भाग__२०
रणजीतला धक्काच बसतो...त्यांला कळत नव्हतं काय बोलू...तोंडातुन एक अक्षर बाहेर नव्हतं निघत...तिचा आवतार वेगळाच झाला होता...सफेद साड़ी,हातात काही नव्हतं..कपाळावर टिकली ही नव्हती...तेजस्वी चेहरा निस्तेज झाला होता...राधाही तिला बघतच बसली....ती दूसरी कोणी नसून सोनाक्षी होती...राधा जिच्यासाठी इकडे आली ती इतक्या लवकर स्वतःच तिच्या समोर उभी होती...सोनाक्षी ही रणजीतला पाहतच बसली...तिला ही काय बोलू कळत नव्हते...
रमा__ बघितले ना सुनबाई मुलगीच आहे ही...भूत नाय...बर या खाली नाश्ता झालाय...
राजेश__ व्हय या आवरुन...
राधा__ हु...
सोनाक्षी__ I am sorry....माझ्यामुळे तुम्ही मगाशी घाबरलात.....
राधा__ आआ ह ईट्स ओके... Actually I am sorry मी तुम्हला बघून उगाच ओरडले....
सोनाक्षी__ ईट्स फाइन....येते मी...
सोनाक्षी निघुन जाते...राधा ही मग खाली जाते...पण रणजीत आता मात्र विचारात पडला होता...
********************************
(रात्री)
रणजीत__ सोना इकडे कशी आली?....ती विधवा आहे..कस काय? योगायोग पण आसा का..मला वाटल होत कदाचित नाही दिसणार सोना मला पण ती माझ्याच घरी दिसावी मला...शेई.....तिला आता जाउन सगळ विचारावस वाटतंय पण राधा आहे ना...
तेवढ्यात रणजीतला रूममध्ये कोणीतरी आल्याच जानवल...त्याने वळून पहिल तर राधा होती...
राधा__ रणजीत बोलायच आहे...
रणजीत__ ह्म्म्म बोल न
राधा__ काय झालय आज तुझ लक्ष जेवणात ही नव्हते..दुपारी पण नीट जेवला नाहीस...काय झाल...
रणजीत__ नथिंग....
राधा__ सोनाक्षीचा विचार करतोयस...?
रणजीत__ (अश्चर्याने)......तुला कस माहित सोनाक्षी कोन ते???
राधा__ त्या दिवशी तुझी डायरी सापडली होती त्यातून...मला पुढच सत्य जाणून घ्यायचा आहे....प्लीज मला सांग....काय झाल जेव्हा तू U.S ला गेलास...
रणजीत__ तूला ऐकायाच आहे न...ठीके...
राधा__ ह्म्म्म....
रणजीत__ डायरीमधुन तुला तस समजल असेलच...सोनाक्षी अनाथ आहे..आमच्या गावात जे अनाथ आश्रम आहे ना...."विसावा" तिकडेच ती शिकली,वाढली....नंतर मी U.S ला गेलो...पण इकडे खुप काही घड़ल...सोनावर एका मुलाची कॉलेजपासून नजर होती...याबद्दल मला माहित नव्हतं....एकदा तीं जॉब वरुन घरी येताना त्या मुलाने तिला उचलून नेल अन तिच्यासोबत जबरदस्ती केली☹️आणि तिला आश्रमाजवळ आणून सोडल...सगळ्याना सकाळी खबर मिळाली...ज्या अवस्थेत ती रस्त्यावर पडली होती...ती अवस्था न बघण्यासारखी होती..मग तिला हॉस्पिटलला नेल गेल...मग पोलिस केस झाली...सोना यातून खुप खचली आणि घाबरली होती...
राधा__ बब बापरे☹️😕😢मम मग पाप पुढे....
रणजीत__ पुढे काय खुप मुश्किलने तीं बर होऊन जेव्हा जॉबवर जायला लागली तेव्हा सगळे तिच्याकडे वाइट नजरेने पाहत होते...तिच्याबद्दल नको ते बोलात होते...खुप हिम्मत करून ती काम करत होती..सगळ सहन करत होती पण आपला समाज अशा मुलींना सुखाने जगु देईल तर ना...तिला कंपनीमधुन पण काढल...यामुळे सोना खुप जास्त खचली...मग काहीदिवसांनी त्या मुलाचा पत्ता लागला...तो सयाजीराव फालतू,अयाशी मुलगा होता...त्याच्या घरच्याना हे समजल मग त्यांनी त्यांची आबरू ही वाचावी...म्हणून सोनाच्या समोर त्यांच्या मुलाशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला...सोनाला मान्य नव्हतं पण,तिच्या आश्रमातील सगळ्यानी तिला यातच तिचे चांगले आहे अस सांगितले आणि लग्नासाठी फोर्स केला...तिनेही नाइलाजाने होकार दिला....त्या मुलाने तर सोनाशी लग्न केल कारण त्यांला त्याच्या बापाने प्रोपर्टी मधुन हाकलु नये म्हणून..लग्न झाल...पण ती खुश नव्हती...जेव्हा मी शिक्षण पूर्ण करून आलो तेव्हा मला हें सगळ समजल...पाया खालून जमीन सरकावी तस झाल....मी तड़क सोनाला भेटलो तिच्या सासरी जाउन...मी तिला स्वीकारायला तयार होतो पण तिने नकार दिला...कारण,
राधा__ कारण....?
रणजीत__ तेव्हा ती pregnant होती...मी तिला हे ही समजवल कि मी बाळ सुद्धा आनंदाने स्वीकारायला तयार आहे पण तीं तयार नव्हती...मग मी त्यादिवशी तिकडूंन निघुन आलो ते सरळ मुंबईलाच...आणि आजच मी सोनाला पाहतोय....३ वर्षानंतर...ती माझ्याच घरी मला भेटल मला वाटल नव्हतं...😢हे कोणाला माहित नाही शिवाय विनयच्या.. आणि आता तुझ्या..☹️
रणजीत एवढ बोलून धसाधसा रडायला लागला....राधाने त्यांला एवढ रडताना कधीच पाहिले नव्हते....तिने त्याच्या पाठीवरुन हात फिरवला...त्यांला आधार दिला..त्याच हे दुःख ती समजू शकत होती...
रणजीत__ (रडत)....राधा😭 खरच ग...मी खुप प्रेम करतो ग तिच्यावर...मी दुःख कस सहन करत होतो मलाच माहित ग...😭😭 बिचारी तिच्यासोबत पण किती वाइट घटना घडल्या राधा😭😭
राधा__ रणजीत प्लीज तू शांत हो...शुईई...शांत हो ना रणजीत....
(मनात).....बापरे...किती भयानक घड़ल आहे तिच्या आयुष्यात सगळ...तिला कस वाटत असेल न...पण जर तीं प्रेग्नेंट होती तर...तीच बाळ कुठे आहे..?
रणजीत__ तिच्याशी बोलायला हव आपल्याला...राधा चालेल न तुला
राधा__ हो बोलुयात आपण...तू आता शांत हो...ह्म्म्म...
रणजीत__ ह्म्म्म....
राधाने रणजीतला आधार दिला...खरच आशावेळी आधाराची खुप गरज असते...मनात जे दुःख आपण साठवून ठेवतो ते कधीना कधी बाहेर निघतेच ना...त्यावेळी आंपल्या माणसाचा आधार मिळाला ना कि खुप शांत वाटत...
**********************************
सकाळी राधा आणि रणजीत बाहेर आले...राजेश न रमा भाजी आनायला गेले होते...हिच संधी होती सोनाशी बोलायची...म्हणून त्यांनी तिला खोलीत बोलावल...
सोनाक्षी__ काही काम होत का...
राधा__ बस न ग...तुला अरे बोलेल चालेल ना...
सोनाक्षी__ हम्म...हो
रणजीत__ सोना..
रणजीतच्या तोडूंन खुप वर्षानी ती तीच नाव ऐकत होती...तिला हे ऐकून आतुनच खुप बर वाटल...डोळ्यात पाणी आल...
सोनाक्षी__ आलेच मी......
राधा__ एक मिनिट सोना..आज तुला हव तेवढ तू रड...
रणजीत__ हम्म तिला सगळ माहित आहे सोना..
राधा__ हो...सोना मला तुझ पुढे काय झाल हें एकायच आहे...तुझ बाळ कुठे आहे??? तू विधवा कशी झालीस?? तू इकडे कशी?
सोनाक्षी__ हो मी प्रेग्नेंट होते...पण माझा नवरा रोज मला मारहाण करायचा त्यांला मी ओझे वाटत होती त्याच...रोज मारहाण करून माझे हाल केले😭 यातच माझ बाळ गेल...मग एकदा हे दारू पिउन घरी येत असताना यांना ट्रकने धड़क दिली आणि त्यात हे गेले...😭 सगळ्या घरच्यानी मला दोष दिला...अपशकुनी, अनाथ नको ते बोलले...माझ्या सासरच्या माणसानी मला घराबाहेर काढली..माझ्याशी नात तोड़ल...तेव्हा मी फिरत फिरत रमा काकू आणि राजेश काकाना भेटले...आणि इथे राहयला लागले...वातावरण शांत झाल मग मी नोकरी शोधली अन ती करायला लागले...रणजीत मला स्वीकारायला आला होता...पण कोणत्या तोंडाने मी.....😭😭
रणजीत__ सोना तू शांत हो ग...😭
राधा__ प्लीज सोना तू शांत हो...खरच खुप काही सहन केलास तू...😕☹️दाद दयाला हवी तुझ्या हिम्मतीची...नव्याने उभी राहण्याच तू प्रयत्न केलेस...
रणजीत__ हम्म्म्म..☹️😭
राधा__ मी आलेच...तुम्ही बसा आणि बोला...मनात जेबढ दुःख आहे बाहेर काढ़ा...
राधा रूमबाहेर आली....तिला अस वाटत होत की त्यांना एकांत द्यावा...दोघेही एकामेकांशी बोलले तर त्यांना खरच बर वाटेल..आणि त्यांच मन ही हलक होइल..इतके वर्ष मनात जे दुःख दाबून ठेवला होते ते बाहेर निघेल आणि मग दोघेही शांत होतील..राधाने रमा आणि राजेशला आज सुट्टी दिली..अन ती स्वयंपाक बनवू लागली...१,२ तासानंतर सोनाक्षी आणि रणजीत बाहेर आले...
आता सोनाक्षी येताना थोड़ी हसत येत होती...आणि रणजीतच ही मन हलक झाल्यासारखे वाटत होते...मग राधाने दोघांना जेवन वाढले आणि तिघेही एकत्र जेवू लागले....
*****************************
रात्री रूममध्ये रणजीत शांत बसला होता...राधा ही कसला तरी विचार करत बसली होती...
राधा__ रणजीत...
रणजीत__ ह्म्म्म....बोल ना
राधा__ माझ्या डोक्यातना काही कल्पना येतायत...
रणजीत__ काय..?
राधा__ आपण सोनाला आपल्यासोबत घेऊन गेलो तर..?
रणजीत__ कुठे....?
राधा__ अरे अंदेरीला आंपल्या घरी...😀
रणजीत__ का..?
राधा__ अरे इकडे राहून ती काय करेल...त्यापेक्षा आपण तिला मुंबईला घेऊन जाऊ...आणि तिला एका स्कुलमध्ये टीचरची जॉब मिळवून देऊ...तिच्या पायावर तिला उभ करूया...आणि मग जर तिची इच्छा असेल तर एखादा चांगला मुलगा तिच्यासाठी शोधून तीच लग्न लावू...म्हणजे कस ती आनंदी राहिल ना तिच्या आयुष्यात..
रणजीत__ (मनात).....मला कळत नाही राधा...तू इतकी चांगली का आहेस ग...😢निशांतशी पण किती चांगल वागतेस तू...त्याच चांगल करतेस आणि आता स्वतःच्या नवरयाच्या ex..Gf ला घरी घेऊन जाण्याच विचार करतेस..तिला स्वतःच्या पायावर उभ करण्याच बोलतेस...अग इतर स्त्रियां तर आंपल्या नवरयावर विनाकारण संशय घेतात पण तू किती विश्वास टाकतेस आमच्यावर....खरच सगळ्यांच नेहमी चांगल करायला बघतेस तू...मी खुप भाग्यवान आहे की तुझ्यासारखी मूलगी मला बायको म्हणून भेटले...तू खुप स्पेशल आणि वेगळी आहेस....अगदी रातराणी सारखी....रातरानी कस सगळ्या फुलांपेक्षा एकदम वेगळी आणि स्पेशल आहे...तशी..तू रातरानी...❤️
राधा__ (एक्टिंग करत).....अरे ओ सांबा कहा खो गये...हाई....😂
रणजीत__ वेडी😂कुठे नाही....तुझी कल्पना चांगली आहे आपण तिच्याशी बोलुया...ह्म्म्म...
राधा__ हम्म..हो...☺️आपण उद्या फिरायला जाउ या कारण उद्या लास्ट डे आहे इकड़चा...आणि हो एक काम करु सोनाला ही सोबत घेऊ ह्म्म्म...चल गुड़ नाइट...
रणजीत__ ह्म्म्म...
मग दोघेही झोपेच्या स्वाधीन होतात....
******************************
सकाळी रणजीत तयार होउन खाली जातो...आणि सोनाला त्यांच्या रूममध्ये पाठवतो...राधा फिरायला जाण्याची तयारी करत होती...तिने मस्त व्हाइट जीन्स आणि स्काय ब्लू कलरचा झालर टॉप घातला होता...त्यावर लांब केसांची पोनी बांधली...सिंपल तयार झाली होती तरी सुंदर दिसत होती...
सोनाक्षी__ (दार नॉक करत).....राधा आत येऊ का?
राधा__ ह..अग ये ना...परमिशन काय घ्यायची त्यात....बस
सोनाक्षी__ बोल काही काम होत का...
राधा__ हम्म......(तिला ड्रेस देत)....हे घे हा ड्रेस घालून ये...आपण बाहेर चालोय फिरायला....तू पण येते आहेस...चल आवर
सोनाक्षी__ नको राधा...लोक काय म्हणतील...
राधा__ कोणती लोक सोना...तुझ्यावर बलात्कार झाला तेव्हा कुठे होती ही लोक?? तुला न्याय मिळवून द्यायचा सोडून त्या आगीत ढंकळताना त्यांना काही वाटल नाही का तेव्हा कुठे होती ही लोक?प्रेग्नेंट असताना ही तुला तुझा नवरा मारायचा तेव्हा कुठे होती ही लोक? तुला घराबाहेर कांढल तेव्हा कुठे होती ही लोक? संग ना...अग आंपल्या वरती वाइट प्रसंग आला की कोणीही मदतीला नाही येत...लोक काय म्हणतील या भीतीने जगायच नाही का? तू बिंदस्त हे कपड़े घाल मस्त तयार हो आणि आनंदाने आमच्यासोबत चल....बघुया कोणती लोक येतात...
सोनाक्षी__ ह्म्म्म...ठीके
मग काहीवेळाने सोनाक्षी आणि राधा खाली आल्या रणजीत तर सोनाला बघतच बसला...त्यांला आधिची सोना पुन्हा आली अस वाटत होत...ती सुद्धा आनंदी दिसत होती...मग तिघेही कोल्हापुर फिरायला निघाले...
****************************
सर्वात आधी सगळे रंकाळा लेक कड़े गेले...तिकडे मस्त ऊंच झाड़ होती...मोठा तलाव होत...थंड गार वारा होता...मग तिकडे जाउन त्यांनी आधी खुप सेल्फीज काढल्या...आणि बोटिंग केली...त्या जागेचे फोटो काढले..मस्त फिरले...वेळ कमी होता म्हणून जास्तवेळ न थांबता तिकडूंन ते निघाले....
मग ते लोक सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय तिकडे गेले...तिकडे ग्रामीण जीवनावर आधारित असे पुतले बनवले होते...शंकराची मोठी मूर्ति होती...वेगळ्या वेगळ्या मुर्त्या,घर तिकडे बनवली होती...श्रीकृष्ण आणि यशोदा मातेची मूर्ति ही तिकडे बनवली होती....संत ज्ञानेश्वर,सोपान,निवृती,मुक्ताबाई यांच्या मूर्ति होती...ग्रामीण जीवनातील माणस आधी कशी राहत होते याचे तिकडे पुतले बनवले होते...राधा सगळकाही तिच्या डोळ्यात आणि कॅमेरामध्ये साठवत होती....
तिकडूंन आल्यानंतर तिघानी मस्त जेवण केले...मग शॉपिंग केली..तोवर संध्याकाळ झाली...आणि मग ते शेवटी महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरात गेले...तिकडे जाउन तिघानी आईचे दर्शन घेतले...आणि थोडेवेळ मंदिरात बसले....
राधा__ बापरे...किती फिरलो...अजुन खुप काही फिरायचा आहे...नेक्स्ट टाइम आलो की फिरू हो ना रणजीत....
रणजीत__ हो हो...
सोनाक्षी__ मला ही खुप मस्त वाटल...
राधा__ हो ना...बर आम्हाला तुझ्याशी बोलायच होत...आम्ही उद्या मुंबईला परत जातोय...तू पन आमच्यासोबत यावीस अशी इच्छा आहे आमची...तिकडे येऊन तू शाळेत टीचरचा जॉब कर...रणजीत तुला यात हेल्प करेल...आणि तुला ही टीचरच काम करायचा होताच ना...तस ही इकड राहून तू काय करणार त्यापेक्षा आमच्यासोबत चल आणि स्वतःच्या पायावर उभी राहा...
सोनाक्षी__ पण...
राधा__ आता स्वतःचा आणि तुझ्या भविष्याचा विचार कर सोना...
सोनाक्षी__ ठीके...मी येइन तुमच्यासोबत पण...तुमच्या घरचे..???
रणजीत__ अग कोणी काही बोलणार नाही...ते आम्ही बघू...
राधा__ हो...आणि उद्या जाताना इकडे सगळ सोडून नव्याने आधीसारखी सोना बनून आमच्यासोबत चल....
सोनाक्षी__ हो...थांक्यु...तुमच्या दोघांमुळे माझा कॉन्फिडेंस अजुन वाढला आहे...☺️
राधा__ वेरी गुड़...
मग तिघेही खळख़लून हसतात😂😀❤️...तेवढ्यात मागून कोणीतरी टाळी वाजवत येत....सगळे उठून मागे बघतात तर एक बाई होती...तिच्या या प्रकारमुळे सगळी माणस आता हळूहळू जमा होऊ लागली....
सोनाक्षी__ सासुबाई......☹️
राधा__ सासु..?ह्या तुझ्या सासु आहेत...
सोनाक्षी__ हो....माझ्या सासु आहेत निर्मला शिर्के...
निर्मला__ काय सुनबाई...तुमच्या नवरयाला जाउन फक्त २ वर्ष काय झाली....तू तर खुदूखुदू हसायला लागलीस...आणि वा कपड़े तर बघा विधवा असून ही असे कपड़े घालतेस...काय बोलायच तुला..लाज नाही अजिबात...
राधा__ ओह...निर्मलाबाई....विधवा आहे म्हणून काय सफेदच कपड़े घालायचे का...आणि २ वर्ष झालीत ना आता मग तिने काय आख आयुष्य त्या नालायक़ माणसाच्या आठवणीत घालवायचे का...😠आणि हो लाज तुमच्या मुलाला नाही वाटली हिची आबरू लुटताना...
निर्मला__ अग विधवा आहै ती समाज काय म्हणेल...आणि आमच्या इबर्तीच काय...
राधा__ समाज..? हा समाज तर आंपल्या कोणत्याच गोष्टीत सहभागी होत नाही...आणि राहिला तुमच्या इज्जतीचा प्रश्न..जेव्हा तुमच्या मुलाने हिची आबरू लुटली..तेव्हा नाही गेली तुमची इज्जत आणि हा समाज तेव्हा नाही आला तुम्हला ताने मारायला...ह तुमचा मुलगा हिला रोज मारायचा तेव्हा नाही गेली तुमची इज्जत...आणि हा समाज कुठे होता तेव्हा.....सांगा ना...
सोनाक्षी__ रररर राधा....😢
राधा__ थांब सोना आज होऊचदे...😠 बोला ना आता निर्मला देवी बोला...जेव्हा हिच्या पोटातील बाळ गेल तेव्हा नाही गेली तुमची इज्जत आणि हा समाज तेव्हा नाही आला....जेव्हा हिला मदत हवी होती तेव्हा हा समाज शांत होता आणि मज़्ज़ा बघत होता...काय बरोबर ना...आणि हो तुमचा मुलगा त्याच्या कर्माने मेलाय...दारू पिऊन तो जर ड्रायव्ह करत होता आणि ट्रकने त्यांला धड़क दिली तर यात सोनाक्षीचा क़ाय दोष..पण तुम्ही तिला दोषी ठरवले....
निर्मला__ आ ते...ब
राधा__ का आता का घबरताय....आहो तुम्ही ही एक स्त्री आहात...तुमच्या मुलाला चांगले संस्कार तर नाहीच दिलत तुम्ही...पन हिच्यावर बलात्कार झाला तेव्हा का नाही लावून दिलीत मुलाच्या एक कानाखाली...का नाही हवाली केलात पोलिसांच्या....का??? का सगळ मिटावत घेतला आणि हिचा लग्न लावून दिलय का..तुमची मूलगी असती या जागी तर असच केल असते का तुम्ही...?...मुलगा रोज हिला मारतोय बघून पण का इग्नोर केलात का???😠😠ह का केलात...मुलगा मेला त्याच्या चुकिने..त्याच्या कर्माने आणि दोष कोणाला हिला...का दिलात...आणि आता जर तुमचा आणि हिचा नात तुटल तर का टोचुन बोलताय हिला...ती स्वतःच्या पायावर उभी राहते तर का मागे खेचता आहेत...शी लाज वाटून घ्या थोड़ी....आणि हो तुम्ही समाजच तर बोलूच नका आधी स्वतः सुधरा मग समाज समाज ओरडत फिरा....पुन्हा जर सोनाला काही बोलात तर याद रखा...😠🙌 मी डॉक्टर असले तरी अशी सरळ करेन ना तुम्हला परत वाकडया होणारच नाही तुम्ही......सुधरा आता तरी तुम्ही पन आणि (सगल्यांकडे बघून).....ह्या समजाने पण🙌विचार बदला आता तरी...(तिचा हात पकडून)....चल सोना....
तिघेही तिकडूंन निघुन जातात....निर्मला आणि बाकीचे सगळे शांतपणे आंपल्या कामाला निघुन जातात.....
********************************
घरी आल्यावर राधा जरा चिड़चिड़ करत होती...पण रणजीत तर अश्चर्याच्या धक्कयातच होता...ही राधा त्यांला नव्याने कळत होती...सोना ही कॉन्फिडेंट आणि आनंदी होती फक्त राधामुळे...☺️
राधा__ समजते काय स्वतःला...निर्मला नाव आणि काम काय हिचा..लोकांची लाज काढायची...स्वतःला रानी विक्टोरिया समजते...😠
रणजीत__ राधा शांत हो...😀
सोनाक्षी__ (राधाचा हात धरून).....थैंक्यू राधा..तू खरच ग्रेट मूलगी आहेस...माझ आयुष्य सावरण्याच तू काम करतेयस...थांक्यु...☺️
राधा__ थांक्यु काय ग...मला तू माझ्या बहिनीसारखी आहेस...बहिनीसाठी एवढ तर करुच शकते...😀बर आता पैकिंग करायला घे...उद्या लवकर निघतोय आपन...
सोनाक्षी__ ह्म्म्म...
रणजीत__ आता जास्त विचार नको करूस...हम्म झोप गुड़ नाइट....
सोनाक्षी__ गुड़ नाईट
राधा__ गुड़ नाइट...
तिघेही लवकरच झोपतात...मग सकाळी सगळ्यांचा निरोप घेऊन ते घरी जायला निघतात...रात्री ९ ला ते घरी पोहोचतात.....
राधा__आई,बाबा,काकू,काका,दादा,ताई...बबडू...शीतल...कुठे आहेत सगळे....रामु काका....
रुता__ राधू काकी......😚आलीश तू
राधा__ हो माझा बच्चा..माझा सोन्या😚.....(तिला किस करत)
रुता__ मी तुला खुप मिस केल काकू...
राधा__ हो मी पण केला ग
रणजीत__ जीत काकाची नाही आठवण अली वाटत...
रुता__ आली ना..काका
रणजीत__ ये माझी बाई😚
माधवी__ अरे आलात....कस झाल सगळ
राधा__ मस्त
सुमन__ आली ग माझी मूल...
रेवा__ भाई,वहिनी आत तरी या
महेश__ या बसा....
राहुल__ आज मुदाम आम्ही घरी थांबलो तुम्हला भेटायला...
रणजीत__ ओह!!!
रम्या__ कसे आहात दोघा...एंजॉय केल ना
राधा__ हो.....
रणजीत__ आम्हाला दोघांना तुम्हा सर्वशी बोलायच आहे
सदाशिव__ या आत मग बोला
रणजीत__ हम्म आ सोना...
सोनाक्षी__ नमस्कार!!!
सुमन__ कोन ही जीत?
सदाशिव__ जीत बाळा कोन ही?
रणजीत__ सांगतो आत बसून बोलुया...
सगळे आत जातात..सोनाला पाहून सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते...होणारच ना कारण हनीमून वरुन येताना कोणतेही कपल सोबत एखादी मूलगी घेऊन येत नाहीत...नाही का...
क्रमश:
(फ्रेंड्स, मी रणजीतचा पास्ट कमी शब्दात मांडला आहे...मला वाटतंय तुम्ही समजून घ्याल...कमी शब्दात ही खुप काही मांडल आहे मी..आणि खरच आपलया समाजातील काही माणस अशी असतात ना कि विधवा मुलींना सुखाने जगूच देत नाहीत..इतके जुने विचार कसे बाळगतात लोक कुणास ठाऊक...आंपल्या देशात बऱ्याच ठिकाणी विधवा बायकासोबत अस होत असते...का त्यांनी नवीन स्वप्न पाहू नयेत का...त्यांना ही जगण्याचा अधिकार आहेच ना..विचार पद्धतीत बदल होण्याची खरच गरज आहे...👍..Stay Tuned....)