प्रारब्ध भाग १६ Vrishali Gotkhindikar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रारब्ध भाग १६

प्रारब्ध भाग १६

पैसे हातात मिळाल्यावर सुमन निदान तेवढ्यापुरती तरी खुष झाली .
आता आठ दहा दिवस तरी बरे जातील ..पुढचे पुढे .
रोज दुपारी माया तिच्या मावशीकडून परत आली की दोघींचे भेटणे सुरु झाले .
कधी मायाच्या अपार्टमेंट मध्ये तर कधी बाहेर मॉल किंवा हॉटेलला ..
सुमन बऱ्याच वेळेस पैसे खर्च करायचा प्रयत्न करायची पण माया नकार देत असे .
तिला माहित होते सुमनची असे पैसे खर्च करायची ऐपत नाहीय .
तरीही एकदोन वेळा तिच्या फार आग्रहामुळे मायाने तिला पैसे खर्चायची परवानगी दिली .

एकदोन वेळा हॉटेलचे बिल आणि काही वस्तूंवर पैसे खर्च केल्यावर सुमनकडचे पाच हजार रुपये मात्र चटक्यात संपले .आता मात्र परत परेशकडे पैसे मागितले तरी मिळणार नव्हते .एकदा मायाच्या घरी ती गेली असताना माया सुमनला म्हणाली .
“चल आज तुला एक गंमत दाखवते .”
मग दोघी तिच्या घरच्या होम थीएटर मध्ये गेल्या .
“आज कोणता पिक्चर पहायचा ..?असे सुमनने विचारताच ..
“आज एकदम स्पेशल गंमत आहे बस निवांत ..”
असे म्हणुन मायाने खोलीचे पडदे ओढुन
अंधार करून टाकला .
आणि मग सुरु झाल्या पोर्न फिल्म्स ..
त्या पाहताना प्रथम प्रथम सुमन संकोचुन गेली .
पण हळूहळू तिला त्यात “गंमत”वाटू लागली .
नवीन कोणतीही गोष्ट तिच्यासाठी “आकर्षण“ असे .
अशा फिल्म्स पाहताना माया त्यासोबत ड्रिंक्स घेत असे आणि सिगारेट पण ओढत असे .
सुमनला सुद्धा मायाने थोडी ड्रिंकची चव दिली ..
तिला ती अगदी कडवट वाटली .
“अग प्रथम ती कडवट वाटते ..नंतर तुच मागुन घेशील आणि चवीचवीने प्यायला लागशील .
सिगारेटचा पहिला झुरका घेताच सुमनला “ठसका” लागला .
मात्र सुमनने ठरवून टाकले दारू सिगारेट नाही प्यायची कारण तिला माहिती होते
की परेशला जरी या दोन गोष्टींचे व्यसन नसले तरी .
तिच्या तोंडाच्या वासावरून त्याला पत्ता लागू शकला असता .
आणि मुळात तिला सुद्धा या दोन्ही गोष्टी फार नाही आवडल्या .
पोर्न फिल्म्स मात्र तिला खुप “रोचक” वाटल्या.
मायाकडे याच्या असंख्य सीडी होत्या ..
त्यात “गे फिल्म्स” आणि “लेस्बियन फिल्म्स “ पण होत्या .
त्या बघताना सुमनला प्रचंड थ्रील वाटले .
त्या रात्री परेशच्या कुशीत आपण होऊन शिरलेल्या सुमनची सेक्सची भुक भागत नव्हती .
परेशला पण नवल वाटले की हीला इतके काय झालेय आज ?

मायासोबत पोर्न फिल्म पहाताना आजकाल सुमन अनावर होऊ लागली होती.
एकदा अचानकपणे फिल्म पाहताना दारूचे घोट घेत मायाने सुमनला जवळ ओढले .
आणि तिच्या रसदार ओठावर आपले ओठ दाबले.
सुमन पण त्याला “प्रतिसाद” देऊ लागली .
मायाने तिला आपल्या मिठीत ओढले ..आणि तिच्या अंगावरचा एक एक कपडा दूर करू लागली
सुमनने पण तिला आवेगाने जवळ ओढुन स्वतःला तिच्या स्वाधीन केले .
एकमेकींच्या अंगावरचे सर्व कपडे कधी दूर झाले ते त्यांना समजलेच नाही .
एकमेकांच्या नग्न मिठीत स्वर्गसुख आहे असे त्यांना वाटले .
आणि मग एक नवीनच “चाळा“सुरु झाला .
सुमनला आणि मायाला एकमेकीत इंटरेस्ट वाटू लागला .
सीडी पाहता पाहता दोघी त्यात दाखवल्या प्रमाणे एकमेकी सोबत “रमू” लागल्या
मायाच्या घरी आता रोज हा “लेस्बियन” खेळ रंगु लागला .
एकमेकींच्या शरीरासोबतचा केला जाणारा हा चाळा आता रोज केल्याखेरीज चैन पडेना .
माया कधी एकदा घरी परत येते आणि कधी एकदा हा खेळ चालू होतो
असे सुमनला वाटत असे ..
मायाची काही वेगळी अवस्था नव्हती ..
आता सुमनला परेशच्या मिठीत स्वारस्य वाटेना .
परेश घरी यायच्या आत ती झोपून जाऊ लागली .
दोन आठवड्याची परेशची इन्स्पेक्शन ड्युटी संपली .
आणि रविवार आला .
हल्ली सुमन रात्री फारसा “प्रतिसाद” देत नाही असे परेशच्या लक्षात आले होते .
आज सुट्टी आहे तर तिला घेऊन बाहेर जावे आणि संध्याकाळी जेवायला जावे
असा बेत त्याने आखला होता .
आधी सुमन हो हो म्हणाली ..पण का कोण जाणे जसजशी संध्याकाळ होऊ लागली
तशी ती “अस्वस्थ” होऊ लागली .
साडेपाच वाजत तिला मायाचा फोन आला .
तेव्हा मी जरा जाऊन येते असे मोघम सांगुन परेशच्या परवानगीची वाट न पाहता
सुमन बाहेर पडली .
मायाच्या घरी गेल्यावर नेहेमीप्रमाणे दोघी एकमेकात हरवून गेल्या .
यावेळी मायाला दारू आणि सिगारेट लागतच असे ..
आणि त्या वासात सुमनला पण जास्त मजा येत असे .
त्या भरात बाजुला ठेवलेला फोन वाजत आहे हे सुमनच्या लक्षात पण नाही आले .
दीड दोन तासांनी सुमन घरी गेली तेव्हा परेश अतिशय “अस्वस्थ” झाला होता .
एक तर काहीही न बोलता सुमन निघुन गेली होती .
नक्की कुठे गेली काहीही समजत नव्हते .
फोन ती उचलत नव्हती ..
सुमन घरात आली तेव्हा दारू आणि सिगरेटचा वास परेशच्या नाकात शिरला .
हा काय प्रकार त्याला समजेना ..
“सुमन काय हे .?.अग कुठे गेली होतीस ?..आणि फोन का उचलत नव्हतीस ?
परेशच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर ना देता..
माझे डोके दुखते आहे असे बोलुन ती थेट आत जाऊन मागच्या बाल्कनीत
बेडवर जाऊन झोपली .
तुला बाम लाऊन देऊ का? ..गोळी देऊ का ?अशा कोणत्याच प्रश्नाला तिने उत्तर दिले नाही .
चल बाहेरच्या खोलीत झोपायला ..इथे अडचणीत नको झोपु असे तो म्हणाला
तरी तिने काहीही उत्तर दिले नाही .
नाईलाजाने परेशने फ्रीजमधले दुध काढुन ग्लासमध्ये ओतुन घेतले आणि ते पिऊन झोपायला गेला .
दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन नेहेमीप्रमाणेच वागत होती..
जणुकाही काल काही घडलेच नव्हते .
परेशला पण तिच्या “विचित्र” स्वभावाची आता हळूहळू ओळख होऊ लागली होती .

आजपासुन परेश नेहेमीप्रमाणे घरी येणार होता त्यासाठी सुमनला घरी असणे भाग होते .
मागच्या आठवड्या सारखे दिवसभर बाहेर राहुन तिला चालणार नव्हते .
तिने तसे मायाला कळवले ...
माया पण आज जरा गडबडीत होती ,ती दिवसभर बाहेरच असणार होती .
नंतर दोन तीन दिवस त्या दोघींचे फक्त किरकोळ मेसेजवर बोलणे होत राहिले .
नंतर एक दिवस दुपारी मायाचा फोन आला घरी ये म्हणून ..
पण सुमनने डोकेदुखीचे कारण सांगुन जायचे टाळले .
खरे सांगायचे तर तिला आता त्या लेस्बियन सेक्सचा आणि पोर्न फिल्मचा कंटाळा येऊ लागला होता .
तिचा स्वभाव इतका “चंचल” होता की फार काळ ती एखाद्या गोष्टीत गुंतून राहू शकत नसे .
सुमन आता मागच्या बाल्कनीत जात पण नव्हती .
तिचे परेशसोबतचे वागणे पण आता पुर्वीसारखेच झाले होते .
परेशला पण “हुश्श्य” झाले होते ..तिचा मूड सांभाळणे ही एक कसरतच होती त्याच्यासाठी.
एके दिवशी मात्र मायाचा मेसेज आला की ती फ्री आहे संध्याकाळी मार्केटला जायचे का .
तेव्हा मात्र सुमनने होकार कळवला आणि दोघी शॉपिंग आणि हॉटेलिंगसाठी बाहेर पडल्या.
शॉपिंग करताना मायाने तिच्यासाठी पण एकदोन वेगळ्या रंगाच्या लिपस्टिक घेतल्या .
आज माया तिला थोड्या लांबच्या उत्तम हॉटेलमध्ये घेऊन गेली होती .
हॉटेलमध्ये खाताना बोलत बोलत तिने सांगितले मागले चारपाच दिवस ती बंगल्यावर
मावशीकडेच राहिली होती .
आणखीही खुप मित्र मैत्रिणी आल्या होत्या ,खुप धमाल केली .
मैत्रिणींसोबत लेस्बियन सेक्स पण केले वगैरे ..
सुमनला तिच्या त्या मावशीच्या बंगल्याबद्दल असलेले “कुतुहूल” आणखी वाढले .
सुमनने बोलता बोलता तिच्या जवळचे पैसे कसे संपले आणि आता परेश पैसे देऊ शकणार नाही म्हणाला
हे सहज मायाला सांगितले .
ते ऐकुन माया म्हणाली ..,एक मार्ग आहे अगदी सहज पैसे कमवायचा ..“कोणता ग .?.मला तर कोणत्याच प्रकारचे विशेष शिक्षण नाही आणि माझी नोकरी करायची बिलकुल इच्छा नाहीय ..”सुमन म्हणाली ..
“हे बघ आमच्याकडे एक पत्त्याचा क्लब आहे .तिथे बायका पैसे लावुन पत्ते खेळतात .

तु पण त्या खेळात भाग घेऊन पैसे मिळवु शकतेस ..’
”मला कुठे येतात पत्ते खेळायला ?आणि पैसे लावणे वगैरे पटत नाही ग मला .
आणि लावायला मी पैसे कुठून आणु?”
अशी सुमनने शंका विचारताच माया म्हणाली ..
“हे बघ पैसे हे पैसे असतात ते कसे मिळवले यापेक्षा किती मिळवले याला जास्त महत्व आहे
असे मी समजते .

क्रमशः