सलाम-ए-इश्क़ - भाग-६ Harshada द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सलाम-ए-इश्क़ - भाग-६




#सलाम-ए-इश्क़

आशु त्याच बोलणं ऐकून थोडी गोंधळली ....आपलं खरच चुकल का...? ती संभ्रमात पडली..ती काही बोलणार तसं तो तुटकपणे म्हणाला-

‘चल माझ बोलून झालय...सोडतो तुला.....’

‘तू जा मला दर्शन घ्यायचंय मी जाईल रिक्षाने.....’ ती उदासपणे म्हणाली.

‘मी शलाकाला प्रॉमिस केलं होत...तेव्हा तू लवकर दर्शन घे तुला सोडतो मग त्यानंतर आपला काही सबंध नाही....’ तो शांतपणे म्हणाला...पण मनात उठणाऱ्या वादळांना शांत करणं त्याला जड जात होत.दोघांचेही डोळे भरून आले होते....पण माघार घ्यायला कुणीही तयार नव्हतं.

त्याने तिला वाकडेवाडीला सोडल आणि तो निघाला.......खरा संघर्ष तर आता सुरु झाला होता.....

त्या दिवसानंतरचा आदित्य पूर्णपणे वेगळा झाला.त्याचा पूर्ण वेळ त्याने अभ्यासाला वाहून घेतला.
आशुचा विषय त्याने पूर्णपणे बंद केला होता.
ती जवळून जरी गेली तरी निग्रहाने दुर्लक्ष करत असायचा,मनाची उगाचंच समजूत काढायचा...शालाकाशी मात्र मनमोकळं बोलायला त्याला आवडायचं.
आशुला पश्चात्ताप तर होत होता पण ते मान्य करायचं नव्हतं.तिला आदित्यच्या खोड्यांची,अटेन्शनची खूप सवय झाली होती...आणि त्यात हा असा अबोला तिला जीवघेणा वाटत होता.....
शलाकाला दोघांचीही मने समजत होती पण ह्या दोन वेड्यांना कसं समजून सांगू की तुम्ही नाही राहू शकणार आता एकमेकांशिवाय..... तिच्याही हातात काही नव्हत.

तश्यातच ऑगस्ट मध्ये डिरेक्ट डिप्लोमा मुलांच्या अडमिशन झाल्या.

त्यादिवशी क्लास भरलेला होता पण टीचर आलेले नव्हते...आदित्य नोटस काढत होता.तेवढ्यात त्याच्या पाठीवर एक थाप पडली-

‘हाय बडी.....मिस्टर आदित्य शिर्के...द हँडसम...’

त्याने दचकून वर बघितले. टाइट ब्लू जीन्स,पिस्ता कलर पोलोनेक टीशर्ट...प्रोपर फिगर ....शूज...लांब केस....

आदि गोंधळून म्हणाला- ‘ मेघना?...म्यागी....What a pleasant surprise? 10th नंतर आताच भेटते आहेस...कुठे गायब होतीस?’

‘अरे नालायका गायब तू होतास...कधी आपल्या संडे ग्रुपच्या प्रोग्राम्सला आला नाहीस...बघ सापडलास आता...माझं डिप्लोमा झालं आणि आता इथे डिरेक्ट डिप्लोमा सेकंड इयर अडमिशन मिळालय....’

‘...म्यागी ..आणि ..तो ...’ आदित्यच बोलण पूर्ण होणार तेवढ्यात कुणीतरी बाहेरून बोलावत होत म्हणून ती त्याला एका हाताने आलिंगन देत म्हणाली-

‘हेय हंड्सम I have to go….catch u later…बाहेर भेटू कॉफीला दिस इव्हिनिंग ओके?...

त्याच उत्तर न ऐकताच बाय म्हणत ती निघूनही गेली.वर्गात एवढी सुंदर,मॉड मुलगी आल्याने सगळे खुश झाले होते.
आशुच्या काळजात मात्र प्रचंड उलथापालथ झाली.
डोळ्यात पाणी तरळले होते....’ ......का ?’ म्हणून शालाकानेही विचारले नाही.

पूर्ण आठवडा मेघना आदीच्या सतत आसपास असल्याने आशुच चित्तच थाऱ्यावर नव्हत.
तिची चिडचिड वाढली होती. प्रॅक्टिकलमध्ये अगदी थोड्या कारणावरून ती शलाकाला ओरडली तेव्हा मात्र शलाका तिला शांतपणे म्हणाली-
‘आशु तुझ्या ह्या प्रोब्लेमच,उगाचच्या चिडचिड चं सोल्युशन काय आहे माहित आहे ?...सरळ जा आणि आदिला सॉरी बोल.......’

‘असं काहीही नाहीये...’ म्हणून ती गप्प बसली आणि आता हे रोजचच झालं होत.

********************

१५ ऑगस्टच्या निम्मित्ताने NSS कडून किल्ले स्वच्छता मोहीम घेण्यात आली होती.१६ ऑगस्टला टीम विसापूर किल्ल्यावर जायला निघाली.
३ ग्रुप मध्ये विभागलेली टीम मजा मस्ती करत...निघाली होती. आशु,आदि आणि शलाका तिघेही वेगवेगळ्या टीममध्ये होते.

किल्ला चढायला अवघड,खाचखळगे,चढ-उतार,दाट झाडी...आणि भरीस भर मधूनच येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी.....प्रत्येक टीम सोबत एक टीचर होते.सर्वात अगोदर वर शलाकाची टीम पोहोचली,मग आदीची...आशुच्या टीम मधले ३ लोक अजून पोहचले नव्हते ज्यात आशुपण होती.
आदित्यने कितीही इग्नोर केलं तरी तिची काळजी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.सरांना विचारून तो त्यांना शोधायला गेला.थोडं खाली गेल्यावर उमेश आणि राघव दिसले पण आशु नव्हती.आदित्यने विचारल्यावर ते म्हणाले ती आमच्या पुढे होती,तरीही एक दिलासा म्हणून तो थोड अजून खाली गेला.एका ठिकाणी दोन रस्ते जात होते म्हणजे कदाचित आशु ह्या रस्त्याने गेली असेल तर? म्हणून आदि तिकडे वळला.

रस्ता पूर्ण दाट झाडांनी व्यापला होता त्यामुळे अंधारलेल वाटत होत....पावसाच्या जोरदार सरी नुकत्याच कोसळून गेल्याने गारवा जाणवत होता...आशुच्या डोक्यात सारखं आदि,ती नवीन आलेली म्यागी...त्यांच्या बद्दलचे विचार...त्या गोंधळात ती चुकून ह्याचं वाटेवर आली होती...तेवढ्यात एक भलमोठ्ठ वानर एकदम तिच्या समोर आल्याने ती घाबरली...पण ते लगेच त्याच्या वाटेने निघून गेल.भेदरलेली आशु मात्र उलट्या पावली पळत सुटली.ओरडायला सुद्धा तिच्यात त्राण राहील नव्हतं।

.कुणीतरी पळतंय ह्याची चाहूल आदिला लागली म्हणून तो ही त्या दिशेने धावला. समोरून जोरात येणाऱ्या आशुची आणि त्याची एकदम धडक झाली आणि तो मागच्या झाडावर तिच्यासकट आदळला...
समोर आदि दिसलावर तिच्या जीवात जीव आला.
आशुने घाबरून त्याची कॉलर दोन्ही बाजूंनी दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवली होती.

नुकत्याच बरसलेल्या सरींनी तिचे केस पूर्ण ओले झाले होते त्यातून पाण्याचे थेंब चेहऱ्यावर येऊन थांबत होते.आदित्य तसाच झाडाला टेकून उभा होता आणि त्याच्या कॉलरला धरून,भेदलेल्या साश्यासारख नाजूक न गोड.. ‘त्याचं भिजेलेलं वेडं कोकरू’ त्याच्या अगदी जवळ होतं.
तिच्या हृदयाची धडधड त्याला जाणवत होती.
त्याच्या नजरेला तिच्या डोळ्यांनी कैद केलं....आणि तो सगळं विसरला...‘मी का भांडलो ह्या वेड्या पिल्ल्याशी? ...हे डोळे का नेहमी मला फसवतात?.....
नकळत त्याने तिच्या चेहऱ्यावरून एक ओली बट एका बोटाने अलगद बाजूला सारली, तिच्या कमरेभोवती एक हात टाकून अजून थोडं जवळ ओढलं,तिचा शर्ट थोडा वर सरकल्याने त्याच्या रफ आणि थंडगार हाताचा स्पर्श तिच्या कमरेला जाणवला ...ती शहारली....तिच्या गालावर उतरत असलेला पावसाचा एक-एक थेंब त्याने हळुवारपणे ओठांनी टिपला.त्याच्या ओठांचा स्पर्श होताच तिचे डोळे अपोआप बंद झाले.श्वास श्वासात गुंतून पडले.तिच्या थंड ओल्या ओठांना त्याच्या ओठांचा स्पर्श झाला.... त्याच्या दोन ओठांच्या हळुवार साखरमिठीत तिचे ओठ बांधले गेले असतांना नकळत,त्या मंतरलेल्या क्षणाच्या अमलाखाली डोळे बंद असतांना देखील आशु बोलून गेली.... ‘ लव्ह यु शोना....’

अचानक भानावर येत आदिने तिच्या कमरे भोवतीचा हात काढला...तिने गच्च पकडलेली कॉलर निट करत तो तिच्याकडे न बघता..
‘सर वाट बघत असतील.....’ तुटकपणे एवढं म्हणून पुढे चालायला लागला.ती ही जरा चपापली...दोघेही त्या एका जादुई क्षणाच्या स्पर्शाने नकळतपणे..भारले गेले होते पण काहीच झाल नाही ह्या अविर्भावात ...नजरेला नजर देण टाळत दोन अनोळखी लोकांसारखे निघाले...........
भांडणातून माघार जरी कुणीही घेणार नसलं तरी तिच्या आयुष्यातलं हे फर्स्ट किस...तिच्या ओठांवर साखर पेरत राहीलं.....

क्रमशः

© हर्षदा