विनयभंग...... Khushi Dhoke..️️️ द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

विनयभंग......



शैला: "स्त्रियांना एक संधी मिळाली की, त्या स्वतःस सिद्ध करण्यात स्वतःला झोकून देतात...इतकेच काय तर, स्व अस्तित्व जपून त्या हे सगळं करत असतात.....आज स्त्री सशक्तीकरण या मुद्द्यावर अनेक नेते आवर्जून लक्ष देताना आपण बघतो.....स्त्रियांना योग्य त्या सुखसोई पुरवून देण्यात ते सक्षम आहेत...."

आज ०८ मार्च "आंतरराष्ट्रीय महिला दिवस" यानिमित्ताने शैला विद्यापीठात वक्तृत्व स्पर्धेसाठी एक स्पर्धक म्हणून स्वतःचे मत इतरांना पटवून देण्याची तयारी करत होती....इतक्यात तिचे लक्ष घड्याळाकडे गेले आणि ती थबकली...🙄 कारण, चक्क सकाळचे ०९:०० वाजले होते आणि शैलाला १०:०० च्या आत प्रवेश नोंदणी करून सभागृहात बसायचे होते....

शैला: "अरे बापरे!! ०९:०० वाजलेत....हे देवा आता बस मला लवकर वेळेत पोहचव म्हणजे तुझे उपकार होतील माझ्यावर.....🙏😥"

तीने लगबगीने सगळं आवरून घेतलं आणि आईला, "आई मी येते ग....आशीर्वाद दे आज माझं स्पीच विदाऊट प्रॉब्लेम पार पडलं पाहिजे...तुझ्या आशिर्वादाने सगळं व्यवस्थित होतंय बघ.....🥰🤗"

आई: "हो ग, माझे शहाणे बाळ ते......सगळं व्यवस्थित होईल बघ आणि तुझाच नंबर आला अस समजून आधीच एक चॉकलेट माझ्यासाठी घेऊन ठेव नंतर म्हणशील...माझ्या मैत्रिणीने पार्टी मागितली त्यात मी विसरून गेले.....😜😄😄"

आईने एका बाऊल मधे दही, साखर आणून तिला भरवले आणि बोलत होती....तिची आई तिची मैत्रीण होती... जी, तिला प्रत्येक बाबतीत सहकार्य करत होती......आणि ती सुद्धा स्पर्धेत क्रमांक आला की, आधी आईला एक चॉकलेट घेऊन घरी यायची.....आईच तिची जवळची मैत्रीण होती.....

शैला: "बरं.....माझी आई......😘 माझी जवळची मैत्रीण आहेस ग तू......... मी कधी तुझ्यासाठी चॉकलेट आणायला विसरले आहे का......? मला तरी नाही आठवत.🙄🙄🙄🙄....मेरी मां, प्यारी मा, मम्मा....🎵🎵🎶"

आई: "पुरे.... ह्म्म्म्म आता..🙄 नौटंकी कुठली.... चला उशीर झालाय निघा राणी साहेबा......इथेच करणार का महिला दिवस साजरा.....?🙄"

शैला: "अरे......देवा..😥मेले ०९:१५......😕😕बोंबला आता....आई आले ग......🥰🤗😘😘" (स्वतःचा हेल्मेट घेत ती बाहेर पडतच, आईला बाय करते....)

ती स्वतःची स्पीच वारंवार आठवून...मनाशी पुटपुटत निघाली......गाडी🛵 चालवताना स्वतःची काळजी ही घ्यायची......स्वतःच्या धुंदीत जात असताच.....😣 गाडी सिग्नल जवळ थांबली...... अजून सिग्नल सुटायला ४०:०० सेकंद बाकी होते......शैला मनाशीच बोलली, "हे देवा वेळेत पोहचव मला आज..🙏.." ती अजून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर होती....म्हणजे आता ०९:२० झाले होते आणि ती ०९:३५ पर्यंत पोहचून जाईल हा हिशोब लावत आनंदी😊 होती......पण, मागून एक आवाज ऐकुन तिची तंद्री तुटली....हाच आवाज आज तिच्या आयुष्यात एक शिकवण ठरणार होता.....

@@@: "Excuse me, mam, can you please tell me this address?... actually I confused, is this behind this road or straight....?"

शैलाने तो पत्ता बघितला तर तो पुढे सरळ होता.....ती त्यांना सांगू लागली, "Actually, you have to go straight for reach on your address..."

@@@: "Ohh, thanks to you......By the way can we drop you wherever you want......one more option for you. you can come with us..@@@@@@@###########&&&&&.?" 😆😆😆😁

शैला जवळ दुचाकी असून देखील ते घाणेरडी मस्करी करत होते........त्यांच्या मते ती एक शांत आणि हतबल मुलगी असावी..........

एका दुचाकीवर दोन पुरुष होते साधारण २९ वयोगटातील असतील........ एक विचित्र चेहरा😆😆😁😁 करून शैलाला उद्देशून घाणेरड्या गोष्टी बोलू लागले......

शैलाने एक रागाचा कटाक्ष टाकला...🤨🤨😠 आणि तिला कळून चुकले होते की, आपण यांना पत्ता सांगून चुकलोय...कारण, त्यांची पातळी अतिशय खालच्या दर्ज्याची होती......हे तिने ओळखले होते.....सिग्नल सुटताच आपली स्कूटी घेऊन ती निघाली...काही अंतरावर तिला जाणवले की, ते दुचाकीस्वार तिचा पाठलाग करत होते.....तिने थोडा वेळ थांबून त्यांच्या सोबत त्यांच्या गाडीचा फोटो स्वतःच्या स्कूटी च्या आरश्यातून काढून घेतला....आणि एक फोटो मागे वळून सुध्दा काढला आणि पळत सुटली......त्यांना कसली तरी शंका आली आणि त्यांनाही समजले की, ह्या मुलीने आपल्याला फसवण्याचा प्लॅन केलाय आणि ते ही तिच्या बाजूने अतिशय वेगाने येत होते..... शैलाने वेगवान गाडी पळवून सरळ विद्यापीठाच्या गेट वर थांबवली....तिला तिथे पोहचलेली बघून ते दोघे थोड्या अंतरावर तिथेच थांबले.....इकडे शैला पूर्ण घामाघूम झालेली बघून गेट रक्षकाने तिला विचारले काय झाले तर तिने नकारार्थी मान हलवून काही न झाल्याचे सांगून पिण्याच्या पाण्यासाठी इशारा केला....त्यांनी तिला खुर्चीत बसवून पाणी प्यायला दिले........ आताही ते दोघे गेट बाहेर कुणाच्या नजरेत येणार नाहीत अश्या अंतरावर उभे होते......त्यांना हे माहीत नव्हते की, शैला अश्या लोकांना कश्याप्रकारे वठणीवर आणते.....😎☝️

ती साधीसुधी मुलगी नव्हती ती पी. एस. आय. ग्राउंड क्लिअर झालेली मुलगी होती म्हणजे अर्थातच तिला सगळे कायदे व अश्या परिस्थितीला कसे समोर जायचे हे चांगलेच ठाऊक होते...आज तिला वेळेत विद्यापीठात पोहचणे गरजेचे होते आणि तिला वक्तृत्व आधी कसलाच वाद नको होता म्हणून ती पळत तिथे येऊन पोहचली होती.......

शैला बसून विचार करू लागली कारण, आता तिच्या मनात महिला सशक्तीकरण म्हणून वेगळेच मत वळण घेत होते.....तिने तिचे स्वतःचे मत आज स्पर्धेत बोलावे हे ठरवून ती प्रवेश नोंदणी साठी पुढे गेली......

👩‍💻 : "आपले नाव सांगा....?🤨"

शैला: "शैला राजीव पाटील."

👩‍💻 : "वर्ग आणि माध्यम?"

शैला: "एम. ए. द्वितीय वर्ष....मराठी माध्यम..."

👩‍💻 : 🙄"अरे शैलू, सांगायचं तर, तू आहेस.... मी उगाच फॉर्मलिटी करत बसले..... वेडूबाई....🙆🤦😁.....🤨🤨 आणि हे काय.....🧐.....तू इतकी का नर्व्हस आहेस.....तू इतकी आत्मविश्वास ठेऊन कुठलही मंच गाजवणारी अग.....आज काय झालंय....?"

वनिता शैलाची मैत्रीण..... पण, प्रवेश नोंदणीची जबाबदारी तिची असल्याने ती सगळ्या नोंदी करत होती....तिने काळजी व्यक्त केल्यावर शैला ने तिला नंतर सर्व सांगते अस सांगून ती सभागृहात जाऊन बसली......

इकडे जवळपास सगळी मंडळी जमली होती.......👨‍🦳👩‍🦳👨‍🦰👩🏻‍🦰👱👨‍🦱👩🏾👨👧👧👦🧒🧒👩🏻‍🦱👨‍🦲👩‍🦲🧔🏻🧓👴👵🧕🧕🧕👨🏼‍💼👩‍⚖️🧝🧝.

शुभारंभ, मालार्पण, मान्यवरांचे स्वागत, कार्यक्रमाची सुरुवात सगळं अगदी व्यवस्थित पार पडलं.............मुख्य अतिथी म्हणून, श्रीमती. मीनाक्षी उपाध्येय (पोलिस उपअधीक्षक)
आल्या होत्या..... आणि बाकी मंडळी, जास्त प्रमाणात महिला होत्या.....
त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा सुरू होणार होती....आणि ज्या क्रमाने प्रवेश नोंदणी मधे नावे होती त्याच ओळीने स्पर्धक आपले मत मांडणार होते.....शैला जरी, विद्यापीठात वेळेत आली असली तरी, सगळ्यात शेवटी नाव तिचेच नोंदवले गेले होते.....त्यामुळे तिचा क्रमांक अगदी शेवटी होता.....सगळ्यांचे मत हे, आज महिला कश्या पुढे जात आहेत यावर भर देणारे होते....मात्र आज जे शैलासोबत घडले होते.....ते एक अविस्मरणीय सत्य होते.....आणि अजून त्यांना शिक्षा देणे बाकीच होते....कारण, जरी तो मोठा अपराध नव्हता तरी, तो एक "शाब्दिक विनयभंग" होता.....आणि स्वतः शैला ह्या सगळ्या गोष्टींचा तिरस्कार करत असल्याने तिला त्यांना मार्गी लावायचे होते......

ती विचार करत होती तोच तिचे नाव घेण्यात आले....."कु. शैला राजीव पाटील कृपया मंचावर येऊन आपले मत व्यक्त करतील...."

तोच तिच्यासाठी सगळ्यांनी उत्साहाने टाळ्या वाजवल्या...👏👏👏
कारण, शैला एक अतिशय हुशार, आणि स्वतंत्र मत मांडणारी विद्यार्थिनी होती आणि आज तर तिच्याकडे एक घटना देखील होती ज्याची ती स्वत: प्रत्यक्षदर्शी होती.......

शैलाने बोलायला सुरुवात केली.....

शैला:. "मंचावर उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत....आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस.... खरं तर, या निमित्ताने मला आज इथे बोलण्याची संधी मिळतेय हेच माझे भाग्य मी समजते....🙏 सगळ्यांनी इथे आज, "आजची स्त्री किती सक्षम" यावर भाष्य केलेच आहे. पण, आज मला एका वेगळ्याच विषयावर बोलायचे आहे.....ते म्हणजे, स्त्रियांना त्यांची ओळख पटवून देण्यात खरंच आज आपण मदत करतोय? हा समाज स्त्रियांना पुढे जाऊ देतोय? की, रस्त्यावरचे ते गुन्हेगार अल्पवयीन मुली पासून ते वृद्ध स्त्री पर्यंत स्वतःची घाण नजर टिकवून त्यांचं जगणे मुश्किल करत आहेत....! आज गरज आहे, आपण स्वतःला काही प्रश्न विचारण्याची....खरंच आजही स्त्री पूर्णपणे स्वतंत्र झालीय....? की आजही ती कोणत्या वेळी घराबाहेर पडावी पासून ते तिने कुणासोबत बोलावे व कुणासोबत बोलू नये हे ठरवणारे तिचे स्वघोषित वाली आहेतच!? का एक स्त्री आजही स्वतःच्या लग्नाचा निर्णय स्वतः घेऊच शकत नाही...? का तिने असे केले म्हणजे ती समाज घातक घटक ठरतेय? बलात्कार पीडित एक महिला असून आजही तिलाच का समाज किळसवाण्या नजरेने बघतो....? अरे, कधीपर्यंत हे प्रश्न आपण स्वतःला विचारणार नाही.... आणि लक्षात ठेवा..🤨जोपर्यंत आपण हे प्रश्न एक सामाजिक घटक म्हणून, सजग नागरिक म्हणून स्वतःला विचारत नाहीत तोपर्यंत आपल्याला माणूस म्हणवून घेण्याची लायकी नाही हे मी इथे जाणीवपूर्वक म्हणेल....!
कदाचित कुणी माझ्या या खोचक बोलण्याने दुखावला जाऊ शकतो पण, जर का यातील एक जरी प्रश्न आपण स्वतःस विचारू तर उत्तर नकारार्थीच येईल आणि ज्या दिवशी ते सकरार्थी यायला सुरुवात होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारतीय स्त्री स्वतंत्र होईल....👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
आज माझ्यासोबत जो प्रसंग घडला तो इथे मांडणे अत्यंत गरजेचं.....कारण, मी जर हे केलं तर, काय माहित किती मुलींचे आयुष्य वाचू शकेल.....आज विद्यापीठाचा रस्ता गाठताना मला दोन दुचाकीस्वारांना पत्ता सांगण्यात काहीच चुकीचे वाटले नाही.....पण, त्यावर उत्तर म्हणून त्यांनी माझा "शाब्दिक विनयभंग" केलाय ह्याचेही त्यांना वाईट न वाटलेले बघून आज मी त्यांची वाट लावायचा प्रण केलाय.......मी आज त्यांना शिक्षा करणार...... पण, मित्रानो मला, आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे.... कृपया मला सहकार्य करून बाहेर अश्या कितीतरी शैला असतील, ज्यांना ते नराधम सोडणार नाहीत त्यांचा आपण जीव वाचवू शकतो......ते दोघे आज माझी बाहेर वाट बघत आहेत की, मी बाहेर पडेल आणि ते माझ्यासोबत वाईट कृत्य करतील... पण, मला खात्री आहे...आपण माझ्यासोबत आहात..🙏🙏...(तिने प्रोजेक्टर ला स्वतःचा फोन कनेक्ट करून त्या दोघांचा फोटो शो केला आणि सगळ्यांना ते दोघे बाहेर असल्याची कल्पना दिली...तोच उपाध्येय मॅडमने कॉन्स्टेबल शिंदे ला पूर्ण कल्पना देऊन त्यांना पकडण्यासाठी पाठवले.... त्यांना अटक करण्यात आली.....आणि पुढे शिक्षेचे आश्वासन देण्यात आले....)
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 टाळ्यांच्या गजरात सभागृह नाहून गेले .......तिने सगळ्यांचे आभार मानत आज प्रथम पारितोषिक स्वीकारले होते आणि भावी पोलिस उपनिरीक्षक कु. शैला राजीव पाटील.... हिने श्रीमती. मीनाक्षी उपाध्येय (पोलिस उपअधीक्षक) यांच्या हस्ते बक्षीस घेऊन आशीर्वाद घेतले....

मॅडम उपाध्येय : "अतिशय कमी शब्दात तू तुझे प्रामाणिक विचार मांडलेस..... आशा करते भविष्यात एक अधिकारी बनून तू समाजात उत्तम कामगिरी बजावणार.....तुझ्या भावी भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.....🤗💐💐💐💐 आणि अधिकारी बनल्यावर माझी भेट घे.....मला खूप अभिमान वाटतो तुझा.....आणि पूर्ण विश्वास आहे.....🤗."

शैला: "हो मॅडम नक्कीच....आणि आपले मनपूर्वक आभार आपला विश्वास मी कायम असाच ठेवेल....🙏🙏"

ती सगळ्यांना पार्टी देऊन आणि आधी आईंसाठी चॉकलेट घेऊन घरी जायला निघते......तोच मागून तिला आवाज येतो......, "बहुतेक आम्हाला कुणी विसरतय...??...🙄🙄😕😕"

शैला: "अरे तू!??? इथे.......😲🤨🤨🤔काय काम आहे तुझं?"

हा रितेश राऊत तितकाच हुशार आणि तो ही पोलिस उपअधीक्षक पदी नियुक्तीस पात्र होता......मुलाखत झाली होती..निकाल सकारात्मक येईल याची त्याला खात्री आणि विश्वास होता.......त्याला आपली शैला आवडायची पण, शैलाचे लक्ष कुणाचं कडे नसून ती तिच्या भविष्याचा जास्त विचार करायची तिचे बाबा सुध्दा पोलिस प्रशासनात असल्याने तिचं आकर्षण पोलिस प्रशासन होते.....आणि कायदा व सुव्यवस्था तिला कसे हाताळावे हे चांगलेच ठाऊक होते......त्यामुळे तिची गोडी आणखीच वाढली होती........

रितेश: "हो म्हटलं मॅडम व्यस्त आहेत तर आपणच भेटाव काय माहित मग अधिकारी झालात की, आम्ही लक्षात राहू की नाही....?😕"

शैला: "साहेब आमच्या पेक्षा मोठे अधिकारी तुम्ही होणार..... कसले आम्हाला टोमणे मारता....😁😁😁😁😁😁"

दोघेही खळखळून हसू लागले......आणि त्याने हळूच तिच्या हाती चॉकलेट ठेऊन तिला काँग्रचुलेट केले.......

रितेश: "अभिनंदन......🍫🍫🤗🥰💐"

शैला: "धन्यवाद........🙏😌"

रितेश: "मग आमचा विचार कधी करणार........अग शैलु माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर......तू का नकार देतेस..?? आता तर मी अधिकारी सुध्दा होणार आणि तूही होशील......मग काय समस्या आहे अग तुझी........मला कळेल का?...😥"

शैला: "रितेश मी आताच तुला कुठलही आश्वासन देण्याच्या मनस्थितीत नाही......पण, लवकरच कळवेल तुला माझे उत्तर......🙂"

रितेश: "मग मी वाट बघायची ना!🙄🙄🥺🥺?"

शैला: "हो.....😌😌😌😌😌......येते मी....."

ती लाजून पळत सुटली आणि इकडे याचे हृदयाचे ठोके चुकले होते.....हा स्मित हास्य चेहऱ्यावर आणून तिच्याकडे बघतच उभा होता......☺️☺️☺️☺️

इकडे ती घरी आली आणि आईला सगळं प्रकरण अगदी जश्यास तसे सांगून टाकले...... आईने शांतपणे चॉकलेट खात खात ऐकुन तिला प्रेमाने समजावून सांगितल, तिला आता अश्या घटनांसाठी तयारी करून ठेवणे आवश्यक असेल.... कारण, ती भावी अधिकारी होती......☝️😎.👩‍✈️

शैला : "आई मला तुला खूप दिवसांपासून काही सांगायचे होते......😌😌😌"

आई : "कोण आहे तो......माझ्या बाळाच्या मनातील राजकुमार ......🤗☺️☺️☺️😘😘"

शैला : "नाही........म्हणजे.......हो... अग.....😲😲😲 तुला कस कळलं.......?????"

आई : "तुझ्या मनात काय आहे हे तुझ्या चेहऱ्यावरून मला सर्व कळतं बाळ.........🥰😘😘 शहाणं बाळ ते माझं.....🤗🥰😘😘"

शैला आईला सगळं सांगून टाकते.....आई तिला समजून घेते.....आणि लवकरच आता ते रितेश ला घरी बोलावून बोलणी करणार अशी बातमी त्याला कळवतात............तो तिकडे....एकदम खुश होऊन...... उडी मारतो......🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺