मी Supriya Joshi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी

गेले कित्येक दिवस मन बैचैन होते. कशातच लक्ष लागत नव्हते, खूपच चिडचिड होत होती. माझा हा अवतार बघून मुलंतर सोडाच पण हेपण घाबरले होते. काय झाले म्हणून विचारायचे त्यावर मला स्वतःलाच काय झाले काळात नसल्यामुळे उत्तर देण्याऐवजी अजून चिडत होते. त्यामुळे सगळ्यांनी काय झाले हे विचारणे पण बंद केले होते. वीणकाम, पैंटिंग करून लगेच ताजीतवानी होणारी, ह्यावेळेस सुई किंवा ब्रश हातातच घ्यावासा वाटत नव्हता आणि घेतला तरी काही करायला सुचत नव्हते त्यामुळेतर आणखीनच चिडचिड होत होती. हो! स्वतःबद्दल सारखे प्रश्न मात्र पडत होते.
कोण आहे मी? विचार करता करता नक्की मी कोण आहे तेच कळेना. मी कोणाची तरी लेक आहे, तर कोणाची लाडकी नातं आहे, कोणाची तरी मैत्रीण आहे, तर बायको आहे, कोणाची तरी सून आहे, तर आई आहे, कोणाची तरी बहीण, वाहिनी, नणंद बरेच काही आहे. पण मी माझी कोण आहे? आजकाल सारखेच मला हे प्रश्न का पडत आहे तेच कळत नाहीये. काय झाले आहे मला? मी मला शोधायचा का प्रयत्न करत आहे? आत्ता ह्या वयात स्वतःला शोधण्याचा का हा अट्टाहास? काही समजेनासेच झाले आहे. विचार करता करता आता असे वाटत आहे कि बहुतेक मी आजपर्यंत मी म्हणून जगलेच नाही. जन्म झालेल्या क्षणापासूनच कोणतेतरी नाते डोक्यावर घेऊन मी जगत आले आहे, कुठले तरी बंधन ठेवून जगत आहे किंबहुना लहानपणापासून ह्या बंधनाची जाणीव करून देण्यात आली आणि त्या प्रमाणे मी वागत आहे. माझी मी म्हणून कधी जगायला मिळालेच नाही. कधी प्रयत्न केला असेल तेव्हा पण लगेच पायात बेड्या पडल्या स्वतःच्या स्वतःच. कुठलीही वेगळी गोष्ट करावीशी वाटली कि कोणी आपल्याबद्दल वाईट विचार करेल का? आणि मग तेव्हा "जग काय म्हणेल?" हा विचार मनात येऊन कधी मोकळेपणाने जगताच आले नाही. हाच विचार चालू असताना अचानक एका डोंगरावर फिरायला जायचा योग आला.. तिथे डोंगराच्या कडेवर उभे राहून तिथून सोंदर्य बघताना इतर जे बघत होते ते न बघता मला स्वतःला जे छान वाटत होते तिकडेच नजर जात होती. तेव्हा असे वाटले कि हीच मोकळी हवा , नजरेला पडणारे हे सौन्दर्य, हाच मोकळा श्वास घेऊन जगायला आवडेल मला. त्याचवेळी मला इरफान खान ह्यांनी लिहिलेल्या आणि अमेय वाघ ह्याने मराठीत अनुवादीत केलेल्या पत्रातले हे वाक्य आठवले, "जीवनाचा खेळ आणि मृत्यूचा खेळ ह्यामध्ये एकच रस्ता आहे. रस्त्याच्या एका बाजूला हॉस्पिटल आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेटचे मैदान, दोन्ही खेळात अनिश्चितता आहेच". ह्या विश्वाच्या ताकतीचा आणि हुशारीचा साक्षात्कार मला त्या क्षणी झाला आणि माझा प्रवास तिथूनच मी सुरु केला. सगळेजण तिकडून दुसरीकडे बाकीचे सौन्दर्य बघायला गेले पण मला तिथेच थांबून मोकळी हवा चाखायची होती, त्याची चव घायची होती, ती अंगावर ल्यायची होती, ती मोकळी हवा ऐकायची होती, म्हणून मी तिथेच थांबले. सगळे बोलावत असताना मी स्वतःला पहिल्यांदा ऐकले. त्याचा आनंद काही वेगळाच होता. ५ मिनिटांनी स्वतःला थांबवून, मनाला मुरड घालून परत सगळ्यांबरोबर जॉईन व्हायला निघून गेले. खूपच विरस झाला स्वतःबद्दल . पण मी असे स्वतःला लगेच बदलू शकणार नव्हते, मी हि अपेक्षा करणे पण चूकच आहे. मला निदान ह्याचा तरी आनंद आहे कि मी त्यावाटेने चालायला सुरुवात तरी केली आहे आणि मला नक्की खात्री आहे की माझ्या ह्या वाटचालीत नक्कीच यशस्वी होणार. परत त्याच पत्रातल्या ओळी आठवल्या,"समुद्रात पडलेलं ते बाटलीच् बूच. त्याने समुद्रातल्या लाटांवर ताबा मिळवायची गरजच नाहीये, मला वाटत त्याने निसर्गाच्या लाटांवर तरंगत राहावं, इथेच पडून राहावं. शांत आणि निश्चित".


सुप्रिया कुलकर्णी