maitry ek khajina - 27 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 27

27

..
..

.

.

..
..

महिना पालटून गेला होता....

सगळेच मन लावून आपलं आपलं कामं करत होते

ऑफिस चे तीन डिपार्टमेंट वाटून देण्यात आले होते

अभिजित आणि मानसी मेन डिपार्टमेंट सांभाळत होते

सान्वी आणि अविनाश टूर्स आणि ट्रॅव्हल्स चे डिपार्टमेंट सांभाळत होते

अनुश्री आणि सुमेध अकाउंट्स चे डिपार्टमेंट सांभाळत होते

आणि सावी रिसेप्शन वरील कामकाज बघत होती

जो तो मन लावून कामं करत होता

अगदी वेळेच काही पडलेलं नव्हतं

एका शनिवारी अभि चे डॅड सान्वी च्या घरी आले

सगळे बऱ्याच दिवसांनी एकत्र असे निवांत बसले होते

अनुराग काका म्हणाले कि आता मुलांचा साखरपुडा करून टाकुयात
लग्नाचं पुढे बघूया मग

आपले मोठे मंडळी काही शांत बसू शकत नाही

अधून मधून बॉम्ब फोडतच राहतात

अनुश्री चा तर डॅड बोलणं ऐकून चेहराच पडला
अचानक टेन्शन आलं
आता कसलं ते तर अनु ला च माहिती होतं
जणू कोणतीतरी गोष्ट तिला खटकते आहे पण ती शांत बसली.

सुमेध चे बाबा म्हणाले हो मला ही वाटतं
फक्त एकदा सान्वी च्या मम्मी पप्पांशी बोलून घेऊ मग ठरवू

आपल्या ह्या महान गँग ला सिनियर सिटिझन्स नि बोलूच दिले नाही

मग काय गप बसण्याखेरीस दुसरा पर्याय नव्हता

अनुराग काका सुमेध च्या वडिलांना म्हणाले .....

आम्ही उद्या आश्रमाच्या कामासाठी पुण्याला जातोय तर तू आणि वहिनी पण चला सोबत

तेवढंच चेंज रे ......

हो ठीके रे जाऊया ना नक्की

थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून
जेवण वैगेरे करून जो तो आपापल्या घरी निघून गेला ....

अनु घरी आल्यावर पटकन रूम मधे निघून गेली

अभि ला आधी थोडं विचित्र वाटलं पण नंतर त्याला वाटलं कि अवी ला कॉल वैगरे करायचा असेल तर

म्हणून गेली असेल बहुदा ....

तो पण रूम मधे निघून गेला

..
..
..
.


अनु इकडे रूम मधे एकटीच स्वतःशी बडबड करत होती

यारं डॅडा नि अचानक हे साखरपुड्याचं काढलं

आता जे काही करायचं लवकर करावं लागेल

पण काय करू मी आता

दादू परत तुझ्यावर ती वेळ नाही येऊन द्यायची रे काय करू मी कोणाची मदत घेऊ

😟😟😟😟😟

एकदा घड्याळात बघत तिनी फोन चेक केला आणि कोणालातरी कॉल केला
..
..
.

हॅलो हाय अरे अनु बोलते आहे

........

ऐकणं अरे तुला उद्या एकाठिकाणी यायला जमेल का
मी ऍड्रेस मेसेज करेल

........


हो अनु मी नक्की येईल पण बाळा तू अजिबात पॅनिक नको होऊस ग मी आहे ना

डोन्ट वरी

.......


थँक्स यार आणि ऐकणा सौम्या ला पण घेऊन येशील का प्लीज

......

हो ठीके पण तू अजिबात टेन्शन नको घेऊस
आणि आता शांत झोप आपण उद्या बोलूयात
मी आहे ना बाळा तू का एवढी टेन्शन घेते ए
अभि ला काही नाही होणार

.......

हो रे तू आहे ना

मला थोडं टेन्शन आलाय पण
दादू ला काहीही करून वाचवायचं आहे
परत जुना अभि नको रे ....

........


अनु काहीच होणार नाही
Be strong girl ....... ☺️
आणि अनु ऐकणा ग .....

हा बोलना


मला ना सान्वी ची माफी पण मागायची आहे ग
ती बोलेल का माझ्याशी
प्लीज तू सांगशील ना तिला .....

हो आपण उद्या तिच्या घरीच भेटणार आहोत
आणि तू काहीही चूक नाही केली
आणि सानू किती चांगली हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाही ए

हो ग ते पण आहेच
ठीके उद्या भेटू आपण
उद्या काय ते फायनल करू


हो ठीके चल बाय .....

हो हो बाय ....


( काय वाटतं तुम्हाला आपली अनु कोणाशी बोलत असेल

आणि नक्की काय चाललंय तिच्या डोक्यात

आणि कोणापासून अभि ला वाचवायचं आहे

आणि कोण होता तो ज्याला सान्वी ची माफी मागायची ए

तूर्तास हे प्रश्न बाजूला ठेवुयात बघूया आता अनु काय करतेय ......... )


..
..
..


अनु फोन ठेऊन रूम मधे फेऱ्या मारत होती

काहीतरी विचार करून ती अभि च्या रूम मधे गेली

दादू कामात आहेस का नंतर बोलूयात का

तो लॅपटॉप वर कामं करत होता म्हणून तिनी विचारलं

नाही ग पिल्लू येना तू .....

अनु त्याच्या समोर जाऊन बसते

बोल परी काय बोलायचं ए

काय दादू आज जास्त खुश ए वाटतं
परी वैगेरे

नाही ग पिल्लू सहजच बोललो
आता माझं पिल्लू मोठं झालं ना
तो तिचे गाल खेचत म्हणाला
आता काय बाबा लग्न वैगरे ठरलं ना

काय रे दादू ..... 🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

बघ ना पिल्लू असं वाटतं आत्ता काल पर्यंत कॉलेज ला घ्यायला यायचो तुला

घरी येता ना लहान मुलासारखी हट्ट करायची

दादू हे घ्यायचं ए ते हवं ए

आणि आता थोडे दिवसात लग्न होऊन जाशील
अभि ला बोलताना भरून आलं होतं

अनु नि त्याला मिठी मारली आणि म्हणाली

ए दादू असं असेल तर मी नाही करत लग्न बाबा जाउदे
मला तुझ्या सोबतच राहायचं ए


ए शहाणे अवी नि ऐकलं तर काय म्हणेल वेडाबाई ..... अभिजीत

मग दादू तू रडू नको ना मला चांगल नाही वाटत ए ...... अनुश्री

नाही ग पिल्लू नाही रडत ए मी

बर ते जाऊदे तुला काहीतरी बोलायचं होतं ना
काय म्हणत होतीस बोल

हा अरे बर झालं लक्षात दिलस

दादू मी तुला बोलले होते ना कि सावी शी लग्न करण्याआधी परत एकदा विचार कर
मग तू काय ठरवलं आहेस

अनु काय झालंय आज अचानक काय आठवलं तुला पिल्ल्या

दादू ते डॅड नि आज अचानक साखरपुड्याचा विषय काढला ना म्हणून

मग तुला काय वाटतं अनु मी काय करावं

दादू मी सांगितलं तर खरंच ऐकशील का तू ..... ???

हो बच्चा नक्की ऐकेल बोल तू

दादू तू प्लीज सावी शी लग्न नको ना करू प्लीज

😭😭😭😭

ठीके मी नाही करणार लग्न आधी तू रडू नकोस चूप एकदम

दादू ते ......... 😭😭😭


अनु शांत हो बाळा दादा ओरडेल हा मग तुला चालेल का

नाही सॉरी पण तू प्लीज नको ना करुस हे लग्न प्लीज
मी हात जोडते

🙏🙏🙏🙏🙏🙏


पिल्लू वेडी आहेस का हात काय जोडते
ठीके मी नाही करत आहे सावी शी लग्न ओके
पण प्लीज रिझन सांगतेस का .....??


दादू उद्या आपण सगळेच सानू दि च्या घरी भेटूया ना सगळं काय ते तेव्हाच सांगेल
आत्ता नाही सांगू शकत मी काही प्लीज दादू

ओके बच्चा पण उद्या पक्का सांगणार आहेस तू

हो दादू नक्की सांगेल
पण दादू एवढं ऐक माझं प्लीज
त्यानंतर मी काहीच नाही मागणार
कोणताच हट्ट नाही करणार पण प्लीज

हो हो ठीके मी हो म्हणालो आहे ना आता
ठीके मग शांत हो
आणि बाकीचं आपण उद्या बघू काय ते आता तू झोपायला चल

दादू अरे पण ......

दादू वैगेरे काही नाही बच्चा दादू ला खूप कामं आहे
आता ते करू दे ना

ओके दादू

अभि तिला रूम मधे सोडायला येतो

दादू झोप नाही येत ए ना मी थोडा वेळ बाल्कनी मधे बसू का

अजिबात नाही पिल्लू मी आहे इथेच झोप पटकन सकाळी मॉम डॅड ला जायचं ए ना ग

झोप ......

तो तिला बेड वर झोपवतो ....

अंगावर पांघरून घालतो आणि आणि थोडावेळ थापटतो .....

दादू तुला कामं ए ना .....

पिल्लू झोप आता मी जातोय थोड्यावेळात

ओके दादू .....

अनु त्याचा हात घट्ट पकडून झोपी जाते

अभि स्वतःशी च विचार करत होता

पिल्लू कधी एवढी मोठी झालीस ग

किती विचार करते

आणि अचानक असं का बोललीस

काही समजत नाही ग परी

तशी माझी गुड गर्ल आहेस तू

नक्की काहीतरी सिरीयस रिझन आहे

जे तुला शांत बसू देत नाही ए

ठीके उद्या पर्यंत वाट बघतो

आणि नाही करणार मी सावी शी लग्न

बिचारी माझी पिल्लू सांगताना पण रडू येत होतं तुला

आजपर्यंत कधीच कोणत्याच चुकीच्या गोष्टी साठी हट्ट नाही केलाय बच्चू तू


अनुच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तिच्याशी कपाळावर ओठ टेकवले

हलकेच तिच्याशी हातातून हात सोडवून घेतला

आणि पांघरून नीट केलं

रूम चे पडदे व्यवस्थित बंद केले

AC च temperature सेट केलं आणि रूम च दार ओढून आपल्या रूम मधे निघून आला

लॅपटॉप बंद करून तो बेड वर बसला

आत्ता विचार करण्यात काहीच अर्थ नाही ए
अनु चुकीचं नक्कीच काही करणार नाही

जाऊदे उद्याच बघू काय होईल ते ......

रूम च्या लाईट्स बंद करून तो झोपी गेला ....


..
..
.
.
.....
...
...
.....

..
.
..
.
.
.
.
.
( पुढे अजून काय वाढून ठेवलं आहे देव जाणे

पण ही नक्कीच वादळापूर्वीची शांतता आहे

अनु कोणाशी फोन वर बोलत होती आणि आता ही सौम्या कोण.... 🙄🙄🙄

नक्कीच काहीतरी होणार आहे पण काय ते बघूया पुढील भागात

सगळ्या प्रश्नांची उत्तरे बघूया पुढील भागात ..... )


.
.
.
.
.

.
.

( तो पर्यंत नक्की सांगा कथा कशी वाटली

आणि प्लीज रेटिंग्स आणि कंमेंट्स मधून नक्की सांगा काय आवडतंय काय नाही

त्याशिवाय आम्हाला कसं समजणार

प्लीज कंमेंट्स करायला कंजूसी करू नका

त्यामुळे मला समजेल कि काय चुकतं आहे काय आवडत आहे .....


आणि काही चुका असतील तर समजून घ्या प्लीज ..... )


..

.


.
..
..
.

.
.
.


...


सगळ्यांनी खुश राहा आणि सेफ राहा ........ 🤗

...
..
.
..
.

.
.

.
.
.


.
...


आत्ता साठी बाय बाय ............ ☺️🙂.
..
...
...
..
....
.....

....
....
.


..

- सुकन्या जगताप ........ 😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED