तुझी माझी लव्हस्टोरी... - 8 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी लव्हस्टोरी... - 8

भाग-८

मग त्यांच बोलण ऐकून कृष्णा तिच्या रुममध्ये पळ काढ़ते.....बेडवर पडून ती हाच विचार करत होती.......

"(मनात)...काय करु...नाही म्हणजे तस सिद्धार्थ सर कोणत्याही मुलीला लगेच आवडतील असेच आहेत...आणि माझ्या आई बाबांसाठी सुद्धा आणि कधीना कधी लग्ना करायच होतच ना मग प्रॉब्लम काय आहे...हा आता मला नेहमी अस वाटायच माझा होणारा लाइफ पार्टनर हा सगळ्या मुलांसारखा कॉमन नसावा काही तर वेगळ त्यांच्यात असाव आता सिद्धार्थ सराना ओळखते खर मी पण.... पण बाबा म्हणतात ना...ओळख आपण करावी लागते.....
लग्ना नंतर ओळख होतेच...... हम्म"

विचार करत करत मग ती झोपुन जाते.....सिद्धार्थ सुद्धा झोपतो...उद्या पासून कृष्णा येईल ना म्हणून😀....
सकाळ होते.......कृष्णा नाशत्यासाठी खाली येते...

"किशु अग ऑफिसला नाही जायच का?....अजुन घरचाच कपड्यात आहेस....ममता"

"नाही आई...ते जाउदे...तुम्हाला मी घेतलेला एक निर्णय सांगायचा आहे....."

"हो पिल्लू बोल....महेश"

"आई बाबा..मी सिद्धार्थ यांच्याशी लग्ना करायला तयार आहे..☺️"

"काय😀खरच बाळा.....महेश"

"हो बाबा.."

"किशा मनापासून घेतलायस ना निर्णय.... ममता"

"हम्म हो ग...."

"वा बाळा.आज खुप आनंदी आहे मी..... महेश"

"हम्म आता हे देशमुखाना कळवा...."

"हो हो थांब..."

इथे रविंद्र, रश्मी, सायली आणि सिद्धार्थ सगळे नाश्ता करत बसले असतात....तेवढ्यात रविंद्र यांचा फोन वाजतो.....📱📱

"Hello...बोल महेश काय म्हणतोस......रविंद्र"

"अरे रवीं...आनंदाची बातमी आहे......कृष्णाने होकार दिलाय......"

"काय अरे वा वा....बर एक जरा तुला २ मिनिट मध्ये परत फोन करतो....रविंद्र"

"बर.."

"अरे एका सगळ्यानी...कृष्णाने होकार दिलाय....."

"काय... वा😀...सायली"

"सिद्धार्थ आता तुझा काय आहे....ममता"

"माझ्याकडून पण होकारच आहे😳...सिद्धार्थ"

"आआआ लाजतोय वाटत जरा जोरात बोल की.... सायली"

"तायु गप्प ग..."

"मी त्यांना फोन करून कलवतो... रविंद्र"

सगळ ठरल्या प्रमाणे होत.....दोन्हीकडून होकार आल्याने..सगळे लगेच कामाला लागतात... दोघांची पत्रिकाही जुळत होती....त्यांच्यानुसार १० दिवसानंतर साखरपुडयाचा मुहूर्त अणि त्याच्या 5 दिवसांनी लग्नाचा मुहूर्त निघाला.....घाई सगळ्यांना होतीच.. आणि मुहूर्त जवळचे निघाल्याने सगळे भारी खुश होते....
सिद्धार्थला तर काय करु आणि काय नको अस झाल होत..... सगळ नीट चालू होत....
ठरल्याप्रमाणे आज देसाई आणि देशमुख कुटुंब शॉपिंग साठी जाणार असतात.....कृष्णा आणि तिचे आई बाबा सिद्धार्थचा घरी जमतात.....

"चला निघूया मग....नाही तर वेळ होईल यायला....महेश

"हो हो निघूया.....रविंद्र"

सगळे जायला निघतात....सगळे मुद्दाम कृष्णा आणि सिद्धार्थला त्याच्या बाइक वरुन आनायला फोर्स करतात..

"अरे sidhu मी काय म्हणते...एका कारमध्ये आम्ही सगळे पुरलो...मग तू आणि कृष्णा तुझ्या बाइकवरून या ना...सायली...(त्यांना चिडवत)...."

"अग्ग पण ते आम्ही......सिद्धार्थ..(थोड़ लाजत)"

"हो हो चल आम्ही जातोय पुढे तुला माहीत तर आहेच कोणत्या मॉलमध्ये यायचे आहे....ठीके चल हा...रविंद्र..(हसत)"

आणि ते निघुन जातात.....

"अरे हे लोक गेले😕.....कृष्णा"

"इट्स ओके आपण माझ्या बाइकवरुन जाउया ना..नाही म्हणजे तुला चालेल का??😕.....सिद्धार्थ"

"हो...चालेल...कृष्णा😳"

आणि तो बाइक काढतो.... कृष्णाला जरा अवघडल्या सारख होत होते....ती थोड़ा Distance ठेवूनच बसते...मग सिद्धार्थ बाइक Start करतो आणि ते निघतात....

फस्ट टाइम कृष्णा सिद्धार्थच्या बाइकवर बसली होती...ती अरशामधून होणारी नजरानजर...👀कृष्णाने हळूच चेहऱ्यावर येणारी केस..मागे घेणं.. सिद्धार्थच चोरुन तिला बघण... मधेच खड्डा आल्यावर तिचा हात सिद्धार्थच्या खांद्यावर जाण.... तो पहिला स्पर्श... हे सगळ ते दोघे अनुभवत होते...

आणि मग ते दोघे Mall मध्ये पोहोचले.... आणि सगळ्यांना भेटून.. शॉपिंगमध्ये गुंग होतात...

"आआआ आई तुमच झाल का.....सिद्धार्थ"

"हो बाळा...एक तू कृष्णा आणि सायु ला घेऊन वरती जा आणि तुमची सगळी लिस्टनुसार शॉपिंग करून या....रश्मी"

"हो चल sidhu... सायु"

"हम चला"

"चल कृष्णा.... सायु"

"हो आई मी आलेच..... कृष्णा"

आणि ते तिघे...वरच्या फ्लोर ला जाऊन खरेदी करु लागतात...

"ताई ...ही साड़ी छान आहे कृष्णाला सांग ना... Engagement साठी कशी वाटते विचार...."

"बर मीच विचारूं का ठीके...😂सायली"

"प्लिज..."

"आआ कृष्णा अग ही बग कशी वाटते Engagement साठी कलर पण छान आहे....हो ना..तुला कशी वाटते.."

"हो वाव...छान आहे ताई😄...हीच डन करूया... कृष्णा"

"हो😀"

आणि इकडे सिद्धार्थ खुश होतो.....कृष्णाला एक शोल्डर कट वाला..कुर्ता आवडतो...पण लग्नानंतर सिद्धार्थला चालेल का...हा प्रशन तिच्या मनात आला... सायली सुद्धा सागर सोबत शॉपिंगमध्ये गुंग झाली होती...मग कृष्णा सिद्धार्थकडेच गेली....

"आआआआ...(घाबरत) सिध्दार्थ सर ...एका ना..."

"हा अग कृष्णा काय झाल...बोल ना"

"सर मला हा कुर्ता आवडलाय... पण तुम्हाला अस शोल्डर कट वाला कुर्ता मी नंतर घालण म्हणजे चालेल का?"

"😅😂(हसत)...अग कृष्णा लग्ननंतर माझी तुला कधीच बंदी नसणार आहे...आणि कधी मी घालणार पण नाही....आणि माझ्या घरी कोणाला काहीच प्रॉब्लम नसणार आहे तू कहिहि घातलेस तरी....सो तू हा ड्रेस घे..."

"खरच सर...😀"

"हो.....वाटल्यास शॉर्ट्स पण घे...तू घरी घालतेस तशी...😂"

हसत हसत तो काय बोलून गेला...हे त्याला नंतर समजल....कृष्णा थोड़ी लाजलीच...😳

"आआआआ म्हणजे......सॉरी"

"ह्म्म्म😳मी मी.. मी आले ट्राय करून...."

"हो..."

आणि ती जाते....तेवढ्यात सायली येते...आणि सिद्धार्थ ला एक ब्लेजर ट्राय करायला सांगते... आणि त्याला तू जा अस म्हणत धकळत..चेंजिग रुममध्ये नेते...

"Sidyya हे ब्लेजर ट्राय कर...जा जा लवकर..."

"अग ताई ऐक ना...इथे एकच चेंगिज रूम आहे ती..जरा छोटी आहे एकतर ..आणि त्यात ती.."

"काय ती नाय तू जा....चल चल..(सिद्धार्थ ला चेंजिग रूमकडे धकळत)"

"अग..ऐकून घे."

ती काही न ऐकून घेता त्याला त्या चेंजिग रुममध्ये धकळते आणि बाहेरुन कडी लावते..

"आता ट्राय कर मी आहे इथे मग झाल की सांग.... सायली"

सायलीला काही माहित नव्हतं....तिने सिद्धार्थला धकल्यामुळे.... आत असलेल्या कृष्णाच्या अंगावर जाऊन तो पडतो...आणि दोघे खाली पडतात...

आज पहिल्यांदा सिद्धार्थने कृष्णाच्या कमरेला स्पर्श केला होता....कृष्णाने सुद्धा आज पहिल्यांदाच सिद्धार्थच्या शरीराला स्पर्श केला होता....तिचा हात त्याच्या खांद्यावर आणि त्याचा हात तिच्या कमरेला लागून दोघे खाली पडले होते......सिद्धार्थ कृष्णाच्या खुप खूपच जवळ आला होता...

दोघांच्या हृदयाची धड़धड़ एकामेकाना जाणवत होती...इतक्या जवळ ते आले होते...कृष्णा खुप घाबरली होती..तिच्या ओठाची थरथर सिद्धार्थच्या ओठाना जानवू लागली होती...😍😳हळूच सिद्धार्थ बोलतो....

"I am sorry ते सायली ताईने मला आत धकळल...(हळूच).."

"सससस सर प्लिज माझ्या अंगावरुन उठा ना,😵😳"

तो झटकन उठतो...

"Iiiiii I am सॉरी....सो सॉरी कृष्णा"

"ह्म्म्म"

तेवढ्यात सायली दार उघडते...आणि ते दोघे बाहेर येतात....तशी कृष्णा लगेच पळ काढ़ते....मग सायली जोराजोरात हसते....

"काय रे...लग्नाआधीच.... आआआआ😂😀😄"

"ताई अग आत धकळणया आधी ऐकून घ्यायचा ना ग..(Serious होऊन).."

"सॉरी sidhu....😢"

"ताई I am सॉरी.... मी उगाच ओरडलो ना..."

"ह्म्म्म"

"रडू नको नाहीतर माझी भाची पण रडेल आत😂...चल आता शॉपिंग झाले...ना..सगळे वाट बघत असतील..."

"हो झाले...आता डिनरला जायच आहे ना...सगळ्यानी"

"हो हावरे😂चल आता.."

"हो मग तुझ्या भाचीला पण भूक लागले...."

"हो बाई चल😂"

सगळी शॉपिंग होते....सगळे एकत्र जमतात....आणि डिनरला जातात... आता जाताना मात्र कृष्णा कारमधून जाते...सागर आणि सिद्धार्थ बाइक वरुन येतात......


To be continued..........



(पुढे बघत राहा......अजुन काय काय होते.....☺️)