Punahbhent - 1 books and stories free download online pdf in Marathi

पुनर्भेट भाग १

पुनर्भेट भाग १

घड्याळाचा काटा साडेनऊ कडे गेलेला पाहताच रमाने हातातली पोळी तव्यावर टाकली
आणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या मेघनाला हाक दिली ,
“मेघु ये ग लवकर गरम पोळी घालतेय तुला ,ताट वाढले आहे तुझे .
जवळच्या छोट्या टेबल वर एका ताटात रमाने भाजी ,कोशिंबीर वाढली होती .
शेवटची गरम पोळी ताटात वाढून रमाने ग्यास बंद केला .
आणि मेघनाच्या पोळीवर तुप वाढले .
तोपर्यंत मेघना आत येऊन खुर्चीवर बसली,तिच्या शेजारीच रमा बसली .
दोघींनी एकत्रच खायला सुरवात केली .
मेघु माझी जायची वेळ झाली बर का
आज सुजाता नाही येणार तेव्हा मलाच दुकान उघडायला हवे
इथे तुझा डबा भरून ठेवलाय तो टाक आधी स्याकमध्ये तुझ्या ”
“हो ग टाकते ..
आणि आई आज मला थोडा उशीर होईल काही लेसन पूर्ण करायचे आहेत .
रितू आणि मी येऊ एकत्रच ,मला सोडेल ती तिच्या स्कुटीवरून .”
“रितू आहे म्हणल्यावर मला काही काळजी नाही ग मेघु तुझी”
रमा म्हणाली .
लगबगीने तिने तिचा डबा पर्समध्ये टाकला आणि बाहेरच्या खोलीत जाऊन कपडे बदलू लागली .
मेघनाचे खाऊन झाल्यावर तिने टेबल आवरले आणि डबा घेऊन बाहेरच्या खोलीत आली .
आपल्या स्याक मध्ये पाण्याची बाटली आणि डबा तिने ठेवला .
एव्हाना रमाचे आवरले होते मेघनाचा निरोप घेऊन ती बाहेर पडली .
घराच्या कोपऱ्यावर बस स्टोप होता ,मिळेल ती बस घेऊन जायला हवे .
तेवढ्यात बस आलीच रमा पट्कन चढली आणि रिकाम्या सीटवर बसली .
दहा मिनिटात तिचे ठिकाण येणार होते .
बसल्या बसल्या रमाच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले .
आधी ती एका मेडिकल स्टोअर मध्ये नोकरीला होती .
नुकतेच वर्षभरापूर्वी तिने एक फूड शॉप सुरु केले होते .
ज्यामध्ये ती लाडू, चिवडा, चकल्या, केक, वड्या असे विकायला ठेवत असे .
तसेच चहा ,कॉफी, वडे ,थालीपीठ, उप्पीट असे जिन्नस ही पुरवत असे.
यासाठी तिच्या मदतीला सुजाता म्हणून एक मुलगी पण होती .
हे दुकान तिच्या एका स्नेह्यांनी तिला नाममात्र भाड्याने दिले होते .
आधीपासूनच तिथे टेबल खुर्च्या काउंटर कपाटे वगैरे होतेच .
एक छोटे बाथरूम सुद्धा होते .
काही किरकोळ वस्तू घेतल्यावर तिला ते दुकान सुरु करायला सोपे गेले .
कोरडे पदार्थ मात्र ती घरीच बनवत असे .
जवळच कॉलेज ,ऑफिस शाळा आणि या सर्वासाठी लागणाऱ्या सामानाच्या
विक्रीची दुकाने पण होती .
त्यामुळे दुकानात दिवसभर गर्दी असे .
दुकान चांगले चालले होते .
सुजाता नऊ पर्यंत दुकान उघडून झाडपूस करून ठेवत असे .
दुकानातल्या कोरड्या पदार्थांची विक्री सुरु करीत असे .
रमा साडेनऊच्या आसपास येत असे .
मग दोघी मिळुन चहा कॉफी इतर पदार्थ तयार करीत असत.
जसजशी मागणी असे तसतसे ताजे पदार्थ रमा बनवत असे .
आणि सुजाता वाटप करीत असे .
उष्ट्या कपबशा ताटल्या ग्लास धुवायला एक वेगळी बाई होती .
ती शेजारीच एका झोपडीत राहायला होती .
अधून मधून येत ती सर्व धुवुन जात असे .
अगदीच काही राहिले तर सुजाता पूर्ण करून टाकत असे .
ताजे घरगुती आणि चविष्ट पदार्थ असल्याने तिच्या दुकानात यायला लोकांची पसंती असे
नोकरीपेक्षा या दुकानात तिला चांगल्या पैकी कमाई होती .
अर्थात दिवसभराचे कष्ट पण होतेच …
बसची घंटा वाजली आणि रमा भानावर आली .
तिचा स्टोप आला होता .
ती पटकन उतरली आणि दुकानाच्या दिशेने निघाली.
दुकानाजवळ पोचताच तिने दुकानाचे शटर उघडले .
तोपर्यंत शेजारच्या दुकानातून दुधाच्या पिशव्या घेऊन शेजारच्या दुकानातील नोकर राजू आला.
झाडू घेऊन झाडणाऱ्या रमाला पाहून पिशव्या ठेवून तो पुढे झाला .
“मावशी अहो इकडे आण तो झाडू ..मी झाडतो .
असे म्हणत त्याने रमाच्या हातुन झाडू काढुन घेतला आणि झाडू लागला .
आज सुजाता ताई नाही का आली ?
राजू, ताई आज उशिरा येईल ,तु थोडा वेळ थांबशील का मदतीला ?
कधीही अडचणीच्या वेळी हा शेजारच्या दुकानातला राजू तिच्या मदतीला येत असे .
त्याच्या मालकांची यासाठी पूर्ण परवानगी असे .
जवळच्या झोपडपट्टीत राहणारा राजू दिवसा काम करून रात्रशाळेत शिकत असे .
राजू असा अडचणीला नेहेमी मदत करीत असे त्यामुळे रमाही त्याला शिक्षणसाठी मदत करीत असे .
कधी वह्या ,कधी पुस्तके ,कधी फी अगदी आनंदाने देत असे .
त्यामुळे राजुलाही शिकायला हुरूप येत असे .
आजूबाजूच्या दुकानातील सगळेच रमाच्या मदतीला कायमच तयार असत .
ही कष्टाळू बाई खुप व्यवस्थित हे दुकान चालवते याचे सर्वांनाच कौतुक होते .
आपल्या वागण्याचे रमाने सर्वाना आपलेसे केले होते .
वर्षभरात तिचा चांगला जम बसला होते तिथे.
आता रमाने मोठ्या पातेल्यात दुध तापत ठेवले आणि पाण्याची घागर बाहेरच्या नळावरून भरून आणली .
दुसरीकडे उप्पीट साठी रवा भाजायला ठेवला .
आता थोड्या वेळात शेजारच्या कॉलेज मधली दहा बारा जण उप्पीट खाण्यासाठी यायची होती .
सोबत चहा आणि बिस्किटे पण लागत त्यांना .
रोजचेच गिऱ्हाईक होते ते तिचे.
ही रोजचीच पहिली ऑर्डर असायची.
रवा भाजेपर्यंत रमाने इतर तयारी केली आणि दूध तापल्यावर त्याच ग्यास वर उप्पीट करायला टाकले .
तोपर्यंत राजूने दुकानात असलेली चार पाच टेबले स्वच्छ पुसून त्यावर पाण्याचे मग आणि ग्लास ठेवले .
इतक्यात सर्वजण आलेच.
ते सर्व बसल्यावर गरम गरम उप्पीट प्लेटमध्ये भरून त्यावर रमाने
खोबरे कोथिंबीर शेव टाकली जवळ लिंबाची फोड दिली .
राजूने सगळ्या प्लेट सर्वांना नेऊन दिल्या .
त्यांचे खाणे सुरु झाल्यावर रमाने सर्वांना चहा टाकला .
बरणीतील बिस्किटे एका प्लेटमध्ये ठेऊन राजूने ती प्लेट बाहेर ठेवली .
सर्वांचे झाल्यावर रमाने चहाचे कप भरले .
राजूने उप्पीटच्या प्लेट धुवायला ठेवल्या आणि सर्वांना चहा आणि बिस्किटे दिली .
सगळ्यांचे झाल्यावर ग्रुपमधील एकजण बिल द्यायला आला.
बिल देऊन रमाला म्हणाला ..
“मावशी तुमचे उप्पीट आणि चहा मात्र भन्नाट बर का ..
रोजच्याच चवीत एक कणभर पण बदल नाही,अतिशय चविष्ट .
नाहीतर आमच्या बायका एका वेळ सारखा चहा दुसऱ्या वेळी जमत नाही त्यांना “
असे म्हणून तो जोरात हसु लागला ,आणि इतर पण लोक हसु लागले .
रमाने हलकेच हसून त्याला साथ दिली .
आणि सर्वजण बाहेर पडले .
तोपर्यंत राजूने प्लेट ,कपबशा धुवून पालथ्या घातल्या होत्या .
“राजू ये उप्पीट खाऊन जा असे म्हणून रमाने राजूला प्लेट दिली .
राजूने बसून खाऊन घेतले ,चहा घेतला .
कधीही मदतीला आला की त्याला काही खायला दिल्याशिवाय रमा सोडत नसे.
“मावशी मी निघतो काही लागले तर हाक मारा “असे म्हणून तो निघाला .
आता नाही लागणार मदत ,थोड्या वेळात सुजाता येईलच .
असे म्हणून रमा पण थोडा वेळ बसली .
किरकोळ कोरडे पदार्थ घेऊन जायला काही लोक येत होते .
पण मोठी ऑर्डर आता एक वाजता असायची .
रोज एक वाजता सात आठ लोक गरम थालीपीठ खायला येत असत ,सोबत काही लाडू ,वडी खात .
नंतर चहा असेच...
रोजचाच नेम होता त्यांचा
आता बारापर्यंत सुजाता येणारच होती .
हळूहळू किरकोळ कामे रमा आटोपत राहिली .
थालीपीठाची तयारी करीत राहिली .

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED