२९ जून २०६१ - काळरात्र - 13 Shubham Patil द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

२९ जून २०६१ - काळरात्र - 13

“म्हणजे आपल्याला ते कुठेतरी लिहून ठेवावे लागतील असंच ना? कुठे लिहायचं? आपण एखाद्या कागदावर नावाखाली आपल्याला पडलेला फसा लिहून ते एखाद्या एन्व्होलोपमध्ये ठेवूयात.” रचना म्हणाली.

“हो आपण तसंच करुयात. आपण एका बॉक्स मध्ये ठेऊ.” रचना म्हणाली.

“सेम, एझॅक्टली.... त्यांनीपण असंच केलं होतं.” हंसीका हताशपणे फास्यांकडे बघत म्हणाली.

“म्हणजे ते आपल्यापेक्षा पुढे आहेत तर.” शौनक म्हणला.

“होय, त्यांनी बॉक्समध्ये काहीतरी युनिक वस्तु ठेवली होती. आपणसुद्धा तसंच करुयात.” रचना म्हणाली.

“जर आपण काहीतरी वेगळं करत असू तर ते सुद्धा काहीतरी वेगळं करत असतील. हा... हा... हा...” असं म्हणून सारंग जोरजोरात हसायला लागला.

त्याच्याकडे दुर्लक्ष करत हंसीकाने आर्याला बॉक्स आणि फासे आणायला पाठवलं.

“म्हणजे आपल्याला फोटो लागतील.” अनि म्हणाला.

“काय वेडा विचित्रपणा सुरू आहे? मला काहीच समजत नाहीये.” नीलिमा दोन्ही हातांनी डोकं गच्च धरत म्हणाली.

सर्वजण सारंगने आणलेले फोटो बघत असताना आर्या एक बॉक्स घेऊन आली. हंसीका तिच्याकडे बघतच राहिली. कारण तो अगदी तसाच बॉक्स होता जो अनि आणि सक्षम पाहिल्यावेळी घेऊन गेले होते. हंसीकाला आधीच समजलं होतं की ती दुसर्‍या रियालिटीमध्ये आली आहे आणि आता आर्याने आणलेल्या बॉक्सवरुन तर तीला खात्री पटली होती की ती दुसर्‍या विश्वात आहे. कारण त्या बॉक्सला बघून कुणीही काहीही बोललं नाही. ती शांतच बसली कारण तिला तिथून बाहेर पाडण्यासाठी हा एकाच मार्ग होता.

"माझ्याकडे हा असाच बॉक्स आहे." असं म्हणत आर्याने तो बॉक्स डायनिंग टेबलवर ठेवला.

सर्वांनी आपापले फोटो निवडले होते. पण या सर्वांत सारंगचा फोटो मात्र नव्हता. तेव्हा अनि म्हणाला, तू नको काळजी करूस. आपण तुझा फोटो काढूयात. त्याने खिशातून मोबाइल काढला आणि कॅमेरा ऑन केला. हंसीकाला हे सर्व पाहून जबरदस्त धक्का बसला. कारण अनिने त्याचा फोन खराब झाल्याचं सर्वांना दाखवलं होतं. पण इथेतर त्याचा फोन अगदी सुरळीत सुरू होता. हंसीका अतिशय त्रासिक चेहर्‍याने आणि मनाने घडणारा प्रकार पाहू लागली. विशेष म्हणजे एक गोष्ट नक्की होतिकी जर अनिचा फोन खराब नव्हता आणि त्याला त्याचे काहीही वाटत नव्हते तर तो खचितच दुसर्‍या विश्वातला होता आणि त्याच्यासोबत आलेला सक्षमसुद्धा.

अनि सारंगचे फोटो काढत होता, पण त्यांच्या मनासारखे फोटो काही येत नव्हते. मग इकडे बघ तिकडे बघ. मागे सरक असं सुरू झालं. हंसीका त्या प्रकाराकडे हरलेल्या मनाने बघत होती. तिला एका गोष्टीचं जास्त आश्चर्य वाटत होतं की जर कुणीच अनिच्या खराब झालेल्या फोनबद्दल बोलत नाहीये तर मग सर्वच एका विश्वातले असतील आणि आपण एकटी दुसर्‍या विश्वातील. जे होईल त्याला सामोरं जाण्याची तिने मनाची तयारी केली आणि म्हणाली, चला सारंगचा फोटो प्रिंट झाला असेल तर आपण फासे टकुयात. सर्वांनी होकारर्थक मान दर्शवली आणि फासे टाकायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या फोटोमागे निळया मार्करने तिने फशावर आलेला नंबर लिहायला सुरुवात केली.

“आर्या?”

“सहा.”

“अनि?”

“तीन”

“सारंग?”

“चार”

“शौनक?”

“सहा”

“नीलिमा?”

“दोन”

“सक्षम?”

“पाच”

“रचना?”

“तीन”

“आणि माझा एक.”

“ग्रेट, आता आपण मल्टी फॅक्टर औथेंतिकटोर क्वीक कोड वापरूया. थोडक्यात क्वीक कोड. म्हणजे आपण काहीही ऑनलाइन शॉपिंग, बँकिंग किंवा काहीही असं करतो जिथे आपल्याला पासवर्ड लागतो, तेव्हा ते आपल्याला रंडम चित्र निवडायला लावतात. आपण ह्या फोटोंसोबत काहीतरी वस्तु ठेऊयात म्हणजे काहीही झालं तरी ती वस्तु म्हणजे आपली एक ययुनिक आयडेनटिटी राहील. आपण काहीतरी वस्तू, चित्र किंवा सर्वांच्या लक्षात राहील असं काहीतरी त्यात ठेऊया.” सक्षम म्हणाला.

“अं..... रुबिक्स क्युब.” आर्या म्हणाली.

“एझॅक्टली, रुबिक्स क्युब नकोच. आपल्याला जो बॉक्स सापडला होता, त्यातसुद्धा रुबिक्स क्युबच होता. हा पेपरवेट घ्या.” हंसीका पेपरवेट बॉक्समध्ये ठेवत म्हणाली.

“चला, आता आपल्या घराची एक युनिक ओळख झाली. आता पेपरवेट आणि आपल्या फोटोमागे असलेल्या नंबरवरून आपण आपलं घर ओळखू शकतो. चला वाईन घेऊयात.” सारंग म्हणाला.

“पण मला सांग, आपल्याला आधी मिळालेल्या नंबर्सपेक्षा आताचे नंबर्स वेगळे कसे आहेत?” नीलिमा किचनकडे जाताना हंसीकाला काम लाऊन गेली.

“लेट मी चेक,” असं म्हणत हंसीकाने डायरी उघडली. त्यात जे लिहिलं होतं ते बघून तिला गरगरायला झालं. त्यात आधीच सर्वांची नावं आणि त्यांचे नंबर्स हिरव्या मार्करने लिहिले होते. ते अक्षरसुद्धा हंसीकाचेच होते. म्हणजे आता ज्या घरात हंसीका होती ती तिथली नव्हती. कारण आता त्या घरात असलेल्या हंसीकाने म्हणजेच आपल्या हंसीकाने या आधी तिच्या मूळ घरात लाल रंगाच्या मार्करने डायरीवर तेच लिहिलं होतं, जे आता तिला हिरव्या मार्करने लिहिलेलं दिसत होतं. तीला आता पुर्णपणे कळून चुकलं होतं की ती शंभर टक्के दुसर्‍या विश्वात आलेली आहे. ती खिन्नपणे त्या कागदाकडे बघू लागली.

तिच्यासमोर सारंग बसला होता. त्याने कॅल्कुलेटर काढलं आणि अशा प्रकारे किती विश्व असतील याचा अंदाज घेऊ लागला. तो एकटाच बडबडत होता, सहा गुणिले सहा, म्हणजे आठ जणं आणि तीन ग्लोस्टिक्स आणि आठ लोकं, परत सहा शक्यता, असं काहीतरी करून त्याने समीकरण मांडलं आणि गुणाकार केला. त्यातून आलेलं उत्तर हे हंसीकाला तिच्या विश्वात जाण्यासाठी मदत करणार होतं. म्हणजे धूमकेतू परत जाण्याआधी ती जर तितक्या वेळी त्या काळोखातून पास झाली असती तर कदाचित शक्यता होती की ती तिच्या विश्वात परत जाऊ शकेल. पण ती शक्यता समुद्राच्या एका थेंबाएवढी होती. कारण सारंगने हो आकडा सांगितला तो मात्र चक्कर आणणारा होता, तो आकडा होता – पन्नास लाख अडतीस हजार आठशे अठ्ठेचाळीस.....

म्हणजेच ५,०३८,८४८ एवढे समांतर विश्वं त्यांच्या आजूबाजूला अस्तीत्वात होते आणि त्यापैकी आपलं खरं विश्व शोधणं हंसीकाला आता अशक्यच होतं. त्यामुळे आता जे होईल ते नशिबावर सोडून हंसीका जगायला तयार झाली. पण धूमकेतू जाईपर्यंत आपण प्रयत्न सोडायचे नाहीत असं तिने मनोमन ठरवलं.

आता तिच्या सोबत तिच्या विश्वातलं कोण आहे हे शोधण्यासाठी तिने प्रयत्न चालवले. तिने हिरव्या मार्करने लिहीलेल्या नंबर्सच्या खाली आता त्यांना मिळालेले नंबर्स लाल रंगाच्या मार्करने लिहिले. इतक्यात तिच्या बाजूला नीलिमा येऊन बसली. “त... तुझ्या फोटोच्या मागे कोणता नंबर लिहिला होता हे तुला आठवतंय का?”

“पाच.”

“पाच? अच्छा, ठीक आहे.”

मग तिने एकामागून एक सर्वांना त्यांच्या फोटोमागील आणि फासे पडल्यावर आलेले नंबर्स विचारले. प्रत्येकाला खोदून खोदून आणि दोनदा विचारलं. शांत डोक्याने ते नंबर्स लिहून घेतले आणि परत विचारात गढून गेली. बराच वेळ विचार केल्यावर तिने काही नावं आणि नंबर्स भोवती मार्क केलं आणि समोर बसलेल्या सारंगला म्हणाली, “हे सारंग, मला तुला काहीतरी दखायचे आहे. हे बघ. मला जे नंबर आठवताहेत जे आपल्याला आधीच्या बॉक्स मधून मिळालेले होते ते हे आहेत, हे मी आता तुझ्यासमोर लाल मार्करने लिहिले आहेत आणि मी ही नोटबुक उघडल्यावर हिरव्या मार्करने हे नंबर्स आधीच इथे लिहिले होते. मी आताच सर्वांना त्यांच्या फोटोमागचे नंबर्स विचारले. त्यात मला असं आढळून आलं की आर्या आणि नीलिमा हे ह्याच विश्वातले आहेत. म्हणजे हे त्यांचं ओरिजिनल विश्व आहे. कारण त्या दोघींनी घर सोडलं नव्हतं. पण उरलेले आपण सर्व बाहेरच्या विश्वातले आहोत. म्हणजे इथं असलेली नीलिमा तुझी मैत्रीण नाहीये. तूला माझं म्हणणं कळतंय का? तू माझ्या सोबत आहेस का?”

तिचं बोलणं ऐकून सारंग जोरात हसायला लागला आणि त्याने काही वेळआधी भरून ठेवलेला वाईन ग्लास एका क्षणात रिकामा केला.