Harvlele Prem - 4 books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#०४.

इकडे हृषिकेश घरी येतो खूप रागात असतो.😠😠...रागातच आपल्या टेडी वर चिडतो.....

हृषिकेश : "का तू इतकी कठोर आहेस...😠😠.माझी चूक नसताना तू मला मारलस.😡...मला मारलस, मला वाईट वाटलं नाही.... पण, तू ज्याची चूक होती त्याला काहीही बोलली नाहीस....😏😏...का केलंस तू हे.....नसेल आवडत तुला मान्य आहे ना मला..... पण, असे मूर्खपणाचे तुझे वागणे का.?? आणि फक्त माझ्याचसाठी..??...इतका वाईट नाही ग मी रेवू......तू का नाही समजून घेत मला.....😭😭😭

आता तर अक्षरशः तो रडायला लागला होता......त्याच्या मोठ्याने येणाऱ्या आवाजाने आईही वर येऊन उभी....

त्याची आई हे सर्व ऐकते आणि दार लोटून आता शिरते....तो घाबरतो आता आईला काय सांगणार....??.

आई : "Hey......rishi...what happened my son....इतका का रागावला आहे तू....काही प्रोब्लेम आहे का? मला नाही सांगणार बाळ......तुझ्या आईला??...तुझ्या बेस्ट फ्रेंडला......नाही सांगणार......?? काय झालंय बेटा बोल अस नको रडुस.....आजवर तुला आम्ही कधीच काही बोललो नाही आज काय झालं इतकं रडायला बेटा...??"

तो रडतच आईला मिठी मारतो अणि सर्व आजपर्यंत घडलेलं सांगतो...त्यावर त्याची आई थोडा विचार करून बोलते...

आई : "हे बघ ऋषी बाळा तुझे बाबा सुध्दा माझ्या प्रेमात होते.......पण, माझ्या घरी जी परिस्थिती होती.....जे प्रॉब्लेम्स होते......मला वाटायचे ते कधीच मला समजून घेणार नाहीत..... त्यामुळे मी तुझ्या बाबांशी कधीच बोलण्याचा प्रयत्न देखील केला नाही......पण, म्हणून त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत....ते रोज मला बघूनच खुश व्हायचे.......एक दिवस माझ्या लग्नाबद्दल त्यांना कुठूनतरी माहिती मिळाली.......आणि तेव्हा त्यांनी स्वतः येऊन माझ्या घरच्यांशी बोलणी केली......घरचे जरा रागावलेच...... पण, त्यांच्या बोलण्याने आम्हाला घरच्यांनी होकार कळवला.......बाळ जे आपल असतं ना ते आपलंच असतं...आज न उद्या ती तुला मिळेल तिला थोडा वेळ तर देऊन बघ...आता यानंतर तू तिच्याशी मुद्दाम नको बोलू....आणि हो तिला त्रास ही नको व्हायला ह्याची काळजी घे....कारण, तू प्रेम केलंय ना.... निभव मग......आणि प्रेमात संयम महत्त्वाचा असतो....तू आज जे काही केलंस ते एकदम बरोबर होतं....तिने कदाचित दुसऱ्याच कारणावरून तुला मारलं असावं......पण, जाऊदे तू तुझे प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेव.... वाईट मार्गाने तिला मिळवण्याचा प्रयत्न केलास तर ती तुझी कधीही होणार नाही आणि खूप लांब जाईल.......म्हणून........ be patient......ok...😘....take care of your Revu......😘😘😘😘विराट सोबत बोलले आहे मी....... त्याने सांगितलंय उद्या तुम्हा सर्वांना ऑफिस मधे यायला....😃😃👍all the best my son......आणि काळजी घे रेवाची.......I mean तुझ्या रेवुची.......ओके.......😌😌🤭😘😘😘.."

त्याने परत आईला मिठी मारली आणि गालावर किस केलं.....आणि बोलला.......😘"thanks.... baby..."

त्याच्या आईने, त्याच्या डोक्यावरून हात फिरवून थोडा वेळ मांडीवर डोकं टेकवून, त्याला शांत केलं.....तो जेव्हा कधी पॅनिक व्हायचा त्या असच शांत करत असत.....

आई त्याचे डोके हळूच उचलून पिलो वर ठेवतात......कारण, तो कसल्या तरी विचारात मग्न असतो.....

आई : "वेळेत ये जेवायला......आमच्या रेवूचा इतका विचार नको करुस....कुठे नाही जाणार पळून ती......🤭🤭🤭🤭....चल बाय......."

त्या हसतच खाली आल्या आणि जेवायला वाढू लागल्या.....

इकडे हृषिकेश ने ठरवले तो आता रेवाला काहीही बोलणार नाही.....फक्त कामापुरते ते बोलणार होते.......तो फ्रेश होऊन खाली आला....आईनी त्याच्या आवडीचे बटर पनीर बनवले होते.....पण, आज त्याला काहीही गोड लागत नव्हते.......तरीही जेवण न करता झोपण्याची परवानगी नसल्याने त्याने थोडं जेवून घेतले.......आणि बाहेर बागेत जाऊन एकटाच बसला.......

बाबा : "बेटा काय झाले???.....अस उदास का आहेस???..... मगापासून बघतोय अरे....नीट जेवलास ही नाही.....काही प्रोब्लेम असेल तर शेअर करावं माणसाने.....बाप आहे तुझा मी.....आणि रहाली रेवा ची गोष्ट तर ती तुझी होईल तिला वेळ दे थोडा......आईने मला सगळं सांगितलय....तू काळजी करू नकोस....जा आराम कर उद्या येणार ना साहेब ऑफिस मधे.....😘 Good Night..... Company's Future Boss.....😎..."

त्याचे बाबा त्याला त्याच नावाने हाक मारत.....

हृषिकेश : "सगळे बोलतात म्हणजे तसच होईल कदाचित......जास्त विचार नको ऋषी आता चला झोपा उद्या काम करायचंय...आणि कॅश फ्लो अरे...देवा.....😥काय टॉपिक मिळालंय....कुणाला येतं, ते करत बसतील बुआ.....😓 मी बाबाला माहिती मागून बाकी काम त्यांच्यावर सोपवून देईल...😑.......चला आता झोपुया....😒😒....."

अस एकटाच पुटपुटत तो रूम पर्यंत पोहचला होता....आणि त्याला आठवलं जार मधे पाणी संपलय ते आणायला तो कीचन मधे गेला...... कारण, त्याला कुणाला त्रास द्यायचं नव्हत.......नोकर तर होतेच.. पण, हे काम त्याला स्वतःला करायचे होते......कुणाला त्रास द्यायचा नाही.....म्हणून तो स्वतः किचन मधे गेला.......पाणी घेतले आणि फ्रीज मधे आणखी शोधाशोध केली.....तर त्याला फ्रीज मधे चॉकलेट्स..🍫🍫🍫🍫🍭🍬 दिसले आणि आपले हृषिकेश साहेब तर चॉकलेट्स चे दिवाणे मग त्या चॉकलेट्स ना कोण बरे वाचवणार!!🤭🤭 जरी त्याचा मूड नसला तरी तो चॉकलेट्स पुढे हार मानायचा.....

रूम मधे आला आणि थोडा वेळ चॉकलेट्स खात टाँग.....🙄🙄......... तोच, त्याचा टेडी..🤭🤭 त्याच्याशी बोलत बसला..........

हृषिकेश : "तुला आठवते टाँग, मी ज्यादिवशी तिला बघितलं....😌😌 अरे प्रेमातच पडलो तिच्या🥰....काय मुलगी आहे यार ती...पण, मला अस वाटतं आता स्वतःहून पुढाकार घ्यायचा नाही....आपण तोंडाच्या भारावर नको पडायला परत.....आणि तसंही संयम असला ना की प्रेम काय काहीही अशक्य नाही....ओके...चला झोपूया...आता....good night tong...my junior....😘😘😘😘😘"


रेवाच मात्र उलट झालेलं....ती त्याचा विचार करू लागली होती....

रेवा : "त्याने आपल्याला दुसऱ्याच्या घाणेरड्या कृत्यातून वाचवले आणि आपण काय केले त्याच्यासोबत....??...रेवा तू चुकीचं केलंस...पण, आता मी काय करू...??? मागील काही दिवसात जे माझ्या सोबत झालं त्या कारणाने मला कुणाला जवळ येऊ देऊ असेही वाटत नाही...परत मला नको त्रास माझ्या जीवनात...म्हणून दोन वर्ष कॉलेज करून मी माझ्या बिझनेस मधे सेटल झाले की कुणी असणार ही नाही सोबत...😒😒😒😔 आणि त्रासही होणार नाही.."

रेवा विचार करत होती....तोच तिला....आठवला राजीव.... जो तिचा ग्रॅज्युएशन मधे मागे लागलेला आणि किती काही तिच्या विरूद्ध त्याने कट रचलेले...जेव्हा रेवाने त्याला नकार कळवला होता.....तर त्याने तिच्यावर एसिड अटॅक करण्याचा ही प्रयत्न केलेला..😠😠😠

काय ही लोकांची पुरुषी मानसिकता असते...मुलगी नाही म्हणाली की तिचे संपूर्ण आयुष्य मागे पुढे न बघता उध्वस्त करण्यासाठी हाच पुरुषी अहंकार पुढे सरसावतो....😡😡

पण, त्यातून ती बचावली म्हणून तिचा अपघात घडवून आणण्याचा सुध्दा त्याने अयशस्वी प्रयत्न केला.....त्यावेळी तिच्या ऐवजी तिच्या मैत्रिणीचा अपघात झाला आणि ती जागीच ठार झालेली......त्यानंतर मात्र रेवाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.......हे सगळ ती आठवून रडत होती...😭😭...

तिच्या आयुष्यात इतकं सर्व मागील काही दिवसांमध्ये घडले होते आणि आता तिला तिच्या आयुष्यात कुणी नको होतं....😣😣

पण, आज हृषिकेश ने तिला श्रेयस च्या तावडीतून वाचवले होते नकळत का होईना तिच्या मनात कुठेतरी आता हृषिकेश बद्दल आपुलकी जन्म घेत होती.....पण, तिच्या कौटूंबिक पार्श्वभूमी मुळे ती कशातच पडायचा विचार करत नव्हती.....

रेवाच्या आई - वडिलांचा अपघात तिच्याच काका - काकूनी प्रॉपर्टीसाठी घडवून आणला होता....काकूंच्या भावाच्या मुलाकडून रेवावर अतिप्रसंग करण्यात आला होता...आणि आताही तो तिच्या मागावर होताच...हे सर्व रेवाला जेव्हा कळाले तेव्हा तिने काका - काकू विरूद्ध आणि त्यांच्या भावाच्या मुला विरूद्ध पोलिसांत तक्रार केली..... पण, पुराव्या अभावी ते सुटले....आणि ते तिला कधीही जिवे मारणार या भीतीने ती दुसरीकडे शिफ्ट झालेली....आणि स्वतः च्या एका BPO ची सुरुवात तिने केली होती....त्याचे काम तिच्या नेतृत्वाखाली चालत होते.... पण, व्यवस्थापनासाठी दुसरेच कुणी कर्मचारी तिने अपॉइंट केले होते.....ज्यांना खरंच गरज आहे असा स्टाफ तिने ठेऊन घेतला होता....ते सगळे तिला खूप मान देत होते...कितीही काही झालं तरी तिच त्यांची वाली होती.....तिने त्यांचं आयुष्य सावरून त्यांना एक नवीन जीवन देऊ केलं होतं....काहींचे तर आयुष्य तिने वाचवून त्यांना रोजगार दिला होता.....ते आभारी होते....आणि मोठ्या जोमाने तिच्या ऑफिसमधली ऑपरेशन विना प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे......रेवाला काहीच तक्रारीची संधी देत नव्हते....😎😎....

तिच्या ऑफिस मधली एक मुलगी जिच्यावर सामूहिक बलात्कार झालेला तिला रेवाने सुखरूप सर्व कोर्ट कचेरी काम सोपस्कार पार पडल्यावर स्वतःच्या कंपनीत नोकरीवर ठेऊन घेतले होते..... तिच्या आयुष्याचं सार्थक रेवामुळेच झालं होतं....

पण, कितीही काही केलं तरी हा जो डाग असतो तो एकदा लागला... की, समाज एका स्त्रीला स्वतंत्र पणे जगूच देत नाही....समाजाची मान्यता कायमची हिरावून घेतली जाते....

ऑफिसच्या एका मुलाची आई आजारी असायची आणि त्याला एक साधी सरळ मुलगी हवी होती जी त्याच्या आईची काळजी घेईल आणि जीचे बाहेर काम करणे त्याला मान्य होते त्यांच्याशी तीच लग्न लाऊन दिलं होतं...दोघे आयुष्यात खूप खुश होते...त्या मुलाला सुद्धा तिच्या वरील झालेल्या कृत्याचा काहीच फरक पडत नव्हता... कारण, रेवाच्या नेतृत्वाखाली प्रगल्भ विचारसरणी नांदत होती.....

ह्या सगळ्यामधून तिला जो काही वेळ मिळायचा त्यात ती कॉलेज करायची...आणि परत आता तिला प्रेमात पडून वेळ घालवायचा नव्हता हाच विचार ती करायची...पण, आता कुठेतरी हृषिकेश च्या रुपात तिला एक चांगला व्यक्ती मिळाला हे ही तितकेच सत्य होतें...

पण, तिला सध्या तरी यात पडायचे नसल्याने तिने जेवण आटोपून झोपायचे ठरवले कारण उद्या कॉलेज मधे जायचे होते...😓😓😴😴😴..

भरपूर विचार करून तिचं डोकं दुखू लागलं...तिने टॅब्लेट घेतली आणि पांघरूण झोपी गेली......

**********************************************

इकडे अमायरा हृषिकेश बद्दल विचार करत होती......त्याला रेवा अवडत असेल तर, आपलं काय?? आपल्याला तर हृषिकेश आवडतो...नाही नाही लवकरच काही केलं पाहिजे....या विचारातच ती झोपी गेली....


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED