मैत्री : एक खजिना ... - भाग 29 Sukanya द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

मैत्री : एक खजिना ... - भाग 29

29


..
...
...
..
...
...
..
...
...
..

तर मिस सावी कुलकर्णी आपण स्वतःहून चूक मान्य करून खरं काय ते सांगताय

कि मी अजून इज्जत काढून तुझी लायकी दाखवून देऊ

बघ म्हणजे तुझी इच्छा सांग आता काय करायचं ..... ??? ...... अनुश्री

ए अनुश्री तोंड सांभाळून बोलायचं हा खूप बोलतेय ...... सावी

ए शहाणे एक तर आवाज खाली आणि अजून तरी मी काहीच बोलले नाही ए
तर तुझ्या भल्याच हेच आहे कि तू बऱ्या बोलण्याने सांगून टाक कि
एवढी चिप का वागतेस
नाहीतर मग मी बोलले कि तुला झोंबतं

ए तुझ्यातर खूप बोललीस हा असं म्हणून सावी तिला मारायला उठते तर सान्वी ने तिला अडवलं
आणि म्हणाली
सावी शांत हो अग काय करतेय .....
तर सावी सान्वी ला म्हणाली

ए तू चांगुल पणा चा आव आणू नकोस तुझ्यामुळे सगळं होतं असं म्हणून ती सान्वी ला ढकलून देते

या मुळे सान्वी ला टेबल चा कोपरा डोक्याला लागतो आणि सान्वी च्या डोक्यातून रक्त येत

हे पाहून अभि सावी काही बोलणार तोच सानू म्हणते

नाही अभि थांब बोलू दे तिला थांब .....

सावी म्हणते हा ऐकायचं ना तुम्हाला सगळ्यांना ऐका मग

हो अनुश्री म्हणते ते सगळं खरं ए

इकडे सुमेध चा जीव खाली वर होत होता कारण सानू च्या डोक्यातून खूप रक्त येत होतं .... 😣😣😣😣

सावी बोलू लागली

सगळं सान्वी मुळे होतं ती नेहमी माझ्या आयुष्याची वाट लावते

खूप राग ए माझा तिच्यावर अगदी कॉलेज पासून

मला सुमेध खूप आवडायचा पण त्याला तर सान्वी शिवाय दुसरं काही दिसायचं नाही

आणि ही मुर्ख तर लहान बाळा सारखं सांभाळायची त्याला

त्याचा राग, त्याचे नखरे, अगदी सगळंच

नेहमी माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची ही

नंतर सोहम नि मला प्रोपोज केलं

तर तोही हिचाच दिवाना होता

प्रेम माझ्यावर करायचा पण विश्वास सान्वी वर जास्त

कायम सान्वी किती हुशार आहे
किती समजूतदार आहे
मॅच्युअर्ड आहे
सान्वी हे, सान्वी ते
सान्वी अशी, सान्वी तशी

खरं तर प्रेम कधी नव्हतंच त्याच्यावर माझं मग काय सोडून दिलं त्याला

बाकीचे काय आई वडिलांचा पण माझ्या पेक्षा सान्वी वर जास्त जीव
सगळ्यांना सान्वी खूपच जास्त आवडायची
असं काय आहे हिच्यात काय माहिती

ती सुमेध आणि सगळ्या मित्र मैत्रिणींना सोडून इकडे आली होती तेव्हा खूप आनंद झाला होता
पण नशिबाने परत सुमेध भेटला

मला वाटलं होतं आता तरी मी सुमेध ला सांगेल कि मला तो आवडतो पण नाही त्या आधीच याचं लग्न जमवलं घरच्यांनी

मग मी विचार केला अरे सुमेध पेक्षा तर अभि जास्त श्रीमंत ए

पण इथे पण तेच ह्याचा सान्वी वर च जास्त जीव

हा तर हा
ह्याची बहीण पण तशीच सारखी सान्वी च्या मागे पुढे
मी होणारी वहीणी होते पण कधी मला तशी वागणूक नाही मिळाली


समजलं आता का राग आहे मला तिचा
आणि हो मी आता तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणार आहे


हो कर कर पोलीस कंप्लेंट कर काही प्रॉब्लेम नाही
पण अशी अर्धवट माहिती नाही सांगायची
पूर्ण सांगायचं सगळं ...... अनु म्हणाली

आणि मला वाटतं आता मीच सांगावं सगळं तुझ्याकडून बोललं नाही जाणार ना आता ..... अनु म्हणाली

दादू, सुमेध दादू, अवी हिनी आपल्या ऑफिस मधे फ्रॉड केला ए
50 लाख रुपयांचा

आणि हो एवढच नाही

हिनी आधी पण कित्येक लोकांकडून पैसे उकळले आहे

हिना व्हाईट कॉलर क्रिमिनल आहे असं म्हण

कितीतरी गरिबांचे पैसे लुटले
किती मुलांच्या भावनांशी खेळली आहे ही

सावी काय केलस अग हे लाज वाटते मला तुझी, तुला मौत्रिण म्हणायची ...... सान्वी रडत रडत म्हणाली

ए नाटकी तुझ्यामुळेच ही वेळ आली ए ..... सावी म्हणाली

बस्स सावी खूप बोललीस खूप ऐकलं तुझं
लाज नाही वाटली तुला सान्वी शी असं वागताना
तिनी किती केलय अग तुझ्या साठी
निघ इथून आणि तोंड काळ कर नाहीतर ...... अभि म्हणाला

नाहीतर काय आणि तू मला शिकवू नको तुझ्या तर असं म्हणून सावी णी अभि वर हात उचलला

अनु णी मधे येऊन तिचा हात पकडला आणि सटकन एक कानाखाली दिली.

माझ्या भावावर हात उचलायचा विचार पण करू नकोस
तुझी लायकी नाही ए

सावी रागाने अनु कडे बघत होती

अनु णी परत एक कानाखाली दिली
आणि हो ही माझ्या बहिणीला तुझ्यामुळे जो त्रास झाला ना त्या साठी
खाल्लेल्या मिठाला तरी जागावं माणसानी

आणि हो पोलीस कंप्लेंट करणार होतीस ना चल मग तुझी ती इच्छा ही पूर्ण करते

अनु जोरात आवाज देते इन्स्पेक्टर साहेब ......

तोच एक लेडी कॉन्स्टेबल आणि एक सर येतात

सर घेऊन जा हिला आणि चांगली शिक्षा द्या

हो मॅडम काही काळजी करू नका
ह्यांचे स्टेटमेंट लिहून घेतले आहेत आणि रेकॉर्डिंग पण केलय लेडी कॉन्स्टेबल सावी ला घेऊन निघून जातात

अभि म्हणतो अनु तुला हिच्या बद्दल एवढं सगळं कसं कळलं

दादू ते मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुला बोलले होते ना कि तिच्याशी लग्न करू नकोस
त्याला नंतर मी काही माणसं ठेवली होती तिच्या वर नजर ठेवायला

तेव्हाच सगळं समजलं आणि तुला आणि सानू ला हे सगळं समजणं गरजेचं होतं म्हणून मग मी .....

तिला पुढे बोलताच आलं नाही

सानू रडत रडत च तिच्या लायब्ररी च्या रूम मधे येऊन रूम लॉक करते

अनु तिथेच खाली बसून रडू लागते

सुमेध धावत रूम जवळ येतो दरवाजा वाजवतो सानू बच्चा दार उघड प्लीज सानू
मानसी पण त्याचा मागे आली दादू तू रडू नकोस आत्ता वहिनी ला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे प्लीज तू शांत हो

इकडे अवी अनु ला समजावतो अनु रडू नकोस यु आर माय स्ट्रॉग गर्ल बेबी ..... रडू नकोस

अभि अनु ला मिठी मारतो

पिल्लू थँक्स ग खूप थँक्स तुझ्यामुळे एक संकट टळलं थँक्स बच्चा .... 😥😥😥

अविनाश तू अनु ला सांभाळ मी सानू ला बघून येतो

इकडे रूम मधून काच फुटल्याचा आवाज येतो

या मुळे सुमेध जास्त घाबरतो सानू दार उघड प्लीज सानू अग बाहेर येना

सुमेध अभि ला आवाज देतो अभि अभि पटकन ये रे

अभि आल्यावर तो अभि ला सांगतो कि सानू च्या रूम मधून काच फुटल्याचा आवाज आला

अभि मानसी ला म्हणतो

मनू जा आणि अवी ला घेऊन ये पटकन


सुमेध शांत हो आपण दार तोडू

अभि, अवी, आणि सुमेध मिळून दरवाजा तोडतात

आत गेल्यावर बघतात तर सानू णी फ्लॉवर पॉट तोडला होता ती एका कोपऱ्यात बेशुद्ध पडली होती

सावी मुळे टेबल चा कोपरा लागल्याने डोक्यातून रक्त येत होतं

एका हातातून खूप रक्त निघत होतं पॉट च्या काचा हातात घुसल्या होत्या

दुसऱ्या हाताला काळा पेंट लागला होता

तिनी बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर ची जी डिझाईन भिंती वर बनवली होती त्याला भिंती वर सावी च्या नावावर काळा रंग लावला होता

तिची अवस्था पाहून सुमेध पुन्हा रडू लागला अभि णी त्याला शांत केलं

सुमेध आणि अभि णी तिला उचलून घेतल

अविनाश कार ड्राईव्ह करत होता सुमेध आणि अनु ला खूप रडू येत होत
खरं तर वाईट सगळ्यांना वाटत होतं पण सगळेच रडले तर कसं होईल.
सिटूएशन हॅन्डल करणं गरजेचं होतं

सगळे पटकन तिला हॉस्पिटल ला घेऊन आले

हाताच्या नसे मधे खूप काचा गेल्या होत्या त्यामुळे ऑपरेशन करणं गरजेचं होतं
अभि नि सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या
डॉक्टर सानू ला ऑपरेशन थिएटर मधे घेऊन गेले

अभि नि मॉम डॅड ला फोन करून थोडक्यात सगळं सांगितलं आणि लवकरात लवकर हॉस्पिटल ला यायला लावल
ते नुकतेच पुण्याहून निघाले होते त्यामुळे वेळ लागणार होता

मग त्यानी थोडा विचार करून सान्वी च्या मम्मी पप्पा ना लवकरात लवकर इकडे बोलवून घेतलं

मग तो सुमेध शेजारी जाऊन बसला आणि त्याला समजावलं

मानसी पण अनु ला शांत करत होती

अविनाश तर शॉक लागल्या सारखा एका कोपऱ्यात उभा होता

खरंच आज काय वेळ आली होती त्यांच्या वर

सावी असं काही करेल याची पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती

तब्ब्ल दीड तासांनी डॉक्टर ऑपरेशन करून बाहेर आले

सगळे उठून उभे राहिले

त्या नंतर मात्र डॉक्टर नि जे सांगितलं त्याने तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली

सुमेध तर झटका लागल्या सारखा खाली बसला


..


.

.

नक्की काय सांगितलं असेल डॉक्टर नि ...... ????

..

.
.


.
.
.
.



(बघूया पुढील भागात कि डॉक्टर काय म्हंटले .....

तो पर्यंत नक्की सांगा कथा कशी वाटली

तुमच्या रेटिंग्स आणि कंमेंट्स मधून नक्की सांगा कथा आवडते आहे कि नाही

काही चुकलं असेल तर समजून घ्या ..... )


..
....
...
...
.....
..
......



.



सगळ्यांनी खुश राहा आणि सेफ राहा ....... 🤗


....
...
...
...
...
...
.....
....
...


आत्ता साठी बाय बाय ......... 🙂☺️

...
..

.

.
.
...
...
...
..

..
.

.




- सुकन्या जगताप ....... 😘