ती__आणि__तो... - 27 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती__आणि__तो... - 27

भाग__२७



दुपारी १ वाजता राधा मॅडम घरातील आवजाने उठली...तीच डोक खुप दुखत होत..आणि नाही काही आठवत होत😂😅मग तीं डोक धरून खाली आली तर समोर रणजीत,मालती बसले होते...



मालती: उठलीस का ग बाळा...ये बस...



राधा: (डोक धरून).... आई ग माझ डोक खुप दुखतय....



रणजीत: hangover आहे...डोन्ट वरी...आई लिंबु पाणी घेऊन या ना..



मालती: हो आले...



राधा: रणजीत...काल मी दारू प्यायले का रे...?



रणजीत: हो..वोडका प्यायलीस ते ही ४,५ ग्लास...



राधा: बापरे...मी पण कोणत्या नादात प्यायले काय माहित...😵



रणजीत: (थोड़ हसत)....ह्म्म्म😃😅



राधा: हसतोस काय...माकडा...



मालती: (लिंबु पाणी देत)......सोनू काय ग अस बोलतेस जावईना...



राधा: सॉरी ग...बर दे आता ते......(ग्लास घेत)



मालती: बर तुम्ही बोलात बसा मी आलेच...(किचनमध्ये जात)



राधा: आ...रणजीत....



रणजीत: ह्म्म्म...काय ग..



राधा: काल मी नशेत काय काय केल रे...म्हणजे..काही वेड वाकड नाही ना केल....🙄☹️बोल ना...



रणजीत: 😂🤣🤣🤣😅😅😅



रणजीतला आता काय बोलाव कळत नव्हतं...तो हसतच रूमकडे गेला...राधा ही तनतन करत त्याच्या मागे गेली...तो खोलीत गेल्या नंतर जोरात हसू लागला...😂🤣



राधा: (चिडून)....हसायला काय झाल...माझ्या प्रत्येक गोष्टीवर हसायला पाहिजेच का तुला...😏तुला विचारण म्हणजे गाढ़वाच्या कानात वाचली गीता..😏



रणजीत: आग आता काय सांगू तुला....बर ठीके तुला एकायच आहे ना...ऐक...



रणजीत तिला सगळ सांगतो...अगदी ती त्यांला किस करेपर्यंत सगळ...राधाला हे ऐकुन आता लाजेने मरावस वाटत होत...नंतर रणजीत पुन्हा हसू लागला...राधा बारीक तोंड घेऊन बाथरूममध्ये गेली...



मग राधा आणि रणजीतने सोबत नाश्ता केला...रणजीतला तिच्याशी बोलायचा होता...पन मालती असल्यामुळे तो गप्प बसला...दुपारी रणजीत झोपी गेला...तेव्हा मालती आणि राधा खाली बोलात बसल्या होत्या...



मालती: रणजीत राव जेवून मस्त झोपलेत...



राधा: ह्म्म्म...खुप दिवसांनी अस निवांत झोपलाय ग तो...नाहीतर नेहमी काम....बर मी गड़बड़ीत विचारायच विसरली.माझे कपड़े काल कोणी चेंज केले ग???



मालती: मीच ग रणजीत रावानी बोलावल मला...



राधा: (आतून खुश होत)......ह्म्म्म😍....



मालती: बाळा एक विचारु का ग?



राधा: बोल ना आई...



मालती: तुझ्यात आणि रणजीत रावानमध्ये अजुन नवरा बायकोच नातं नाही निर्माण झाल ना???



राधा: (गोंधळत).....आ आई आता तुझ्यापासून काय लपवू..हो नाही आहे आमच्यात तस नातं...नाही मनाच आणि नाही शरीराच..



मालती: ह्म्म्म...मी समजू शकते...पण बाळा एक सांगू का...



राधा: ह्म्म्म...



मालती: तुझा हा कान्हा आहे ना..तो विनाकारन कोणतीच गोष्ट करत नाही तो सगळ ठरवूनच करतो...राधू तुझ आणि रणजीतची लग्न गाठ ही त्याने तुम्ही जन्माला यायच्या आधिच बांधली होती...त्यामुळे तुझ्या,निशांतच्या आणि रणजीतच्या आयुष्यात कोणीही तीसरी व्यक्ती असती तरी ती दूर झालीच असती कारण तुमच्या गाठी आधीच बंधल्या होत्या...सो मला अस वाटत आता निशांतने नातं त्यांच स्वीकारला आहे तू ही स्वीकार...




राधा: हो आई खर आहे तुझ....




मालती: आणि मला काल रणजीतच्या डोळ्यात तुझ्यासाठी जे प्रेम,काळजी,आणि आदर दिसला ना तो कदाचित तुला ही नसेल दिसला...रणजीत तुझ्यावर प्रेम करायला लागलेत बाळा...आणि माझी नजर चुकत नसेल तर तू सुद्धा रणजीतवर प्रेम करायला लागलेस हो ना तुझ्या डोळ्यात दिसताय बाळा...म्हणूनच मी कालपासून जास्त खुश आहे...



राधा: (लाजुन).....हम्म...आ आ आई अग अस काही नाही...ते मी.....आई खरच माझ्या डोळ्यात दिसताय का ग...😃



मालती: हो बाळा...कस असत बग बाईची नजर ही नेहमी प्रेमाच्या शोधात असते..जेव्हा ते प्रेम तिला मिळत न तेव्हा ती टिकडेच स्थिररावते...समजल😃😉
मला सांग आताच्या तुझ्या फीलिंग्स मध्ये आणि आधिच्या फीलिंग्स मध्ये फ़रक आहे ना..



राधा: हो...मला ना त्याची सतत काळजी असते...तो जवळ आला की हृदय जोरात धड़धड़त...तो नसला की मझा जीव जागेवर नसतो..माझ्या जगण्याला तिच्याशिवाय अर्थ नाही...



मालती: हेच तर प्रेम आहे...बाळा आता सगळ निट बोल त्यांच्याशी..बोल्यानी सगळ क्लीयर होत ह्म्म्म...आणि अशीच सुखी राहा...निदान पुढच्या वर्षापर्यंत तरी आम्हाला नातीच तोंड दाखवा हु....😂



राधा: आई....☺️😚



मालती: छान लाजतेस हु...😂



राधा: 😂😂



रात्री सगळे मस्त जेवून आपल्या खोलीत गेले...राधा कारभारी लईभारी सीरियलचा रिपीट टेलीकास्ट बघत होती...रणजीत ही तिच्या बाजूला बसून पाहत होता पन टीव्हीमध्ये नाही राधाच्या चेहऱ्याकड़े...जशी त्या सीरियल मध्ये सॉन्ग वाजत होते...रोमांटिक सिन चालू होते तस राधाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते...मग राधाही ते गाण बोलायला लागली...



राधा: (टीव्ही बघत).....कारभारीsss माझ कारभारीsss..कारभारीss लईभारी माझ कारभारीsss....ह्म्म्म ह्म्म्मsss..


(तुम्हला ही सीरियल माहित असेलच☺️माझी तर आवडती आहे ही सीरियल )



रणजीत: गाण चांगल आहे😂



राधा: हो ना...चला संपली सीरियल...आता झोपते...



रणजीत: आ राधा ऐक ना



राधा: हु...



रणजीत: I'm really sorry राधा...त्यादिवशी तू रात्री फ़ोनवर बोलताना मी ऐकला आणि नंतर विक्रमला तू अस मीठी मारतांना पाहिला आणि मनात संशय निर्माण झाला आणि त्या रागात मी नको ते बोलो तुला..आणि फाडून टाक तो डिवोर्स पेपर....खरच सॉरी राधा...(रडत)...मला माफ कर आणि प्लीज आंपल्या घरी परत चल आणि ते डिवोर्स वैगेरा वीसर प्लीज.... मी पुन्हा अस नाही करणार....🙏



राधा: (रडत)....मला ही माफ कर रणजीत...मी पन रागात नको ते बोले...😥सॉरी...



नकळत दोघेही एकमेकांना मीठी मारतात...आणि मिठितच मोकळे होतात...किती भारी कपल अस्त ना ते ज्यांच्यात इतकी भांडण होतात तरी एका मनापासून बोलेल्या सॉरीने सगळे वाद मिटून जातात...♥️ मग राधा आणि रणजीत वेगळे होतात...आणि थोड़े लाजतच झोपी जातात...❤️त्यांच्यातले गैरसमज मिटले होते म्हणून आज शांत झोप लागनर होती त्यांना....


*************************************



राधा: गुड़ मॉर्निग....



मनोहर: गुड़ मॉर्निग फुलपाखरा...



मालती: ये बाळा बस...



रणजीत: गुड़ मॉर्निग...



मालती: गुड़ मॉर्निग...या तुम्ही पण बसा...



मनोहर: गुड़ मॉर्निग....



राधा: आई बाबा...आम्ही आज आमच्या घरी जातोय...



मनोहर: ओके...😃



मालती: ठीके बाळा...


*************************



राधा आणि रणजीत नाश्ता करतात...आणि तयारी करून घरी जातात....त्यांना आलेला पाहून सगळे खुप खुश होतात...



माधवी: या..या...क़ाय सुनबाई इतके दिवस राहीलीस माहेरी...आमची आठवण आली नाही का



सुमन: हो ना...



राधा: अस काही नाही आहे...खुप आली आठवण मला...बर बबडू,ताई,दादा कुठे आहेत सगळे....



रणजीत: ग सगळे त्यांच्या कामला...रम्या वहिनी येईल आता बबडूला सोडून स्कुलला...



राधा: ह्म्म्म...बर आई काकू मीआलेच पटकन आजीना भेटून...



रणजीत: हा तू ये भेटून मी बैग ठेवतो...



राधा: ओके...आलेच...



रणजीत: ह्म्म्म...



राधा: (दार नॉक करून).....आजी...क़ाय करताय?



आजी: अरे राधबाई...ये ये...कधी आलीस माहेरुन...



राधा: आता आले आजजी...कशा आहेत...



आजी: मी मस्त...आणि तू माहेरी गेली होतीस तर जाड़ होऊन यायचा ना तर अजुन बारीक होऊन अलीस...



राधा: ह्म्म्म...क़ाय करू आता आजजी..



आजी: बर फ्रेश झालीस का...



राधा: नाही ना



आजी: जा म आधी फ्रेश हो मग बोलुया आपण...



राधा: ओके आलेच...


**************************



राधा खोलीत जाते...आणि फ्रेश होते...बाहेर आल्यावर ती रेडियो ऑन करते आणि सॉन्ग्स एकतच तिचे कपड़े कपाटात लावते...रणजीत येतो आणि राधाला अस रूममध्ये पाहून त्यांला खुप बर वाटत...खुप दिवसांनी त्यांला त्याची खोली वाटत होती..आणि राधाचा तो निरागस,आनंदी चेहरा रणजीत तसाच दरवाजा जवळ उभा राहून पाहत बसला...



मग राधा रणजीतचे शर्ट निट लावन्यासाठी हँगल बघते तर ते कपाटावर होते म्हणून ती कपाटावर पाया देऊन ते कढायच प्रयत्न करते...पन तरीही ते निघत नाहीत...मग रणजीत तिच्या मागून येतो आणि हँगल काढू लागतो..राधा त्याच्याकडे एकटक बघू लागते जस रणजीतची नजर पड़ते तस तो ही तिच्या डोळ्यात पाहतो..आणि हरवून जातो...



ला ला ला ला...
गुलाबी आँखे जो तेरी देखी
शराबी ये दिल हो गया
सँभालो मुझको मेरे यारो
संभलना मुश्किल हो गया...❤️


दिल मे मेरे ख्वाब तेरे
तस्वीर जैसे हो दीवार पे
तुझपे फिदा में क्यो हुआ
आता है गुस्सा मुझे प्यार पे
में लूट गया मान के दिल का कहा
में कही का ना रहा
क्या कहु में दिलरुबा
बुरा ये जादू तेरी आँखों का
ये मेरा कातिल हो गया...


गुलाबी आँखे जो तेरी देखी

शराबी ये दिल हो गया

सँभालो मुझको मेरे यारो

संभलना मुश्किल हो गया...❤️



यांची नजरानजर चालू होतीच की तोवर रूममध्ये आजी आणि रेवा आल्या....आणि ह्या दोघाना समजल ही नाही...😂हे अस झाल की "हम अपने मस्ती में आग लगे बस्ती में"😂❤️



क्रमशः
(आता तरी खुश ना मंडळी...मिटली बर त्यांची भांडण....आता बघू पुढे क़ाय होता.....☺️)