करूया नवविचारांची divali......??? Khushi Dhoke..️️️ द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

करूया नवविचारांची divali......???

हॅलो.....🤗 कसे आहात सगळे........ सर्वांना दिवाळीच्या खूप - खूप शुभेच्छा.....💐💐☺️☺️

तुम्हाला प्रश्न पडलाय ना मी कोण...🙄? तर मी माझी ओळख करून देते..... मी अवनी सहस्त्रबुध्दे.... एका मोठ्या संयुक्त - कुटुंबातील कन्या.... अहो पण तुमच्या माहितीसाठी सांगते.... आमचं कुटुंब जरी संयुक्त असलं तरी, खूप पुढारलेले विचार जपणारं आहे बर का....! कळेलच तुम्हाला मी अस का म्हणतेय.....😁

तर, दिवाळी आलीय येत्या पंधरा दिवसांवर आणि आज पासून आमच्या घरी सगळी कामं निघणार आहेत.... पण, आमच्या घरचे माणसं आणि बाया दोन्ही लैंगिक भेदभाव न ठेवता सगळी कामं एकत्र मिळून करतात... म्हणजे जर माणसं पेंटिंग करतील..... तर, बाया आधी स्वच्छ करून, त्यांच्यासाठी जेवण बनवून ठेवणार.... आणि विशेष म्हणजे हे की, सगळे सोबतच जेवण करतात.... स्त्रियांनी, पुरुषांना जेवण वाढून नंतर जेवावे हा समजच आमच्या घरी कधी उगमास आला नाही.... ना कधी बाबांनी किंवा इतर मंडळीनी तो स्वीकारला.... हे एक मला चांगले संस्कार लाभले, अस मी मानते...

तर, आज बघुया कोण काय - काय करतंय..... चला मग आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनून, आमच्यात या.... मला खात्री आहे तुम्हालाही आमच्यात सहभागी होऊन, काहीतरी सकारात्मक भाव अनुभवता येईल..... आपले सर्वांचे आमच्या कुटुंबात मनपूर्वक स्वागत.....🎉🎊🤗🤗

आमच्या कुटुंबात....
दोन मोठे काका - काकू, त्यांची चार मुलं,
माझे आई - बाबा आणि मी एकुलती - एक लाडाची,
माझे लहान काका - काकू आणि त्यांची दोन पिल्लं....

इतका सगळा आमच्या कुटुंबाचा विस्तार..... नाही, अहो घाबरता कशाला.... नाव सांगून तुम्हाला कन्फ्युज करणार नाहीये..... फक्त माझं नाव तेवढं लक्षात असू द्या.....😁 कारण, मीच सांगते आहे ना तुम्हाला आमच्या घरी कशी दिवाळी साजरी करतात..... मग हे महत्त्वाचं नाही का...!!😁 अरे देवा माझं वयच सांगायचे राहून गेले.... तर मी म्हणजेच, अवनी सहस्त्रबुध्दे... वय वर्षे पंचवीस (२५)..... अजून तरी मला घरच्यांनी लग्नासाठी फोर्स केलेला नाहीये..... कारणही तसच.... अहो मला ना बँक पी. ओ. व्हायचंय ना.... मग तीच धडपड सुरू आहे..... म्हणून, बाबांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय... हो मला समजतंय, प्रत्येकच मुलीला हे स्वतंत्र मिळणं ही सोपी गोष्ट नसते.... खरं तर हे विचारच दुर्मिळ....😓 पण, मी याबाबतीत स्वतःला नशीबवान समजते..... जर कुणी पालक मला वाचत असेल ना तर, नक्कीच त्यांनी स्वतःच्या मुलींना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक संधी देण्यात काहीच चुकीचं नाही...... असा विचार करून, त्यांना ते स्वतंत्र देऊ करावं हीच एक छोटीशी निस्वार्थ इच्छा.....🙏

चला तर मग माझ्या घरी..... बघुया काय चाललंय.......🤭🤫

मोठे काका : "अग व्यवस्थित पकड ना पडशील आणि तुला लागलं म्हणजे...😥"

हे होते माझे मोठे म्हणजे सगळ्यात मोठे काका त्यांच्या गृहमंत्र्यांना....🤭 अहो म्हणजे आमच्या काकूंना कुठलीच दुखापत झालेली त्यांना सहन होत नाही.... खूप जपतात ना...🤗 असेच माझे सगळे काका आणि माझे बाबा सुद्धा त्यांच्या - त्यांच्या बायकांना खूप जपतात....😘😘 अतिशय प्रेमळ कुटुंब आहे आमचं..... हो आमच्याकडे नोकर - चाकर आहेत बर का....! पण, ह्या सगळ्या कामाच्या वेळी त्यांना सुट्ट्या देण्यात येतात.... आणि घरचीच सगळी मंडळी ती काम करतात.... नोकर - चाकर स्वयंपाकात मदतीला असतात..... मात्र दिवाळीच्या दिवशी सगळ्यांना कपडे आणि मिठाई वाटून आमच्या कुटुंबात सामील होण्याचा सन्मान आम्ही त्यांना देऊ करतो....☺️☺️ आम्ही कधीच त्यांना अपमानास्पद वागणूक देत नाही..... लहानापासून - मोठे सगळे त्यांच्याशी नम्र वागतात..... चला तर मग बाकी मंडळी काय करत आहेत बघुया....

वंशिका : "दादू हे घे ना ले....😦 मला हे नाही जमनाल.....😥"

ही आमची वंशू पिल्लू, लहान काकांची मुलगी... आपल्या दादुला म्हणजेच, आमच्या अंशला स्वतः कडील सामान घ्यायला सांगत आहे आणि ते ही क्यूट फेस करून......😘

मी : "वंशू पिल्लू इकले ये..... दे ते ईकले..... माझा बच्चा इतुशी जान..... कशाला इतकी काम कलते....😘"

वंशिका : "दिदू.... याल बिग माम अँड बिग डाडा इतकं सलव कलत आहेत.... मग आपणही काही तली केलं पाहिजे ना..😔"

मी : "अग माझी पिल्लूशी..... पिट्टुशी.... किती ग समजूतदार तू........😘😘"

वंशिका : "मी तुझी गूड गर्ल ना दिदु....☺️☺️"

मी : "हो ग माझी पिल्लू....😘"

वंशिका : "मी येते हा.... दादू वेतींग फॉल मी ना..... सी यू सुन दीदु....☺️"

मी : "ओके ग माझा पिल्ला...😘"

बघितलं का आमच्या घरचे लहान पिल्लं..... तेही काही कमी नाहीत.... तितकीच काळजी, आपुलकी..... संस्कारच आहेत तसे.....☺️☺️

चला मग अजून बघुया बाकीचे काय करत आहेत..... मी आज तुम्हाला माझ्या घरच्यांचा परिचय देण्यात व्यस्त असल्याने, काम करणार नाही अस समजू नका......😁 रोज मी सुद्धा त्यांना मदत करतेच...... आता आमच्या घरी जी डेकोरेशन होईल ती अगदी पर्यावरण पूरक, टाकाऊ वस्तूंपासून - टिकाऊ वस्तू अशा पद्धतीने होईल..... आणि ती जबाबदारी माझी असेल......😎😎

आई : "अहो हे घ्या ना काय करताय..... मला स्वयंपाक करायचा ना...😥"

बाबा : "काळजी नको ग करुस वाटल्यास आज आम्हीही करू लागतो तुम्हा बायकांना स्वयंपाक काय मुरली (लहान काका)...??😁😁"

मुरली : "हो ना वहिनी थांबा सोबत करू....☺️☺️"

आई : "बर बर......😁😁"

तर ही आमची वडीलधारी मंडळी...... सगळे एकमेकांना सणासुदीला मदत करतात, हातभार लावतात..... आणि नंतर मग सगळे मिळून जेवण करतात.....☺️☺️

बाबा : "बेटा अवनी इकडे ये...🙂"

मी : "हो बाबा आले..... बोला बाबा.... बोलावलं....🙂"

बाबा : "हा बेटा ते आलं का रिझल्ट तुझं.... एक्झाम झाली ना.....🙄"

मी : "हो बाबा काहीच दिवसांनी किंवा महिन्याभरात येईलच.... कोरोनामुळे लटकलय..... कमिशनची नोटीफिकेशन आली आहे.... की, लवकरात - लवकर निर्णय काढून निकाल लावला जाईल....☺️"

बाबा : "मग यावेळेस बँक पी. ओ. नक्की ना बाळा.....☺️☺️"

मी : "हो बाबा मी पूर्ण प्रयत्नाने सोडवलाय पेपर नक्कीच रिझल्ट positive असेल....🙂☺️"

बाबा : "आणि negative जरी आला तर काय ना अजुन जोमात तयारी करून द्यायचे नेक्सट टाइम..... फक्त तू डोक्यावर टेन्शन नको घेऊस..... आम्ही आहोतच पाठीशी.....🙂🙂🙂☺️"

मुरली : "हो ना अवनी बेबी काळजी नको... एकदम बिंदास रहायचं काका आहे अजून....😁😁😎😎"

बाबा : "अरे मुरली तू किती attempt दिले होतेस.....??🙄"

मुरली : "दादा मला चौथा प्रयत्न देऊन यश हाती आलं पण, तू आणि मोठे दादा सगळे पाठीशी होता म्हणून, हिम्मत न हरता मी हे करू शकलो..... नाहीतर माझ्या सोबतच असणारे सगळे घरच्या दबावानेच त्रस्त असायचे.....😓"

बाबा : "जाऊदे रे.... तसही ना घरच्यांनी मुलांना सपोर्ट केला पाहिजे.... ते नक्कीच यशस्वी होतात.... आज बघ तू वर्ग एक चा राजपत्रित अधिकारी आहेस.... समाजकल्याण विभाग..... अगदी तळागळातील लोकांना तू तुझ्या अधिकाराक्षेत्रातून मदत पुरवू शकतो.... खरंच लेट पण थेट लिहिल असतं कुणा - कुणाच्या नशिबी..... त्यामुळे हिम्मत न हरता प्रयत्नरत असलं पाहिजे....😎☝️"

मुरली : "बघ बेबी असे बाबा सगळ्यांना नाहीत मिळत आणि म्हणून, कित्येक मुली स्वतःची स्वप्न मारून जगताना मी बघितलंय.... तू खरंच नशीबवान आहेस..... तुझ्या लग्नाची घाई न करता, तुझे बाबा तुझ्या भविष्याबाबत जास्त विचारपूर्वक निर्णय घेतात.... खरंच ते एक आदर्श आहेत माझ्यासाठी.... भाऊ असला तरी आधी मी त्याला आदर्श मानतो....😎☝️"

मी : "बाबा, काका..... खरंच मला आपलं पूर्ण कुटुंब लाभलं हे मी नशीब मानते.... किती ते सगळे आपुलकीने विचारणा करतात.... माझ्या चांगल्याचा विचार करतात.... खरंय मी नशीबवानच आहे....☺️☺️"

आई : "चला स्वयंपाकाला लागायचं आहे..... बेटा अवनी तू पिल्लांना बघ हा.... आम्ही करतो स्वयंपाक मिळून सगळे..... ती बघ वंशू.... तिकडे जा हा... तिला खेळव....😅"

मी : "हो आई....☺️☺️😅"

चला मग आमचं एक पिल्लू समजदार तर आहे..... पण, तितकंच खोडकर ही....😁😁 बघा कशी पळते आहे ती...

मी : "पकडा - पकडा...... पिट्टुशी..... पिल्लुशी ग माझं बाळ..... कस पळतय....😁😁 पकडलं..... येयेये...."

वंशिका : "सोल ना मना जाऊ दे ना..... इतकी काम केनी ना मी.... जाऊ दे ना.....😥"

मी : "इकडे बघ...... माझी क्यूटी पाय...... पिल्लू.... यू आर गूड गर्ल ना.... हे बघ तिकडे कुकिंग सुरूये ना..... आणि तू छोटस पिल्लू आहे ना.... मग दिदुच नाही का ऐकणार....🙄"

वंशिका : "सोल्ली दीदू.... मी ऐकेन तुझं....... मी गूड गल आहे ना....... प्लोमिश.......🙂"

मी : "That's my girl....😁"

बघितलं का मंडळी अस हे आमचं पिल्लू....😘

थोड्या वेळाने स्वयंपाक होईल आणि आई आवाज देईल तुम्ही ही या जेवायला......🙂☺️

आई : "अवनी, वंशिका पिल्लू या सगळे जेवण तयार आहे.....🍱🍴🥄🍽️

वंशिका : "ये येये....... दीदू चल.... पतकन😅"

मी : "हो हो हळू...... अग पिल्लू थांब ना....."

ही काही ऐकणार अस दिसत नाही..... या हा तुम्ही ही.....😅☺️

सगळे जमलेत......

वंशिका : "दीदू मना तू भनव.....😅"

मी : "ओके पिल्लू..☺️ ये इकडे बस...."

@@@ : "जेवण चाललंय वाटतं.....😅"

बाबा : "अरे शंकरराव या या..... बसा घे ग जेवायला वाढ....☺️"

शंकरराव : "अहो नको...... वहिनी.... मी आताच आलोय...... जेऊन..... घ्या सगळे जेऊन.... महत्त्वाचं बोलायचं होतं.......☺️"

बाबा : "आता काय विशेष.....🙄🙄"

शंकरराव : "सांगतो आधी जेवून घ्या सगळे..... बसतो मी......☺️"

सगळ्यांची जेवण आटोपली...... घरचे सगळे हॉलमध्ये येऊन बसले.....🙄 कसला विषय असेल...... देवच जाणे......

बाबा : "बोला काय विशेष.....??"

शंकरराव : "ते आपल्या बेबिंसाठी एक स्थळ आहे.... मुलगा मुंबईत आहे नोकरीला..... ए. एस. ओ. मंत्रालय पोस्टिंग...... बघा जमत असेल तर......??🙄🙄"

बाबा : "शंकरराव हे बघा, आमच्या बेबी आता परीक्षेची तयारी करत आहेत..... मधात लग्नाचा विषय आणून, तिचं मन नाही भटकवायच आम्हाला.... आणि स्थळांच काय ना.... ती उद्या बँक पी. ओ. झाली की, उपजिल्हाधिकारी बघू..... काय म्हणता......🤨"

शंकरराव : "नाही ते आपलं सहज.....🙄 वयात लग्न झालं की बरं असतं नाही का....🙂"

बाबा : "माझ्या माहितीप्रमाणे, तुमच्या मुलीचं लग्न वयातच झालं, नाही का....!! आणि त्याचसाठी तुम्ही तिला कमी शिकवलं.... शेवटी काय झालं.... नवरा गेल्यावर, तिला जॉब ही मिळेना.... कसं असतं शंकरराव आजकाल मुलींनी शिकून, जॉब करण खूप इंपॉर्टन्ट झालंय..... जीवन खूप अनिश्चित आहे.... कधी काय होईल सांगता येत नाही..... म्हणून, मुली जर लग्नाआधीच कमवायला लागल्या तर, त्यांना लग्नानंतर कुणी बोलू शकत नाही.... काही घटना झालीच तर त्या स्वतःचं बघू शकतात.... आणि राहिली गोष्ट अवनीची तिला अजून तरी शिकायचं आहे........🙏"

शंकरराव : "येतो मी....🙂🙏"

बाबा : "या.....🙏🙂"

बाबांनी सूनावल्यावर, मला नाही वाटत ते कधीही इथून पुढे आमच्या घराच्या वाटेने दिसतील.....

मुरली : "बरं झालं बोललास दादा.... हे असेच येतील कुणीही आणि आपल्या बेबीसाठी स्थळ आणतील.... अरे आपण काय बघणारच नाहीत का चांगला तिच्यासाठी......🤷🤷"

बाबा : "असो..... या विषयावर जास्त चर्चा नको..... चला सगळे कामाला लागुया....😓"

बघितलंत असे विचार आहेत आमच्या घरी.... आणि मला नाही वाटत असे विचार ज्या घरी असतील त्या घरी मुलींचं लग्न कमी वयात केलं जाईल किंवा तिला तिच्या करीयर पासून वंचित ठेवलं जाईल......🙂🙂

तर काही दिवस असच स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे...... तुम्हाला आता डायरेक्ट घेऊन चलते डेकोरेशन करायला...... या तर.....

आज मी गिफ्ट बॉक्स, फ्रूट पॅकेजिंग, डिझायनर चार्ट, सीनरी, वॉल डेकोर, तोरणं सगळं करून घेणार आहे.... यात मला माझी पिल्लं मदत करतील......😘 चला तर मग वाट कसली पाहताय....😁😁

वंशिका : "दिदू....🙂 मी काय कलू..... हे लीबिंस....☺️ किती क्यूत ना....😘"

मी : "हो ग पिल्लू अगदीच तुझ्यासारखे.....😘😘"

अंश : "मना विसलली तू.....😔"

मी : "अले.... मेला शेल.....😘😘"

अंश : "...😎😁😁😁"

आम्ही सगळं आवरलं...... भेटू दिवाळीच्या दिवशी तेव्हा दाखवतेच...... आणि काय - काय मस्ती असते ते ही घेऊन येते...... नक्की या हा सगळे.....😁😘

काहीच दिवसांनी...... दिवाळीच्या दिवशी, सकाळी..........

उपटन कार्यक्रम.........☺️☺️

सकाळच्या उपटन कार्यक्रमानंतर, आम्ही सगळे एका अनाथालय आणि वृद्धाश्रमात जाऊन काही दान पुण्य करत असतो..... हे सगळ्यांच्या संमतीने होत असल्याने त्यात वेगळेच समाधान आम्ही अनुभवतो.....☺️☺️ मला अस वाटतं, फक्त दिवाळीच एक निमित्त नसावे.... जेव्हा आपण ज्यांना कुणी नाही, त्यांना मदत करू...... तर जेव्हा कधी आपल्याकडे, आपल्या गरजेपेक्षा जास्त काहीही असलं, ते आपण मनात एक उदार भाव ठेऊन दान केलं पाहिजे...... त्यातच खरी समाधानाची सकारात्मकता आपण अनुभवत असतो..... अशाचप्रकारे आमचे प्रत्येक सण आम्ही दुसऱ्यांना काहीतरी देऊन साजरे करत असतो.....

आज दिवाळीचा दिवस..... आमच्या घरच्या, काळजी घेणाऱ्या आमच्या लोकांना, आम्ही गिफ्ट देऊन त्यांचे आभार मानतो..... शांताबाई आणि कांताराम हे आमच्या घराची काळजी अगदी त्यांच्या घारासारखी घेतात..... म्हणून, आज मी स्वतः पॅकिंग केलेले गिफ्ट त्यांना देणार आहे....

तुम्हाला एक गोष्ट सांगते..... जर, आमच्या पिल्लुला आज गिफ्ट दिले नाही..... तर, ती घर डोक्यावर घेणार..... म्हणून, तिच्यासाठी म्हणजे आमच्या वंशी आणि दुसरा अंश पिल्लुसाठी दोन गिफ्ट मी स्वतः पॅक करून ठेवले आहेत...... त्यांना सरप्राइज असतं हे.....🤭🤭🤫 पण, प्रत्येक वर्षी मिळत असल्याने हे सरप्राइज त्यांना माहीत असतं...🤭 पण, तरीही खोटं हसू आणि एक्स्प्रेशन चेहऱ्यावर ठेवतात...... कारण, त्यांनाही माहित असतं की, दिदूने इतकी मेहनत घेतलीये......

वंशिका : "Wow.......🥰🥰🥰😍😍🤩"

मी : "आवडलं पिल्लू.....😍😍"

वंशिका : "खूप...... 🥰🥰🥰"

आता आमच्या घरची सगळी मंडळी गेलीय स्वयंपाक करायला...... आज मस्त स्वादिष्ट पदार्थ बनवण्यात येतात..... आणि सायंकाळी पूजा असते....... त्यात मस्त पूजा मांडण्यात येते.......

सगळ्यांच जेवण आटोपल्यावर, सगळे निवांत बसून गप्पा रंगतात...... एकमेकांची मस्करी आणि खूप काही......☺️😁🤭🤫 चला या आमच्यासोबत मस्ती करायला......

राजेश (मोठे काका) : "काय मुरली कस सुरू आहे तुझं ऑफिस.... तुझ्या तर स्टिंग ऑपरेशन येतात छापून जाम दणका आहे तुझा डिपार्टमेंटमध्ये...... आपली बेबी सुद्धा चांगली ऑफिसर झाली की, असाच दणका असेल..... नाही का अवनी बेटा.....😎"

मी : "काका अहो..... जिथं चूक आढळली बोलणार मी... पण, मला दणका वगैरे नाही जमणार....🤭"

राजेश : "काही नसतं ग तेवढं... फक्त आपल्या अधिकारातील काम विना भ्रष्टाचार करायची बस...."

मी : "हो हे जमेल....😎"

मुरली : "आमची वंशिका बघा कसा दणका आहे तिचा या घरात....😂😂"

सगळे : "..😂😂😂🤭"

वंशिका : "...🙄🙄"

मी : "इकडे ये पिल्लू.....😘"

वंशिका : "सगने मना का बन हसत आहे दीदू...🙄🙄"

मी : "नाही ग पिल्लू.... यू आर ए स्ट्रोंग गर्ल ना...... म्हणून, सगळे सांगत आहेत एकमेकांना.....😘😘 आमची वंशिका किती स्ट्रोंग आहे ते.....🤭 हो ना काका....🤫"

मुरली : "हो ना माझी राजकुमारी ग....👸"

वंशिका : ".....😊😊🥰"

सगळे : "...🤭🤭🤭🤭🤭🤭"

बाबा : "बर मुरली हिला काय होऊ देणार मोठी होऊन....?"

मुरली : "दादा मला काय वाटतं ना तिचा आवाज बघ ना किती गोड आणि ती गातेही हातवारे करून..... तिच्यात जर का गायनाची आवड असेल ना तिला गायिका करेल..... किंवा तिला जे काही करायचं असेल ती करेल.... माझ्याकडून पूर्ण स्वतंत्र असेल.... पण, सध्या तिला, तिचं आयुष्य जगू दिलं पाहिजे..... हीच माझी इच्छा आहे..... वयापेक्षा लवकर मोठे झाले ना की, आयुष्य जगणं विसरून, मुलं वेगळ्याच विश्वात रमतात..... मला परीच्या बाबतीत तसं नाही करायचं आहे..... तिला ज्या वयात ती आहे त्याच नुसार तिला जगू द्यायचं आहे.... तिचं पुढचं आयुष्य कसं जगायचं ती ठरवेल.....😊"

बाबा : "हो खरंय तुझं..... मुलांना जास्त दाबून ठेवलं की, त्यांच्यातील भावना जास्तच उसळतात..... आपण आपल्या घरी कधीच अशी वागणूक दिली नाही..... याचा मला अभिमान आहे.... दादांनी सुद्धा त्यांच्या मुलांना वकील, डॉक्टर हे त्यांच्या इच्छेने होऊ दिलं..... श्रुती सुद्धा उपजिल्हाधिकारी तिच्याच इच्छेने झाली आणि आता बघ कशी एक कर्तबगार स्त्री अधिकारी म्हणून, जबाबदारी पार पाडतेय......😎😎"

श्रुती : "काका अहो खरं तर आम्ही अधिकाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी न चुकता पार पाडली ना तर अशाच अर्ध्या समस्या संपतील.... पण, तसं होताना दिसत नाही...... पण, म्हणून मी टीका करत नाही तर, स्वतःचे अधिकार वापरून, कायद्याने न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करते.....😎"

बाबा : "हो बाळा आपण आपल्या अधिकारांचा वापर करून न्याय मिळवून दिला पाहिजे.... खरंच गुणाची आहेस.... अशीच पुढे जात रहा....😊"

मुरली : "बेटा ते तू लास्ट टाइम ते सॅनिटरी नॅपकीनच मशीन बसवून घेणार होतीस ना त्या एका ट्रिबल एरियात त्याच काय झालं....🙄"

श्रुती : "हो काका ते मी बसवलं.... खूप अशा स्त्रिया होत्या ज्यांना सॅनिटरी नॅपकीन विकत घेण्यासाठी पैसे नव्हते..... ते आम्ही आमच्या खर्चातून देऊ करतोय...... आणि एक सॅनिटरी नॅपकीन डीस्पोजल मशीन बसवून घेतलय..... त्यात तो कचरा राख रुपात बाहेर येतो आणि त्याचा पर्यावरणाला कसलाच धोका नसतो....."

मुरली : "खूपच सुप्त उपक्रम राबवला तू.... मी सुद्धा माझ्या विभागातून आदिवासी दुर्गम भागात त्यांना रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न करतोय..... त्यांच्यापर्यंत योजना पोहचाव्यात हे प्रयत्न करतोय....."

बाबा : "नक्कीच दोघेही अप्रतिम जबाबदाऱ्या पार पाडत आहात यात काहीच वाद नाही.... आम्हा सर्वांचा एक कुटुंब म्हणून, दोघांवर नेहमीच विश्वास असेल....... असेच समाजासाठी काम करत रहा....😎😎"

श्रुती, मुरली : "नक्कीच......😎😎"

तर मंडळी ही आमची फॅमिली...... शिक्षित, सुसंस्कृत, सहिष्णू, स्त्रियांचा आदर करणारी, स्त्रियांना मान देणारी, कसलाही भेदभाव न करणारी..... अजून काय हवंय.... दिवाळी फक्त एक उत्साह म्हणून साजरी न करता एक नवविचार अंगिकारण्याच्या उद्देशाने साजरी केली तर, सकारात्मक भाव तुम्ही अनुभवाल हे नक्की.....😊

तर आज निरोप घेते...... एका सकारात्मक विचारांच्या दिवाळीच्या दिवशी..... 😊 तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप - खूप शुभेच्छा..... हसत रहा, काळजी घ्या.....💐💐😊🤗☺️