समाजमान्य अलिखित नियम...️ Khushi Dhoke..️️️ द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

समाजमान्य अलिखित नियम...️



माणूस आणि गाढव यांची गोष्ट प्रत्येकाने त्या वेळी ऐकली असणार जेव्हा त्यांना "लोकं काय म्हणतील?" हा एकदम मुळ प्रश्न पडला असेल... किंबहुना इथूनच त्यांची काटकोनात विचार करण्याची वृत्ती सुरू होते.....आणि कालांतराने "लोकं काहीही म्हणतच असतात" इथपर्यंत ते विचार करण्यास सक्षम होतात....

गाढव आणि एक प्रवासी गाढवापाठी बसून जात असता, काही लोक त्याला उद्देशून म्हणतात.......

लोकं : "अरे! याला काही डोकं आहे का त्या मुक जनावराचा विचार न करता स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतोय हा माणूस!!"

नंतर तो व मुलगा गाढवाच्या पाठीवरून उतरतात आणि रिकाम्या गाढवासोबत पुढच्या प्रवासाला सुरवात करतात.......🚶🐐🚶.........तेवढ्यात परत काही लोक त्याच्या समोरून येत असता, त्याला उद्देशून म्हणतात......

लोकं : "काय मूर्ख माणूस आहे हा रिकामा गाढव सोबत नेतोय, त्या लहान मुलाला पाय तुडवत नेतोय."

त्या माणसाला कळून चुकतं की, लोकं काहीही केलं तरी बोलणारच उलट आपण त्यांच्या गोष्टींना महत्त्व देऊन स्वतःचाच प्रवास लांबवतोय...... आपल्याला सुध्दा जीवनाच्या प्रवासात हीच गोष्ट वेळेत समजल्यास जीवनाचा प्रवास आपण पूर्ण करण्यात वेळ न घालवता पूर्ण करू........ माझ्या सुध्दा जीवनाचा काहीसा असाच प्रवास मी तुमच्यासोबत वाटून घेण्यात किंवा तुमच्यापर्यंत तो पोहचवण्यात यशस्वी झाली तर ते माझे भाग्य असेल......✍️

२१ जानेवारी, सोमवार आठवड्याचा पहिला दिवस अर्थात आठवड्याची सुरवातच म्हणा ना...जाधवांच्या घरी मुलगी म्हणून मी आईच्या उदरातून माझ्या इवल्याश्या पावलांनी बाहेरच्या दुनियेत पदार्पण केले........त्या वेळी जर कुणी व्यक्ती माझ्या अस्तित्वाची जाणीव मला करून देत होती तर ती होती माझी "आई"..🤱....

बाकीच्यांना तितकासा आनंद झाला नव्हता. आमचे नातेवाईक तर बाबांना म्हणायला लागले, "मुलगी झालीय लक्ष ठेवावं लागेल."

काही दिवसांनी आई रुग्णालयातून घरी आली... मी नवजात असल्याने मला सांभाळणे गरजेचे असून देखील आईला घरच्यांना काय हवं? काय नको? हे बघणं "तीच" अलिखित अधिनियम असलेलं कार्य ती पार पाडत होती....😞 मी सुरवातीपसूनच शांत असल्याने मला आई पाळण्यात झोपाळा देऊन सर्व काम उरकावायची.... तिला कुणीच कधी काय हवं हे बघितलं असल्याचं मला तरी आठवत नाही.... असेच दिवसामागून दिवस जाऊ लागले......⏳...... मी माझ्या वयाचा पल्ला गाठत होते .... शेवटी "बेटी बचाव - बेटी पढाव" या योजनेची मानकरी होण्याचा मान मला मिळणार होता ....... तेव्हा घरच्यांनी मला मराठी जिल्हा परिषद च्या शाळेत घालण्याचा निर्णय घेतला...... कारण मी मुलगी होते ना... मग शिकून काय करणार?? या त्यांच्या किळलेल्या मनोवृत्तीला मी प्रश्नचिन्ह करावं ते माझं वय नव्हतेच...... मी माझ्या शाळेत जायला मिळण्याच्या आनंदात समाजाच्या त्या मानसिकतेत स्वतःला कधीच सामावून घेतलं नव्हतं.... मी मोठी होत होती तसतशी घरच्यांना काळजी वाटू लागली..... शेजारचे तर त्यांचे कर्तव्य विना पगारी पूर्ण करत होते, जणू मी त्यांचीच जबाबदारी असावी.....वेळोवेळी आजी आणि बाबांना ते सांगत असत की.....

शेजारी : "हिला शिकवून काय करणार शेवटी मुलगी, ही लग्न करून दुसऱ्यांच्याच घरी जाणार!!!!"

मात्र आई माझ्या पाठीशी खंबीर होती... कदाचित ती सुध्दा या गोत्यात सापडली असावी ऐके काळी आणि तिने निश्चय केला असावा की, आपल्या मुलांना आपण चांगले आयुष्य देऊ....म्हणून ती नेहमी माझा विरोधातील सगळे डावपेच मोडून काढत असे...... इयत्ता दहावी उत्तम टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्यावर कौतुक करणारी फक्त माझी आईच होती... इतरांकडून मी अपेक्षा करावी त्या आधीच त्यांनी त्यांची दारे बंद केलेली पाहून मी सुध्दा दार ठोठावले नाही......आता प्रश्न होता तो पुढच्या शिक्षणाचा.... त्यात माझ्या लग्नाच्या मुद्द्याला चांगलाच पेट आलेला... परंतु आईंनी निर्णय केला की, "मी माझ्या मुलीला शिकवणार" आणि त्या दिवशी मला आईचे ते दुर्गेचे रुप बघून स्त्रित्वाची जाणीव झाली.... स्त्री खरंच दैवी रुप असते... पण ती एक मामत्वाची मूर्ती सुध्दा असते..पण, जर का कुणी तिच्या अस्तित्वाला मिटवण्याचा प्रयत्न केला तर ती त्यांना ठाम पणे ठणकावून सांगण्यात तत्परही असते....त्यानंतर घरी कुणीच लग्नाचा विषय काढला नाही...मी माझं शिक्षण एम.बी. ए. पर्यंत पूर्ण केलं....मला उपजतच आई कडून व्यवसायी वृत्ती मिळाली असल्यामुळे मला एक व्यवसाय करावा असं नेहमी वाटतं असे....👩‍⚖️ शिक्षण घेतल्यानंतर मी व्यवसाय सुरू करण्याआधी नोकरीतून अनुभव घेण्याच्या विचाराने नोकरीसाठी धडपड करू लागले...... दोन - तीन कंपनीत प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने मी खचले..😓😓😓😓 तेव्हा आईने मला भावनिक आधार देऊन परत नव्या जोमाने लढण्यास प्रवृत्त केले.....परत मी नोकरी शोधायला सुरवात केली....... मला २५,०००/-₹ मासिक पगाराची एका कंपनीमध्ये विवरण पत्र बनवण्याची नोकरी मिळाली........अर्थात तो आनंद गगनात मावेनासा होता..... पहिला पगार मी आईच्या चरणी समर्पित केला.... आईला सुध्दा खूप आनंद झाला हे तिने जरी बोलून दाखवले नसले तरी ती खुश होती, तिच्या लेकीचे यश बघून... पण, म्हणतात ना काही लोकं नेहमीच त्यांची कर्तव्य पार पाडत असतात..... शेजारच्या काही कर्तव्यदक्ष लोकांनी आजी आणि बाबांना भडकवल्यामुळे त्याच क्षणी आई आणि मला परके होण्यास भाग पडले..... आई खंबीर होती ... मला तिचं कमालीचं नवल वाटायचं.... एक स्त्री आदिशक्ती असते हे मी तिच्या कडूनच शिकले होते......तिथून निघाल्यावर राहण्याचा प्रश्नच नव्हता कारण, मी नोकरी करण्यासाठी भाड्याने खोली घेऊनच राहायचे किंबहुना बाहेर रहात असल्याकारणानेच माझ्याविषयी शेजारच्या लोकांचा विश्वास कमकुवत होण्यास सुरवात झाली होती.......एकटी मुलगी जर का घराबाहेर राहत असेल तर ती कधी चारित्र्यहीन होते हे तिचं तिलाच कळत नसतं आणि जेव्हा ती घरी परतते तेव्हा तिला त्या चारित्र्यहीन असण्याचे प्रमाणपत्र सुध्दा अर्ज न करता तिचेच लोकं देत असतात......😟

आई आणि मी घरी आलो आता ती खोली आमचं घर असणार होती....... आईने तिच्या प्रयत्नातून परत त्या खोलीला घर बनवण्यात स्वतःचे जीव वेचले......नंतर माझा एकटीचा प्रवास सुरू झाला...... खूप आनंद होता त्या एकटेपणात......स्वच्छंदी फिरणे......मनाला येईल ते इतरांचा विचार न करता करणे..... यात काय मज्जा असते ते मी अनुभवत होते........कालांतराने मला कंपनी मध्ये त्याच विभागात मुख्य पद देण्यात आले... जबाबदाऱ्या वाढल्याच....पण, त्यातही काही तरी मला चुकतंय, असच सहज वाटायचं.... एकदा आई आणि मी असेच बसलो असता, आईला मी विचारले......

मी : "काय गं, तू जेव्हा माझ्यासाठी खंबीरपणे उभी झालीस तेव्हा तुला भीती नाही का वाटली?"

त्यावर आईने, मला जे माझ्या जीवणाकडून अपेक्षित होते.... पण, ते गवसत नव्हते ते शोधणारे उत्तर दिले.....

आई : "कसं आहे बाळ, तुझ्यात मी स्वतःला शोधते आहे... अगदी तेव्हापासून जेव्हा तू माझ्या या दोन हातात नवजात जीव होतीस आणि माझ्याकडे अपेक्षेच्या कटाक्षाने बघत होतीस.....मी तेव्हाच निश्चय केला होता की, तुला मी इतकं सक्षम करेल की, कुणावर विसंबून राहायचे विचार सुध्दा तुझ्या मनात येणार नाहीत.....आणि बाळ तू जे करत आहेस ते कदाचित तुला चुकीचं वाटत असेलही कारण, तू जे विचार करतेस ते तुला करायचंय.... आणि हे मी आधीपासूनच अनुभवलं आहे पण, तुला नेमके ते वळण्यास उशीर होतोय....हे बघ तुला जे काही करायचे ते तू करावं मला नेहमी हेच वाटतं आणि मला विश्वास आहे एकदिवस माझं बाळ आभाळाच्या त्या क्षितिजापलकडे जाऊन मला तिथून हात दाखवेल आणि सांगेल की, हे बघ मी तुझ्या प्रयत्नांना बळ दिले......"

हे ऐकुन माझा विश्वास आणखी दृढ झाला आणि नंतर मी निर्णय घेतला की स्वतःच काहीतरी नवीन करावं जेणेकरून आपण आपल्या आईच्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकू.....नोकरी सोडणे जमणार नव्हते म्हणून, मी नोकरी करूनच काहीतरी करण्याचे ठरवले.....आणि किरकोळ व्यवसाय करण्यास सूरवात केली.....मी माझ्या बचतीच्या पैशांतून माझ्या घरी एक छोटंसं दुकान लावलं ज्यात मी बाहेरून मसाले आणून तिथे नोकरीच्या वेळेनंतर ते विकायचे.....हळू हळू आईंनी आणि मी आमचा व्यवसाय वाढवला आणि त्याचे रुपांतर व्यापारात झाले.....हे सगळे यश - अपयश सुरू असतानाच काही संकटे आलीच आणि ती संकटे जीवनाचा भाग समजून आई आणि मी उत्तमरित्या पेललं.....दरम्यान कंपनीतील एका मुलाच्या प्रेमात मी पडले होते....तो तिथे व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत असल्याने त्याला उत्तम पगार तसेच घरी तो एकुलता - एक आसल्या कारणाने त्याला कसलाच विचार करण्याचा ताण नव्हता....आणि बाबा उत्तम व्यापारी....त्यामुळे श्रीमंती तर त्याने बालपणापासूनच बघितली किंबहुना तो लहानाचा मोठा त्याच श्रीमंतीत झालेला...... स्वभावाने अतिशय प्रेमळ, दुसऱ्यांचा आदर करणारा, सहिष्णु, माझ्या मतांना समजून घेणारा, आणि त्यातल्या त्यात एक उत्तम नवरा बनण्यासाठी पात्र असाच तो होता......काही दिवसांनी आमचं ठरलं की, घरी विचारणा करायची आणि लग्न करायचं... आधी मी माझ्या आईला कल्पना देण्याचे ठरवले... आणि युवराज ला घरी बोलावले.... घरी कुणी येणार आणि तो ही एक पुरुष हे नवीनच घडणार त्यामुळे आईच्या मनात आधीच शंका आली होती......तिने उत्तम तयारी करून ठेवली होती......युवीला बघता क्षणीच तो तिला आवडला असल्याचा भाव मी तिच्या चेहऱ्यावर बघितला होता आणि अलगद मनात एक सुखावणारा स्पर्श झाला.... स्वतःला सावरत मी त्यांची ओळख करून दिली.... पूर्वकल्पना जरी मी आईला दिली होती तरी युवी ची आईसोबत ती पहिलीच भेट, त्यामुळे माझं मधात असणं आवश्यक होते......आधी त्याने आई सोबत बोलायला सुरुवात केली....

युवी : "आई, मी युवराज श्रीकांत पाटील, मी आणि रेवा सोबतच एकाच कंपनीत कामाला आहोत... आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि हे आधी तुम्हाला सांगावस वाटतं म्हणून आम्ही आज हे ठरवलं की तुम्हाला सर्व सांगून टाकावं माझ्या घरच्यांना यासाठी मी स्वतः विचारणा करेल व मला खात्री आहे ते यासाठी कधीही नकार देणार नाहीत...."

हे एकूण आईचे डोळे पाणावले ते आनंदाचे अश्रु होते...हे मी हेरले होते......त्यांनी माझा हात काहीही विचार न करता युवी ला सोपवून एकच विश्वास दाखवला आणि म्हणाली....

आई : "तू मला आई म्हणालास त्याच क्षणी मी तुझ्या प्रामाणिक इच्छाशक्तीला अनुभवले...तुझ्या इतकं कुणीच माझ्या बाळाला सुखात ठेवण्याचा विचारही मी करणार नाही....सुखी रहा....🥰😘🤗..."

हे बोलून आईंनी त्यांची आसवे पदराने पुसली आणि आम्ही रात्रीच्या जेवणाकडे प्रस्थान केले..... जेवण उत्तम बनले होते.... युवी त्या दिवशी खूप खुश होता.....आता आमच्यापुढे आव्हान होते युवी च्या घरच्यांचा होकार मिळवण्याचे त्यासाठी युवीने आई आणि मला त्याच्या घरी बोलावून घेतले होते....त्याचा प्रशस्त बंगला, नोकर - चाकर बघून मला मनात भीती वाटली की, जर त्यांनी आपल्याला नकार कळवला तर? आणि आपण तर हा विचारच केला नव्हता.... त्यावेळी युवी ने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला.......

युवी : "रेवा मी तुझाच असेल आणि आता या क्षणी सुध्दा आहे त्यामुळे तू काही काळजी करू नकोस...."

आम्ही आत गेलो....त्याची आई एक अत्यंत सुंदर जशी राणी आणि बाबा राजा असा तो जोडपा होता.... त्यांनी युवीला स्वबळावर काही करून दाखवण्यासाठी नोकरी करायला भाग पाडले होते अन्यथा इतकी श्रीमंती की, आमच्या कितीतरी पिढ्या त्यात जगणार होत्या... आम्ही जाता क्षणीच मी त्यांच्या पाया पडले.... त्यांनी दुरूनच आशीर्वाद दिला आणि बसायला सांगितले.....आम्ही बसलो.....त्यानंतर बाबांनी युवी ला विचारले, "काय हीच आपली आवड?" युवी ने एकदम विश्वासाने हो म्हंटले..... त्यावर त्यांच्या बाबांनी सुध्दा आमच्यावर विश्वास दाखवत होकार दिला..... त्यांनी माझ्याकडून माझी मतं जाणून घेण्यासाठी मला काही प्रश्न केले....

युविचे बाबा : "जर तुमची पत्रिका जुळण्यात समस्या आल्या किंवा हे लग्न होण्यात काही बाधा आल्या त्यावर तुझे काय निर्णय असेल...?"

मी : "बाबा माझे मत आहे की, लग्नं ही एक खूप पवित्र गोष्ट असते आणि त्यात पत्रिका बघून लग्न करण्याचा खूप लोकांचा विश्वास असतो....पण आज जग बदलतंय त्यानुसार आपण आपले विचार बदलायला काहीही हरकत नाही.... आज आपल्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणून आपण लग्नच करत नाही... आणि दुसरीकडे त्याच मंगळावर भारताने झेप घेण्याची तयारी दाखवलीय....काही लोकांना खर तर पृथ्वी चे परिवलन आणि परिभ्रमण हेच कळलेलं नसल्या कारणाने ते असे नियम पाळतात ज्याच्या मी तरी समर्थनात नाही....."

माझे हे ठाम मत एकूण बाबांनी एकच गोष्ट युवी ला सांगितली.......

युविचे बाबा : "युवी तू खरंच नशीबवान आहेस पोरा..."

आणि सगळीकडे माझं कौतुक होत होतं...

त्यानंतर आम्ही ठरवले की, खूप खर्चिक लग्नसमारंभ न करता थोडक्यात न्यायालयात लग्न करून लहान पार्टी लग्नानंतर दिली जाईल... त्यानुसार लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही कार्यक्रम ठरवला..... मंडळी जमली...... सगळ्यांना तक्रार होतीच की, त्यांना लग्नात आमंत्रण दिले नाही......आणि लग्न पत्रिकेशिवाय हे सगळ जुळून येणं म्हणजे "चंद्रावरून यान परत येण्यासारखं!" हे लोकांना पचणार नव्हतच मुळी......त्यानंतर कार्यक्रमात कमी लोकांना आमंत्रित केलेलं बघून इतरांना त्यावर आक्षेप होताच..........लोकांना तर हेही वाटून गेलं की, आम्ही अपराध केलाय......कारण आमच्या लग्नात त्यांची उपस्थिती नव्हती...🤦🤷... आता ही नवीनच मानसिकता असते.....लोकांना त्यांचा मान ठेवला नाही की प्रत्येक गोष्टीत चूक दिसते .......ही रीतच आहे दुनियेची.....लग्न पार पडलं पण, मी रडले नाही म्हणून माझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे सुध्दा कमी नव्हते .....🤦😅 त्यानंतर आमच्या सुखाच्या संसाराला सुरुवात झाली...आणि मी रेवा युवराज पाटील झाले.....दरम्यान आमचा मसाले चा व्यापार भरभराटीस लागला होता तो आईंच्या स्वाधीन करून मी आमच्या व्यापारात लक्ष देत होते.......आईन्नाही ते उत्तम जमायचे.....आता आई साठी मी एक घर घेतले होते आई तिथे रहायच्या सगळं कसं अगदी व्यवस्थित सुरळीत सुरू असतानाच ............माझ्या आयुष्यात एक भूकंपाचा धक्का बसला.....युवी!!!!!!.......माझा युवी, आता लग्न होऊन काहीच दिवस झालेले, संसार चांगला राजा राणीचा असतानाच एका अपघातात तो!!!!!.......😭😭😭😭😭😭😭😭😭😭 हे कळताच माझे प्राण जणू त्याच्यासोबत निघून गेले, होते ते फक्त माझे शरीर......तरी मला असं खचून चालणार नव्हते ......मी निर्णय घेतला, युवी ला अग्नी न देता त्याला माती द्यायची आणि तिथे एका वृक्षाची लागवड करून त्याला जपायच अर्थात याची परवानगी बाबांनी मला दिलीच होती.....पण म्हणतात ना जगाची रित निराळी....तिथेही काही लोकं होतेच त्यांनी एकास्वरात बोलावे तसे ते बोलत होते...

"आधी लग्न पत्रिका नाही जोडून बघितली आणि आता मुलाला गिळंकृत केलं सूनेनी......काय बाई ही पोरगी अशी कशी कुलक्षिनी ही.... नवऱ्याचा अंतिम विधी सुध्दा नाही करू म्हणते....आणि त्याला गाडायची भाषा करते.......पाप लागेल हिला....."

त्यांचे बोलणे सुरूच होते......पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते कारण मी किंवा युवी कधीच अंधश्रद्धा पाळण्यात विश्वास ठेवत नव्हतो आणि मी भाग्यशाली की माझे कुटुंब एक सज्जन होते......कालांतराने मी त्या घरची मुलगी म्हणून सर्व बघायची .....आई बाबा आता माझी जबाबदारी याची जाणीव मला लग्न होत्या क्षणापासून होतीच.......पण काही लोकं बोलतच असतात म्हणून आपण जर का आपले निर्णय बदलू तर मग आपण मानसिक गुलाम बनतो.......या माझ्या जीवनात मला माझी माणसं मिळाली ज्यांनी माझे विचार जपले.....त्यांची मी मनापासून आभारी आहे.... आणि तुम्ही कितीही चांगलं केलात तरी लोक तर बोलणारच ... शेवटी जगाची रीतच निराळी........🤷 मी आता उत्तम व्यवसायी स्त्री आहे ज्यासाठी मी स्वप्न बघितले होते... आणि सोबत आपल्या कुटुंबाचा भार पेलणारी उत्तम मुलगी सुध्दा.....माझ्या लग्नाचा विचार सुरू आहे आई बाबा आता माझेच आहेत त्यांची अशी इच्छा आहे की, मी आयुष्याची नवी सुरुवात करावी....पण अजूनही हे हृदय युवी साठी धडधडत आहे....❤️👩‍❤️‍👨
.........