Harvlele Prem - 7 books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#०७.
हॉस्पिटलला जात असता रेवा खूप जास्तच रडत होती......ती सारखी समोर ठेवलेल्या गणपतीला हात जोडून ऋषीला सुखरूप ठेवण्याची भिक मागत होती.....हे सर्व नकळत तिच्याकडून होत होतं....रेवा : "हे....देवा.....गणू बापा वाचव त्याला....वाटल्यास तुझ्या दर्शनाला मी त्याला घेऊन येईल.....🙏🙏😔"

ती जे काही डोळे बंद करून पुटपुटत असते....ऋषीचे बाबा सर्व ऐकत असतात.....आणि मनातच हसत असतात.....

विराट : "तुला माहितीये रेवा बेटा...आमचा ऋषी खूप understanding आहे....मुलींना कधीच तो मुद्दाम त्रास देत नाही....पण, कुणी जर का मुलींना त्रास दिलं तर त्याला सहन होत नाही.....😎"

रेवा : "हो अंकल मला अनुभव आहे हा....😌😌"

बोलता - बोलता हॉस्पिटल येतं......ते सगळे कार पार्किंग मधून लिफ्ट ने फोर्थ फ्लोर वर जातात....तिथे रूम नंबर २०४े आय.सी. यू. मधे ऋषी ला ठेवलं असतं......


अजून त्याला शुद्ध आलेली नसल्याचं डॉक्टरांनी सांगताच रेवा तिथेच खुर्चीत पडते.....आणि जोरात रडायला लागते.....तेवढ्यात अमायरा तिला सावरायला जाते....

अमायरा : "अग.......SWEETU........होईल ना तो बरा....आणि स्वतःला का दोष देतेस अग......त्याला काहीच होणार नाही बघ.......😊😊😊"

विराट : "रेवा बेटा तू नको ग काळजी करू तो परत आपल्यासोबत असेल आधिसारखा.....😊😊"

डॉक्टर : "रेवा.....🙄 Mr. Virat ह्याच का मिस रेवा....??"

विराट : "हो....ह्याच का आपण ओळखता यांना???"

डॉक्टर : "अहो.....पूर्ण स्टाफ ओळखतो मिस रेवा यांना जेव्हा ऋषीला इथे आणल तेव्हा तो फक्त रेवा...रेवा... इतकंच बोलत होता...आणि आपली ओळख असल्यामुळं त्याला मी without formalities....... admit करून घेतलं......पण, रेवा जर इथे असली ना की, त्याला लवकर शुद्ध येण्याचे चानसेस आहेत....तुम्हाला जर काही प्रोब्लेम नसेल रेवा मॅडम तर तुम्ही इथेच थांबणार का...? नाही म्हणजे, मी एक डॉक्टर आहे मला अनुभव आहे कधी कधी आपल्या जवळच्या माणसाच्या सहवासाने सुद्धा रुग्ण बरा होऊ शकतो आणि ऋषी च्या बाबतीत तरी मला हेच योग्य वाटतय......"

रेवा : "काही प्रोब्लेम नाही डॉक्टर मी थांबू शकते.....😌😌"

विराट : "अमायरा बेटा तू घरी जाऊन फ्रेश हो आणि आराम कर जरा......खूप मदत झाली बघ तुझी सुद्धा ड्रायव्हर तुला सोडेल घरी.....मी आणि रेवा थांबतो.....इथेच.....ऋषीच्या आईला बोलवायचे आहे मग त्या आणि मी निघू आणि रेवा तू इथेच माझ्या मित्राचा फ्लॅट आहे तिथून फ्रेश होऊन ये म्हणजे जास्त वेळ जाणार नाही आणि तुला ऋषी जवळ थांबता येईल.....काही प्रोब्लेम नाही ना बाळ तुला....??"

रेवा : "अंकल एक सांगू मला आज पर्यंत माझ्या आई बाबा पेक्षा जास्त कुणीच वाटलं नव्हत....... पण, आज तुमच्या रुपात मला अस वाटतंय ते परत आलेत....😭😭"

विराट : "अग रडतेस का?? हवं तर मलाच बाबा म्हण....😌😌चालेल मला....(आणि तसंही तुला आम्ही सूनच करून घेणार म्हटल्यावर बाबा म्हणावच लागेल ना......🤭🤭अस ते मनांत बोलले.....)

रेवा : "ओके बाबा......😊"

विराट : "That's like my sweet girl.....किती गोड दिसतेस हसताना बघ....नेहमी खुश रहात जा.....😊"

अमायरा घरी निघाली आणि रेवा बाबांसोबत त्यांच्या मित्रांकडे फ्रेश व्हायला निघून गेली.....ती फ्रेश झाली थोडं फार खाऊन घेतलं....खर तर तिची इच्छा नव्हतीच काही खायची आता तिलाही ऋषीला बघितल्याशिवाय काही जाणार नव्हतच.....पण, तरीही.....जर तिने काही खाल्ले नसते तर...तिला admit करावं लागलं असतं ना राव.....😂

बाबांनी ऋषी च्या आईला धीर देत न घाबरता हॉस्पिटल च्या पत्त्या वर यायला सांगितले.....ते दोघे ही आता तिकडेच जायला निघाले.......विराट ची आई हॉस्पिटल मधे आली....आणि डायरेक्ट ऋषी कडे जायला निघाली.....बाबांनी तिला सांभाळलं....नंतर रेवा त्यांच्या जवळ गेली.....रेवाकडे त्या बघतच राहिल्या........इतकी साधी सरळ.....आणि नाजूक अशी ती त्यांना ऋषी साठी एकदम परफेक्ट वाटली.....त्या मनोमन खूप खुश होत्या......

रेवा : "आई मी रेवा.....माफ करा पण, आता मी यांना बाबा म्हणते.....तर, तुम्हाला आई तर म्हणुच शकते ना.....??....आणि माझ्याचमुळे ऋषी या कंडीशन मधे आहे ना मग मीच त्याला इथून बाहेर काढेल माझ्यावर विश्वास ठेवा...🥺🥺 आई....😓"

आई : "अग....बाळ तू आईच बोल मला काहीही प्रोब्लेम नाही....आणि तू जरी सांगितलं नसतं ना तरी मीच तुला ऋषी जवळ थांबायला सांगितलं असतं....कारण तुझ्याशिवाय तुझ्या ऋषीला कुणीच नाही सांभाळू शकणार....😘😘"


त्यांनी तिच्या कपाळावरून मायेचा हात फिरवला.... रेवाला सुद्धा खूप दिवसांनी मायेचा आसरा मिळाल्यासारखे वाटले....🥺🥺 तीने तसच त्यांच्या मांडीवर डोकं ठेऊन खाली बसून डोळे शांत मिटून घेतले....

काही वेळ तसाच शांततेत गेला.....तिकडून डॉक्टर्स आले.....त्यांनी सांगितलं की, ऋषी अजूनही शुध्दीवर आलेला नाही.....त्याला बघून येण्याची परवानगी त्यांना आहे पण, त्याच्यासमोर रडू नका अस सांगून ते निघून गेले......
आई बाबा त्याला बघायला गेले....

ते आल्यावर त्यांनी रेवाला ऋषी जवळ रहायला सांगून ते घरी निघून गेले.....

ती ऋषी जवळ बसून त्याला न्याहाळत होती तेव्हा नकळत तिच्या डोळ्यांतून अश्रू आले.....


ती उठून खिडकीतून बाहेर बघू लागली....तिचे अश्रू अनावर झाले.....ती ओक्षिबोक्षी होऊन रडायला लागली.....तिचे काही भानच नव्हते.......ती भानावर आली ते इ.सी.जी. च्या स्क्रीन वर येणाऱ्या लाईन्सच्या आवाजाने......त्यावर खूप वेगाने लाईन्स वर खाली धावत होत्या........ती जोरात ओरडली.....

रेवा : "डॉक्टर...डॉक्टर.......come fast..........😢😢"

पटकन जाऊन ती ऋषी जवळ बसली आणि त्याचा हात हातात घेऊन त्याच्या फेस कडे बघू लागली......आणि नंतर एक हात त्याच्या गालावर ठेऊन बोलली....

रेवा : "Get up yar......I am waiting for you....... what's this......I don't want to see you, in this condition....😭😭"

तेवढ्यात डॉक्टर्स आलेत....

डॉक्टर : "Give me that oxygen mask.....fast....."

नर्स सगळे इक्यूपमेंट डॉक्टर ना देतात.....आणि डॉक्टर त्यांच्या कामात व्यस्त होतात.....

रेवा अजूनही डोळ्यात पाणी घेऊन एका कोपऱ्यात उभी असते.....आणि मनात काहीतरी एकटीच बोलत असते.....

रेवा : "मी तुला ओळखण्यात किती मोठी चूक केली यार ऋषी.....पण, मी काय करू यार माझ्या लाईफ मधे इतके प्रोब्लेम झाले मागील काही दिवसात की, मला ना आता कुणीही जवळ नकोय अगदी तूही....त्यामुळे तुला डिस्चार्ज मिळाला...... की, आपण फक्त गणू बाप्पा चे दर्शन म्हणून मंदिरात जाऊ त्यानंतर आपण कधीच नाही भेटणार हा निर्णय मी घेतलाय.....तू माझ्यात जास्त गुंतू नये हाच माझा हेतू आहे....कारण, मला तुझ्यात गुंतून तुझ्या जीवाशी खेळायला नाही आवडणार अरे......hope you understand......😭😭"

डॉक्टर : "Miss. Reva please don't cry........ Hrishikesh will not tolerate all that tears ok dear.......🤭🤭"

रेवा : "ok........doctor.......I will not cry anymore....😌😌😌"

डॉक्टर : "That's like a good girl......now he is all right....... you can talk to him........😊😊"

रेवा : "Really....... doctor......thank you so much......🙏🥺🥺"

डॉक्टर : "Go......talk to him.......he is waiting....🤭🤭"

रेवा पटकन ऋषी जवळ जाऊन बसली.....आणि त्याला काहीही न बोलू देता बोलू लागली....

रेवा : "का आलास मधात तू....बघ ना किती लागलंय तुला.....यार...माझ्यामुळेच झालं ना हे सर्व..... please forgive me......🙏🥺🥺..... I feel guilty...... तुला अस बघवत नाही अरे.....आता मला का बघत बसलाय बोलशील का....??"

तिच्या ध्यानात नव्हतच की मागापासून आपणच बोलतोय......ऋषी ने त्याच्या लीप्स वर बोट ठेवले आणि डोळ्यांनी थांब मी बोलतो असा इशारा करून बोलू लागला.....

Finally Hero is back....

जेव्हा त्याने त्याच्या लीप्स वर बोट ठेऊन इशारा केला तेव्हा मात्र रेवा ने त्याला कॉपी केले आणि दोघांनी सारखाच इशारा एकमेकांना करून जोर जोरात हसू लागले......

तो रेवा कडेच बघत होता....आणि मनात विचार करू लागला....

हृषिकेश : "किती गोड हसते यार ही.....आजवर फक्त रागातच दिसली राव......कुठे लपवून ठेवला होता रेवू हा क्यूट फेस......😘😍😍🥰"

ती त्याला भानावर आणण्यासाठी चुटकी वाजवते......तो भानावर येतो...

रेवा : "कुठे हरवला होता.....??🤨🤨"

हृषिकेश : "तुझ्यात......😍......अम्म्म्म......नाही काही नाही......बोल ना.....किती छान हसतेस तुला अस हसत खेळत रहायला काय होतं...????? कुणी पैसे मागत का....??"

रेवा : "तू आधी बरा हो मग तुला सर्व सांगेन....."

हृषिकेश : "रेवू नको ना अग माझ्याशी इतकं वाईट वागत जाऊ....मी नाही अग वाईट इतका जितका तुला वाटतो.... प्लीज ना रेवू....🥺🙏"

अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं......तिने त्याच्या गालावर हात ठेऊन त्याला शांत हो असा डोळ्याने इशारा केला....

रेवा : "नको अरे....का लहान बालासारखा रडतोय......नाही वागणार मी कधीच यानंतर..पण, तू लवकर बरा हो मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे.....ओके.....😌😌"

हृषिकेश : "ओके रेवू.....🤭🤭 बरं... रेवू मी तुला वाईट वाटतो की चांगला इतकंच सांग ना ग प्लीज...🥺🙏"

रेवा : "तू खरच खूप चांगला आहे यार.....आणि तुझे आई बाबा.....😍😍They treat me as their own daughter...... माझीच चूक झाली तुला समजण्यात....म्हणून म्हणतेय लवकर हो बरा मला याविषयीच बोलायचं आहे तुझ्याशी......"

हृषिकेश : "Thanks......Revu.......thank you so so much.....😘😘 माझ्या मनावर एक ओझ होतं तुला मी वाईटच वाटतो की काय.....😔😔"

रेवा : "ये बस का..... नौटंकी......😂"

हृषिकेश : "अशीच हसत रहा मला छान वाटतं.....कुणालातरी चांगलं वाटतं म्हणून हसावं माणसाने..."

रेवा : "चांगलं वाटतं म्हणून सतत हसत रहाल की, लोक वेड्यात काढतात...😂😂.."

हृषिकेश : "मग हो ना वेडी माझ्यासाठी.....😌😌😍😍😘"

त्याने तिला जवळ ओढले आणि तिच्या डोळ्यात बघू लागला...तिने मात्र लाजून मान खाली केली.....त्याने तिची हनुवटी पकडुन वर बघ असा इशारा केला....पण, ती लाजून चूर झाली होती......इतक्यात डोअर कुणी तरी नॉक केल्याचं समजले आणि दोघेही दूर झाले.....😂

शीट यार आज तरी त्या दोघांना राहू द्या की सोबत.....🤦🤦🤦

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED