Reunion Part 7 books and stories free download online pdf in Marathi

पुनर्भेट भाग ७

पुनर्भेट भाग ७

घराच्या आजूबाजूला कोणीच राहणारे नसल्याने घरातला नेहेमी होणारा
सतीशचा आरडाओरडा आणि दंगा कुणाला कळायचा प्रश्न नव्हता .

हे सर्व कमी म्हणून की काय एक दिवस एक गृहस्थ संध्याकाळी दारात उभे राहिले .

रमाला विचारले त्यांनी ती कोण आहे ..बायको म्हणल्यावर ते म्हणाले

असे आहे काय ,लग्न झाले म्हणूनच या सतीशने घर भाड्याने घेतले वाटते .

नाहीतर धर्मशाळेत राहत होता .

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या घराचे गेले वर्षभराचे भाडे दिले गेले नव्हते .

रमाने जेव्हा हे घर आमचे स्वतःचे आहे असे सांगितले तेव्हा ते हसु लागले .

तुम्ही बायको असुन सुद्धा सतीशने तुम्हाला पण थापा मारल्या वाटते .

असे म्हणून ते घरीच बसून राहिले ,पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणाले .

वर्षाचे म्हणजे सहा हजार रुपये होतात असे पण बोलले .

ओळखीचा म्हणून कमी भाड्यात घर दिले तर हा भाडे पण देईना ..

असेही बोलु लागले

रमाचे तर डोकेच गरगरू लागले .

आणि थोड्या वेळाने सतीश घरी आला ,नशीब आज पिऊन नव्हता आला .

त्या गृहस्थांना पाहिल्यावर दचकला आणि गयावया करू लागला .

जवळचे दोन हजार आणि रमाकडचे दोन हजार घेऊन

त्याने त्या गृहस्थांना दिले आणि उरलेले दोन दिवसात घरी आणुन देतो म्हणाला.

ते गेल्यावर रमाने विचारले .

“अरे सतीश हे कोण ?आणि हे सांगत होते ते खरे आहे का ?

यावर सतीश चुपच ..!!

तु तर म्हणला होतास हे आपले स्वतःचे घर आहे .

हे ऐकल्यावर सतीश म्हणाला

“स्वतःचे घर कुठून आणणार होतो मी ?
मला ना आई न बाप

तुझ्याशी लग्न करायसाठी मी ही थाप मारली तुझ्या काकांना

नाहीतर त्यांनी कशी दिली असती आपली पुतणी माझ्यासारख्या अनाथाला ?

यावर काय बोलावे रमाला सुचेना, पण मनातून मात्र ती थोडी हबकली ..

एक तर सतीशला दारूचे, जुगाराचे व्यसन होतेच ,
त्यात आता घरही त्याचे स्वतःचे नाही हे तिला समजले .

दोन दिवस असेच गेले ..

आणि सतीश एक दिवस रात्री दहा वाजले तरी ऑफिसमधून आलाच नाही .

आता परत दारू ढोसून येतो वाटते असे रमाला वाटले

पण त्या रात्रभर सतीश आलाच नाही.

सकाळी मात्र तिने स्वतःचे आणि मेघनाचे आवरले .

मेघनाला नेहेमीसारखे काकुकडे सोडले ,काका काकूंना हे काही सांगण्यात काहीच अर्थ नव्हता .

तिने तिच्या ऑफिसमध्ये आपल्या रजेचा फोन केला

आणि चौकशीसाठी ती तडक सतीशच्या ऑफिसमध्ये गेली .

ऑफिसमध्ये लोक आताशी यायला लागले होते.

तेवढ्यात तिला सतीशचा मित्र मोहन दिसला .

त्यानेही तिला पाहिले आणि तिच्याजवळ गेला .

“नमस्कार वहिनी मी मोहन...
ओळखले न मला “

रमाने मान हलवली ..

तो म्हणाला , बोला काय काम होते इथे
रमा काळजीने म्हणाली ,

“सतीश काल पासुन घरी आला नाहीय

तुम्हाला माहिती आहे का तो कोठे आहे ?”

असे विचारताच तो म्हणाला गेले कित्येक दिवस सतीश ऑफिसला आलेलाच नाही .

हे ऐकल्यावर रमाला चक्कर आल्यासारखे झाले .

जवळच्या बाकावर ती मटकन बसलीच .

रोज सतीश डबा घेऊन ऑफिसला जायला बाहेर पडत होता .

ऑफिसला आला नव्हता मग जात कुठे होता हा ?

मोहन तिला जवळच्या लंच रूम मध्ये घेऊन गेला .

तिला प्यायला पाणी दिले .

आणि तिच्यासाठी कॉफी बिस्किटे मागवली .

सकाळच्या गडबडीत आणि विचारांच्या तंद्रीत तिने काहीच खाले नव्हते .

रात्री पण सतीशची वाट पहात ती न जेवताच झोपली होती .

कॉफी बिस्किटे खाल्ल्यावर तिला थोडी तरतरी आली.

तिने जे घडले ते मोहनला सांगितले .

मोहनने जे सांगितले ते ऐकुन ती अक्षरश: हादरलीच .

सतीशचा स्वभाव अतिशय चमत्कारिक होता .

ऑफिसमध्ये त्याचे कोणाशीच पटत नसे .

सतीशला दारूचे व्यसन होतेच .

ऑफिसला बरेच दिवस तो आलाच नव्हता .
याआधी पण थोडे दिवस रजेवरच होता

गेले वर्षभराच्या त्याच्या अनियमित उपस्थितीमुळे बरेच मेमो सुद्धा मिळाले होते त्याला

रजा शिल्लक नसल्याने या महिन्यात त्याचा पगार सुद्धा झाला नव्हता.

दारूच्या व्यसनामुळे त्याची मित्रांकडे उधारी असायचीच .

मागच्या महिन्यात पगार नसल्याने
त्याने दोन चार मित्रांकडून जरा जास्तच रक्कम उधार घेतली होती .

तिच्याशी बोलताना मोहन म्हणाला,”

“त्याचे मानसिक संतुलन सुद्धा बिघडलेले आहे .

मागच्याच वर्षी त्यासाठी त्याला दवाखान्यात पण ठेवले होते.

यासाठी काही गोळ्या पण चालू होत्या त्याला .

अधून मधून त्याला झटके पण येतात ,विचित्र वागतो तेव्हा तो ,

आणि नंतर त्याला आठवत पण नाही आपण काय केले ते ..

सतीश सारख्या माणसाशी तुम्ही लग्नच कसे केले ?
तुमच्या घरी मी त्याच्यासोबत आलो तेव्हाच मला नवल वाटले होते .

खरेतर त्याचे लग्न झाले ही बातमी त्याने ऑफिसमध्ये कोणालाच सांगितली नव्हती

तुमच्याकडे आम्ही काकांना भेटायला आलो होतो तेव्हा मी सतीशला सांगितले होते

असे कोणाला फसवून लग्न नको करूस .

त्यावर त्याने माझ्याशी बोलणे पण सोडले ..
आणि अचानक लग्नादिवशीच मला बोलावले

आता तो कुठे गेलाय हे आम्हालाही माहिती नाही .

फोनही लागत नाही त्याचा

रजा संपली तरी हजार झाला नाही म्हणून उद्या ऑफिसचा शिपाईच

तुमच्या घरी चौकशीला येणार होता “

ही नवीन माहिती समजल्यावर रमा हादरलीच होती ..

काय उत्तर देणार होती ती मोहनला तरी .

काय मदत लागली तर सांगा असे मात्र त्याने सांगितले .

शेवटी ती ऑफिसमधून बाहेर पडली ,त्याचा शोध कुठे घ्यायचा या काळजीतच .

नंतर पंधरा दिवस झाले तो घरी परतलाच नाही .

या काळात नोकरी , सतीशची काळजी
आणि ह्या सगळ्या गोष्टी काकांपासून लपवणे यात तिची दमछाक झाली .

तशात अचानक मेघनाला डायरिया मुळे दवाखान्यात दाखल करावे लागले .

तिच्या तातडीच्या उपचारासाठी तिच्याजवळची होती ती सगळी शिल्लक संपली .

सतीशचा पत्ता नव्हताच ...

काकाकाकूंनी पण चौकशी केली त्याची
पण ऑफिस कामासाठी गेला आहे असे सांगुन तिने वेळ भागवली .

तिचा पगार व्हायला अजुन पंधरा दिवस होते .

आता ही पैशाची अडचण कशी भागवायची असा विचार करता .

तिच्या लक्षात आले आता फक्त हातातल्या चार बांगड्या आहेत

त्या गहाण ठेवून थोडे पैसे उभे करावेत .

संध्याकाळी ऑफिसमधून येतायेताच ती सोनाराकडे गेली .

बांगड्या दाखवताच सोनाराने स्पष्ट सांगितले ह्या खोट्या आहेत .

हे ऐकुन ती थक्क झाली ,तसेच तिने मंगळसूत्र पण दाखवुन घेतले .

तिच्या अंदाजाप्रमाणे तेही खोटेच निघाले .

निराश होऊन ती घरी परत आली .

दुसऱ्या दिवशी तिच्या साहेबांकडे तिने पुढच्या महिन्याच्या पगारातली उचल मागितली .

आणखीन चार दिवसांनी एका संध्याकाळी सतीश दारात येऊन उभा राहिला .

म्लान चेहेऱ्याच्या त्याला बघुन तिला वाईट वाटले .

तो आला अंघोळ करून आधी मेघनाशी खेळायला लागला .

नंतर लगेच जेवायला बसला,फार भुकेला वाटत होता तो .

जेवण झाल्यावर रमाने इतके दिवस कुठे होतास विचारले .

पण काहीच सांगायला त्याची तयारी नव्हती .

बऱ्याच गोष्टींचा जाब तिने त्याला विचारला पण त्याने काहीच उत्तर नाही दिले .

फक्त माझे चुकले ,मी आता परत असा नाही वागणार एव्हढेच बोलत राहिला .

आता काय बोलणार माफी मागितलेल्या माणसाला तर माफ केलेच पाहिजे .

खोट्या दागिन्याविषयी विचारल्यावर ,”मी कुठून आणणार होतो सोन्याचे दागीने ?

आणि तुझ्या अंगावर लग्नात काहीतरी घालायला हवेच होते न .

नाहीतर तुझे काका काय म्हणाले असते ?

म्हणून मग मला हा पर्याय सुचला “...नि:शब्द रमा बघतच राहिली ..

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED