सलाम-ए-इश्क़ - भाग - १२ Harshada द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सलाम-ए-इश्क़ - भाग - १२

सलाम-ए-इश्क़
भाग-१२
अंतिम भाग--

“All India NGO Conference and Exhibition” चा पहिला दिवस उद्घाटन आणि अध्यक्षीय भाषणं यातच गेला.The Social Engineering Pvt. Ltd.चा स्टॉल अगदी मोक्याच्या जागेवर होता. प्रमुख पाहुणे भेट देणार म्हणून पहिल्या दिवशी स्टॉलवर अमित सोबत आदित्यही जातीने हजर राहिला. नंतरचे दोन दिवस ठरल्याप्रमाणे बाकीचे स्टाफ मेंबर असणार होते. दुसऱ्या दिवशी नची आणि पिहू कंपनीला चांगल्याप्रकारे रिप्रेझेंट करत होते. त्यांच्या प्रोडक्टची बऱ्यापैकी इन्क्वायरी वाढत होती.सकाळपासून व्हिजिटर्सचा राबता असल्याने त्यांची दमछाक झाली होती. दुपारी लंचब्रेक नंतर ते जरा निवांत बसून गप्पा मारत होते.समोरचा स्टॉल जो सकाळच्या सेशन पर्यंत रिकामा होता त्याठिकाणी व्हॅलेंटिअर्स टीम स्टोलची अरेंजमेंट करत होती. शेजारी एक वयस्क महिला आणि व्हॅलेंटिअर्सपैकी कुण्या एकाचा वाद चालू होता. स्टोलची थोडीफार जुजबी अरेंजमेंट करून ते निघून गेले. ती महिला हताशपणे घाम पुसत शेजारच्या खुर्चीवर बसली. पिहू आणि नचीचं अधून मधून तिच्याकडे लक्ष जात होतं. तिने जागेवरूनच पिहूला विचारलं-
“बेटाजी थोडा पानी मिलेगा क्या?
“हा जी जरूर...” म्हणून पिहूने पाण्याचा एक ग्लास भरून त्यांना दिला.
“थॅंक्यु बेटाजी...” म्हणत तिने पिहूला रिकामा ग्लास दिला.
तिच्या चेहऱ्यावरचा तणाव बघून पिहू म्हणाली.
“आंटीजी कुछ हुआ है क्या?”
“अरे बेटाजी कल के व्हॅलीडीकटरी फंक्शन के अरेंजमेंट के लिये वो पिछेवाले सब स्टॉल शिफ्ट किये हैं आजके दिन,उसमे हमारा भी था.मेरे टीममेट गये है हॉटेल,मै अकेली थी,मैने बोला उनको थोडा वक्त दो । लेकीन वो लोग सुनते कहा है,अब देखो ये लॅपटॉप,स्क्रोलिंग डिस्प्ले,प्रोजेक्टर ये सब कनेक्शन मुझे कहा आते है. आधे घंटे मै ब्रेक खतम होगा,मैने टीम को फोन किया है,पता नही कितनी देर लगेगी.” हताशपणे त्या म्हणाल्या.
त्याचं बोलणं ऐकून नची म्हणाला-“ आंटीजी इतनाही प्रोब्लेम है, तो नो प्रोब्लेम... मै दस मिनिट मै आपको सिस्टम सेट करता हू| ”
“अरे बेटाजी तब तो बहोत मेहेरबानी होगी...” तिच्या चेहऱ्यावरची उदासी मावळून आनंद पसरला.
नची आणि पिहू मिळून त्यांची सिस्टम सेट करत होते. सेट करता करता त्यांचा हसी मजाक,चिडवा चिडवी,तिचं लाजणं बघून शर्मा आंटी गालातल्या गालात हसत होत्या.बोलल्या प्रमाणे थोड्याच वेळात नची आणि पिहूने त्यांचा स्टॉल सेट करून दिला. त्यांना खूप सारे आशीर्वाद देऊन त्या पिहूला थांबवत हळूच कानात म्हणाल्या-“ बेटाजी क्या आप दोनो की शादी होने वाली है?”
दोन मिनटाच्या ओळखीवर विचारलेला हा प्रश्न ऐकून पिहू गोंधळली तिला आश्चर्यही वाटलं,तिने होकारार्थी मान डोलावली.तिच्या डोळ्यातले आश्चर्याचे भाव पाहून शर्मा आंटी म्हणाल्या-“अरे बेटाजी मैने तो ऐसेही पूछ लिया..बहोत अच्छा लग रहा है आपका जोडा...और ये नजरे धोका नाही खायेंगी लगता है वो लडका आपको आपसे ज्यादा प्यार करता है| नसीबवाले हो बेटाजी|”
पुढे जाऊन फोन वर बोलणाऱ्या नचीकडे पाहून ती गोड हसली आणि नेहमीच्या फिल्मी अंदाजाने शर्मा आंटीला म्हणाली-“हा आंटी सही है,बहोत प्यार करता है वो | आप बस ये आशीर्वाद दिजीये के इस प्यार को किसीकी नजर ना लगे..बहोत देर लगी है ये प्यार समझने को....बस कभी दुआओ मै याद रखना के ये प्यार बरकरार रहे....”
तिच्या कुरळ्या केसांवरून हात फिरवत त्या म्हणाल्या- “ हा कल हम लोग आपके पुना के किसी फेमस गणेश मंदिर जानेवाले है तब पक्का गणेशजी से आपके लिये आशीर्वाद मांगेंगे|
पिहू लाजून गोड हसली.
कॉन्फरन्स तिसऱ्या दिवशी तीन वाजताच संपणार होती.आज अमित नसल्याने भूमीसोबत पिहू असणार होती.वेळात वेळ काढून आदित्य ही व्हॅलीडीकटरी फंक्शनला उपस्थित होता.एकूणच तीन दिवसाची कॉन्फरन्स TSE साठी फायदेशीर ठरली होती. कॉन्फरन्स संपल्यावर आदित्य पार्किंगमध्ये त्याच्या गाडीजवळ फोनवर बोलत उभा होता.भूमी आणि पिहू एकमेकांना खुणावत होत्या.फोनवर बोलता बोलता आदि हे सगळं बघत होता.फोन ठेवल्यावर त्याने भूमीला विचारले-
“मिस भूमी You wanna say something ,any problem ?
भूमी आणि पिहुने पुन्हा एकमेकांकडे बघितले,मग पुढाकार घेत भूमीच म्हणाली-
“सर आज चतुर्थी आहे ना...तुम्ही सिद्धिविनायकाला जाताय ना? सर मी,नची आणि पिहू येऊ का आता तुमच्यासोबत सारसबागेत दर्शनाला?...आमची खूप इच्छा आहे.”
“अरे विचारायचं काय त्यात...कम ऑन..फक्त जातांना तुम्ही तुमचे जा.....”
“ओके सर”
तिघेही गाडीत बसल्यावर आदित्यने सारसबागेला जाण्यासाठी रेंजहिल रोडकडे गाडी वळवली.
***************************

चतुर्थी असल्याने सारसबागेत नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. गाडी पार्क करून ते बागेत आले. भूमी,नची,पिहू मंदिराच्या पाहिऱ्या चढून वर जात होते पण आदि खालीच थांबला. अदिसर सोबत नाहीये खालीच थांबले, म्हणून पिहु पळत खाली आली आणि तिने विचारलं-
“सर दर्शन नाही घेणार का?”
”पिहू मी दर चतुर्थीला येतो बागेत पण त्याचं दर्शन नाही घेत इथे बाहेरच बसून असतो थोडावेळ....तुझ्या भाषेत म्हणायचं तर-“खफा हु उससे पर बेवफा नही” म्हणून त्याचं दर्शन न घेता त्याच्या ह्या अंगणाच दर्शन घेतो.Don’t think so much .....go….”
काहीच न समजून पिहू गोंधळून दर्शनाला निघून गेली.
आदित्य जवळच्याच एका बेंचवर बसला होता.त्याने एकवेळ मंदिराकडे बघितलं अन एक दीर्घ उसासा घेत डोक मागे टेकून त्याने डोळे लावले.बंद डोळ्यांआड नेहमी प्रमाणे आशु शिवाय काय दिसणार होतं?...तिच्या वेड्यासारख्या काही गोष्टी आठवून त्याला हसू आलं आणि मग अचानक हलक्या मिटलेल्या पापण्यांतून एक अश्रू त्याच्या गालावर हळूच ओघळला. आठवणीच्या एका वेगळ्या गुंगीत असतांना अचानक एक सॉफ्ट बॉल येऊन त्याच्या कपाळावर आदळला.त्याची तंद्री भंगली आणि त्याने कपाळ चोळत डोळे उघडले. तो बॉल घ्यायला म्हणून समोर एक ५/६ वर्षांची फ्रीलचा गुलाबी फ्रॉक घातलेली,गोरीपान,गोड,गोंडस...टपोऱ्या डोळ्यांची,लांब केसांची मुलगी उभी होती.आदित्यला कपाळ चोळतांना पाहून तिने जीभ चावून कान पकडत सॉरी म्हटलं. इतकं क्युट,निरागस सॉरी ऐकून तो गालातल्या गालात गोड हसला.खाली पडलेला बॉल उचलून त्याने हातातच ठेवला. ती मुलगी जवळ येत म्हणाली.
“ Mr. Stranger can you please give me my ball?”
तिच्याकडे बघून हसत तिला बॉल देत तो म्हणाला-“O.K stranger I will give it back to you”
त्याच्या हातातून बॉल घेत ती म्हणाली-“मेरा नाम स्ट्रेंजर नही,मेरा नाम दित्या है |”
हसून,थोडं आश्चर्याने तो म्हणाला-“ आपका नाम दित्या है?....मेरा नाम आदित्य है.. देखो कितना सिमिलर है..”
ती सुद्धा गोड हसली मग गर्दी पाहून गोंधळून इकडे तिकडे पाहत म्हणाली-“ आदित्य अंकल मे बॉल धुंडते धुंडते यहा आयी लेकीन अभी मोम्सी लेफ्ट में थी या राईट में वो याद नाही आ रहा.”
“ओके नो प्रॉब्लेम...आप ज्यादा दूर नाही आये ना..तो इधर ही होगी आपकी मॉम्सी..”
म्हणून तिचा हात पकडून तो जरा पुढे गेला.तोच त्याचा हात झटक्यात सोडवून दित्या मोम्सी म्हणत पळत सुटली.समोर दुर्वा आणि फुलं विकणाऱ्या बाईला पैसे देत असलेल्या साडीतल्या पाठमोऱ्या लेडीला तिने एका हाताने मागून पकडले.
आदित्य मंदिराकडे जाणाऱ्या सरळ रस्त्याच्या डाव्या बाजूला थोडं अलीकडेच थांबला होता. आदित्य त्यांच्याकडे पाठ फिरवणार तोच ती मागे वळली.......आदित्यचा एक क्षण डोळ्यांवर विश्वास बसला नाही........ती आशु होती.त्याची अश्विनी....
**********************

आशु मागे वळली. दित्याला खांद्याला पकडून तिच्याकडे बघत ती म्हणाली-“ क्या हुवा शोना?”
“मोम्सी मे बॉल लेने गयी ना तो मे गुम गयी थी, This uncle helped me….You know Momsi I am Ditya and he is Aditya…” तिने समोर हात दाखवला,पण आदित्य डाव्या बाजूला वळणाऱ्या रस्त्याच्या कडेला होता.आशुने थोड पुढे जाऊन दुरूनच डाव्या बाजूला झुकून बघितलं. इतका वेळ तो दगड बनून तिच्याकडे फक्त बघत होता. अबोली मलमल कॉटन साडी, लांब केस,हलकासा मेकअप..आणि..आणि गळ्यात एका जाड सोन्याच्या सरीत दोन पोवळ्या मध्ये असलेला एक मोठा काळा मणी, कपाळावर एक छोटी टिकली.चेहऱ्यावर तोच गोडवा,डोळ्यात तीच जादू मात्र चमक झाकोळलेली होती. ती जागच्या जागी खिळली,समोर आदित्य उभा होता...तो तिला समोर उभा असलेला फक्त काही क्षणच दिसला, नंतर तिच्या डबडबलेल्या डोळ्यांना काही दिसेनासं झालं...जाण्यापूर्वी ज्या सिद्धिविनायकाच्या अंगणात शेवटची मिठी मारली होती....वेळेचा धागा तिथंच येऊन बांधला गेला होता मात्र आता संपूर्ण धाग्यातली सहजता,सरलता नाहीशी होऊन नशिबाच्या गाठीचा अडथळा अस्तित्व दाखवून देत होता. आदित्यला समोरचं काहीच दिसत नव्हत. संपूर्ण बाग एक हिरव वर्तुळ होऊन जणू त्याच्या नजरेसमोर फिरत होती.एक एक वर्ष त्या वर्तुळात मिसळत होत ते अजूनच मोठं मोठं होतं चाललं होतं...त्यात दुराव्याच्या क्षणांची कितीतरी आवर्तने मिसळत होती....किती आणि किती काळ क्षणां-क्षणांत मिसळत होता.इतक्या वर्षांची,महिन्यांची,दिवसांची,क्षणांची एकाकीपणाच्या लिपीने लिहलेली पाने डोळ्यातल्या थेंबानी हळूहळू पुसत तो कोरा कोरा झाला ..मनात विचारांची असंख्य वादळे उफाळून येत पुन्हा विरत होती,डोळे मुक्यानेच संवाद साधत होते - “ ...हा दिवस आहे की रात्र?वास्तव आहे की स्वप्न?....मी मीचं आहे की फक्त जाणीव....समोर माझी आशु उभी आहे की कुणा दुसऱ्याचं अर्ध आयुष्य?...समोर माझं प्रेम आहे की कुण्या दुसऱ्याच्या मालकीचं एक व्यक्तित्व...? तिच्या गळ्यातल्या ह्या सरीच्या अलीकडचे आणि पलीकडचे आयुष्य किती वेगळ आहे.एकत्र निघालेल्या दोन रेषा समांतर झाल्यात की त्याचं भेटणं अशक्य....पत्रातल्या दोन चार ओळींतून ‘तुझं माझं आयुष्य आजपासून वेगळं’ असं म्हणणं इतकं सोयीस्कर होतं..?...स्वतःच्या अंशाला माझ्या नावासदृश्य नाव देऊन प्रेमाच्या जुन्या सावल्यांना उन्हात ठेवणं कश्याला?....हा भास की फक्त आभास.............,तू अश्या वळणावर का भेटलीस किंबहुना तू पुन्हा भेटलीसच का.......तुझ्या माझ्या प्रेमाच्या आठवणींच्या शिदोरीवर मी जगत होतो ना?का पुन्हा ह्या रुपात समोर येऊन त्या आठवणीमधली सहजता काढून घेतली?....मी आयुष्याला किती प्रयत्नाने सावरत होतो..तुझ्या आठवणीत मिसळत होतो पुन्हा उगवत होतो....जो होतो जसा होतो श्वास घेत होतो......तो ही आता जडावलाय.......मी जगावं की नाही गं.... जीव तोडून प्रेम केलं हाच तो काय माझा गुन्हा........ह्याची शिक्षा हे तीळ तीळ मरणं असेल तर नकोय मला एकदाच काय जीव घे देवा न पुन्हा हे प्रेम,हे आयुष्य काहीही नको.....जीवनाचे सगळे हिशोबच चुकले...........ह्या प्रेमाच्या व्यापारात हा आदित्य शिर्के कंगाल झाला ...............”
दोघेही समाधी लागल्या सारखे उभे होते.येणारे जाणारे विचित्र नजरेने बघून जात होते.दित्याने तिचा हात खेचल्यावर ती भानावर आली.तिच्या मोम्सीच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याने ती बेचैन झाली होती. तेवढ्यात दित्या म्हणाली-“ मोम्सी शालुमा आपको बुला रही है,आपको सुनाई नही दे रहा क्या..मै कबसे आपको बता रही हु .....आप ऐसे स्त्याचू बनके क्यू खडे हो?”
आदित्यला दुरूनच इशार्याने”एक मिनिट” म्हणून आर्जव करून ती दित्याला घेऊन विरुद्ध बाजूला थोडं पुढे गेली.सरळ रस्ता पुढे वळल्यावर उजव्या बाजूला एक बाक होता. तिथे दित्याची आजी,तिची शालुमा बसली होती.ती एका मुलीशी बोलत होती.आशु आल्यावर शालुमा अश्विनीकडे बघत म्हणाली-“वीनि बेटा ये मेरी कॉन्फेरंसवाली फ्रेंड है..पिहू..” पिहू अश्विनीकडे पाहून गोड स्माईल देऊन म्हणाली-“हेल्लो नाईस टू मीट यु दि...” आणि शालिनी आंटीला बघून ती म्हणाली-“आंटी बहोत जल्दी मै हु....नाईस टू मीट यु...and उस दिन के आशीर्वाद के लिये thanks.” एवढं बोलून आंटीच्या पाया पडून ती पळतच निघाली.आशु शालुमाला म्हणाली..”कौनसा आशीर्वाद मा?...ये क्या बोल रही थी?”
“अरे ये लडकी और उसके साथ एक लाडका था...क्या नाम था उसका पता नही...अरे वो बहोत प्यार मै है| उनकी शादी होने वाली है...made for each other couple..| लेकीन पता है बच्ची लगती है उसके सामने..|मैने बोला था उसको दोनो के लिये गणेश जी से दुआ करूंगी.” लहान मुलासारखी आनंदाने शालुमा सांगत होती.
आशु तिला म्हणाली-“शालूमा सुनो ना एक पुराना दोस्त मिल गया है| आप और दित्या यहा बैठो मै थोडा हाय हेल्लो बोलके आती हु|...जिया,नितु और राम थोडा घुमके इधरही मिलनेवाले है,ठीक है?
“अच्छा बेटाजी ...जल्दी आना...”
दित्याला शालुमाच्या शेजारी बसवत ती थोडं पुढे आली.आदि तिथेच उभा होता.तिने बघितले मघाशी भेटलेली कुरळ्या केसांची मुलगी त्याच्याशी हसून बोलत होती.खर तर ‘आम्ही निघतोय’ हे सांगायला पिहू आदित्यला शोधत आली होती आणि ती लगेच निघाली.
आशु त्याच्या जवळ आली.
त्याच्याकडे बघत म्हणाली- “बसुया का जरा वेळ?”
आदित्य काही न बोलता समोरच्या रिकाम्या बाकावर बसला. आशु त्याच्या शेजारी बरंच अंतर ठेऊन बसली.एरवी ती अशी बसली की तो लगेच म्हणायचा-“पिल्या उधारीवर प्रेम केल्यासारखी दूर बसू नको...आपल्या दोघांमध्ये मुंगीला पण जागा द्यायची नाही हं”.
हे आठवून तिला हसायला आलं.ती गालातल्या गालात हसली.तो शून्यात नजर लाऊन बसला होता. थोडं अडखळत ती त्याला म्हणाली-“आता तू बोलत होता ती मुलगी तुझ्यासोबत आलीय का?” त्याने तिच्याकडे अविश्वासाने बघितलं,त्याच्या मनात आलं...लग्न होऊनही ही अजूनही उगाच माझ्या बाबतीत का पसेसिव्ह होतेय...
“हो आम्ही सोबत आहोत” तो मोजकं आणि तुटकपणे बोलला.
“कायमचं?” तिने चाचरत विचारलं.
“तसचं काहीसं”....त्याला तिच्या ह्या बालिश प्रश्नांना उत्तर द्यावीशी वाटत नव्हती.
ती अजून काही विचारणार तेवढ्यात तो म्हणाला-“हे बाकीच महत्वाचं नाहीये.आपण दुसरं काही बोलूया का?..हे लग्न होऊनही उगाचचं पझेसिव्ह होऊन काय सिद्ध करतेय? तू इथं कशी? कुठे असतेस सध्या ?..नाही म्हणजे सांगायचं नसेल तर its ok ..”
त्याच्या बोलण्यातला कोरडेपणा,तुसडेपणा,तुटकपणा तिला अपेक्षितच होता.तिच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं.
“ All India NGO Conference साठी आले होते.”
आश्चर्याने तिच्याकडे बघत तो म्हणाला-“मी देखील होतो तिथे..माझी कंपनी आहे The Social Engineering Pvt. Ltd.आमचा स्टोल होता, तू दिसली नाहीस ...”
डोळे रुमालाने टिपत ती म्हणाली-“ I am Glad to hear this…. मलाही हेच अपेक्षित होतं तुझ्याकडून...स्वतःची कंपनी न ऑल...बाय द वे...कॉन्फरन्सला मी नव्हतेच...थोडं बाहेर आणि बराचं वेळ हॉटेलमध्येच होते. दित्याला इथलं हवामान सहन होत नव्हत...अरे मी विसरलेच....सांगायला मी दिल्लीला असते...”
तिच्या नजरेला नजर न देता दुसरीकडे बघत आवाजात थोडी सहजता आणत तो म्हणाला-“छान आहे तुझी मुलगी दित्या.....मिस्टर काय करतात?
आपल्यला हा सहज विसरला ह्या भावनेने आलेला हुंदका आवरत ती म्हणाली-“.I am in Delhi...My Husband Vikram , He Is software engineer ...मीसुद्धा “एनजिओ” मध्ये काम करते... Life is actually good …..”
ती चेहऱ्यावर हसू ठेवायचा प्रयत्न करत होती.काही क्षण शांतते नंतर ती म्हणाली-“ and your life Aditya?”
“don’t ask me ashwini मी उत्तर देणं गरजेचं समजत नाही आणि त्यासाठी मी बांधील देखील नाही.”
थोडं आशेने त्याच्याकडे बघत ती म्हणाली-“आदित्य...शलाका ....शलाकाचा काही कॉन्टॅक्ट आहे का?लग्न झालं असेल तिचं...माझी वेडू बेस्टी... मी काल सहज जाऊन बघितलं.समता पार्कमध्ये नाही रहात तिचे आई-वडील I think.”
न राहवून मोबाईल काढून त्याने शलाकाचा नंबर तिला दिला आणि कुत्सितपणे थोडंस हसत तो म्हणाला-“ ...बेस्टी.....बेस्टी तर खरंच ती आहे....नातं जीवापाड जपणारी....”
बराच वेळ झाला म्हणून ती उठली...तो बसूनच होता. मघापासून डोळे रडून सुजले होते.ती कसंबसं अवसान एकत्र करून त्याला म्हणाली-“चल आदित्य...आज अचानक भेट झाली खरी...पुन्हा कधी भेट होईल माहित नाही....आयुष्यात खूप प्रगती कर,नवीन आयुष्याची सुरवात करत आहेस..त्यासाठी शुभेच्छा...आणि शेवटचं , जमलं तर मला माफ कर...!”
ती काय बोलतेय हे त्याला नीटसं ऐकूही आल नाही,सगळं जग जागीच थांबलय आणि एक निर्वात पोकळी तयार झालीय ह्या भावनेने तो दचकला आणि भानावर आला तेव्हा ती निघून गेली होती.त्याने पुढे येऊन बघितलं सोबतच्या त्याच्यासाठी अनोळखी असणाऱ्या लोकांसोबत आशु बाहेर जाण्यासाठी पाहिऱ्या चढत होती. तो आघात झाल्यासारखा समोरच्या गवताच्या लॉंन वर बसला आणि कुणाची कुणाची पर्वा न करता गुढग्यात डोकं घालून कितीतरी वेळ लहान मुलासारखा रडत बसला....
******************
कधी एकदाचा दिवस उजाडतोय म्हणून शलाका जणू सूर्याच्या धावा करत होती.तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता की रात्री उशिरा Landline वरून आलेला फोन तिने उचलला तो आशुचा तिच्या बेस्टीचा होता आणि विशेष म्हणजे तिची आणि आदीची भेट झाली होती आणि त्यानेच तिला नंबर दिला होता.कधी एकदा आशूला पाहते असं तिला झालं होतं.
आशु आली तेव्हा नऊ वाजले होते.तिच्यासोबत दित्या होती. आशुसोबत असलेल्या गोड गोंडस मुलीला पाहून शलाकाला भरून आलं.दोघींचेही अश्रू थांबता थांबत नव्हते.किती तरी वेळ काय बोलावं हे त्यांना सुचत नव्हत.एक वेळ होती की बोलता बोलता कुठे थांबू हे त्यांना सुचायचं नाही आणि नियतीने आज ही वेळ आणली होती.शलाकाचा नवरा ऑफिसच्या कामानिम्मित बाहेरगावी गेला असल्याने तिला निवांत बोलता येणार म्हणून ती अगोदरच खूप खुश होती.शलाकाच्या चार वर्षाच्या मुलासोबत सक्षमसोबत खेळण्यात दित्या गर्क झाली होती.चहापाणी थोडं फॉर्मल विचारपूस झाल्यावर त्यांच्यातला अवघडलेपणा कमी झाला.
आशुचे हात हातात घेत ती म्हणाली-“आशु खूप वाट बघितली ग ह्या दिवसाची....आता पुन्हा आपण आयुष्यात कधी भेटू मी ह्याची आशाच सोडून दिली होती.देवावरचा विश्वासच उडाला होता..पण तू भेटलीस....मी सांगू शकत नाही ग मला काय वाटतंय ते....”
स्वतःचे डोळे पाझरत असून तिचे डोळे पुसत आशु म्हणाली-“वेडे आयुष्यात कधी भेटणार नाही...असं थोडच होतं....आणि इथे भेटलो नसतो तरी स्वर्गात तुझी वाट बघत बसले असते मी दारातच....”
रडता रडता हसत शलाका म्हणाली-“By the way कुठे असतेस सध्या?
“दिल्लीला...” थोडंस तुटकपणे ती म्हणाली. सक्षमसोबत खेळणाऱ्या दित्याकडे कौतुकाने बघत शलाका म्हणाली-“पठ्ठीने आईचं काहीच घेतलं नाहीये....बाबांवर गेलीय वाटतं पूर्ण.....”
डबडबलेल्या डोळ्यांनी शलाकाच्या डोळ्यात बघत ती म्हणाली-“शलू माझं कसं काही ती घेणार गं......मी तिची आई नाहीये.....मी तिची फक्त मोम्सी ...म्हणजे तिच्या भाषेत “मॉम जैसी” आहे....तिची आई आशना शर्मा आहे.ती आशना शर्मा आणि विक्रम जाधव यांची मुलगी आहे.”
अनपेक्षितपणे बसलेल्या ह्या धक्क्यातून सावरत अविश्वासाने ती म्हणाली-“काय? मग...तुला मुल बाळ?...आणि तुझं लग्न कुणाशी झालंय,दिल्लीला कुणासोबत असतेस?”
डोळे पुसत दीर्घ श्वास घेत ती म्हणाली-“.....शले......मी लग्नचं नाही केलं गं.....मी कुणाची कशी होउ शकणार जेव्हा की मी आदिला माझं सर्वस्व मानून मनोमन पती म्हणून स्वीकार केला होता.”
डोकं घट्ट पकडत शलाका म्हणाली-“आशु आता माझं डोकं बधीर होईल मला नीट उलगडून सांग काय झालय ते.....मी ब्ल्यांक झालेय.”
क्रमशः