचे ठरवले, तिने बाळा ला घेऊन तिच्या आई बाबांच्या घरच्या जवळ च असलेले दोन रूम च घर भाड्याने घेऊन, तिथे रहायला गेली . काम तर तिच्याकडे होतच, पैसे जरी त्यात कमी भेटत असले . तरी त्यात दोघींचा खर्च ती भागवत होती . तिने जे थोडेसे पैसे साठवून ठेवले होते, त्यात तिने घरातील सामान घेतले . सगळ व्यव्सतीथ चालले होते, रुहीच्या आईवडिलांना रुहीचा, आदित्य पासून वेगळ होण्याचा निर्णय आवडला नसल्यामुळे त्यानी रुहीशी संबंध तोडून टाकला होता . आजूबाजूची लोक ही तीच्याबब्तीत आता काहीबाही बोलू लागली होती . पण, ती त्या माणसाकडे दुर्लक्ष करू लागली .आता रुहीची मुलगी राधा आता सहा महिन्याची जाहली होती .रुही आता पूर्ण वेळ तिच्याकडे च लक्ष देत होती, त्यामुळे तिला तिच्या ऑफीस मधल्या कामांकडे आणि तिच्या शिक्षणाकडे फार लक्ष देता येत नव्हते .त्यामुळे तिची फार दमछाक होत असे .पण तरीही ती तिने हिंमत नव्हती हरली . ज्या कारणांसाठी ती ने हा निर्णय घेतला होता, ते कारण तिला कोणत्याही परीस्तीथीत पूर्ण करायचेच होते .तिने रात्रीचा अभ्यास करायचा ठरवला .दिवसभर घरातले काम, बाळाची देखभाल ,ऑनलाइन काम आणि रात्रीचा अभ्यास ....रुही फक्त दोन तास झोप्त असे ...
ई कडे रुहीच्या निर्णयामुळे आदी खूप दुखावला गेला होता, तो कोणालाच काही बोलू शकत नव्हता . आई आणि बायको, बहिणी मधे तो खूप पिस्ला गेला होता, रुही ने लग्नाआधी तिच्या स्वप्नांचा ऊलेख आदित्य च्या बहिणी जवळ केला होता, तरीही त्याच्या बहिणीने त्याविषयी आदित्य जवळ काहीच संगितले नाही, आदित्य ड्रिंक घेतो, हे सूध्हा रुहीला संगितले नाही, तिने केलेल्या चुकीची शिक्षा आता आदित्य आणि रुहीच्या नात्याला आणि त्याच्या बाळाला भोगावी लागत होती . आदित्य ला रुहीच म्हण पटत होत .तिने तिच्या स्वप्नाचा ऊलेख ही आदित्य जवळ केला होता .पण, आदित्य ने काही तीच ऐकल नव्हत. रुही गेल्यापासून आदित्य च फक्त काम एके काम चालू होत .दिवसरात्र फक्त काम, त्यातून त्याने खूप पैसा ही कमावला होता . त्याच व्यसन ही आता कमी जाहाले होते, शिवाय त्यातून शीतल शी ही त्याच बोलण कमी जाहले होते .शीतल त्याच्या अयुषातुन गेल्या पासून रुही वर मनापासून प्रेम करत होता . लग्नानंतर शीतल फक्त त्याची एक मैत्रीण होती ....फक्त एक चांगली मैत्रीण . त्यात शीतलचा नवरा आदित्य चा त्यांच्या लग्नाआधी पासून चा मित्र होता . त्याला आदित्य आणि शीतलच्या लग्ना आधीच्या अफेअर बदल त्याला काहीच माहीत नव्हत . त्यामुळे त्याला टाळता ही येत नव्हत .त्याच घरी येणजण ही होत .मग कधीकधी त्याच्या सोबत शीतल ही घरी यायची .त्यात शीतल आणि आदित्य एकाच गावची, त्यामुळे कार्यक्रम च्या नीमीतने त्याची नजरा वर नजर पडायची. त्यामुळे आदित्य ची ई छा नसताना ही शीतल त्याच्या अयुषा पासून दूर जाऊ शकत नव्हती . रुहीला शीतल च्या बाबतीत थोडस अनकंफर्टबल वाटणे, शक्य होत .त्यामुळे त्याबाबतीत आदित्य तिला समजून घेऊ शकत होता .
ई कडे जेव्हा पासून रुहीचा निर्णय आदित्य च्या आई बहिनी ना समजला, तेव्हापासून त्यानी एकदा सूध्हा रुहीची आणि तिच्या बाळाची साधी विचारपूस सूध्हा केली नव्हती, उलट ती कशी चुकीची होती, हे सांगून आदित्य चे कान भरवत होते . त्याना आता पक्की खात्री पटली होती, की रुही आता परत येणार नव्हती, त्यामुळे त्यानी आदित्य च्या दुसऱ्या लग्नाचा विचार केला होता .पण, अजूनही आदित्य आणि रुहीचा घट्स्पोट झाला नव्हता . आणि आदित्य कडे बघून तो रुहीला घट्स्पोट देईल, अस सूध्हा वाटत नव्हते . ई कडे रुही गेल्या पासून आदित्य काम एके काम करत होता .स्वतःला त्यानी कामात तिने ऐत्के गुंथुन घेतले होते, की कुठे बघायला त्याला वेळच नव्हता .रुही गेल्यापासून आदित्य च ड्रिंक करणे ही कमी जाहाले होते .आणि शीतल पासून ही तो दूरच होता .फक्त त्याची एकच ई छा होती, की रुही आणि तीच बाळ फक्त घरी याव. तिच्या सगळ्या ई छा पूर्ण करायाला तो तयार होता .
रुहीच बाळ आता वर्षाच होत आल होत . त्याच्या बरोबर रुहीचा कोर्स ही पूर्ण होत आला होता . ती ने आता गावा मधे कॉम्पुटर क्लास सुरू करायचे ठरवले होते, रुही हळू हळू तिचे स्वप्न पूर्ण करत होती .बाळा कडे ही पाहत होती . झशी च्या राणी सारखे बाळ पाठीला बांधून स्वप्नांच्या मागे लागली होती .तिची स्वप्ने तर ती पूर्ण करत होती .पण ती पूर्ण करत असताना, ती आदित्य ला खूप मिस करत होती .तिच्या बाळाच्या बाबांना मिस करत होती ....तिच्या आई वडिलांना मिस करत होती .