My color is different ..... ?? books and stories free download online pdf in Marathi

रंग माझा वेगळा.....??







गोष्ट आहे एका लग्न समारंभातील..... पूर्ण कुटुंबासह आम्ही लग्न सभागृह गाठलं....... कोरोना काळ येण्याआधी लग्न किती उत्तम पार पडायचे ना!..... ना कुठल्या व्यक्तिपासून लांब रहा... ही अट, ना कुणाशी हात न मिळवण्याची...... तर, हे लग्न त्याच ( कोरोना आधीच्या ) काळातले....... लग्न समारंभ अगदीच गच्च भरलेलं!...... पाहुणे मंडळी ओळखीची असल्याने, बाबांना मान मिळाला आणि आम्हाला बसायला जागा...... लग्न लागलं, आम्ही नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीला भेटायला स्टेजवर ही गेलो...... नवरा मुलगा एक सरकारी कर्मचारी होता...... आणि मुलगी उच्च शिक्षित...... आम्ही स्टेजवरून, नवरा - नवरीला बक्षीस देऊन परतताना, आमच्या कानावर कुणाच्यातरी भांडण्याचा आवज पडला...... लगेच आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला.......

जाऊन बघतो तर काय!..... ते भांडण नवरा आणि नवरी मुलीच्या घरच्यांतीलच असल्याचे बाबांना एका व्यक्तीने सांगितले....... आम्हाला आश्चर्य वाटलं....... अस कस होतंय.....?? काही वेळानी कळाल की, ते भांडण "हुंडा हवा तितका दिला नाही....!" म्हणून, नवरा मुलगा, नवऱ्या मुलीविनाच वरात घरी घेऊन परतणार!! याविषयी होतं..... आणि चक्क ते ही लग्न लागल्यावर.....! नवरी मुलिकडील मंडळी आर्थिक रित्या साधारणचं........ नवऱ्या मुलीचे बाबा माझ्याच बाबांसोबत एकाच शाळेत शिक्षक....... त्यामुळे त्यांनी जमेल ते नवऱ्या मुलाला देऊ केलेलं..... पण, तरीही त्यांची हाव काही केल्या कमी होईना......

जिथे आम्ही थांबलेलो, तिथून काही अंतरावर अशी जागा होती...... जिथून मला ते सगळं स्पष्ट ऐकू येणार होतं..... मी लगेच त्या जागी जाऊन, मोबाईलमध्ये व्हिडिओ सुरू केला...... जे काही तिथं घडलं, ते मी माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर केले...... आणि जाऊन नवऱ्या मुलीला बाजूला बोलावून घेतलं..... तशी तिची आणि माझी ओळख होतीच..... ती तिच्या बाबांसोबत आमच्या घरी यायची....... आमची चांगलीच जवळची मैत्री होती......💞

मी : "हे बघ तुझ्या घरच्यांना हे लोकं हुंडा दिला नाही म्हणून वरात परत नेण्याची धमकी देत आहेत...... तुला काय वाटतं....🙄"

ती : "माझी ईच्छा नसून हे लग्न लावलं गेलं...... हा मुलगा दारुडा आहे..... आणि माझ्याशी लग्नाआधी, फोनवर खूप घाण बोलायचा...... मी घरच्यांना सांगून त्यांनी मलाच गप केलं...... म्हणाले, तू दिसायला इतकी पण चांगली नाहीस.... तुला गवर्नमेंट जॉब वाला मिळतोय..... नशीब समज आणि... गप लग्न करून आपल्या घरी जा....🥺"

मी : "अग पण आता काय करायचं.... ते लोकं तर पैसे मागत आहेत ना....😬?"

ती : "मी काय करणार.....😒 आधीच माझं ऐकलं नाही त्यांनी आणि आता कोण ऐकून घेईल....??"

मी : "अग पण....🤨"

ती : "जाऊदे ना बघतील घरचे.....😓😓"

मी : "अग हा तुझ्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे ना...... लग्नानंतर हे असे वागणार नाहीत याची काय गॅरंटी....?? उलट तुझा छळ होईल...."

ती : "मग मी आता काय करू..??"

मी : "तू हे लग्नच नको करुस....."

ती : "काय...😲😲😲"

मी : "हो....🤨"

ती : "अग पण... माझे आई - बाबा.... त्यांच्या समाजातील असणाऱ्या इमेज च काय...??"

मी : "तू आता आपल्या आई - बाबांच्या ज्या इमेजचा विचार करतेस ना..... हे लोकं, लग्नानंतर ते ही ठेवणार नाहीत...... बघितलं नाहीस..... कसे भांडण करत आहेत..... आणि तू तर चांगली शिकलेली ग..... मग हे कस खपवून घेत आहेस.... आणि तुझं आणि राजेशच तर प्रेम होतं ना एकमेकांवर मग त्याच काय झालं......🙄🙄"

ती : "अग....😓😓... घरच्यांना दुसऱ्या कास्टचा नको होता.......😒"

मी : "तुझा नवरा कुठल्या पोस्ट वर आहे...🤨🤨"

ती : "क्लार्क आहे तो बँकेत....."

मी : "अग बाई...... मूर्ख काय तुझ्या घरचे..... हा क्लार्क आणि राजेश आय. बी. पी. एस. मधून पी. ओ. फरक कळतो का म्हणावं..🤨🤨"

ती : "त्यांना मी सगळं सांगून ते ऐकले नाहीत..... आणि मला त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही करायचे नव्हते.....😓"

मी : "तू ही मूर्ख आहेस..... हे बघ माझी आत्येबहिन...... नवरा मेला तिचा..... विधवा आहे.... दोन छोटी मुलं आहेत..... घरच्यांनी लक्ष देणं सोडून दिलंय..... स्वतःच तिला स्वतःच बघावं लागतं.....कुणी ढुंकूनही बघत नाहीत..... हे बघ एकदा लग्न झालं ना की, एक - दोन वर्ष ते ही खूप झाले...... सगळे विचारणार नंतर मात्र तुझं तुलाच बघायचे आहे.... म्हणून, जरी तू आता लग्न मोडून इथून गेलीस ना राजेश तुला स्वीकारेल मी ओळखते त्याला....
तो यांच्यापेक्षा कितीतरी पुढच्या विचारांचा आहे..... तू सांग, करू त्याला कॉल.??...🤨"

ती खूप विचार करत बसली..... नंतर खूप भारी मनाने आणि विचारपूर्वक फोन कर असा इशारा करून तिच्या नवऱ्या जवळ गेली आणि तिला हे लग्न मान्य नसल्याचे सांगितले.....

नवरा : "अस कस मान्य नाही...... लग्न झालंय.... आता कस काय तुटू शकतं...... हे शक्य नाही.... तुझ्या घरच्यांना सांग हुंडा द्या आणि चल...."

तो ओढत तिला स्टेज खाली घेऊन आला...... इकडे मी राजेशला पूर्ण कल्पना देऊन योग्य त्या तयारीत यायला सांगितले होते..... काहीच वेळात तिथं सगळी मंडळी जमली..... नवरा भांडण करू लागला..... नवऱ्या मुलीच्या घरचे तिलाच दोष देत होते.... तिने हे नव्हत करायचे...... थोड्याच वेळात तिथे राजेश आणि त्याच्यासोबत पोलीस बंदोबस्त मंडपात येऊन पोहचला........

नवऱ्या मुलाचे बाबा : "अरे हे काय तुम्ही आपल्यातलं बोलणं इथपर्यंत कस काय?😠"

मी : "मीच बोलावून घेतलय..... हे बघा तुम्ही जे काही केलं ना तिकडे..... मी या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड केलंय आणि आता हे पोलीस तुम्हाला घेऊन जातील आणि जे काही आहे ना ते तिकडे द्यायचं स्पष्टीकरण..... तुम्ही जे काही मागणी केलीय ती कायद्याने गुन्हा आहे....."

नवऱ्या मुलाचे बाबा : "तू कोण आम्हाला कायदा सांगणारी आणि आमच्या घरच्या विषयात बोलणारी..?😠😠?"

मी : "मी कोण याआधी तुम्ही माणूस तरी आहात का हा विचार करा....😠"

नवऱ्या मुलाचे बाबा : "जास्त बोलतेस..... याद राख...😡"

मी : "तुम्ही गुन्हा करून जर इतके बोलत असाल..... तर मग मी तर खरी आहे का बोलू शकत नाही.....🤨😠 इन्स्पेक्टर हे पुरावे घ्या..... आणि बघा यांची काय व्यवस्था होऊ शकते का....??🤨"

पोलीस : "नक्कीच मॅडम......आपण माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद.....🙏😎"

मी : "..😎😎🙏"

पोलीस नवऱ्या मुलाकडील मंडळींना घेऊन गेली.....

नवरीचे बाबा : "पोरी तू मधात पडलीस.... सुटलो आम्ही....
नाहीतर त्यांनी आम्हाला पूर्ण जीवनभर खाल्ल असतं.....😭😭😭"

मी : "काका, तुम्ही नका काळजी करू..... हा राजेश आणि आपल्या प्रियाच एकमेकांवर खूप प्रेम आहे...... तो एका चांगल्या पदावर कार्यरत आहे..... मी विश्वास देते बाबा तो तिला खूप सुखात ठेवेन....🙏"

नवरीचे बाबा : "पोरी आम्ही आधीच तीच ऐकायला हवं होतं ग...... पण, मला वाटते आताही वेळ गेलेली नाही..... माझी परवानगी आहे..... राजेशच माझ्या मुलीशी लग्न लावून देण्याची.... पण, मी चुकलो पोरी.... या खोट्या स्वाभिमानाने मला माझ्या मुलीच्या मनात काय हे कधी दिसलच नाही..... आणि नेहमी लोकं काय म्हणतील? हेच विचार माझ्या डोक्यात असायचे...... ज्यांनी हे लग्न जुळवून देण्यात आम्हाला मदत केली..... त्यांनीच आता हात झटकले आणि बोलले की, यातलं मला काही माहिती नव्हत.... मी चुकलो पोरी....🙏😭😭😭"

मी : "काका काळजी करू नका...... तुमच्या सारख्या चांगल्या माणसांसोबत कधीच वाईट होऊ शकत नाही...😎"

सगळ्या फॉर्मलिटी पूर्ण झाल्यावर राजेश आणि प्रियाच लग्न ठरवून पार पाडलं गेलं...... आणि आज ती एका मुलीची आई आहे....

तर अशीच मी नेहमी सत्याच्या बाजूने उभी असते..... आणि तेही पुराव्यानिशी.....😎🙏

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED