maitry ek khajina - 28 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 28

28


...
..
.
.
...
..

..
..

.

.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच संडे ला सगळे सान्वी च्या घरी जमले होते ..

सुमेध आणि अभिजित चे आई बाबा पुण्याला गेले होते

सकाळी लवकर सगळे आले होते

सान्वी, सुमेध, अभिजित, अनुश्री, मानसी, अविनाश, सावी

अनुश्री नि बोलायला सुरवात केली ......

मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे
बोलायचं आहे म्हणण्यापेक्षा आपल्याला भेटायला कोणीतरी येणार आहे

आणि हो मी स्पष्ट बोलते आहे प्लीज कोणी राग येऊ देऊ नका
पण मला दादू नि सावी लग्न करणं मान्य नाही ए
म्हणून मी त्याला माझा निर्णय सांगितला आहे
पण उगाचच कोणाच्या मनात काही गैरसमज नकोत म्हणून मला सगळं साक्षीदार आणि पुराव्यानिशी सिद्ध करायचं आहे

अनुश्री प्लीज तू आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस
तुझा अविनाश तुला भेटला ना मग तुला माझं सुख बघवत नाही ए का ...... सावी रागात म्हणाली

हे बघ सावी माझं या विषयी दादू शी बोलणं झालंय
त्यामुळे तू थोडावेळ शांत बसशील तर उपकार होतील

अग पण ...... सावी

एक मिनिट सावी मला या सगळ्यांची कल्पना आहे
आणि अनु चा जो निर्णय आहे मला मान्य आहे या पुढे सगळ्यांनी शांत बसून तिला कोऑपरेट केलं तर बर होईल ..... अभिजित

सावी उगाचच चिडू नकोस अनु काय म्हणते ऐकून घेऊया प्लीज ...... सानू समजुतीच्या सुरत म्हणाली

सावी कडे गप्प बसण्याखेरीज पर्याय नव्हता

अनुश्री नि कोणालातरी फोन लावला आणि कधी येतोस ते विचारलं
आणि ओके ठीके म्हणून फोन ठेवला .....

अनु कोण येणार आहे ...... अभिजित

दादू 5 मिनिटात येईल तो आला कि समजेल प्लीज

तोच डोअरबेल वाजली सगळेच दरवाजाकडे बघत होते
सगळ्यांना उत्सुकता होती नक्की अनु नि असं अचानक कोणाला बोलावलं आहे .....
...
..
समोर उभ्या असलेल्या मुलाला बघून सान्वी, सुमेध आणि सावी शॉक झाले

आणि सावी म्हणाली

तू ....... 😲😲😲😲😲😲

इथे ....... 😥😥😥😥😥😥

समोरच्या व्यक्तीला पाहून सावी च्या चेहऱ्यावरचा रंग च उडाला

एकदा माझ्या आयुष्याची वाट लावून मन भरलं नाही का

सावी प्लीज नीट बोल किंवा त्यापेक्षा या पुढे कोणीच काही बोलू नका ...... अनुश्री म्हणाली

सोहम अरे तू आत तर येना प्लीज ..... सान्वी म्हणाली

सोहम हे नाव ऐकून सगळ्यांच्या लक्षात आलं होतं कि हा सावी चा पाहिला पती आहे

सोहम आत आला .....

सान्वी म्हणाली बाय द वे सोहम तू आज अचानक इकडे

हो सॉरी म्हणजे ते अनु ने बोलावलं होतं म्हणून ..... सोहम

ओ ओके तू प्लीज बस ना इथे ..... सान्वी

अनु तू सोहम ला ओळखतेस आणि ह्याला इथे का बोलवलं आहे ..... 🙄🙄🙄🙄 ..... सावी

एकतर मिस सावी माझं नाव अनुश्री आहे
आणि प्लीज मी सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल
पण सध्या मी सगळ्यांना गप बसायला लावल आहे तर प्लीज तेवढे उपकार करा ..... अनुश्री

अनु पिल्लू काय झालंय तू तिच्याशी एवढं रूड का वागतेय
प्लीज बच्चा नीट सांगतेस का ...... अभिजित

दादू सगळं सांगते प्लीज दोनच मिनिट .... अनुश्री

सोहम सुरवात करूयात ना .... ??? .... अनुश्री


हो अनु ...... सोहम

आज आपण सगळे इथे का जमलो आहे
मी सोहम ला इथे का बोलवलं ए
मी त्याला कशी ओळखते
नक्की कसली चर्चा करायची ए
सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळतील
फक्त मधे कोणी बोलून नका
प्लीज ......
सोहम तू कर सुरवात ..... अनुश्री

सगळे सोफ्यावर बसले .....

अनु आणि सोहम समोर उभे होते

सोहम नि बोलायला सुरवात केली

मला वाटतं मला माझी वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही

सगळ्यात आधी मला एक गैरसमज दूर करायचा आहे

सान्वी तू माझी खूप चांगली मैत्रीण होतीस
कॉलेज ला असल्यापासून तू मला सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली ए
नेहमी मला समजून घेत आलीस
सानू काही कारणांमुळे तूझ्या मनात माझ्या विषयी राग असेल
पण मी अजून पण तुला माझी खूप चांगली मैत्रीण मानतो
खरंतर अनु मुळे मला तुझ्यासमोर येऊन तुझी माफी मागता येतेय हेच खूप ए
अनु आणि मी बॉस्टन ला भेटलो
आणि तेव्हापासून आम्ही कॉन्टॅक्ट मधे आहोत
........

मला माहिती नाही तू माफ करशील कि नाही
पण एक खूप चांगली मैत्रीण गमावली ए मी
माझंच मन मला खातंय मला माफ कर
सान्वी मला माहिती नाही सावी नि माझ्या बद्दल तुला काय सांगितलं ए
पण आज सगळे गैरसमज दूर करायचे आहेत मला

खरं तर अनु ला सावी वर डाउट आहे
म्हणून तिनी माझी मदत मागितली ए
आणि मी तयार झालो

सानू मी सावी ला नाही सावी मला सोडून गेली होती .....

काय ....... 😲😲😲😲😲 सुमेध, सान्वी, अभिजित

हो आमचं लग्न झाल्यावर मी तिला घरी घेऊन गेलो पण तिनी एकदिवस ही त्या घराला आणि माझ्या माणसांना आपलं मानलं नाही

सतत माझ्या आई बाबा ना त्रास द्यायची
खूप समजावलं मी तिला सावी लग्न तू माझ्याशी केलं असलस तरी नातं तुझं सगळ्यांशी जोडलं गेले आहे
प्लीज त्यांना आपलंस कर

पण नाही सावी नि कधीच माझ्यावर प्रेम केलं नाही

माझ्यावर काय सावी कधीच कोणावर प्रेम करू शकत नाही

तिचं फक्त आणि फक्त पैश्यावर प्रेम ए

सॉरी टू से पण हिच्या एवढी निच बाई मी कधीही पहिली नाही

सोहम ..... सावी रागाने ओरडत उठली

मिस सावी खाली बसा आणि ओरडू नका आम्हाला ऐकू येत
आणि गप बसायला लावल ए मी
उगीच तुझी लायकी काढायला लावू नकोस
या वेळेस चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला आहेस
ह्या अभिजित ची अनु जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत तुझ्यासारख्या मुलींना त्याच्या आजूबाजूला ही भटकू देणार नाही मी
सानू दि ची मैत्रीण होतीस म्हणून तुझ्याशी चांगले वागले
तुझे सगळे कारनामे माहिती ए
थोडावेळ इज्जतीत गप बस मग पोलीस स्टेशन ला ओरड काय ओरडायचं ते ..... सोहम तू बोल पुढे ..... अनुश्री

अनु चा अवतार पाहून सगळेच अवाक झाले होते

सोहम पुढे बोलून लागला

सानू लग्नानंतर एक महिन्यांनी ही निघून गेली मला सोडून
आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली होती मी सावी वर प्रेम केलं होतं
😔😔😔😔😔😔

पुन्हा नव्याने सुरवात करणं गरजेचं होतं म्हणून मी मुंबई ला निघून आलो

ऑफिस जॉईन केलं
सानू एकदा मरीन ड्राईव्ह वर तुला पाहिलं होतं
पण हिम्मत झाली नाही बोलायची
दरम्यान च्या काळात मला सगळ्यात जास्त सपोर्ट कोणी केला असेल तर ती होती सौम्या
आम्ही एकाच ऑफिस मधे कामं करत होतो
ती माझी बेस्ट फ्रेंड् झाली आणि कायमची आयुष्यभराची साथी पण ....

तिनेच मला पुन्हा उभ केलं
आज मी जो काही आहे फक्त सोमू मुळे


तिला सगळं खरं सांगितलं होतं मी
तिनी जगायची नवी उमेद दिली
एक दिवस ऑफिस ला येऊन मला डायरेक्ट म्हणाली
सोहम माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे लग्न करशील
मला तुझ्या भूतकाळाशी काही घेणं देणं नाही
चुका सगळ्यांकडून होतात प्लीज कायमचा माझा होशील

त्याला दिवशी नव्याने प्रेमाची व्यख्या कळली

आई बाबा पण ती खूप आवडली होती
आम्ही तीन वर्षांपूर्वी लग्न केलं
माझ्या आयुष्याला पूर्णत्व दिलं सोमू नि

लग्नाच्या एक वर्षानंतर मला मुलगी झाली

तिचं नाव पण सान्वी .... ☺️☺️☺️☺️

सानू सावी मला सोडून गेली याचं मला आता दुःख होतं नाही
कारण जिला प्रेम म्हणजे काय हेच नाही माहित तर तिच्या कडून अजून काय अपेक्षा करू मी

पण सानू तुझ्यासारखी चांगली मैत्रीण गमावल्याच दुःख खूप जास्त वाटायचं ग

सोमू ला सांगितलं होतं मी

आपल्याला मुलगी झाली तर तिचं नाव सान्वी ठेवूया

सान्वी
सगळ्यांसोबत कायम असणारी
प्रत्येकाची काळजी घेणारी
समजूतदार

एक परफेक्ट मुलगी कशी असावी तशी ए तू

प्रत्येक बापाला त्याच्या मुलींनी तुझ्यासारखं असावं अशी सान्वी आहेस तू ...... द ग्रेट .....

सोमू नि कोणतेच प्रश्न ण विचारता ती सान्वी नाव ठेवायला तयार झाली

सोमू म्हणाली होती

सोहम तू चुकीचा नाहीस हे तिला लवकरच समजेल
मी आहे तुझ्या सोबत मी सांगेन तिला

माझ्या आयुष्यातल्या तीन ग्रेट महिला जर कोणी असतील तर ....

सगळ्यात आधी माझी आई ...... माझी जन्मदात्री

दुसरी म्हणजेच तू सानू ....... अ ग्रेट फ्रेंड

आणि

आणि तिसरी म्हणजे सोमू ....... माझी पर्मनंट बायको आणि
गरजेनुसार आई आणि मैत्रीण

सोहम ला बोलताना भरून आलं होतं
अनु त्याला शांत करत होती

सानू चे डोळे पाणावले होते
आज नव्याने सोहम तिला कळला होता

सावी चा तर जळफळाट होतं होता पण तरी ती शांत बसली होती

सानू सोमू ला एकदा तुला भेटायचं आहे प्लीज तू मला माफ नाही केलस तरी माझी काही हरकत नाही
पण एकदा प्लीज .... सोहम

अरे प्लीज काय बोलाव ना तिला मला नक्की आवडेल तिला भेटायला ..... सान्वी

सोहम सौम्या ला कॉल करून बोलावतो

घरातला वातावरण एकदम दंग होतं

सौम्या आल्यामुळे सगळे थोडे नॉर्मल झाले

सौम्या च्या हातात एक छोटी दोन वर्षाची मुलगी होती

सोहम ला बघताच तिनी त्याच्या कडे जायचा हट्ट केला

सोहम तिला घेऊन सानू जवळ गेला

सान्वी ही माझी छोटी सान्वी

सान्वी च्या डोळ्यात अश्रू आले
असं काही तिला खूप अनेपक्षित होतं
ती नि छोट्या सान्वी ला घेतलं

हाय सानू माऊ तू डॅडू ची बेस्ट फ्रेंड ए ना .... छोटी सान्वी

हो ग पिल्लू ..... सान्वी

हे सगळे कोण ए ..... छोटी सानू

हे सगळे माझे फ्रेंड ए पिल्लू
चल आपण भेटूया

हा ना अविनाश काका .... सान्वी
हाय अवीनाश काका .... छोटी सान्वी

हाय बच्चा असं म्हणून अवी तिचे गाल खेचतो

ही ना.....

ही अनु माऊ ए मला माहिती ए..... छोटी सानू

अरे वा गुड गर्ल...... लक्षात आहे तुझ्या पिल्लू.... अनुश्री

हा अभि काका अनु माऊ चा भाऊ.....

हाय काका ......
...
...
...
.....

मोठी सान्वी छोट्या सान्वी ची सगळ्याशी ओळख करून देते
सावी चिडली होती म्हणून सानू नि तिची ओळख करून देणं टाळलं होतं

मग ती सुमेध कडे आली

हा सुमेध काका ए

काका तू ना खूप हँडसम ए माझ्या डॅडू सारखा

हो का पिल्लू तू पण खूप क्युट ए माझ्या सानू सारखी

काका सानू माऊ फक्त माझी ए पण आपण शेअर करूया का माऊ ला .... छोटी सानू

सगळेच तिच्या बोलण्यावर हसतात

😂😂😂😂😂😂

ओके पिल्लू आपण शेअर करू ..... सुमेध


सानू छोट्या सानू ला सौम्या कडे देते

हाय सानू मी सौम्या
खूप छान वाटलं तुला भेटून
खरंच सोहम म्हणतो तशी खूप गोड मुलगी ए तू
सानू मी विनंती करते सोहम ला माफ कर प्लीज
त्याची खरंच काही चूक नाही ग प्लीज ...... सौम्या

अग प्लीज विनंती काय करतेस ग .... सान्वी

दि माफ कर ना सोहम ला त्याची खरंच काही चूक नाही ग..... ट्रस्ट मी..... अनुश्री

सानू प्लीज मला एकदा माफ कर मी हात जोडतो ..... 🙏🙏🙏🙏🙏🙏....... सोहम

सोहम प्लीज अरे हात काय जोडतोस
माझा तुझ्यावर राग नाही रे
फक्त थोडे गैरसमज झाले त्याला साठी मीच सॉरी .
.. सान्वी

सानू प्लीज माझी आधी सारखी फ्रेंड होशील का ग प्लीज ...... सोहम

हो रे नक्कीच...... 🤝🤝🤝🤝 सान्वी

थँक्स सानू आज एक मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं
चल येतो मी ..... सोहम

अरे प्लीज थांब ना ...... सुमेध

नको रे सुम्या आज वेळ चुकीची ए पण नंतर नक्की येईल लवकरच भेटू ..... सोहम

मानसी पटकन जाऊन फ्रीझ मधून चॉकलेट आणते आणि छोट्या सानू ला देते
पिल्लू मानसी माऊ ला पण लवकर भेटायला येशील ना

हो मी येईल थँक यु
बाय सानू माऊ ..... छोटी सान्वी

बाय पिल्लू .... 😘😘😘😘..... सान्वी

सोहम आणि सौम्या सगळ्यांचा निरोप घेतात

सावी जणू काही झालंच नाही या अविर्भावात म्हणते अनु तुझं झालं असेल तर मी निघू का मला बाहेर जायचं ए

एकतर मी आधीच बोलले ए माझं नाव अनुश्री आहे
आणि हो अग हा फक्त साक्षीदार होता

अजून पुरावे बाकी आहेत

माझ्या दादू च आयुष्य उध्वस्त करायला निघाली होतीस

या अनुश्री च्या कोर्टातून तुझी एवढी सहज सुटका नाही

समजलं गप बसायचं एकदम

...
..
...
.
.
.

अनु नि तर पार सावी ची बोलतीच बंद केली होती

सगळेच थोडे गांगरून गेले होते कारण हे धक्कादायक होतं

...
...
.
.

.
.


.
.
.
.
( बघूया पुढील भागात आपल्या सावी मॅडम नि काय प्रताप केले ए ते

लवकरच पुढील भाग लिहायचा प्रयत्न करेल

तो पर्यंत नक्की सांगा कथा कशी वाटली.

काही चूका असतील तर माफ करा

..)


.
.
.
.
.
.
..
.
..
सुकन्या जगताप

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED