कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २७ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २७ वा

कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

भाग- २७ वा

--------------------------------------------------------------------

१.

देशमुखसरांना हॉस्पिटल मध्ये दाखल करून आज आठ दिवस झाले होते ..

त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट आहे असेच सगळ्यांना वाटत होते ..त्यामुळेच तर

ब्रेन स्ट्रोक होऊन देखील ..त्यांच्या हृदयाला इजा पोंचली नाही , की स्मरणशक्तीला ..धक्का नाही.

त्यांना डायबेटीस नाही, बीपीचा त्रास नाहीये ..

पेशंटची कंडीशन पाहून डॉक्टरांनी खूप समाधान व्यक्त करीत बोलून दाखवले की –

खरोखर नशीबवान आहेत देशमुखसर . सहीसालामात सुटले एका जीवघेण्या संकटातून .

नाही तर ..काही काही पेशंट इतके दुर्दैवी असतात की त्यंची नंतर होणारी हलत बघवत

नाही ..त्यांच्या मनाने हे तसे काहीच नाही ..

हे सगळे अगदी ओके म्हणतोय आम्ही पण शेवटी स्ट्रोक तो स्ट्रोकच जाता जाता दणका देशमुखांना

देऊन गेलाच आहे.

त्यांच्या ..शरीराच्या उजव्या भागाला बरीच इजा पोंचली आहे ..त्यात सुधारणा होण्यास

देशमुखसरांचे वय लक्षात घेता ..ही सुधारणा वेगाने व्हावी अशी आशा करणे बरोबर होणार नाहीये.

एक मात्र नक्की ..सहा –महिने .वर्ष भरात ..त्यांच्या परिस्थितीत खूप समाधान कारक

फरक पडत जाईल ..असे चान्सेस खूप आहेत .

त्यासाठी आजकाल खूप उपचार पद्धत्ती प्रचलित आहेत ..त्याचा उपयोग घेता येणे ठीक आहे.

हॉस्पिटलमध्ये आल्यापासून .आज पहिल्यांदा .कानावरती हे शब्द पडले आणि सगळ्यांना ऐकून खूप बरे वाटले .

सागर देशमुख ..ही व्यक्ती .. हॉस्पिटलसाठी व्हीआयपी पेशंट होती , त्यांच्यवर

उपचार करण्यासठी विशेष टीम हॉस्पिटलने ठेवली होती .त्यामुळे फमिली मेम्बर्सचे टेन्शन खूपच कमी

झाले होते .

गेले दोन दिवसापासून डॉक्टरकाका राउंडला आल्यावर ..

अभिजितला , त्याच्या आईला . समजावून सांगत होते ..की -

यांच्या जिवावरचा धोका टाळला आहे . लुळे-पांगले होऊन पडण्याचे दुर्दैव तर ओढवले नाहीये .

पण या झालेल्या आघाताने ..देशमुख साहेबांना मोठाच मानसिक धक्का बसलेला असणार ..

त्यातून ते स्वतःहून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील ..त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी त्यांना आधार

द्यायचा आहे, त्यांना मदत करायची आहे ...

इथून घरी गेल्यावर सर्वसाधारण माणसासारखे त्यांचे रुटीन सुरु होण्यास वेळचा लागेल ..

पण, ते स्वतहा प्रयत्न करीत असतील तर,त्यावेळी ..त्यांच्या बाजूला ..मदतीसाठी सतत असणे

काही दिवस गरजेचे आणि महत्वाचे आहे.

आणि येते काही महिने तरी ..त्यांचे ऑफिस ,ऑफिसचे काम ..हा भाग पूर्णपणे बंद ,त्याचे टेन्शन

याना नको, या पासून दूर ठेवणे बरे राहील .

वडिलांच्या सगळ्या कामाची जबाबदारी मुलाने घायची असते “ ही पद्धत आपल्याकडे आहेच ,

तेव्हा ..यापुढे अभिजितने वडिलांच्या भावनेचा आदर राखून .आणि

आता ते शब्दाने इतक्या लवकर काहीच बोलू शकणार नाहीत , तेव्हा काही न बोलता ही जबबदारी घ्यावी.

आम्ही तशा सुचना देशमुख सरांना करणारच आहोत ..पण, अभिजीतला कल्पना असावी म्हणून

एक डॉक्टर म्हणून नव्हे तर फमिली फ्रेंड म्हणून सांगतो आहे

अभिजित मनात म्हणाला –

तुम्ही खूप म्हणाल मला ..पण. तसे होणे सोपे नाहीये

डॉक्टर काकांना काय माहिती , आमच्यातले नाते कसे आहे ते , त्यांचे हे सांगणे जनरल आहे,

आपल्याला ते जसेच्या तसे लागू पडणे “कठीण आहे .

अभिजीतची आई ..रूम मधल्या खुचीत बसून रहात ..सगळ्या गोष्टी पाहत होती , ऐकत होती ..

या सगळ्या गोष्टीत आपल्याला कुणी सांगेल ..आणि त्यामुळे काही बोलावे लागेल ..असे काही

नाही ..

कारण ..अभिजित सारखा कर्ता मुलगा समोर दिसत असतांना ..आपल्याला कशाला सांगतील .

अनुषा अधून मधून येऊन जायची ..पण ती आणि अभिजित बाहेर भेटून बोलायचे .

अजून तरी देशमुख साहेबांच्या समोर एकत्र येण्याचे धाडस त्यांना होत नव्हते ,आणि ही वेळ पणयोग्य

नाहीये ..असे वाटायचे.

देशमुख सर पडून राहण्याशिवाय काहीच करू शकणार नाहीत .. त्यांना अत्तेन्द करण्यासाठी

एक बोय आणि एक सिस्टर चोवीस तास असत ..

अभिजित त्याचा laptop घेऊन बसत ..वर्क फ्रोम होम सारखे इथे बसून काम करू लागला .

..................

२.

हॉस्पिटल मधला आता हा तिसरा आठवडा होता ..

दरम्यान ..देशमुखसरांच्या तब्येतीत खूपच सुधारणा झाली होती ..उजवा पाय जरा जास्तच

शक्तिहीन झालाय हे सध्यातरी जाणवत होते , उजवा हात बर्यापैकी हालचाल करू शकत होता .

त्यासाठी काही व्यायाम करण्यास सुरुवात करायला लावली होती.

हे पाहून स्वतः देशमुख जास्त उत्साहित झालेत असे सर्वांना वाटत होते .पण मी स्वतः करीन

अशी घाई करू नका असे डॉक्टर बजावून सांगत होते ,दिवसभरातून हालचाल व्हावी म्हणून हातात

पेन धरून जसे लिहिता येईल तसा प्रयत्न करून पाहण्यास हरकत नाही .

देशमुख सरांना या परवानगी मिळाल्याचा आनंद झाला होता

प्रश्न अजून ही मोठा होता ..बोलणे तसे खूपच अस्पष्ट आणि अडखळते होते.

एक दिवस सकाळचा चहा ,नाश्ता झाल्यावर ..देशमुखांनी अभिजीतला हाताने ..जवळ उशाशी

येऊन बस असे खुणावले ...

तसे तर सगळेच पाहत होते ..देशमुख बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत ,पण, त्यांच्या तोंडातून

शब्द स्पष्टपणे उमटत नाहीयेत ..कदाचित ही जाणीव .त्यांना खूप वाईट वाटायला लावणारी असेल

निराशेने उतरलेला त्यांचा चेहेरा आणि डोळ्यातली पाणावलेली नजर खूप काही सांगणारी होती.

धडाडीच्या माणसाना असे काही होणे “म्हणजे मोठीच शिक्षा भोगण्यासारखे असते.

बाबांनी केलेल्या खाणा-खुणा समजून घेत अभिजित खुर्ची घेऊन त्यांच्या जवळ येऊन बसला .

देशमुख साहेबांनी अभिजीतला त्याचा मोबाईल हातात घेऊन बस असे खुणावले..

आणि

अविनाश जळगावकर यांचा फोन नंबर दिसतातच त्यवर बोट ठेवीत खुणावले

..तू बोल आणि इकडे येण्यास सांग .

अभिजितने लगेच कॉल लावून त्याना संध्याकाळी ..हॉस्पिटल मध्ये बाबांनी बोलावले आहे असा निरोप दिला .

त्याप्रमाणे ...अविनाश सर बरोबर सहा वाजता हॉस्पिटलला लाये ..

स्पेशल रूम मध्ये आले ..देशमुखसरांना दुपारची झोप छान लागली होती ,त्यामुळे ते फ्रेश दिसत

होते . अविनाश जळगावकर आलेले पाहून बाबांना बरे वाटते आहे ..हे अभिजीतला दिसत होते .

अभिजितने बाबांच्या जवळ खुर्ची आणून ठेवली . अविनाश अंकल त्यांच्या जवळ बसले होते .

ऑफिस मधले हे तर पी.ए. पण.मैत्रीचे नाते इतके जुने की.. अविनाश अंकल आपल्या बाबांना

मोठा भाऊ “आहे असे मानतात . त्यांच्यातील हे नाते दोघांनी मनापसून निभावले आहे हे आता

सगळ्यांना माहिती होते.

अविनाश सरांची ऑफिस बेग कडे बोट दाखवीत ,ती जवळ घ्या असे आणि त्यातून पेपर काढून हातात घेऊन बसा .असे खुणवत

.. देशमुखांनी पेन मागितला ..

आणि थरथरत्या ..हातांनी ,कापर्या बोटांनी ..लिहिले ..

ऑफिसच्या सगळ्या चाव्या ,आणि माझी bag..उद्या सकाळी इथे घेऊन या.

अविनाश सरांनी .तत्परतेने ..यस सर , घेऊन येतो , असे म्हटले.

त्याच वेळी ..

---------------

३.

---------

रोज संध्याकाळी येणारी अनुषा आली , ती रूम मध्ये न बसता ,बाहेर व्हिजिटर लोबी मध्ये बेंचवर

बसून मेसेज करायची अभिजीतला ..मग, आईला सांगून ..अभिजित थोडा फिरून येतो असे सांगून

बाहेर यायचा ..आणि मग , ते दोघे खाली जाऊन हॉस्पिटल कॅन्टीनमध्ये भेटायचे.

पेशंट देशमुख सरांच्या समोर येण्याचे ती टाळत होती ..कारण अभिजित आणि तिच्या मैत्रीबद्दल

देशमुखांना माहिती नव्हती . अशा परीशितीत हे माहिती होण्याने उगीच काही टेन्शन निर्माण होणे नको

म्हणून दूरच राहिलेले बरे ..असा दोघांनी विचार केला होता.

अभिजित लॉबी मध्ये येऊन अनुशाच्या जवळ बसणार तोच ..

अविनाश सर येत असल्याचे पाहून ..अभिजित बेंचवर न बसता ..मोठ्या खिडकीजवळ जाऊन उभा

राहिला ,जसे अनुषाला तो ओळखत नाहीये ..असे त्याला दाखवायचे होते.

अविनाश सरांना ..अनुषा दिसली , पण ,त्यांना वाटले ..ती सहज आली असेल ..

बेंचवर तिच्या शेजारी बसत ते म्हणाले –

अनुषा – तुझे प्रोजेक्टचे काय भवितव्य असेल ? आता काहीच सांगू शकत नाही.

तू आलीच आहेस ..तर ..देशमुखसरांना भेटून घे ,आता छान आहे त्यांची तब्येत ,खूप सुधारणा

आहे आता .

आणि हो ..त्यांचे चिरंजीव ..अभिजित ..ते बघ .समोरच उभे आहेत ..

पहिल्या दिवशी तुझी तशी ओळख करून दिलीय मी , पण टेन्शन मध्ये लक्षात नसेल राहिले

अभिजीतच्या .

त्यांनी अभिजीतला ..बोलावले ..आणि म्हटले ..

अभिजित ..देशमुख साहेबांच्या आयुष्य प्रवासावर प्रोजेक्ट करणारी विदाय्र्थिनी ..हीच ती अनुषा .

हे ऐकून अभिजित म्हणाला ..

अविनाश अंकल – आपण खाली जाऊन चहा-कॉफी घेत बोलू या का ?

असे म्हणून तिघी खाली जाऊन चहा घेत बोलत बसले ..

अचानक अविनाश सर म्हणाले ..

अनुषा ..मी तर तुला सांगायचे पार विसरून गेलो बघ या गडबडीत ..

तुझ्या कॉलेजातील कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग तुझ्या सोबत साहेब ऑफिस मध्ये पाहणार ,

नेमक्या त्याच सकाळी ऑफिसला येण्या अगोदरच साहेबांना हा त्रास झाला ..आणि ते राहूनच गेल.

अनुषा म्हणाली ..माझी फार निराशा झालीय ..सगळी मेहनत वाया गेली , हा कार्यक्रम सरांनी

पाहणे माझ्या साठी फार महत्वाचे होते ..कारण पुढचे कार्य स्वरूप पुढे कसे असणार हे मी ठरवणार

होते ..पण, सरांना हा त्रास झाला ,सगळच ओमफस झालं ..आता पुन्हा मुदतवाढ मिळते का

पाहावे लागणार ..नाही तर हाता तोंडाशी आलेला घास जाणार आमचा ....

अविनाश सरंनी मध्येच विचारले ..

आमचा ? म्हणजे ..कोण ?कोण ?

अनुषा ने स्वतःला सावरत म्हटले ..तसे नाही हो .आमचा म्हणजे..प्रिन्सिपल सर, आणि आमचे सर

असे म्हणयचे आहे मला .

अनुशाकडे पहात अविनाश सर म्हनाले ..

तुझे लक फारच जोरावर आहे असे मी तरी नक्कीच म्हणेल ..

कसे काय हो काका ? अनुशाने आश्चर्याने विचारले ..

अनुषा ..तुला खोटे वाटेल कदाचित ..

पण.. तुझ्या कोलेजात झालेला ..कार्यक्रम ..देशमुखसरांनी आणि मी दोघांनी मिळून चक्क

लाइव्ह पाहिलाय ..

काय जादू केलीस तू ..तुला माहिती नाहीये पोरी ..

अग .त्यातले ..तुमचे पाहुणे ..दुसरे तिसरे कुणी नसून ..

सरांची मुलगी आणि जवाई आहेत ..

पहिल्यांदा सरांनी त्यांच्या जावयाला पाहिले ..खूप वर्षांनी त्यांची लेक त्यांना डोळ्यांना

दिसली .

अनुषा ..सर वरून किती ही ..कठोर असो ..पण..आतून फारच प्रेमळ आहेत , पण, हे न

दाखवण्याची वाईट खोड त्यांच्यात आहे.

पण, तुझा कार्यक्रम पाहून ..झाल्यावर ..सर खूपच भावनिक होऊन बोलत होते ..

म्हणाले ..अविनाश ..मी फार मूर्ख माणूस आहे रे .नको तिथे नको इतक्या गोष्टी ताणून

धरल्या मी. आता त्याचे परिमार्जन करण्याची बुद्धी होते आहे मला ..

त्यासाठी अनुशाला धन्यवाद दिले पाहिजे ..

आणि तिचीच मदत घ्यावी लागेल मला ..माझ्या माणसांना पुन्हा भेटायचे असेल तर..

अविनाश सरांचे सगळे शब्द अनुषा तिच्या हृदयात साठवून घेत होती ..

अभिजित त्यांना म्हणाला .. अंकल ..तुम्हाला खूप महत्वाचे सांगायचे आहे ..

उद्या तुम्हाला बाबांनी सकाळी बोलावले आहे ना ..त्यावेळी बोलू आपण ..

आणि हो ही अनुषा ..प्रोजेक्टवाली ,ही पण असेल ..तिची मदत बाबा घेणार आहेत ,म्हणजे

मला हिची मदत घ्यावी लागेल ..

अनुषा मनातून खुश झाली ..तिच्या मनातली निराशा दूर दूर पळाली ..

अविनाश सर म्हणाले ..अभिजित ..तू आता साहेबांच्या जवळ जाऊन बस ..

उद्या सकाळी भेटू अकरा वाजता ..

अनुषा ..तू पण ये बरे का आठवणीने ..

अविनाश सरांना बाय करतांना ..

अनुषा मनात म्हणत होती ..

न येऊन सांगते कुणाला ..हेच तर हवे आहे मला.

--------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात

भाग – २८ वा लवकरच येतो आहे .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमावीण व्यर्थ ही जीवन

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------