Sahvas - last part books and stories free download online pdf in Marathi

सहवास - शेवट

नीरा उठून बाथरूम मध्ये गेली सर्व स्वतःच व्यवस्थित ड्रेस अप केलं आणी बाहेर कॅन्टीनमध्ये येवून तीने दोन चहा बनवले .. एक स्वतः घेत एक तिने रामनाथ ला दिला .. त्याने तो पिला ..
मॅडम मस्त बनला चहा ... थोडं डोक्यात रूमरूम होतेय .. कैसा तो भी लाग रहा है ...
ठीक है आप थक गये होंगे.. थोडा नहा लो और सो जाओ ..
ठीक है मॅडम ... मै बाहर के रूम मी थोडा सोता हूं
रामनाथ बाहेर गेला .. निराने कॅमेरा फुटेज क्लिअर केले आणि घरी निघून गेली .. ती सकाळी उठली तर ऑफिस मधून फोन होता

मॅडम गार्ड दार नाही उघडत आहे ..
निराने .. एक स्वतःलाच स्मित हास्य दिल आणि ती तयार होऊन निघाली ... आज तिच्या ओठांवर एक गीत होतं ..
नीरा पोहचली तर दारासमोर गर्दी होती संपूर्ण ऑफीस बाहेर उभं होतं तिने पोलिस ला फोन केला आणि तिने दार ठोकायला सुरुवात केली .. थोड्यावेळात पोलीस आले आणि त्यानि दार तोडले समोर बघतात तो रामनाथ बेहोष होऊन पडला होता पोलिसांनी डॉक्टर बोलावला आणि त्याने त्याला तपासून सांगितलं कि तो स्वर्गलोकात गेलाय .. सर्व काळजीत असताना नीरा मात्र खुश होती ... समोर पोस्टमार्टम झालं आणि रामनाथ हार्टअटॅक ने गेल्याचं कळलं ...

सुमती ने सकाळी बेचैन होऊन शब्द ला फोन केला तो थोडा बेचैन होता .. का सकाळीच फोन आला म्हणून
बोल सुमती
काय करतोस हे शब्द .. तुला एवढं कमी पडतंय तर परत ये इकडे
कशाबद्दल बोलतेस तू ?
तुझ्या अन शिराजच्या अफेयर बद्दल
शब्द शांत झाला .. सुमती त्याला भडाभडा बोलत राहिली पण तिच्या प्रश्नाचं उत्तर शब्द कडे नव्हतं ... त्याने फ्रँकफोर्ड ला यायला होकार दिला ... आणि त्याने निराला फोन केला

नीरा .. मला माझ्या फ्रँकफोर्डची तिकीट हवी आहे उद्याची
सर काही अर्गेन्ट का?
हो सांगतोच तुला ...
निराने तिकीट बुक करवून शब्द ला पाठवल्या आणि त्याने २४ तासात व्हिसा मिळेल ह्याची अरंजेमेंट केली ..

शब्द ऑफिस ला आला .. त्याने सर्वांची मीटिंग बोलावली आणि त्याने सर्वाना सांगितलं ... कि त्याने कंपनी सोडून आता फ्रँकफोर्डला शिफ्ट व्हायचा प्लॅन केला आहे .. आणि नेक्स्ट सी इ ओ .. नीरा माथूर असेल .. निराला तो शॉक होता ती बघतच राहिली तिला कळत नव्हतं हसू कि रडू ... ती आपल्या टेबल वर येऊन बसली .. आणि स्वतःला स्वप्नाच्या दुनियेत तर नाही ना म्हणून चिमटे काढू लागली ...

तेवढ्यात एक ऑफीस बॉय आला आणि त्याने सांगितलं कि आज शब्दचि सेंड ऑफ पार्टी आहे .. ९ वाजता हॉटेल ली मेरिडियन अंधेरी ला ... नीरा ने तो मेसेज घेतला आणि ती निघाली ...

लाल शिफॉन ची साडी त्यावर गोल गळ्याच ब्लॉऊस .. सिल्वर मेटॅलिक नेकलेस .. झुमक्याचे सिल्व्हर मेटॅलिक कानातले .. ओठांवर ऑरेंज टोन लिपस्टिक .. केसांचा बन आणि त्यावर मोगरा .. कमरेला साजेसा कंबरपट्टा .. हाय हिल्स .. हाताला बाजूबंद नाजूकसा ... डोळ्यात नशा .. आणि ओठांवर हसू ...अशी नीरा हॉटेल मध्ये एका बाजूला उभी राहून रेड वाईन च्या ग्लास मधून एक एक घुट घेत होती ... पार्टी चालू होती आणि ती सर्वाना दुरून बघत असताना शब्द जवळ आला ...

चीअर्स ... रेड वाईन
येस शब्द ..
चीअर्स ..
डान्स ..
व्हाय नॉट ...
शब्द ने निराच्या कमरेला हात घालून तिचा एक हात हातात घेतला आणि एक सुथिंग म्युझिक वर डान्स करू लागले ..
मिस करेल मी ती रात्र .. नीरा हळूच बोलली
मी पण ... भेटूयात कधी जर इंडिया मध्ये आलो तर किंवा तू तिकडे आली तर
हो .. भेटणार ना
हो का नाही
एक रात्र हवी आहे पुन्हा .. मिळेल निराने त्याच्या डोळ्यात डोळे मिसळून विचारले
चल वर एक रूम आहे लेट्स डू प्रायव्हेट पार्टी ..
हुह .. ती त्याचा हात पकडून निघाली ...

रूम मस्त होती .. मंद दिव्याच्या झोतात चमचमती ... एक सुंदर लुसलुशीत बेड .. एक छानशी गॅलरी ... एक मस्त फ्लॉवर बेड .. मंद संगीत ... रेड वाईन ची बॉटल ...सर्व बांध सुटलेले नखशिखांत प्रेमात भिजलेले ... ती आणि तो .. एक मावळता सूर्य आणि उगवता चंद्र ... आणि तोच सहवास प्रत्येकाला हवा हवासा ... प्रत्येकाला ना सांगता येणारा .. कि तो सहवास हवा आहे म्हणून ... त्यानं दोन प्रतिकृतीतून .. सहज फुलणारा तो मद्यधुंद सहवास ....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED