PURE SOUL......? books and stories free download online pdf in Marathi

PURE SOUL......?



मीनल एका कंपनीमध्ये जॉब करत होती.... तिची रात्रीची ०८:०० ते सकाळी ०८:०० अशी शिफ्ट असायची.... सोबतीला अजून मुली होत्या... तिची ओळखही होती..... पण, वॉश रूम मधे ती सहसा एकटीच जायची......

त्या रात्री सुध्दा ती एकटीच गेली......ती बाहेर पडली की, कानात हेडफोन्स टाकून तिच्या बॉय फ्रेंड शुभमला फोन करून बोलता बोलता आपले काम आटोपून परत आपल्या केबिन मधे जाऊन बसायची.....

"खुदा की इनायत हैं हमे जो मिलाया है......" शुभम च्या फोन ची रिंगटोन वाजली......

शुभम : "हॅलो.......जान, कशी आहेस.... वॉश रूम काय...😜😁😁"

मीनल : "तुला बरं कळतं अरे मी कुठे जाते कुठे नाही.... शहाण्या......😏😏"

शुभम : "अरे मेरी जान....तेरे बारे मे नहीं तो कीसके बारे मे पता रहेगा.......🤗🤗🥰"

मीनल : "चल जास्त रोमँटिक होऊ नकोस..... ह्म्मम आता.....😄😄"

शुभम : "जशी आपली इच्छा राणी सरकार......🙏"

मीनल : "बरं.....जेवण केलस का...? की नाही अजून पडलाय बाहेर.... मित्रांसोबत गाव हिंदळत......🙄🤨"

शुभम : "अग, राणी जेवण झालं बघ तुझ्याच फोन ची वाट बघत होतो...🤗"

मीनल : "बरं... बरं.....भेटू आपण येत्या रविवारी......🤗"

शुभम : "हम तो कबसे आपका इंतेझार कर रहे थे.... अब मिलो तो पुरा प्यार जतायेगे......🥰"

मीनल : "पुरे तुझे लाड...😄😄 अजून काही?"

शुभम : "अजून तर काही नाही....भेटू तेव्हाच बोलूया......मग.....😜"

मीनल : "चावट कुठला.......😲😲😳😳😳😳😳😳🥺🥺🥺🥺🥺अरे शुभम इथे कुणी तरी बसलय....मला काहीच कळत नाही आहे बघ.......इथे बेसिन मधे कुणीतरी बसलय.........केस मोकळे आहेत तिचे.... आणि हसते आहे ती....मी काय करू........"

शुभम : "हॅलो....हॅलो, मिनू काय झालं तुला? बरी आहेस ना बेबी तू.???😥😥😥....कोण आहे तिकडे बोल ना काही😢😢😢....हॅलो......हॅलो.....मिनू.....🥺🥺"

इकडे शुभमला काहीच कळत नव्हते........ ऑफिस त्याच्या घरापासून सोळा किलोमीटर होते आणि इतक्या रात्री घरी काय सांगणार म्हणून तो मीनल च्या फोन ची वाट बघत बसला....🥺🥺🥺

इकडे धापकान पडल्याचा आणि मिनालचा जोरात किंचाळली त्याचा आवाज एकाच वेळी ऐकुन टीम लीडर आणि सगळे वॉश रूम जवळ आले.....पाहतात तर मीनल खाली पडलेली.....तिला उचलून आत केबिनमध्ये आणण्यात आले आणि चेहऱ्यावर पाण्याचा वर्षाव करून जागे केले..........

तिला सगळ विचारल्यावर तिने झालेला सगळा प्रकार जश्यास तसा सांगितला.....तेव्हा त्याच ऑफिस चे जुने चपराशी शिंदे काकांनी एकच वाक्य उद्गारले....."म्हणजे ती इथेच आहे म्हणायची....!"

हे ऐकताच सगळे शिंदे काकाकडे आश्चर्याने बघू लागले कारण सगळे दोन ते तीन वर्षांपासून जॉईन झालेले होते.... तर शिंदे जुने कर्मचारी होते......म्हणून काकांना काही माहिती असावी म्हणून टीम लीडर काकांकडे जात विचारणा करू लागले.....

टीम लीडर : "काका तुम्हाला काय माहिती आहे याबद्दल आणि आता थोड्या वेळा आधी तुम्ही काही बोललात आम्हाला नीट सांगाल? काय आहे हे प्रकरण..🤨🙄🙄🙄😳😳😳😧...?"

सगळ्यांना जाणून घेण्याची इच्छा होतीच काकांनी जराही वेळ न घालवता सांगण्यास सुरुवात केली......

काका : "खूप वर्षा आधीची गोष्ट आहे सर.......एक मुलगी मंदिरा नाव होते तिचे.....जेव्हा कंपनीचे बांधकाम सुरू होते तेव्हा इथे मुलाखती घेण्याचं सुध्दा ठरवण्यात आले होते आणि त्यानुसार याच बिल्डिंग मधे कार्यक्रम ठरवला गेला होता.......मी तेव्हा सगळ्या तयारीत सहभागी होतोच....मंदिरा अगदीच साधी मुलगी....माझ्या ती लक्षात आहे कारण, ती खरंच मनाने खूप चांगली होती....त्या दिवशी उशीर होणार होता....मला जेवण करायला वेळही नव्हता तिकडे सर आरडाओरड करत होते.....मी आपले काम करण्यात व्यस्त होतो...... तेव्हा ही मुलगी स्वतःचा डबा माझ्यासाठी घेऊन आली....आणि मला जेवण्याचा तिने आग्रह केला..........मी तिला नकार दिला कारण, सर खूप चिडले होते........ तिनें माझं एकही न ऐकता स्वतःच्या हातांनी मला भरवत म्हणाली...."माझेही बाबा असेच खूप मेहनत करायचे कुणीच त्यांना जेवायला विचारायचे नाही आणि एक दिवस ते मला सोडून निघून गेले....त्यांनी शेवटचा श्वास जिथे घेतला तिथेही कुणी त्यांना मदत म्हणून पुढं आले नाहीत...त्यांचेच सहकारी त्यांना घरी त्या अवस्थेत घेऊन आले.....म्हणून काका स्वतःची काळजी स्वतः घ्या हे लोक कुणाचे नसतात.....😭😭😭😭😭माझे बाबा"
तिला या अवस्थेत बघून मला ही अश्रू अनावर झाले.... पण तिला सांभाळत मी तिला शुभेच्छा देऊन मुलाखतीसाठी खंबीर रहा असे सांगून माझ्या कामात मग्न झालो.....मुलाखती आटोपल्या तिने मला एक चॉकलेट देऊन सेलेक्शन झालं ही आनंदाची बातमी कळवली.....मी देखील खुश झालो होतो कारण आता ती माझ्या मुलीप्रमाणे माझी काळजी घेणार होती.....पण, नियातीला हे मान्य नव्हते.......आणि......🥺😭😭😭😭😭😭😭😭"

काका मोठ्याने रडु लागले...... सरांनी त्यांना पाणी दिले व शांत केले.........
🥺🥺

ते पुढे सांगू लागले....

"माझा निरोप घेऊन ती आनंदी हास्याने बाहेर जाण्यास पाऊल टाकणार तेवढ्यात बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीचा गेट तिच्या अंगावर पडला आणि.......😭😭😭😭😭तिचा जागीच अंत झाला......😭😭😭😭😭😭 माझी मुलगी मला ज्या दिवशी मिळाली होती ती त्याच दिवशी मला सोडून गेली......आणि आज ती इथेच आहे माझ्या सहवासात पण, मी तिला बघू शकत नाही........पण, काही दिवसांपासून तिचा असण्याचा अनुभव मला होत आहे आणि मला यातच समाधान आहे......पुढे कुणावरही कार्यवाही झाली नाही....तिच्या निराधार आईला कुणीही सहारा दिला नाही म्हणून तिच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि जोपर्यंत ते होणार नाही ती कुठेही जाणार नाही.....तिने मला तिच्या आईविषयी सांगितले होते.😔😔...तिच्या आईने खूप मेहनत घेत दोन चार घरची धूनी भांडी करून तिला शिकवले पण, आता तिला तिच्या आईला अश्या अवस्थेत ठेवायचे नाही म्हणून ती जॉब शोधून त्यांना आराम देईल अस म्हणत होती... पण.......😭😭😭😭"

हे ऐकुन सगळ्यांचे अश्रू अनावर झाले आणि टीम लीडर ने तेव्हाच तिच्या आईला आम्ही आधार देऊ असे सांगून टाकले.....

त्या रात्री झालेला सगळा प्रकार मिनलने शूभमला सांगितला आणि मंदिराच्या घराचा पत्ता देऊन उद्या तिकडेच भेटू असे सांगून घरी जाऊन तयार होऊन ती सुद्धा तिथे ठरलेल्या वेळेत पोहचणार होती......

दुसऱ्याच दिवशी सगळे मंदिराच्या घरी गेले......टीम लीडर ने तिच्या आईला एक चेक, एक घर, आणि एक नोकरी देऊ केली.....तिची आई इथून पुढे छोट्या मोठ्या घरात कामाला न जाता टीम लीडर च्या घरी त्यांच्या मुलांना सांभाळणार होती......त्यांच्या मुलांमध्ये ती स्वतःची मुलगी शोधून जगणार होती म्हणूनच त्यांनी तिला स्वतः घरी कामाला ठेऊन घेतले... हे सर्व मंदिरा स्वतः बघत होती आणि खूप खुश होती...तिच्या आईच्या डोळ्यात आज वेगळीच चमक होती.....आणि चेहऱ्यावर ......समाधान सुध्दा...🤗...

त्यानंतर ती सावली सगळ्यांसमोर तशीच आनंदात हवेत मिसळून गेली.......✨🌀💫✨☄️☄️ सगळ्यांनी वर बघितले तर धूसर सावली एक आनंदी हास्य चेहऱ्यावर आणून समाधानाने सुटल्याचा विश्वास दाखवत होती.......
🤗

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED