novhel Jeevalgaa Part 42 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी- जिवलगा . भाग -४२ वा

कादंबरी – जिवलगा

भाग -४२ वा

-------------------------------------------------

हेमूच्या आग्रहामुळे मामा थांबला आहे, याचे हेमूच्या आई-बाबांना जरा आश्चर्यच वाटत होते.

एव्हढे महत्वाचे काय सांगायचे असेल हेमुला ? ते मनाशीच विचार करू लागले .

आणि हे उद्या सकाळीच कळणार आहे म्हणजे तो पर्यंत वाट पहावीच लागणार आहे ,

म्हणून ते स्वस्थ बसून राहिले .

हेमू रात्रभर विचार करीत होता ..उद्या आपल्या आई-बाबांना नेहाच्या आणि आपल्या नव्या

नात्याबद्दल सांगायचे आहे , तसे म्हटले तर ..

हेमूने नेहाला तिच्या घरची काहीच माहिती विचारली नव्हती . तिच्या घरी कोण कोण आहेत ,

आई-बाबा काय करतात , पारिवारिक माहिती .या बद्दल कधीच काहीही विचारलेले नव्हते ,

फक्त ..आपण एकमेकांना आवडतो , आणि या आवडण्याचे रुपांतर प्रेमात झालेले आहे.

दोघांच्याही घरातील मोठ्या माणसांना या लव्ह-स्टोरी बद्दल काडीची ही कल्पना नाहीये .

मामाने हे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरवला नसता तर ..सांगितले नसते आपण.

हेमू आणि नेहाची प्रेमकहाणी ..अजून गुपचूप –भेटीगाठीचे राहिले असते आता हे सगळे

सांगायची वेळ आली आहे ,कारण आता जर कल्पना दिली नाही आणि

..हे असे मुलगी पहा ..कार्यक्रम ठरवले गेले तर..?

असे काही नकोच आता त्यापेक्षा म्हणून सकाळी सकाळी ..चहाच्या वेळी..हे सांगायचा हेमूने निश्चय पक्का केला .

दुसरे दिवशी सकाळी ..हेमुचे बाबा ,आई ,मामा ..बाहेर अंगणात ..सकाळच्या उन्हात बसले होते ..

हेमू उठला की इथेच चहा पाणी घेऊ असे हेमूच्या आईने सांगितले होते ..त्यामुळे आता हेमूची

सकाळ कधी होते ? आणि तो कधी बाहेर येतो ..याची उत्सुकतेने ते वाट पाहत बसले होते.

हेमूने त्यांना जास्त वाट पहायला लावली नाही ..

थोड्याच वेळात ..तो देखील अंगणात येऊन बसला .

मामा म्हणाले – हेमू तुला काय सांगायचे ते सांग राव पटकन ,

एकतर आम्हाला उत्सुकता आहे

आणि दुसरी गोष्ट म्हणजे ..आज सोमवार ..मला दुपारची काही महत्वाची काम आहेत.ती आजच

ठरलेल्या वेळी झालीच पाहिजेत ..तेव्हा तू काय बोलू ? कसे सांगू ?

असा घोळ घालू नको ..सरळ सरळ मोकळेपणाने सांग ..

हेमू बोलू लागला -

आई ,बाबा आणि मामा ..

माझ्या ओफिसात ,माझ्या सोबत असलेली माझी सहकारी ..नेहा “ तिचे नाव , माझ्या सारखीच

इंजिनियर आहे , पण, नोकरीत खूप ज्युनियर आहे ..नवी इम्प्लोयी आहे आमच्य ओफिसात .

ती मला आवडली आहे.. आणि तिने ही मला होकार दिला आहे ..

पण,नुसते आवडणे ..पुरसे नाहीये .म्हणून आम्ही एकमेकांना समजून घ्यायचे ठरवले आहे ,

म्हणून आम्ही आमच्या घरातील मोठ्या माणसांना आमच्या बद्दल काही सांगितले नाही.

कारण ..आता वाटणारे प्रेम पुढे आयुष्यभर टिकणारे आहे , आपण सोबत करणारे आहोत “

ही खात्री झाली तरच ..पुढे लग्न वगेरे .बद्दल ठरवायचे आहे .

आई-बाबा -

हे असे आहे..सध्या. मी तिचा माझ्यासाठी विचार करतोय ..त्यामुळे ..तुम्ही इतर मुली

पाहण्याचे वगरे असे काही ठरवू नका .

आणि समजा –मी ज्याचा विचार करतोय ते जर प्रत्यक्षात होऊच शकत नसेल ..तर ..

मी तसे पण सांगेन ..मग..त्या नंतर दुसरा विचार करू या..

हेमूने एका दमात सांगून टाकले ..त्याचे ऐकून घेत आई-बाबा म्हणाले ..

तुझ्या काल पासूनच्या वावरण्यातून ..आम्हाला थोडी थोडी शंका येतच होती ..

की .काही तरी आहे याच्या मनात .

आई म्हणाली –

हे बघ हेमू .. इथे राहून आम्ही काय सांगणार तुला .

तू आणि तुझी बायको ,तुझा संसार या गावात थोडाच करणार आहात ?

त्यामुळे ..सगळा विचार करून ..शांतपणे ठरव ..

आम्ही तुला विरोध करणार नाही ..याचा अर्थ ..त्या मुलीच्या .म्हणजे नेहाच्या घरच्या माणसांना

त्यांच्या पोरी साठी तू योग्य वाटला पाहिजे ..ते पण विचार करतीलच न ?

त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा..मुलीचे आई-बाप हजारदा विचार करतील .

आणि..त्यामुळे आम्ही असे म्हणतो की ..

जर त्यांनी ..तुमच्या दोघांच्या प्रस्तावाला विरोध केला ,तुम्हाला “ हे होणार नाही “असे म्हटले तर

तुम्ही दोघांनी ते स्वीकारले पाहिजे ..

याच अटीवर तुला परवानगी आहे .कारण गोष्टी ..सहमतीने आणि आनंदाने झाल्या तरच त्या

सगळ्यांना सुख देणार्या असतात.

मामा म्हणाले – हेमू –

अक्का आणि दाजी म्हणतात ते बरोबर आहे, एक लक्षात ठेव नेहमी

तू आपणहून हे सांगितलेस म्हणून आम्हाला कळाले ,समजा लपवून ठेवले असतेस ..तर

आणि त्यासाठी खोटे बोलून वेळ धकवली असतीस .मग, खोटे बोलणे,ते लपवण्यासाठी अजून

खोटे ..हे चालू राहिले असते ..

तू असे काही केले नाहीस ..हे सगळ्यासाठी छान आहे.

आता तू मोकळ्या मनाने ..पुढचे सगळे ठरवू शकतोस .आम्ही तुझ्या सोबत असुत .

मामाचे बोलून झाल्यावर ..हेमुचे बाबा म्हणाले –

हेमू तुझ्या आनंदात आमचा आनंद असेल ..पण, म्हणून काही तू सारासार न विचार करता

निर्णय घेण्याची घाई करू नकोस ,आताचा प्रश्न तर तुझ्या सगळ्या आयुष्याशी निगडीत आहे .

तुझ्या निवडीबद्दल आमच्या मनात अजिबात शंका नाहीये ..

फक्त एक लक्षात असू दे..

तुमच्या प्रपोजलला सर्व सहमती असावी , आम्ही सहमत आहोत ..पण..नेहाच्या घरच्यांची

सहमती तुम्हा दोघांना मिळवावी लागेल . विरोधसाठी विरोध नका करू .

हेमू मनातून खुश झाला ..पहिली फेरी तर पार पडली ..इकडचा गड सर झालाय ..

आता किला सर करायचा आहे..तो नेहाच्या घर चा ..

आणि ही मोहीम ..सोपी नाहीये ..बघू..लढणा तो पडेगा ..

*****

....२........

नेहाला झोप लागलेली आहे हे पाहून सोनिया दुसर्या रूम मध्ये गेली ..

.मधुरिमादीदीला फोन करण्याचे ती कधी पासूनचे ठरवीत होती .. हेमू आणि नेहाचे अपडेट द्यायचे होते.

.त्यापेक्षा ..हेमच्या घरचे

त्याच्यासाठी पोरी पसंद करीत आहेत ..ते थांबवले पाहिजे ..हा विचार सोनियाच्या मनात आला होता .

मधुरिमा हेमूच्या घरी स्पष्टपणे बोलू शकणारी व्यक्ती आहे..हे सोनियाला माहिती होते .

मधुरिमादीदीने ..सोनियाचा कॉल उचलीत म्हटले ..

काय ग, काय प्रोब्लेम झालाय तिकडे ? त्याशिवाय तू फोन नाही केलास ..तू काही सहज पावसा –

पाण्याच्या गप्पा करणारी मुलगी नाहीस हे मला माहिती आहे ..असो..

बोल ..काय झाले आहे ?

सोनिया सांगू लागली ..

मधुरिमादीदी .. तुझ्या अपेक्षेप्रमाणे ..हेमूच्या प्रेमाला उशिरा का होईना नेहाने प्रतिसाद दिला , तिचे

प्रेम आहे त्याच्यावर हे ही कबुल केले आणि म्हणाली ..

अजून आपण ट्रेनी-लव्हर आहोत ..अजून जाणून घेऊ ,समजून घेऊ ,मग आपापल्या घरी सांगायचे

असे त्या दोघांनी ठरवले आहे..थोडक्यात आजून त्यांची ही लव्ह-स्टोरी ..हे “चोरीचा मामला “आहे.

हे ऐकून दीदी म्हणाली ..

सोनिया – हे दोघे इतके तरी बोलतात ..याचाच मला आनंद होतोय . आणि नेहाचे बरोबर आहे ..

प्रेम आहे ,दोघे एकमेकांना आवडतात हे पण ओके ..पण..नवरा –बायको “म्हणून .ते खरेच अनुरूप आहेत

का ? याचा त्यांना विचार करणे महत्वाचे वाटत असेल तर ..तितका वेळ त्यांनी घ्यावा ..आणि आपण

ही तो त्यांना दिला पाहिजे ..असे मी म्हणेन ..आपण घाई नको करायला ..

सोनिया म्हणाली –

दीदी यु आर राईट , पण, नेहाच्या घरी तिच्या लग्नासाठीची घाई-गडबड कधी ही सुरु होऊ शकते ,

नेहाला त्याचीच भीती वाटते आहे . आणि हेमूच्या घरी तरी ..विचारू नकोस ..

दीदीने विचारले ..काय झाले हेमूच्या घरी ..?

सोनिया सांगू लागली -

गेल्या शुक्रवारी तो गावाकडे गेला आहे..त्याच्या मामा-मामी ने मुलगी पसंद करून ठेवत..

तिला हेमूच्या घरी घेऊन आले ..काल रविवारी मुलगी –पाहण्याचा कार्यक्रम सुद्धा झालाय

.काय झाले कुणास ठाऊक ?हेमूने अपडेट दिले नाहीत ..

म्हणून आपल्या वेडाबाई ..नेहा ..रडकुंडीला आलेली आहे..

उद्या हेमू आल्यावर सगळे काही समजेल .

हे सगळे ऐकून ..दीदी म्हणाली ..सोनिया ..बरे झाले सांगितलेस ..

मी आता सकाळी हेमूच्या घरीच फोन लावून बोलते सगळ्यांशी ..

अनायसे मामा पण आहेत ..त्यांना कल्पना देते .म्हणजे .ते .हेमूच्या आई-बाबांना सांभळून घेतील .

सोनिया ..मी हेमूच्या घरी बोललेले आहे...हे नेहाला सांगू नकोस .सध्या सिक्रेट राहू दे ..

मी पुढचा अक्शन प्लान ठरवते आणि सांगते तुला ..

आपली अनिता कशी आहे ? तिचे काय अपडेट ?

दीदीने असे बोलल्यावर सोनियाला धीर आला –

ती म्हणाली – दीदी ..खूप छान अपडेट आहेत अनिताचे

अनिता ..आणि रोहन ..येत्या दोन-तीन महिन्यातच लग्न करणार आहेत.आणि रोहनने ठरवल्या प्रमाणे

स्वतःच्या घरात राहायला जाणार आहेत .

रोहनच्या घरचे आलेले आहेत ..त्यामुळे अनिता दोन दिवस त्यांच्या सोबतच आहे..उद्या येईल इकडे.

दीदी म्हणाली ..अरे वा. गुड गुड ..!

सोनिया ..मी उद्या तुला ऑफिसमध्ये करेन कॉल.आता बाय ..!

सोनियाने फोन कट केला ..आता दीदी सगळे काही ठीक करेल ..या विचाराने तिला झोप लागली .

***************

----३-------

इकडे हेमूच्या घरी ..चौघेजण अंगणात गप्पा करीत बसले होते ..आईने सगळ्यांच्यासाठी

गरमागरम पोहे बनवून मधोमध ठेवले ..आणि बोलत बोलत खाणे आणि खात खात बोलणे

सुरु झाले ..आणि ..

हेमूच्या बाबांचा फोन वाजू लागला ..

नाव आणि नंबर पाहून ..ते म्हणाले ..

अरे हेमू ...मधुरिमाचा परदेशातून आलेला कॉल..बहुतेक तुझ्य्साठी असणार ..

हेमुला आश्चर्य वाटले ..दिदीचा फोन इकडे ? कसा काय आला ?

त्याने हेल्लो गुड मोर्निंग दीदी म्हटले ..

त्याचा आवाज ऐकून ..दीदी म्हणाली ..तुझ्याशी नाही बोलायचे मला ..

तुझ्या बाबांना दे..खूप दिवस झाले .त्यांच्याशी बोलायचे होतेच मला .आता कारण सापडले .

हेमू ने काही न बोलता .बाबांच्या हातात फोन देत म्हटले ..

दीदीला तुमच्याशी बोलायचे आहे ..बोला ..!

बाबा हेल्लो दीदी म्हणाले ..त्यावर दीदी बोलू लागली ..

नमस्कार काका ..

हेमूने आता तुम्हाला त्याच्या मनातले सांगितले असेल ,असे मी गृहीत धरते ..

आता मी काय सांगते ते ऐका ..

ही नेहा ..आपल्या हेमुसाठी अगदी योग्य मुलगी आहे...तिचा परिवार खूप मोठा ,चांगला आहे

त्याची काळजीच नका करू ..आणि मी ज्या मावशींच्या घरी राहते ना .

.त्या या नेहाच्या सख्या मोठ्या मावशीच आहेत , सगळं अगदी उत्तम आणि योग्य ठिकाण आहे हे .

आता पुढच्या आठवड्यात ..तुम्ही हेमूच्या गावी जायचे आहे.. आणि तिथे गेलवर ..सोनिया आणि

अनिताच्या घरी त्यांचे पाहुणे म्हणून ..तीन-चार दिवस तुम्हाला राहायचे आहे..

या मुक्कामात तुम्हाला इथे राहणाऱ्या तिसर्या माणसाशी तुमची ओळख न देता रहायचे आहे,

ही तिसरी व्यक्ती ..नेहा आहे.

तिला पहा , तिच्या सहवासात राहून पहा ,भावी सुनबाई तुमच्या

परीक्षेत पास की नापास हे मला सांगा .

.मग, पुढचे मी बघते ..

आणि हो ..हे आत्ता जे ठरलाय न ते फक्त आपल्यात राहू द्या . मी सांगेन तसे करायचे तुम्हे .

आज हेमुला अजिबात सांगायचे नाही ..तो नेहमी प्रमाणे एकटाच जाईल .जाऊ द्या .

मग..पुढे काय करायचे ,कसे करायचे ..ते सांगेन ..

ही नेहा ,खूप गोड मुलगी आहे, तुम्हाला नक्की आवडेल.

हेमुचे बाबा म्हणाले ..दीदी ..तू जसे म्हणतेस ..सगळे तसेच होईल .

आम्ही तुझ्या शब्दा बाहेर नाहीत ..हे तुला माहिती आहे .

दीदीने फोन ठेवला ..

बाबा म्हणाले ..तिला इथल्या शाळेच्या बद्दल उद्या काही माहिती हवी आहे.,पाठवा म्हणते.

हेमुला वाटले तसे दीदी काही बोलली नाही ..हे बरे झाले ..!

मामा दुपारी गावाकडे निघून गेले ..

रात्री ..हेमू ट्रेन मध्ये बसला ..रात्रीचे अकरा वाजले होते ..

नेहा त्याच्या मेसेजची वाट पाहत असणार ..

नेहा ..निघालोय मी ..उद्या कधी पाहीन तुला असे झाले..आहे ..

नेहाचा रिप्लाय आला ..

हेमू ..मिसिंग यु माय डियर ..ये लवकर

..लव्ह यु ...!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी- पुढच्या भागात

भाग- ४३ वा लवकरच येतो आहे.

--------------------------------------------------------------------------------

कादंबरी - जीवलगा

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED