FB......LOVE....??? books and stories free download online pdf in Marathi

FB......LOVE....???

बारावीचे पेपर संपले आणि लगेच घरच्यांनी, फोन घेऊन दिला ....... नशीब बारावीत योग आला.....😝.... नाहीतर, घरचे बोलत होते..... "ग्रॅज्युएशन कर नंतर घेऊन देऊ"....🤷😓😓....... म्हणजे, तेच झालं ना..... टिक टॉक असताना व्हिडिओ नको बनवू अस घरचे म्हणतील....... आणि मग काय.... तर, भारतात ते ऍपच बंद होईल....😂🤷

तर, चला मग माझ्या नव्या फोनची ओळख करून देते..... घेतला चांगला एम. आय. चा फोन..... जरी, आता चीनच्या वस्तू बंद केल्या असल्या तरी, भारतात मात्र हेच फोन दिसतात सगळीकडे........ कारणही तेच, स्वस्त आणि मस्त..... ( फुकटचा सल्ला..... जर, भारताला कुठल्याही वस्तू बंद करायच्या असतील तर, आधी बघावं......🧐🧐 की, त्याचा पर्याय आहे का....?? जेणेकरून जनता संतुष्ट होऊ शकेन.....असो...😂🙏 सवयच आहे मला अस मधात काही तरी टाकण्याची..... आवड नसल्यास कंसातील भाग वगळावा हीच आर्त हाक....😓🙏 कृपया कमेंटमध्ये व्ययक्तीक मतावर प्रतिक्रियात्मक भाव दाखवू नये....🙏😓...... ✍️ नोंद असावी ✍️ )

तर, नवीन फोन म्हटलं की, जरा जास्तच उत्साह येतो......🤗 नाही का.....!😂 म्हणून, मी ही त्याला अपवाद नव्हते.... जरी, १२ वी मध्ये चांगले गुण मिळाले असले....... तरी, मी एक मनुष्य प्राणी आहे हो....!! किती वेळ मोहातून सुटू शकते.......🥰 नाही का...??😜 म्हणून, झालं मग सुरू आपलं व्हॉट्स ऍप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम जितके सोशल मीडिया असतील सगळ्यांनी फोनचे पोट भरून झाले.....😁😁

मग, हळूहळू नवीन फ्रेंड्स बनत गेले..... मजा यायची..... अनोळखी व्यक्ती आपली तारीफ करतो......पण, काही विचित्र कुणी बोलला की, सरळ ब्लॉक करायचे........ किती भारी फिलिंग असते ना..... आणि मग, कितीतरी तास असेच घालवू लागली.......⏳ भान नव्हते जेवायचे, ना अभ्यासाचे ना कुठल्याच गोष्टीचे......🥴 फक्त आणि फक्त...... एकच.... ते म्हणजे सोशल मीडिया अपडेट्स...... पण, विनाकारण मी कधीच प्रतिक्रिया दिली नाही..... का उगाच वाद अंगी पाडून घ्यायचा.....नाही का....?? आणि मग तो वाद सांभाळायला आपण एखादं सेलिब्रिटी नाही ना....!!😜 असो.....😂 (जोक होता....😝)

मग, एकदा सहज बोलता - बोलता..... एक न्यू फ्रेंड रिक्वेस्ट आली.......

Mr. King........

🧐🧐 मी एकदम शॉक..... अस नाव, कोण ठेवत असतं यार ..😂😂.... ठेवायचं आहे तर, इतकी नाव आहेत..... ती ठेवा की.... असो.... मी ती रिक्वेस्ट इग्नोर केली..... मग मला त्याच आयडी ने एक मेसेज आला.....

Mr. King : "Hey...... Hi......Buddy....✌️"

मी परत तो डायलॉग बॉक्स इग्नोर केला आणि त्याला क्लोज करून माझ्या दुसऱ्या, ओळखीतल्या, मित्र - मैत्रिणींशी बोलू लागले.....

Mr. King : "Hey..... Why you are ignoring me....🤷🤷..... I just wanted to talk to you babs...."

मग माझं डोकं फिरलं......

मी : "Hey....... Who the hell are you......🤬"

Mr. King : "Hey........ Dude relax...... Just calm down....... I know you......✌️😘"

मी : "How dare you to send me this type of emojis.......🤬"

Mr. King : "Ok.....🤐"

मी : "..🤬🤬"

Mr. King : "अरे..... आता मी काय बोललो तुला..... विनाकारण, शिव्या देणारे ईमोजी कशाला पाठवतेस.....😕"

मी : "(मराठी बोलतोय म्हणजे कुणी महाराष्ट्रीयन असावा....🧐...... ह्म्मम..... ओळखीचा असला पाहिजे.....🤨🤨) कोण आहेस तू?? तुला मराठी येते....!?🤨"

Mr. King : "हो....... आणि तुला ओळखतो सुद्धा....😁😁"

मी : "( कोण असेल....मुलगीच असेल....... कदाचित, माझी मस्करी करत असेल..... ह्म्म्म्म..... मी पण, मजा घेते मग.....😁) हो का..... मग सांग मी काय करते सध्या....🤨"

Mr. King : "तू मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स मध्ये आहेस ना कॉमर्स स्ट्रिम...... फर्स्ट इअर अजून काही.....🤨"

मी : "तुला कसे माहिती.....😕"

Mr. King : "मी बोललो ना सगळं माहितीये मला....😁😁"

मी : "चल बाय...🥴"

Mr. King : "अग काय झालं.....बोलशील....😕 वाईट वाटलं का..?? अग..... ठीक आहे बाय....उद्या बोलू...."

मी मात्र रात्रभर विचार करत लोळत होते......कोण असेल? आपल्याला कसा काय ओळखतो...??🧐 वगैरे प्रश्नांनी डोकं भरलं...... किचनमध्ये जाऊन कॉफी घेतली आणि त्याच विचारात झोपी गेली.....😴😴😪

सकाळी......

कॉलेजसाठी तयार होत होते..... पण, फोन न्यू म्हटलं की, हातातून सुटत नसतो.....😁😂 म्हणून हातात फोन घेऊनच तयारी सुरू......🤳

आई : "ये ग झालं असेल तर...... फोन घेतला तेव्हापासून त्यातच डोकं आहे हीच..... एका कामात लक्ष नाही.....🤷 ये नाहीतर मी आली की, फोन आणि थोबाळ दोन्ही फुटतील.....😡"

मी पळतच रूम बाहेर गेले.....😓 फोन फोडून घेण्याची हाउस माझी नव्हती...... नाहीतर आमच्या मातोश्री त्यातच एक्स्पर्ट.....😁😂🤷🥴

मी लवकर - लवकर नास्ता करून कॉलेजसाठी बाहेर पडले.....

मी : "येते ग.....🤳"

आई : "डोळे नीट सरळ ठेऊन चल..... आणि तो फोन बॅगमध्ये टाक आधी...... नाहीतर, पडशील तोंडाच्या भारावर.....😡 कालपासून बघतेय...... हिला...... कशातच तिचं लक्ष नाही...... धड जेवण नाही..... बाबांना येऊ दे हिच्या, सांगतेच त्यांना........ पण, त्यांनाही सांगून काय....🤷 घेऊन देणारे तेच ना..... जाऊदे बाप - लेकी दोघेही तसेच.....😓"

आई पुटपुट करत काम करत होती....... तीची ही बडबड रोजचीच होती........ म्हणून, मी बॅगेत ठेवलेला फोन काही अंतरावर जाऊन बाहेर काढला आणि त्यात डोकं खुपसून जात होती.....

@@@ : "ओ...... मॅडम...... जरा बघून चला की..... मोबाईलमध्ये लक्ष तुमचं...... रस्त्यावरून कुठून जाताय हा तरी भान असू द्या की....😠😠"

मी : "अरे....जा की.... कशाला सकाळी - सकाळी डोक खराब करून घेतोस..... चुकी झाली..... जा आता....."

तो बरडत पुढे गेला आणि मी माझ्या रस्त्याने डोकं मोबाईल मध्ये खुपसून....😂🤦🤦

कॉलेजला पोहचून सुद्धा धड लक्ष नव्हत.....🤦 सतत त्या फोनकडेच लक्ष..... कुणाचा मेसेज तर आला नसेल ना.....? कुणी कॉल तर केला नसेल ना???....🙄🙄

कॉलेज सुटले आणि मैत्रिणींनी पार्टी मागितली...... त्यांना पार्टी द्यावीच लागत होती..... नाहीतर पाठीवर धपाटे देत.....😂😂

पार्टी देऊन, मी माझ्या घरच्या रस्त्याने निघाली..... कॉलेज जवळ असल्याने पाई प्रवास होता.....🚶

परत नोटीफिकेशनचे टोन वाजले आणि मी चेक केलं...... त्याच आयडी वरून मेसेज होता......

Mr. King : "Hey...... आज छान दिसत होतीस.....🥰"

मी : "तुला कसं कळलं....🙄"

Mr. King : "मला सर्व कळत....😁"

मी : "अतिशहाणा त्याचा बैल रिकामा...🥴"

Mr. King : "काय.....?🤨"

मी : "काय? काय?.... माझे पाय....😝"

Mr. King : "जाम कॉमेडियन आहेस हा तू......😝😝"

मी : "हॅलो..... कॉमेडियन काय कॉमेडियन इथ....मी काय तुझं एंटरटेनमेंट करते, अस वाटतं का....🤨🤨🙄😡🤬"

Mr. King : "तसं नाही ग बाळ......😘😘"

मी : "मी काय लहान आहे का..... बाळ म्हणायला..... आणि तुला सांगितल ना हे असले...... ईमोजी पाठवू नकोस.... तेच ईमोजी फेकून मारेल तुला......😠"

Mr. King : "चला...... त्याच बहाण्याने तुझा स्पर्श तर होईल......🥰"

मी : "काय नीच माणूस आहेस..... लाज वाटत नाही अस बोलायची......😠"

Mr. King : "कसली लाज जीला मी पसंत करतो..... तिचा स्पर्श तर मला हवासा वाटेल ना..... मग जर, हे मी बोलून दाखवलं तर, काय चूक केली.....🤷"

मी : "थोबाळ बघ आधी स्वतःच...... मग मला पसंत करशील....... कळतंय ना.....😠 काळया तोंडाच्या.....😡"

Mr. King : "Hey........ Love you na....😘"

मी : "तुला कळतंय ना....... तुला ब्लॉक करणार आहे आता मी....😡😠🚫"

मी त्याला ब्लॉक केलं....... काही दिवस, फेसबुकवर मी माझ्या जवळचे फ्रेंड्स, ज्यांना मी ओळखत होती....... त्यांच्याशी बोलत होती..... एकदा कॉलेजमध्ये माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितले.....

मैत्रीण : "अग ऐक ना........ मला ना माझ्या फेसबुक फ्रेंडने डेट वर बोलावलंय...... चल तू पण, तो बोलला फ्रेंडला घेऊन ये....."

मी : "नको ग तूच जा.....कोण आहे कोण नाही....तो....🙄"

मैत्रीण : "अग चल ना........ हे बघ तू आलीस नाही...... तर, मी बोलणार नाही तुझ्याशी.....🤐"

मी : "अग ये...... काय तुझं.... ठीक आहे..... पण, नाव काय त्याच....🤨"

तिने मला तोच आयडी दाखवला.....मी शॉक झाले..... पण, रिअँक्ट केला नाही.... कारण, आता मला माहिती पडणार होते हा नक्की आहे कोण....??🧐🧐

मी : "बर कुठे भेटायचं ठरलं....??"

मैत्रीण : "ते क्वीन्स हेलेना रेस्टॉरंट आहे ना तिथे..... मी तुला पीक करणार..... रेडी रहा...... सायंकाळी @ ०६:००..... ओके.... चल..... मला पार्लरमध्ये जायचयं..... थोडी तयारी करते ना...... चांगली दिसायला हवी मी......🥰"

मी : "बाय.....🥴🥴"

मला कळत नव्हते ही इतकी का खुश होतीय......पण, हे मला पुढे कळणार होते....🧐

आम्ही ठरलेल्या वेळी.....ठरलेल्या ठिकाणी पोहचलो.....😎 आम्ही आधी पोहचलो........ नंतर मागून दोन बॉईज आले.......

@@ : "Hey.......Hi......Girls.....😎😘"

दोघेही खूप जास्त वयाचे होते..... साधारण २८ - ३०...... मी बघूनच शॉक झाले...... तो माझ्याचकडे बघत होता..... माझ्या मैत्रिणीने ओळख करून दिली..... त्याने हात मिळवण्यासाठी हाथ पुढे केला..... मी दुरूनच नमस्कार केला......🙏

Mr. King : "...🤨🤨🤨🤷"

मी : "अनोळखी माणसांशी हात नसते मिळवत मी.....😎🙏"

Mr. King : "असू दे...... हात जोडून, पाया पडायची वेळ येईल लवकरच.....😁😁😏😏"

मी : "काय बोललास.......🤨"

मैत्रीण : "अग जाऊदे ना काय तो असाच मस्करी करतो..... चला कोण - कोण काय ऑर्डर करेल..??.....🙄"

सगळ्यांनी त्यांच्या आवडीच्या वस्तू मागवल्या.....आणि एन्जॉय केल्या.......आणि घरी जायच्या वेळी..... तो मैत्रिणीला जास्तच कवटाळत होता..... मला त्या दोघांच्या, जवळ असन्याची कल्पना आलीच..... पण, इतके जवळ असतील याच्यावर विश्वास बसत नव्हता..... कारण, माझी मैत्रीण, कधीच कुणाच्या प्रेमात पडली नव्हती..... ते दोघे निघून गेले.... मी आणि माझी मैत्रीण सुद्धा घरी निघून आलो......

मी माझे रात्रीचे जेवण वगैरे आटोपून, माझ्या रूममध्ये येऊन बेडवर पडले.......😓 नोटीफिकेशन टोन परत वाजला......

मी माझा फेसबुक अकाउंट बघितला...... एका वेगळ्याच आयडीचा मेसेज होता..... मी तो ओपन केला...... आणि माझे डोळे.....😲😲😲😲😲😳😳😳😳😳

कारण, त्यात अस काही होतं ज्याने माझी आणि माझ्या मैत्रिणीची झोप उडणार होती......😠

त्यात माझ्या मैत्रिणीचे काही आक्षेपार्ह फोटोज् होते.... जे की, खूप जास्त संवेदनशील होते......मी लगेच तिला ते फोटो डाऊनलोड करून व्हॉट्स ऍप केले...... तिचा लगेच कॉल आला......

मैत्रीण : "....😭😭😭 कुणी केलं हे..... 😭😭😭"

मी : "अग थांब रडू नकोस...... मला त्या तुझ्या मित्राने काही दिवसांआधी..........#@@@@###"

मी तिला आजपर्यंत घडलेलं सर्व सांगितल.....

मैत्रीण : "अग पण, आता मी काय करू..... माझी इज्जत घालवली त्याने.....😭😭 मी तर कधीच अश्या कुठल्याच फोटो त्याला पाठवल्या नव्हत्या....... मग हे घडल कस???....😭😭"

मी : "तू त्याचे आणि तुझे, जे मेसेज आहेत......
ते डिलीट नको करुस.... मी बघते काय करायचे....ओके आणि रडणं बंद कर..... आता तो रडेल....😎😡😡🤬🤬"

मी त्याला मेसेज केला.....

मी : "😡🤬 असले धंदे करायला लाज कशी वाटत नाही रे.....🤬"

@@ : "अरे डार्लींग चिडू नकोस.....आजच भेटलीस आणि इतकी का चिडतेस...... "

मला कल्पना आली तो दुसरा - तिसरा कुणी नसून तोच Mr. King...🤬🤬😡 हे सर्व करतोय....😡🤬🤬

मी : "काय हवंय तुला.....?? हे सर्व का करतोय तू....🤬😡"

Mr. King : "तू हवी आहेस मला..... तू तुझे मला असे फोटोज् पाठव..... नाहीतर, मी हे फोटो व्हायरल करेल.....😁😁😁."

मी : "......😡🤬 तुला मी काय मूर्ख वाटले का.....तुझ्या तालावर नाचायला......असेल माझी मैत्रीण मूर्ख...... म्हणून, फोटो सेंड केले तुला.... तू बघच आता.... तुझी कशी वाट लागते.....🤬😡 चुकीच्या वाघिणीला डीवचलं तू...... बघच...... आणि काय करायचं कर तू...... मग मी काय करते ते बघ......🤬😡🤬🤬🤬"

मी लगेच माझ्या एका मित्राला फोन केला जो की, अश्या एडिटिंग बद्दल जाणकार होता......त्याला बोलावून घेतले...... तो आला आणि त्याने सांगितले की, फक्त मैत्रिणीचा चेहरा वापरलाय आणि बॉडी दुसऱ्याच कुणाची लावलीय..... मोर्फिंग केलाय फोटो.....असे खूप प्रकरण होतात..... मी अश्या प्रकरणाबद्दल ऐकून होतेच पण, माझ्यासोबत घडताना बघून शॉक होते..... कारण, माझी मैत्रीण ज्या नात्याला प्रेम समजून बसली होती...... ते तर अगदीच खोटं निघाल.....🤬😡

आम्ही लगेच सगळे पुरावे सायबर सेल ला देऊ केले.... आणि आरोपीला लवकरच आय. पी. अॅड्रेसने ट्रॅक करण्यात आले....... आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत दंडात्मक शिक्षा करण्यात आली......

त्या प्रकरणानंतर मी....... F 🅱️...🙏🙏 ठोकला.....☝️😓😓😓

जे ओळखीचे मित्र - मैत्रीण आहेत त्यांच्याशिवाय, कुणाशीच जास्त बोलायचे नाही..... आणि फोटोज् तर कुणालाच पाठवायचे नाही हे ठरवले........ माझी मैत्रीण त्या घटनेने आतून खूप दुखावली गेली होती..... आणि तिची मानसिक स्थिती बिघडली होती...... मी तिला त्यातून बाहेर येण्यात मदत केली.....

सोशल मीडिया खरंच आज एक समांतर लाईफ स्टाईल बनलीय......आज जर तुमचं सोशल मीडिया अकाउंट नसेल तर, चक्क तुम्ही "वाळीत" टाकले जाता..... किंवा तुम्ही जर कुणाला त्याच्या वाढदिवस निमित्त स्टेटस ठेऊन शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणजे तुम्ही "गावठी" होऊन जाता.....☝️☝️😓😓

तुम्ही अपडेटेड आहात, हे तुम्हाला त्यांना पटवून द्यावं लागतं......मग तुम्ही एखाद्या महापुरुषांची जयंती वा पुण्यतिथी विसरला तर चालतं...... पण, "रसोडे मे कोण था?" हे जर का तुमच्या लक्षात नसेल.... तर तुमच्यावर, हसलं जातं...... कारण, माझ्याच बाबतीत हे घडलंय...... मला हा काय प्रकार सुरू होता माहिती नव्हती आणि माझ्या मैत्रिणी फोनवरून मला..... वारंवार तसं म्हणायच्या......"खुशी, रसोडे मे कोण था?"

मला ते कळत नव्हते.....🙄🙄 कारण, मी सोशल मिडीयावरील व्हायरल पासून लांबच असते.....वेळच नसतो म्हणा ना!!😓😓☝️पण, मग, माझी बुद्धी कशी कुचकामी हेच दाखवण्याचा त्या प्रयत्न करीत.....आणि माझ्यावर हसत...... असो.....😓

तर, सोशल मीडिया लांबूनच बरा...... रील लाईफ जर, का आपली रियल लाईफ झाली.....तर, मग आपल्याला आपणच वाचवू शकतो आणि त्याचे एकमेव मार्ग म्हणजे......👇👇

सोशल मीडियाचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडू न देणे......🙏😎


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED