She__and__he ... - 6 books and stories free download online pdf in Marathi

ती__आणि__तो... - 6

भाग__६


राधा हॉस्पिटलमधुन घरी येते...आज ती आल्या आल्याच चिड़चिड़ करत होती.....


मालती__ आलीस का....राधू


राधा__ (वैतागुन).......मी नाहीतर कोन बाबा आहेत का तुझ्या समोर....मी आहे तर मीच असणार ना....


मनोहर__ फुलपाखरा काय झालाय....वैतागतेस का


राधा__ सससस सॉरी आई....बाबा मी जरा खोलीत जातेय...दमले मी म्हणून जरा....
{राधा रूममध्ये जाते}


मनोहर__ फुलपाखरा.....ऐ फुलपाखरा.....कदाचित खरच दमले ती....


मालती__ हो...मला ही तेच वाटतंय....नाहीतर अशी वैतागत नाही तीं कधी.....


मनोहर__ असुदे...होइल ती नीट नंतर....


राधा तिच्या खोलीत जाते....तिची आज नुसती चिड़चिड़ होत होती....का कुणास ठाऊक पण त्या Mr.Potato ला जास्त बोल्याच तिच्या मनाला कुठेतरी टोचत होत.....राधा खोलीत जाउन कान्हासोबत बोलू लागली....


राधा__ तो Mr.Potato मला अस कस बोलू शकतो...बरोबर ना कान्हा....अस कस बोलू शकतो तो मला...माझा बोरिंग फेस आणि काय तर....बड़बड़...मी इतकी बड़बड़ करते का रे..कान्हा...पण मी सुद्धा बोले ना रे त्यांला....कदाचित मीच तस नसते बोले तर तो ही नसता बोला....🙄 हो ना रे...पण काय करू..त्यांला बघितले की तळपयाची आग मस्कात जाते....😒जाउदे न राधा का इतका विचार करतेस त्याच...


तेवढ्यात राधाचा फोन वाजतो....📱📞


राधा__📞 Hello....हाय! विक्रम बोल ना...


विक्रम__📞राधा 1 मिनिट थांब तुला कॉन्फेंसला घेतोय...(कॉन्फ्रेंस कॉल करत).....ह्म्म्म आता बोला सगल्यानी...


सनम__हम्म झाला आपला ग्रुप जॉइन...बोल विक्रम तू काय म्हणत होतास....


विक्रम__सगळे आहेत ना....


जागृती__ हो..विकी


पल्लवी__ विकी बोल आता....


विक्रम__ ओके सो गाइज....माझ्या Dad ला बिजिनेस मध्ये खुप फायदा झालाय...सो त्यांनी एक पार्टी करायची ठरवले....तर त्यांना माहित आहे तुम्ही सगळे माझे बेस्टेस्ट फ्रेंड आहात सो...त्यांनी तुम्हला उद्या इन्वाइट केलाय पार्टीला.....सगल्यानी या...


राधा__विकी बट....तिकडे टॉपचे बिजिनेसमैन आणि त्यांच्या फैमिली असतील...आम्ही कस?????


सनम__हो यार


जागृती__हो विकुड़ी....


पल्लवी__बरोबर बोलीस राधू....


विक्रम__फ्रेंड्स come on...अरे तुम्ही सुद्धा माझी एक छोटी फॅमिली आहात....अस काय बोलताय...आपली दोस्ती ही कधीच तूटायची नाही..आणि तिकडे तुम्हला कोंन काय बोलणार नाही...आपण सगळे डॉक्टर्स आहोत यार...खुप इज्जत आहे आपल्याला...हे बिजिनेस मैन आजारी पाडले तर डॉक्टर उपयोगी पडतो ना....😂🤣


पल्लवी__तू ना....खरच😂


राधा__वेडा...😀


विक्रम__ओके मग उद्याच डन...संध्याकाळी ८ वाजता भेटतोय आपण माझ्या घरी....


सगळे__ओके.....डन


राधा__ए विकुड़ी...ड्रेस थीम वैगेरा आहे का...


विक्रम__नाही ग...तुम्ही मूली काहीही घालु शकता म्हणजे नेटची साड़ी वैगेरा....


पल्लवी__हो का....मग नउवारी साड़ी घालून येते....😂🤣😂🤣


सनम__🤣😂


जागृती__🤣🤣🤣🤣


विक्रम__तू कशीही आलीस तरी मला आवडतेस😍


राधा__(खोट खोकत).....अहहहआआह आम्ही पण आहोत कॉलवर....भान असुदे🤣🤣🤣


विक्रम__😅😅😳


जागृती__हो....चला म उद्या भेटू...बाय!!!


सगळे__ चलो....!!!!

(राधा फोन ठेवते)

आता मगाशी चिड़चिड़ करणारी राधा आपोआप शांत झाली मित्रांशी गप्पा मारून...खरच मित्र ना गॉड गिफ्ट असतात...त्यांच्याशी जरास बोल की..खुप बर वाटत....♥️


***********************************


{दूसरा दिवस}


राधा__ आई आज मी विक्रमच्या घरी पार्टीला जातेय...लक्षात आहे ना....


मालती__हो बाळा...


राधा__ओके आता हॉस्पिटलला निघते....बाय!!!!


मालती__बाय!!!!

राधा हॉस्पिटलमध्ये जाते...तिची काम आवरते...संध्याकाळी लवकर घरी येते...आणि फ्रेश होऊन तयारी करते.....


तींने आज व्हाईट नेटची पार्टी वेअर शॉर्ट फ्रॉक घातली...त्यावर फुलांची नक्षी होत्या....कानात डायमंडचे लॉन्ग कानातले घातले...गळ्यात छोटी नाजुक चैन त्यावर फुलपाखराचे पेंडेट होते....हातात घुंगरू असलेले ब्रेस्लेट...डायमंड रिंग घातली....ओठांवर रेड लिपस्टिक लावली....केस मोकळी सोडली...पायात व्हाईट शार्ट हिल्स घातल्या....हातात व्हाईट पर्स घेतली...राधा आज एकदम बाहुली सारखी दिसत होती...😍तयारी झाली आणि ती खाली आली....


राधा__ जीरु आलीस का...चल निघु....


जागृती__ छान दिसते आहेस हं....एकदम डॉल🤤


राधा__😘 हो का तू पण tvkaa दिसतेस😂 चल आता....आई येते मी बाबाना मी सांगितले आहे...सो तुम्ही जेवून घ्या आणि डोर लावून झोपा मी चावी घेतले ह्म्म्म


मालती__नीट जा आणि लवकर ये....


राधा__ हो बाय!!!


राधा आणि जागृती जायला निघतात....काहीवेळाने विक्रमच्या घरी पोहोचतात....घर खुप मोठ होत बंगल्या सारख....सगळीकडे सजावट केली होती....सगळी माणस आली होती....बाहेर विक्रम आणि बाकीचे सगळे उभे होते....


राधा__ हाय!!!


विक्रम__हाय!! राधा...जीरु....


सनम__ राधा छान दिसते आहेस...


राधा__थैंक्यू!!सनम


विक्रम__ बर चला आत...बिंदस्त पार्टी एन्जॉय करा


पल्लवी__ हो...

सगळे आत जातात....विक्रम त्याच्या वडिलांशी सगळ्यांची ओळख करून देतो....मग सगळे पार्टी एन्जॉय करत असतात...मस्त डान्स चालू होता....गाणी वाजत होती....तेवढ्यात राधा वाशरूमला जाते.....नंतर वाशरूममधुन बाहेर येत असते की तिची टक्कर कोनासोबत तरी होते.....


राधा__ आऊच.......😵(वर बघून).....ओह सॉरी हं........तू.......🙄😒


तो__ डॉक्टर रेडियो तू.......इथे पण😵😵😒


राधा__ झाल भेटलास पुन्हा.....लागली पनवती आता😏


तो__ ओह! मी पनवती😏 तू काय मग....आणि तू इथे काय करतेस


राधा__ विक्रम आहुजा माझा कॉलेज बेस्टी आहे...त्याने इन्वाइट केलाय मला....समजल पण तू इथे कसा....😠😏


तो__ इथे सगळे बिजिनेसमैन पण आलेत सो विकीच्या बाबांच्या पार्टनरचा मी मुलगा आहे...मीही बिजनेसमैन आहे....😒


राधा__ओह नवलच आहे....बटाटा पण आता बिजिनेसमैंन झालाय😏😏


तो__ का....रेडिओ जर डॉक्टर होऊ शकते मग बटाटा बिजिनेसमैंन का नाही असु शकत😠😏


राधा__तू ना.....😠


विक्रम__ (आवाज देत).......राधुडे अग इथे काय करतेस......?


राधा__(त्याच्याकडे रागात बघत).....वाशरूमला गेले होते रे.....


विक्रम__ अच्छा.....
(त्याच्याकडे बघत).....हेय हाय!!! बड़ी....कसा आहेस....(हात मिळवून)


तो__मी मस्त तू.....


विक्रम__मस्त....बाय दी वे.....तू इथे काय करतोयस????


तो__(राधाकडे बघून)......वॉशरूमला गेलो होतो रे.....


राधा__(मनात).....कसा मुलगा आहे हा.....😏😠 माझी कॉपी करतो...वॉशरूमला गेलो होतो म्हणे.....😏 चंपकलाल😏😏


विक्रम__ओके....चल बाय!!!
राधू डार्लिंग चल सगळे वाट बघत आहेत....


तो__(मनात).....ओह डार्लिंग.....ही तर बोलात होती माझा बेस्टी आहे तो....असो मला काय....😏


राधा__ हम्म्म्म चल विकुड़ी.....


दोघेही तिथुन जातात.....सगळे मूल आणि मूली कपल डान्स करायला जातात....सनम आणि जागृती...विकि आणि पल्लवी डान्स करायला जातात....सगळे मूल आणि मूली....अनोळखी असून ही एकत्र जोड़ी करून डान्स करत होते....राधा समोर उभी राहून पाहत होती.....तेवढ्यात सगळ्या लाईट्स अचानक बंद होतात....कोणाला काही कळत नाही....सगळीकडे अंधार होतो....सगळी माणस आपल्या पार्टनर सोबत उभे असतात....राधा एकटी होती...तिला त्या अंधारात भीति वाटत होती....म्हणुन ती जीरुला शोधत पुढे जाऊ लागली...


तेवढ्यात राधाला कोणीतरी तोंड दाबून मागे खेचल...आणि तिच्या उघड़या पाठीवर कर्कश असा कोणाचा तरी स्पर्श होऊ लागला....अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी अस करत होते....ती पुरती घाबरली पण पळनार कुठे...तीने खुप प्रयत्न केला स्वतःला सोड़वायचा....पण त्याने पकड़ खुप घट्ट केली म्हणून तिला पळता येइना....अचानक तिच्या मानेवर कोणी तरी स्पर्श केला...आता मात्र राधा खुप घाबरली तींने आपली पर्स त्याच्या तोंडावर मारली आणि त्याच्या डोळ्याला लागल्यामुळे त्याने तिला सोडले....तशी राधा धावु लागली....

पळत पळत राधा बाहेरच्या बाजूस आली....तिला फ़्लैश लाइट दिसली..आणि समोरून तिला Mr.Potato येताना दिसला...तीने विचार न करता जाउन त्यांला मीठी मारली....आणि रडू लागली....


राधा__ (घाबरून)........पपपपपप Mr.Potato... ममममममम मला वाचव....वाचव.....😢.(रडत)


तिने मीठी अजुन घट्ट केली....त्यांला काहीच कळत नव्हते.....


तो__ अग रेडिओ काय झाल तुला.....अग


राधा__ (हातवारे करून)..........तो तो.....तततत


तो__ तिकडे कोन.....


तो तिकडे बघू लागला....तर त्यांला एक मुलगा तिकडे दिसला....


तो__ (ओरडत)....एय कोन आहे तिकडे.....ए थांब....

तो तिकडे पळत गेला....तेवढ्यात तो मुलगा पळून गेला....मग त्याच लक्ष राधकडे गेल ती अजुन त्यांला मीठी मारून होती.....तेवढ्यात बंगल्यात लाईट आल्या.....ती घाबरली होती म्हणून...तो तिला घेऊन साइडला गेला...आणि तिकडे एका बाकावर ते बसले.....राधा अजुन घाबरलेली होती.....


तो__ अग रेडिओ रडू नकोस....काय झाल होत..?


राधा__(रडत).....मी ना....माझ्या फ्रेंडला शोधत होते...तर कोणीतरी माझ तोंड दाबल आणि मला बाहेर आनल.....😭


तो__ ओके....तुला कोणी काही केल नाही न....


राधा__ ममममम मला त्या माणसाने....नको तिकडे हात लावला....आणि माझ्या मानेवर.......😭


राधा तीच बोलन मधेच थांबवत बोली.....हे ऐकून त्यांला खुप राग आला....तेवढ्यात राधाचा ग्रुप तिकडे आला....सगला प्रकार त्यांना समजला....तो रागातच आत गेला....थोड्यावेळाने बाहेर येताना सोबत एका मुलाला आनल...तो ड्रिंक केलेला होता....सगळ्यांना काही कळत नव्हते...


विक्रम__ जीत सजंयला का आनल बाहेर....?


तो__ हाच तो ज्याने डॉक्टर रेडिओ आ म्हणजे राधा सोबत...नको ते चाळे केले.....


राधा__ पपपपपप पण तुला कस समजल.....


तो__ तू बोलीस ना तेव्हा हा तुझ्या मागेच होता...पाहिले मी याला पळत जाताना.....आणि पार्टीमध्ये पण याच लक्ष तुझ्यावर होत....


विक्रम__ संजय तू......😠😠 राधा सोबत अस करायची हिम्मत कशी झाली तुझी....तिला तू हात लावलास कसा....मी आता dad ना जाउन सांगतो....


तो__ नको...आता अंकलना नको सांगू सगळ्यांसमोर उगाच....नको


विक्रम__ हमम...राधा ये पुढे आणि मार याला...😠


राधा__ ननननन नको...विकुड़ी😥😕


तो__ रेडिओ तू ये पुढे.....😠


तशी राधा घाबरत पुढे येते....आणि संजयला जोरात कानाखाली मरते....


तो__ हे बग संजय....मुलगी म्हणजे तुझी प्रोपर्टी नाही समजल...की तू तिला कुठेही हात लावशील....तुझ्या घरी पण तुझी आई आहे तुझी बहिन पण आहे....तिच्यासोबत आम्ही अस केल तर....


संजय__ ए.....


तो__ का राग अला....मग ही मुलगी नाही का....अरे तू आता नशेत असलास तरी...कोणतीही मुलगी सुंदर दिसली म्हणून तिच्यासोबत तू अस वागुच कस शकतो....मुलींचा रिस्पेक्ट कर यार....अस नको वागुस...त्या मुलींचा पण जीव आहे रे....मुलगी असन्याची एवढी मोठी शिक्षा त्यांना का???...तस तर मी पण मुलगा आहे...राधा तर माझ्या मिठित होती...जवळ जवळ अर्धा तास...मी त्या संधीचा फायदा घेऊन तिला कुठेही टच करू शक्लो असतो...पण नाही....मी असा विचार पण कधी करू शकत नाही....ज्या मुलीला आपण छेडतो ना ती सुद्धा कोणाची तरी बहिन आहे रे...म्हणून आपल्या बहिनीचा चेहरा आठवा अस काही करताना...आज जर राधा तुझ्या तावड़ीतुन सुटली नसती तर....तर काय झाल असत....अरे तीच आयुष्य बरबाद झाल असत रे....आणि संजय एक लक्षात ठेव कर्म वाइट करशील ना तर त्याचा परिणाम वाइट होणार त्याचे परिणाम तू तर भोगशील पण तुझी बहिन सुद्धा भोगू शकते....कर्माचा फेरा असा असतो ना...की आपण केलेल्या कर्माची शिक्षा आपल्या माणसाला मिळते....समजल.........😏😠


संजय__ ननननन नाही नको....
रररर राधा सॉरी....मला माफ कर....😢मी नशेत अस नको वगायला पाहिजे होत....मी पुन्हा अस कोणत्याच मुलीशी नाही वागणार....😢


राधा__ (घाबरत)......i i it's ok.....😕


तो__ जा आता.....


विक्रम__ thanks रणजीत....आणि तू जे काही त्यांला बोलास अगदी बरोबर होत....


तो__ ह्म्म्म....अरे सगळ्या मुलानी हाच विचार केला आणी नीट वागले ना तर...कोणत्याच मुलीवर बलात्कार,ऐसिड attack नाही होणार....प्रत्येक मुलगी न घाबरता फिरू शकेल.....☺️


सनम__ हो यार बरोबर....


विक्रम__ बर चला आत...राधू चल.....आणि हा प्रकार कोणाला सांगू नका.....


पल्लवी__ हो चला....


सगळे आत जातात...पण राधा त्यांला थांबवते....


राधा__ आ...Thank u So much.....


तो__ वेलकम....☺️


राधा__ (हात पुढे करत).......हाय मी राधा..!


तो__ मी रणजीत...!


राधा__ नाही...Mr.Potato 😂😂😅


रणजीत__ हो आणि तू डॉक्टर रेडिओ.....😂😀


दोघेही हसतच आत जातात.....काहीवेळाने पार्टी संपते आणि राधा सगळ्यांना बाय करून निघुन जाते.....राधाची नजर रणजीतला शोधत होती....पण तो दिसला नाही मग राधा आणि जागृती घरी निघुन गेल्या.....

घरी जाउन पण राधा सगळ्या प्रकार आठवत होती.....आणि त्याच नाव घेताच तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली.....क्रमशः


(शेवटी झाली यांच्यात थोडीफार मैत्री....😀 आता ही मैत्री अशीच राहिली तर बर होइल...नाहीतर पुन्हा यांच्यात वाद सुरु होतील....बघुया पुढे यांचा काय होत....तुम्ही वाचत राहा फ्रेंड्स....आणि असच स्पोर्ट करा!!!!☺️)
©प्रतिक्षा__♥️🥀


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED